गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Monday, March 9, 2026

गातो गझल मराठी...

     बालपणापासून तर संगीत शिक्षक म्हणून कार्यरत असलेले यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी गाव सोडून पुण्यात स्थायिक होईपर्यंत माझे आयुष्य अतिशय कष्टमय गेले.१९६५ ते १९७५ ऑर्केस्ट्रामधील दगदग, नंतर कोणत्याही सुख-सुविधा नसताना मराठी गझल व गझल गायकीच्या प्रचार-प्रसारासाठी सुरेश भटांसोबत महाराष्ट्रभर भटकंती.यातून मला १९८२ मध्ये  एक रचना स्फुरली.ती म्हणजे #सरगम_तुझ्याचसाठी !  ही माझी पहिली कविता होय.नंतरच्या काही काळात ती स्वरबद्ध झाली.त्यावेळी माझा धाकटा बंधू स्व.प्रशांत कदम ही गझल सदृश्य रचना त्याच्या कार्यक्रमांमधून सादर करायचा.त्याच्या सोबत हर्षवर्धन मानकर,अनिल रेनकुंटलवार वगैरे पोरं तसेच माझे अनेक विद्यार्थी पण ही रचना गायला लागले.सध्या मयूर महाजन हा पुण्यातील गायक "सरगम तुझ्याचसाठी" शिर्षकांतर्गत होणाऱ्या कार्यक्रमाची सुरवात या रचनेने करतो.माझ्यासाठी ही अत्यंत आनंदाची बाब होती/आहे.
         बऱ्याच मोठ्या कालावधी नंतर नुकत्याच झालेल्या वाशीमच्या महाविद्यालयातील कार्यशाळेत ही गझलसदृश्य रचना  त्यातील काव्य व त्याला साजेशा सुरावटी कशा घ्याव्या/घ्यायला हव्या याबद्दल  सविस्तर माहिती देत प्रा.हर्षवर्धन मानकरने (त्या वेळचा 'हर्षू') अतिशय चांगल्या पद्धतीने ही सादर केली.अर्थात स्वरबद्ध करतानाच ह्या सुरावटी आल्याच होत्या.तरी पण  कार्यशाळेतील उपस्थित विद्यार्थी व रसिकांना त्या उलगडून सांगणे महत्वाचे ठरते.त्या बद्दल हर्षूचे मनःपूर्वक अभिनंदन! (तुझ्या गायकीच्या ढंगाने प्रशांतची आठवण ताजी झाली) ऐका तर...

सरगम तुझ्याचसाठी, गीते तुझ्याचसाठी
गातो गझल मराठी, प्रिये तुझ्याचसाठी

सोसून गायिले मी, गाऊन सोसले मी
आयुष्य जाळले मी, प्रिये तुझ्याचसाठी

घन सावळा गरजतो, बेबंद तान घेतो
बरसून शांत होतो, प्रिये तुझ्याचसाठी

व्याकुळ ही विराणी, गाते तुझी कहाणी
शिवरंजनी दिवाणी, प्रिये तुझ्याचसाठी
('विराणी' ऐवजी 'मारवा' घेण्याची कल्पना प्रशांतची होती)

तबला - प्रा.अनिल सोनोने
हार्मोनियम - प्रा.डॉ.वतारे
की बोर्ड - आदेश बनसोड

Mobile recording by madhukar bansod, washim

दिन लगे है रात सा...(उर्दू ग़ज़ल)




डॉ.दिलीप पांढरपट्टे 'रिंद' जी की चार बेहतरीन उर्दू ग़ज़लें रेकॉर्ड की थी। उस में से 'दिन लगे है रात सा' यह ग़ज़ल पेश-ए-ख़िदमत है।समाअत फ़रमाईए...


 ...यह ग़ज़ल युट्युबपर सूननेके बाद पद्मश्री सुरेश वाडकरजी और मशहूर ग़ज़ल गायक रुपकुमार राठोड इन्होने मुझे व्हाट्सअपवर भेजी थी।यह प्रतिक्रियायें मेरे लिए और प्राजक्ता के लिए बहुमूल्य है...


■Attach 'din lage hai' aikla kitti chaan tune ani gayki. Kon ahe hee kanyaka. Apratim gaylay. God bless her.regards namaskar.


Apratim chal keliye tumhi nehmi pramane.

-#suresh_wadkar 


■ बहुत ही खूबसूरत ग़ज़ल हुई है , बहुत ही अच्छी कम्पोजीशन है और लाजवाब गाया है प्राजक्ता ने मेरी ओर से हार्दिक बधाई और शुभकामना आप सभी को 💕

-#रुपकुमार_राठोड


दिन लगे है रात सा और काँटा फूल सा

ये मोहब्बत का असर है, ये नहीं कोई हादसा


अब कहाँ नग़्मे सुनाए हम बहारे इश्क मे

अब यहा ख्वाबों में आता है चेहरा चांद सा


हम पयंबर है मुहब्बत के, वफ़ा के, प्यार के

जान का दुश्मन भी लगता है हमें दिलदार सा


'रिंद' की जादुगरी का ये भी पहलू देखिए

हाथ में पानी भी ले वो तो लगे है जाम सा


ग़ज़लसरा - प्राजक्ता सावरकर शिंदे Prajakta Savarkar Shinde 

मोसिकार - '#शान_ए_ग़ज़ल' सुधाकर कदम

Live -Amaravati 26/12/2024





संगीत आणि साहित्य :