गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Wednesday, April 27, 2022

मराठी ग़ज़ल गायन में मील का पत्थर...राजेश माहेश्वरी.


     आर्णी जि . यवतमाल के विख्यात संगीतकार एवं ग़ज़ल गायक श्री . सुधाकर कदम जो सन १९७५ से संगीत से जुडे है अब महाराष्ट्र की सांस्कृतिक राजधानी पुणे मे स्थित होकर अपनी आवाज एवं संगीत का जादू फैला रहे है . प्रख्यात कवि सुरेश भट के शब्द एवं सुधाकर कदम का सुर यानी ग़ज़ल गायकी में इंद्रधनुष समान प्रतीत होता है . सन १ ९ ७० से सुधाकर कदम ने ग़ज़ल गायन क्षेत्र में कदम रखा . मराठी ग़ज़ल गायन की तीन घंटे की महफिल सजाकर कार्यक्रम करनेवाला महाराष्ट्र मे एक भी ग़ज़ल गायक नहीं था यह बात खुद ग़ज़लकार सुरेश भट कहते थे . सुरेश भट एवं सुधाकर कदम इस जोडी ने मराठी गझल एवं ग़ज़ल गायकी जनता तक पहुंचाने हेतु सन १९८०-८२ से इन तीन वर्षों तक पूरे महाराष्ट्र का दौरा कर गझल के कार्यक्रम प्रस्तुत किए . तभी से महाराष्ट्र में मराठी ग़ज़ल क्या चीज है इसका पता चला , लोकप्रियता बढने लगी , तभी से कई गायकों न ग़ज़ल गायकी की ओर रुख किया . पर आज भी मराठी ग़ज़ल गायकी में सधाकर कदम का स्थान मिल का पत्थर है . इसलिए सुरेश भट जैसे महान कवि ग़ज़लकार उन्हें आदय मराठी ग़ज़ल गायक कहते थे . वह प्रमाणित होता नजर आ रहा है . 


     उर्दू , हिंदी , ग़ज़ल अलग बात है वहाँ मराठी गझल प्रस्तुत करना कठिन था . हिंदी , उर्दू , मराठी यह केवल भाषा नहीं है , भाषा के साथ उसकी संस्कृती के अनुसार भाषाओं का रुप बदलता है . भाषा की विशेषताओं के चलते ही संस्कृति का आंगन फलफूल है . ग़ज़ल के संदर्भ में यह अधिक सटिक बैठता है क्यों कि , उस प्रकार ढंग कोई मराठी का नही . अरबी , उर्दू भी उस प्रकार के काव्यों के गर्भ के भीतर की नाल . कहने का मतलब जो प्रकार अपनी भाषा में नहीं उसको आत्मसात करके सुधाकर कदम ने अपने कार्यक्रमों की प्रस्तुति कर सफलता के कदम चुमे है . उन्होंने हिंदी , उर्दू जैसी आसान राह न चुनते हुए मराठी ग़ज़ल गायन का कांटों से भरा सफर अपना कर मराठी ग़ज़ल गायन को नया 

आयाम देकर उसे लोकप्रियता के शिखर तक पहुंचाया जो कि एक ऐतिहासिक कार्य की पूर्तता करने जैसा है . तथा इनकी मराठी ग़ज़ले भी उर्दू की तरह मधुर एवं कर्ण प्रिय होती है . मराठी ग़ज़ल गाते हुए उसे शब्दों के अनुसार स्वर , साज , संगीत देना भी महत्वपूर्ण है . उसमे भी सुधाकर कदम ने अपने संगीत के बलबूते सफलता प्राप्त की . आज भी उनकी ' हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही , ' ' झिंगतो मी कळेना कशाला , ' ' मस्तीत गीत गा रे , ' लोपला चंद्रमा लाजली पौर्णिमा , ' ' या एकले पणाचा छेडीत मी पियानो , ' ऐसी गई मराठी ग़ज़ले श्रोता गुनगुनाते है यह उनके संगीतकार के तौर पर सफलता पाने का गौरव है . 


     सन १९८७ में कक्षा १ ते १० तक मराठी शालेय किताबों की कविताओं को संगीतबध्द किया . हाल ही में कक्षा एक एवं पांच के शालेय मराठी के किताब की कुछ कविताओ को संगीत दिया . जिसका ध्यनिमुद्रण पुणे के बालचित्रवाणी में किया गया . जिस की सीडी , कैसेट महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक महामंडल द्वारा निर्माण की है . सुधाकर कदम द्वारा संगीत बध्द किया गया ' हे शिव सुंदर समर शालिनी महाराष्ट्र माऊली ' यह ज्येष्ठ कवि कुसुमाग्रज व्दारा रचित महाराष्ट्र गीत महाराष्ट्र सरकार के गीत मंच विभाग द्वारा संपूर्ण महाराष्ट्र में छात्रों को पढाये जाने के बाद आज संपूर्ण राज्य में सभी छात्र एवं सुरताल के साथ यह गीत गाते नजर आते है . 


      उर्दू ग़ज़ल गायन संगीतबध्द करने में सुधाकर कदम कम नही . उनका उर्दू ग़ज़लों पर आधारित ' तसव्वूर ' नामक ग़ज़लों भरा नजराना पश्चिम महाराष्ट्र में धूम मचा रहा है . सुधाकर कदम का पूरा परिवार संगीत , सुरों का दीवाना है . भैरवी , रेणू यह दोनों पुत्रियां गायिका एवं पुत्र निषाद जो कि तबले का मास्टर है . तथा उन्होंने ' तसव्वूर ' उर्दू ग़ज़ल एवं ' सरगम तुझ्याच साठी ' यह मराठी गीत गझलो का कार्यक्रम लोकप्रिय हुआ है . सुधाकर कदम द्वारा मराठी ग़ज़लों को स्वर बध्द करने एवं गायकी के योगदान के चलते उन्हे अखिल भारतीय ग़ज़ल परिषद द्वारा ' शान - ए - ग़ज़ल ' पुरस्कार से गौरवान्वित किया गया है . जो कि उनके कार्यों की पहचान है . विख्यात कवि ग़ज़लकार सुरेश भट ने एक कार्यक्रम के दौरान सुधाकर कदम को ' मराठी का मेहदी हसन ' की उपाधि तक दे डाली थी . सुधाकर कदम जो की बडी तन्मयता से गाते है तब शब्दों का अस्तित्व जान पडता है . गुलाबी जख्मों पर धीरे - धीरे सुरुर चढता प्रतीत होता है . पहाडी आवाज , गझलों का चयन , शब्दों का ठोस उच्चार , उनकी विशेषता है . विदर्भ के आणी जैसे छोटे से नगर का अदनासा कलाकार महाराष्ट्र की सांस्कृतिक राजधानी पुणे में विदर्भ एवं आर्णी शहर का नाम मराठी ग़ज़ल गायकी एवं स्वरबध्द गीतो से गौरवान्वित किया जा रहा है . 


( दैनिक भास्कर , यवतमाल जिला विशेष परिशिष्ट , २३ / ९ / २००६ )

Sunday, April 10, 2022

मराठी गझल व सुधाकर कदम...प्रा.अशोक राणा



   गझल हा फारसी प्रकार माधव ज्युलियनांनी मराठीत आणला.त्याला मराठमोळे रूप दिले ते सुरेश भटांनी आणि मराठी गझल कशी गावी हे शिकवले सुधाकर कदम यांनी. #अशी_गावी_मराठी_गझल या शीर्षकाखाली महाराष्ट्रभर गझलगायनाचे कार्यक्रम करून गझल सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचे श्रेय त्यांना जाते.या कार्यक्रमात कविवर्य सुरेश भटांनी निवेदन करून त्यांच्या ऐतिहासिक कार्यावर शिक्कामोर्तब केले. 

     असा हा लोकविलक्षण गायक व संगीतकार . माझा मित्र आहे याचा मला अभिमान आहे . त्याची प्रारंभीची वाटचाल मी पाहिली आहे . त्याचबरोबर या क्षेत्रावर आपला ठसा उमटविण्याकरता त्याने केलेला संघर्ष व त्यात त्याची ससेहोलपटसुध्दा मी जवळून अनुभवली । 

     यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी या सध्याच्या तालुक्याच्या गावी ( तालुका पण खूप नंतर झाला. ) संगीत शिक्षक म्हणून सुधाकर कदम यांनी आपल्या कामगिरीचा प्रारंभ केला .( त्याअगोदर यवतमाळच्या भाग्योदय कला मंडळात वयाच्या १६ व्या वर्षापासून त्यांनी गायक , वादक व संगीतकार म्हणून १० वर्षे काम केले होते . ) विदयार्थ्यांपर्यंत संगीत कलेतील सौंदर्य व लय पोचविण्यात त्यांनी आपले सारे कसब पणाला लावले . पाठ्यपुस्तकातील कवितांना चाली लावून त्याचे गायन शाळा - शाळांमधून केले . पुढे त्याच्या कॅसेट्स महाराष्ट्रत लोकप्रिय झाल्यात . वडील वारकरी संप्रदायाचे गायक असल्यामुळे सुधाकरवर बालपणीच संगीताचे संस्कार झाले होते . वारकरी संप्रदायातील सर्वसमावेशकतेचा वारसाही त्याला लाभला . त्याचा खरा लाभ आर्णीच्या श्री महंत दत्तराम भारती विद्यालयाच्या विदयार्थ्यांना झाला . ते विदयार्थी धन्य होत , ज्यांना सुधाकर कदमांसारखा गुरू लाभला . 

     यवतमाळच्या समर्थवाडीत सुधाकरचे घर होते . मी यवतमाळ येथील हिंदी हायस्कूलमध्ये चित्रकला शिक्षक म्हणून १९७९ मध्ये रुजू झालो . याच शाळेत संगीत शिक्षक पदावर विनायक भिसे कार्यरत होते . दोघेही कलाशिक्षक असल्यामुळे बहुतांश प्रसंगी दोघांवर सारख्याच जबाबदाऱ्या यायच्या . त्यामुळे आमची दोघांची गट्टी जमली . पदवी परीक्षेसाठी मी संगीत विषय घेतल्यामुळे मला अमोलचंद महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागला . या महाविद्यालयात प्रा . पुरुषोत्तमराव कासलीकर हे विभाग प्रमुख होते . त्यांच्याकडे माझे संगीत शिक्षण सुरू झाले . तेथेच माझा परिचय सुधाकर कदमांशी झाला . 

     यवतमाळ हे कलारसिकांचे गाव आहे . तेथील काही संगीत प्रेमींकडे गाण्याच्या मैफिली नेहमीच होत . तेथे भिसेंसोबत तानपुरा संगत करायला मी जात असे . तेथे सुधाकर कदम यांचेही गायन हमखास होत असे . भिसे व सुधाकर हे दोघेही कासलीकर गुरुजींचे शिष्य होते.त्यामुळे कासलीकरांनी आयोजित केलेल्या समारंभामध्ये सुधाकरचीही हजेरी राही.वर्षातून एकदा संगीत महोत्सवाचे आयोजन कासलीकर गुरुजी अमोलकचंद महाविदयालयात करीत असत .त्यात विदर्भातील नामवंत कलाकार आपली कला सादर करीत असत.अशाच एका महोत्सवात सुधाकर कदम यांनी #संतूर_वादन केले. .त्याचे रेखाचित्र पेन्सिलने रेखाटले होते . त्यापूर्वी पं . शिवकुमार शर्मा यांचे हुबेहूब रेखाचित्र काढल्याबद्दल मला शाबासकी मिळाली होती.संतूर वादनात मार्गदर्शन न मिळाल्यामुळे पुढे सुधाकरने  फारशी मजल मारली नाही . त्याचा बराचसा काळ विविध कलांशी आपले नाते सांगण्यातच गेला. एक हरहुन्नरी कलावंत व मनमिळावू शिक्षक अशी ओळख करवून देण्यात भरपूर मेहनत केली . अनेक नव - नव्या कवींच्या रचना गाऊन त्याने कवींचा स्नेह संपादन केला . त्यात भर पडली ती एका प्रस्थापित कवीची व ते म्हणजे सुरेश भट . 

      सुरेश भटांच्या कविता सुमन कल्याणपूर , लता मंगेशकर , आशा भोसले , सुरेश वाडकर , अरुण दाते , वगैरे गायकांनी गायिल्या होत्या . त्यामुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती . गझल हा फारसी काव्यप्रकार मराठमोळेपणात घोळवून त्यांनी मराठी गझलकार म्हणून ख्याती प्राप्त केली होती . त्यांचे हे स्थान डळमळीत करण्याचा प्रयत्न तत्कालिन अनेक प्रस्थापित कवींनी करून पाहिला . पण त्यांना यात यश मिळाले नाही . या काव्यप्रकारावर आपली पकड कायम राहावी याकरीता सुरेश भट सतत सावधगिरी बाळगून खूप मेहनत घ्यायचे . त्यांनी काही वृत्तपत्रांमध्ये सदरे लिहून गझल कशी लिहावी याचे धडे नवकवींना दिलेत . ' गझलेची बाराखडी ' या नावाने त्यांनी अनेकांना दस्तावेज पाठविला . एक चळवळ म्हणून सुरेश भटांनी सातत्याने हा उपक्रम राबविला . मी अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयामध्ये बी . ए . भाग २ मध्ये असताना सुरेश भटांचा ' रंग माझा वेगळा ' हा काव्यसंग्रह मराठी कला साहित्य या प्रश्नपत्रिकेसाठी नेमलेला होता . तो विकत घेण्याची ऐपत नसल्यामुळे एका वहीत त्यातील सर्व कविता मी लिहून काढल्या . त्यांच्या अनुकरणातून मीही गझला लिहिल्यात . त्या कुणी तरी गाव्यात म्हणून मी गायकाच्या शोधात होतो . सुधाकर कदम माझी गझल केव्हा तरी गायील अशी आशा मला होती . पण त्याला माझ्या गझला दाखविण्याचे धाडस मला झाले नाही . 

      पुढे सुरेश भटांचा व सुधाकर कदमांचा परिचय झाला . जवळीक वाढली . एकमेकांकडे येणेजाणे सुरू झाले . सुरेश भटांच्या गझला सुधाकरने स्वरबध्द करून कार्यक्रमांमधून व आकाशवाणीवरून गायला सुरुवात केली . अशा प्रकारे सुरेश भट व सुधाकर कदम हे समीकरणच बनले . यातूनच ' #अशी_गावी_मराठी_गझल ' या कार्यक्रमाची निर्मिती झाली . आपल्या आवाजात सुरेश भटांच्या गझला अल्बमच्या रूपाने रसिकांपुढे येतील अशी आशा सुधाकरला असावी व तसे ते स्वाभाविकही होते . कारण की सुरेश भटांनी तसे आश्वासन त्यांना दिल्याचे माझ्या ऐकिवात होते.

     सुरेश भटांचा ' एल्गार ' हा संग्रह त्याच्या सामाजिक आशयातील गझलांमुळे आगळावेगळा ठरला . त्यातील बहुतांश गझलांची निर्मिती सुधाकर कदमांच्या आर्णी येथील निवासस्थानी झाली होती . त्यावेळी ते वर्षातील अनेक दिवस , आठवडे आर्णीला राहत असल्याचे माझ्या काही मित्रांनी मला सांगितले . सुरेश भटांना एक दिवस सांभाळणे हे एक आव्हानच असायचे हे त्यांच्या चाहत्यांना चांगलेच ठाऊक आहे . या पार्श्वभूमीवर सुधाकर कदम यांची किती दमछाक झाली असेल याची कल्पनाच केलेली बरी . 

      सुधाकर कदम यांच्या तपश्चर्येला जे अपेक्षित फळ यायला हवे होते तसे मात्र आले नाही . अर्थात सुरेश भटांच्या गझला कॅसेटच्या रूपात रसिकांपर्यंत पोचल्या नाहीत . कुठे माशी शिंकली कुणास ठाऊक , प्रत्यक्ष गझल रेकॉर्ड झाल्या त्या अरुण दाते , सुरेश वाडकर ,
इ . पुरुषांच्या आवाजात . एक स्वप्न भंगले . या अनुभवातून सुधाकर जाताना मी पाहिला . म्हणून काही अप्रिय अनुभवाची नोंद मला करावी लागत आहे . त्याबद्दल सुरेश भरांचे भक्त मला क्षमा करतील अशी अपेक्षा आहे . मी तसे केले नाही तर मात्र मी करणे कठीण जाईल असे वाटते . 

     काही कारणांनी भटांनी काही कालावधीनंतर सुधाकर कदमांना जाहीर कार्यक्रमातर आपल्या गझला गाण्यास मज्जाव केला . एका खाजगी कार्यक्रमात तर त्यांनी कहरच केला नागपूरच्या आमदार निवासात आमदार हरिश माणधना यांनी आमदारांसाठी सुधाकर का यांच्या गझल गायनाचा कार्यक्रम आयोजित केला होता . हे जेव्हा सुरेश भटांना कळले तेव्हा ते ताडताड पाय आपटत व काठी हवेत उडवीत तेथे गेले . असा कसा सुधाकर कदम माझ्या गझल गातो ते मी पाहतोच असे म्हणून त्यांनी तेथे धिंगाणा घातला . त्यामुळे तो कार्यक्रम रद्द करण्यात आला आणि हे सगळे कशासाठी तर मानधनासाठी . ' माझ्या गझला गाऊन पैसे कमवतो , तर मला मानधन शून्य !' अनेक वर्षांच्या कौटुंबिक जिव्हाळ्याच्या सहवासानंतर व अनेक कार्यक्रम सोबतीने केल्यानंतरचा हा भटांचा अवतार न पाहवता आलेला सुधाकर थोडा खचला होता . 

     आर्णीसारख्या खेड्यातून बाहेर पडण्यासाठी सुधाकरने जे जे आधार शोधलेत ते सो कुचकामी ठरले . शेवटी सेवानिवृत्तीची वाट न पाहता स्वेच्छानिवृत्ती घेण्याचा निर्णय त्याने घेतला . पुण्यात जाऊन नशीब आजमावण्याचा त्याचा निर्णय खरोखरच शहाणपणाच होता . पण तो त्याने उशिरा घेतला . उशिरा का होईना सुधाकरने संगीत दिलेल्या मराठी गझलच्या अल्बमला सुरेश वाडकर यांच्यासारख्या विख्यात गायकाचा आवाज लाभला हे मात्र आम्हा सर्वांसाठी भूषणावह आहे . मराठी गझलगायकीचे प्रात्यक्षिक पहिल्यांदा महाराष्ट्राला देणारा सुधाकर कदम मात्र सोईस्कर रीतीने विस्मरणाच्या गर्तेत टाकण्याचा प्रयत्न झाला. नुकत्याच झालेल्या दूरदर्शनवरील कार्यक्रमात त्याच्या ऐतिहासिक कामगिरीची जाणीवपूर्वक नोंद घेतली गेली, तेव्हा मात्र हायसे वाटले. 

     आज ' #गझलगंधर्व  ' या सन्मानाने गौरविला गेल्यानंतर त्याची दखल घेणे भाग पडले . त्याच्या या ओळखीसाठी त्याला किती खस्ता खाव्या लागल्या हे मात्र फार कमी लोकांना माहीत आहे . त्याने स्वत : या आठवणी लिहन काढल्या तरच या विषयीची माहिती आपणास मिळू शकेल . पत्रकार म्हणून कार्य करणारा , सडेतोड लिहुन अनेकांची नाराजी ओढवून घेणारा सुधाकर केव्हा तरी या दिशेने आपली लेखणी वळवील अशी आशा करायला हरकत नाही . तसे झाले तर अनेक नव्या दमाच्या गझलगायकांना दिशा मिळेल.आज सुधाकर समाधानी आहे . कारण त्याची स्वप्ने पूर्ण व्हायला लागली आहेत.मराठी गझलगायकीमध्ये आणखी खूप काही करता यावे यासाठी त्याला उत्तम आरोग्य लाभो हीच सदिच्छा !



 

 

Tuesday, April 5, 2022

लंदफंद


     पन्नास-पंचावन्न वर्षांपूर्वी विदर्भात खाजगी बसेस चालायच्या. हात दाखवला तेथे थांबून प्रवासी घेणाऱ्या या रंगीबेरंगी खेकडा छाप बसेस प्रवाशांच्या अतिशय आवडत्या होत्या. या बसेसमध्ये मनुष्यप्राणीच प्रवास
करायचे असे नाही, तर कोंबडे, बकरे, कुत्रे, गारुड्याचे साप वगैरे प्राणीही इतर प्रवाशांसोबत प्रवास करायचे. आजच्या सारखी फक्त मनुष्य प्राण्यांनाच मुभा नव्हती. त्यामुळे 'सर्वप्राणी समभाव' प्रत्येकामध्ये रूजायचा (एखाद्या वेळी जर गारूड्यांचा नागोबा चुकून माकून पेटाऱ्याच्या बाहेर आला तर कोणालाही चावत नसे असे म्हणतात?) या बसेसच्या 'फरंट' सीटवर म्हणजे ड्रायव्हरच्या बाजूच्या आसनावर गावातील प्रतिष्ठित व्यक्तीच बसू शकत असे. गावचा मामलेदार, पाटील, डॉक्टर वगैरे प्रवास करणार असेल, तर त्याचे सामान आणण्याकरिता माणूस जायचा. चुकून जर एखादा सर्वसाधारण माणूस तिथे बसलेला असला, तर येणाऱ्या प्रतिष्ठिताकरिता त्याला उठवले जायचे. इतर पासिंजर मागच्या बाजूला असलेल्या दोन साईडच्या बाकड्यावर बसायचे त्यानंतर येणारे प्रवाशी मात्र बगिच्यात आपले बस्तान बसवीत. बगीचा म्हणजे काय हा प्रश्न आपणास पडला असेल, नाही? बगीच्या म्हणजे बाग नसून दोन बाकड्यामधील जागेला बगिचा म्हणायचे. बगिच्यात बसणाऱ्याचे हाल सगळ्यात जास्ती व्हायचे पण कोणीही कुरकुरत नसे.

      आमच्या आर्णीला त्यावेळी (यवतमाळ-आर्णी-यवतमाळ) कोळशावर चालणारे वाफेचे इंजिन असलेली हाफटन चालायची. तिचीही वेगळीच गंमत होती. बसच्या मागच्या बाजूला बॉयलर, त्यांत सतत कोळसे टाकणे, ड्रायव्हर व बॉयलरच्या मध्ये प्रवाशी! चढाई आली तिचे कुंथणे, फारच त्रास होऊन थांबली की बॉयलर गरम करणे वगैरे सोपस्कर करत दोन अडीच तासात ४२ किलोमीटर अंतर कापल्या जात असे. कधी कधी तीन तासही लागत. या सर्व खाजगी बसेसना ग्रामीण भागात ‘लंदफंद' सर्व्हिस म्हणत. हे नांव का पडले हा संशोधनाचा विषय आहे तरी पण आमच्या अल्पबुद्धीप्रमाणे कोठेही थांबणे, केव्हातरी निघणे, केव्हाही पोहोचणे, कितीही प्रवासी घेणे, कुठेही उतरवणे, वेळेनुसार न धावणे, नर, नारी, पशु या सगळ्यांना मुक्त प्रवेश देणे, या सगळ्या प्रकारांमुळे या सर्व्हिसला लदफंद हे नाव पडले असावे, ते काहीही असले तरी त्या काळात लंदफंद सर्व्हिस पॉप्युलर होती, एवढे मात्र नक्की.

      सध्या संपूर्ण भारताची स्थिती लंदफंद सर्व्हिस सारखी झाली आहे. 'कोणीही यावे टिचकी मारोनी जावे' अशी! काँग्रेसची लंदफंद सर्व्हिस घोट्याळ्यावर चालायला लागली म्हणून त्रस्त झालेल्या प्रवाशांनी भाजपाच्या हाती सुकाणू देण्याचे ठरविलें. परंतु आपणही लंदफंद सर्व्हिसमध्ये काँग्रेसच्या मागे नसल्याचे दाखवून दिले.उलट आताच जास्ती लंदफंद वाढली, असे जनता ओरडत आहे.

     वरील सर्व बाबींवरून लंदफंद म्हणजे भोंगळ असा एक अर्थ निघतो. संपूर्ण देशात अनेक वर्षापासून लंदफंद चालू आहे. सरकार लंदफंद, कार्यालये लंदफंद, पोलीस लंदफंद, सर्व काही लंदफंद! एखाद्या कार्यालयात आवश्यक कामाकरिता जावून बघा! ज्या व्यक्तिशी तुम्हाला काम आहे ती व्यक्ती त्या कार्यालयात त्यावेळी तुम्हाला सापडेल तर शपथ आणि सापडलीच तर लंदफंद केल्याशिवाय काम झाले तर शर्यत! सगळीकडच्या लंदफंद सर्व्हिसमुळे अखिल भारतीय जनतेला लंदफंदची इतकी सवय झाली आहे की, असे जर घडले नाही तर त्यांना चुकल्या चुकल्यासारखे वाटायला लागते.

     जुन्या लंदफंद सर्व्हिसची नावेही मस्त होती. बलवंत, दत्त, लोकसेवा, समर्थ वगैरे वगैरे, सध्या नव्याने सुरू झालेल्या खाजगी बसेस सारखे ट्रॅव्हल्स वगैरे नाव नव्हते. खरे पाहिले तर ट्रॅव्हल्स म्हणजे आधुनिक युगातील सोफॅस्टिकेटेड लंदफंदच! कारण महागडी तिकिटे काढून मुद्दाम ए.सी. कोचमधून प्रवास करावा, तर वातानुकुलित यंत्रच बंद असते. तर कधी कधी व्हीडीओ नादुरूस्त असतो. त्यामुळे चालकाच्या पसंतीची आपणास नको असलेली गाणी ऐकत प्रवास करणे नशिबी येते. त्यातही थांबे चालकाच्या मर्जीचेच असल्यामुळे ह्या बसेस प्रवाशांकरिता आहे की, चालक-मालकाकरिता हा प्रश्नच पडतो. एकदा आम्ही बडौद्याहुन नागपूरला येत होतो. रात्री सुरत नंतर एकही थांबा न घेता बस सतत धावत होती. सकाळी मात्र सगळ्यांची चुळबूळ सूरू झाली. त्यातही मुलांची तर जास्तीच. त्यामुळे काही प्रवाशांनी बस थांबवायची विनंती केली. पण ९.०० वाजेपर्यंत त्यांचा ठरलेला ढाबा येईपर्यंत काही बस थांबली नाही. त्यामुळे लहान मुलांनी आईच्या मांडीवरच आपले प्रातः कालीन कार्य उरकले. त्यावेळी मात्र ट्रॅव्हल्स पेक्षा लंदफंद बरी, असे जुन्या मंडळींना निश्चितच वाटले असेल. कारण ती जिथे म्हटले तिथे थांबत होती. आताच्या सुंदर सुंदर ट्रॅव्हल्स तर गिरकी घेऊन मोराच्या तोऱ्यात फक्त ढाब्याच्या बनातच थांबतात.

       आपले आयुष्यही लंदफंद सर्व्हिससारखेच आहे. नको तिथे थांबते, जो प्रवासी सोबत हवासा वाटतो तो मिळत नाही. फ्रंट सीटवर बसायची इच्छा असून, बगिच्यात बसावे लागते. गाव लवकर यावे, असे वाटत राहते. पण ते अशा वेळी येते की गात्र थकल्यामुळे आले काय न आले काय अशी परिस्थिती निर्माण झालेली असते. निघतो एका गावी जायला, पोहचतो दुसऱ्याच गावी. त्यातही गर्दी ही की कोणाजवळ मन मोकळे करतो म्हटले तर शक्य होत नाही. कारण जो तो आपल्याच घाईगर्दीत असतो. आयुष्याच्या लंदफंदचे सुकाणू आपल्या हातातून निघून जाते व पत्ताही लागत नाही. त्याला आपण आपले कर्मभोग समजून निमूटपणे बघत राहतो. त्यातही अपघात झाला तर... 'राम नाम सत्य है...'

-सुधाकर कदम

रेखाचित्र - सुरेश राऊत,यवतमाळ.






 





संगीत आणि साहित्य :