●अशी गावी मराठी गझल●
सुरेश भट यांच्या निवेदनासह त्यांचीच गझल...
महाराष्ट्र साहित्य परिषद,पुणे.१९८२
"हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही
चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही"
जे तुला दिले होते तेच ओठ दे माझे
मागचे जुने देणे टाळणे बरे नाही
ऐक तू जरा माझे सोड मोह स्वप्नांचा
आजकाल स्वप्नांचे वागणे बरे नाही
जाहली न कोणाची आज राख रांगोळी
आपुलीच रांगोळी काढणे बरे नाही
आज मोकळे बोलू, आज मोकळे होवू !
जीव एकमेकांचा जाळणे बरे नाही
कालचा तुझा माझा, चंद्र वेगळा होता
हे उन्हात आलेले चांदणे बरे नाही
मैफलीत या माझ्या पाहतेस का खाली
हाय, लाजणाऱ्याने जागणे बरे नाही
गझल - सुरेश भट
गायक - सुधाकर कदम
● old live... headphon please


No comments:
Post a Comment