Thursday, June 25, 2026
येता येता गेला पाऊस...
येता येता गेला पाऊस
असा कसा हा वेडा पाऊस
अजून ओले पान मनाचे
जरी पुराणा झाला पाऊस
किती दिसांनी भेटलीस तू
किती दिसांनी पडला पाऊस
मेघ दाटले तुझे मनी अन्
डोळ्यांमधुनी झरला पाऊस
आठवणींच्या नभात उरला
फक्त तुझा अन् माझा पाऊस
गायक - सुरेश वाडकर,वैशाली माडे
शब्द - दिलीप पांढरपट्टे
संगीत - सुधाकर कदम
Subscribe to:
Posts (Atom)


