गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Sunday, June 30, 2019

फडे मधुर खावया...


 कलवंताचा मेंदू जरा तिरका असतो.
त्याच्या कलेत तो सरळ चालतो.
पण त्या कलावंताला सांगितलं की,जरा काही लिहा...
तर त्याचा चपखल तिरका मेंदू आपल्या जगण्यातल्या नेहमीच्या गोष्टी कशा वेगळ्या शब्दात आणि कलावंती ढंगात पकडतो याचं उदाहरण म्हणजे हे पुस्तक...

-राजन खान
.................................

●फडे मधुर खावया...
(लेख संग्रह)
सुधाकर कदम
................................
● अक्षर मानव प्रकाशन,
पुणे
किंमत-१५०रु.
.................................
● पुस्तक घरपोच मिळण्यासाठी 
8888858850
9822400390
या क्रमांकावर फोन करून पुस्तक बुक करता येईल.
● ऑनलाइन पेमेंट करिता खाते क्र.
A/c no : 053312100004140
IFSE Code : BKID0000533
बँक ऑफ इंडिया,पुणे.


चकव्यातून फिरतो मौनी...

जगात बरीच अवलिया माणसं असतात.आपल्या धुनकीत जगत राहतात आणि मोठी होतात.अशाच एका अवलिया माणसाच्या जीवन प्रवासाचा वेध घेणारा हा ग्रंथ.
नाव,सुधाकर कदम.काय येत नाही या माणसाला,आणि काय केलं नाही आयुष्यात या माणसानं?एका खेड्यातला जन्म,शेतकरी कुटुंब,स्वतःच्या बळावर संगीत शिकला,ऑर्केस्ट्रा चालवला,शास्त्रीय संगीताची बहुतेक वाद्य वाजवली,इतरांनाही संगीत शिकवलं,मराठी आणि उर्दू-हिंदी गझल गाउन लोकांपर्यंत पोहचवली,मुलांसाठी गाणी रचली.
हा माणूस लेखकही आहे.गंभीर आणि विनोदी लिहिलंय यानं.चांगला कवी सुद्धा आहे.चित्रकलेची उत्तम जाणही आहे.शिवाय लोकांच्या भल्याचं थोडं राजकारण आणि समाजकारणही केलं यानं.
आपल्या मस्तीत आणि नजाकतीत जगला,मित्र जोडले,संसार केला,पण सर्वात महत्वाचं,आपल्या संसाराकडे दुर्लक्ष नाही केलं,तो ही नेटका केला.कवितेचं अवलियापणही जपलं.
त्याच्या जगण्याचा प्रवास हा एक संदर्भग्रंथ झाला.वर्तमान आणि भविष्यातल्या पिढ्यांसाठी तो ग्रंथ म्हणूनच या पुस्तकाच्या रूपानं संकलित केलाय.समाजाला त्याचा नक्कीच उपयोग होईल.

-राजन खान

.................................

● चकव्यातून फिरतो मौनी
(सन्मानग्रंथ)
संपादक-श्रीकृष्ण राऊत
................................
● अक्षर मानव प्रकाशन,
पुणे
किंमत-२५०रु.
.................................
● पुस्तक घरपोच मिळण्यासाठी 
8888858850
9822400390
या क्रमांकावर फोन करून पुस्तक बुक करता येईल.
● ऑनलाइन पेमेंट करिता खाते क्र.
A/c no : 053312100004140
IFSE Code : BKID0000533
बँक ऑफ इंडिया,पुणे.





संगीत आणि साहित्य :