#महाराष्ट_मायभू_अमुची_मराठी_भाषिकांची
आर्णी (जि.यवतमाळ) येथे संगीत शिक्षक म्हणून कार्यरत असताना १९८६ मध्ये शिक्षक कलाकार,विद्यार्थी/विद्यार्थिनी यांना घेऊन इयत्ता १ ते १० च्या पाठ्यपुस्तकातील कवितांना स्वरबद्ध करून तीन भागांमध्ये #झुला नामक कॅसेट तयार केल्या होत्या.त्यात अण्णा भाऊ साठे यांचा जोशपूर्ण असा खालील #पोवाडा पण होता.आज महाराष्ट्रदिना निमित्त आपणा समोर सादर करीत आहे.या कॅसेटमधील बहुतेक कवितांच्या स्वरलिपीचे #सरगम नामक पुस्तक पण प्रकाशित केले होते.या कवितांचे ध्वनिमुद्रण आर्णीलाच आहुजाच्या डेकवर केले होते. त्यामुळे स्टुडिओतील ध्वनिमुद्रणाइतकी सफाई दिसणार नाही.पण जोश मात्र नक्कीच जाणवेल...
गायक - मामा मरगडे,शिक्षक.आर्णी.
संगीत - अर्थातच माझे
सहकलाकार - खंदारे गुरुजी,पुसद.(ढोलकी), करपे गुरुजी,आर्णी.(हार्मोनियम,कोरस),गजानन घोडेराव गुरुजी,अविनाश गिरी (कोरस).
