गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Sunday, December 25, 2022

सुधाकर कदमांची शब्द-स्वरसंपदा...


      आजमितीस सुधाकरच्या नावावर लेखक/कवी म्हणून ’#फडे_मधुर_खावया…’ (स्फूट लेख),’#सरगम’ (स्वरलिपी), ’#मीच_आहे_फक्त_येथे_पारसा' व '#काळोखाच्या_तपोवनातून' (काव्य संग्रह) अशी चार पुस्तके,तसेच ’#भरारी’ (मराठी गझल गायनाची महाराष्ट्रातील पहिली कॅसेट), '#अर्चना’ (टी सिरीज)', '#खूप_मजा_करू’ (फाऊंटॆन म्युझिक कं), ’#काट्यांची_मखमल’ (युनिव्हर्सल म्युझिक कं), ’#तुझ्यासाठीच_मी...’( युनिव्हर्सल म्युझिक कं) ह्या कॅसेट्स सीडीज आहेत.नव्याने केलेला #रे_मना हा त्यानेच लिहिलेल्या स्वरबद्ध गीत-गझलांचा अलबम spotify या ऑडिओ चॅनलवर उपलब्ध आहे.तसेच रविप्रकाश चापके यांच्या मराठी गझलांचा #गझल_गुलाबो हा अलबम लवकरच spotify वर प्रसिद्ध होत आहे.

        सुधाकरनेच स्वरबद्ध केलेला  हनीफ़ साग़र,बशर नवाज़ यांच्या उर्द गझलांचा तीन तासाचा कार्यक्रम विविध गायक गायिका करीत आहेत. सुरेश वाडकरांपासून पं.शौनक अभिषेकी,अनुराधा मराठे, वैशाली माडे, नेहा दाउदखाने, रसिका जानोरकर, मयूर महाजन, गाथा जाधव, गायत्री गायकवाड गुल्हाने, प्राजक्ता सावरकर शिंदे, आदित्य फडके, रफ़िक शेख, वैशाली पुल्लीवार, अविनाश जोशी, सचिन डाखोरे सोबतच लहान बंधू शांत कदम व मुली भैरवी,रेणू पर्यंत गुणी गायक- गायकांनी त्याने स्वरबद्ध केलेल्या रचना गायिल्या आहेत.

       यात मराठीतील कुसुमाग्रज,सुरेश भट,ग.दि.मा.,विंदा करंदीकर,बाबा आमटे,बा.भ.बोरकर,यशवंत देव,मंगेश पाडगावकर,गंगाधर महांबरे,पद्मा गोळे,इंदिरा संत,वसंत बापट,बालकवी,शांता शेळके,सरिता पत्की,शंकर वैद्य,वंदना विटणकर,उ.रा.गिरी,ग्रेस,श्रीकृष्ण राऊत,इलाही जमादार,शिवा राऊत,आशा पांडॆ,श्रद्धा पराते,दिलीप पांढरपट्टे,अनिल कांबळे,संगीता जोशी,म.भा.चव्हाण.रमण रणदिवे,सदानंद डबीर,नारायण कुळकर्णी कवठेकर,शिवाजी जवरे,ललित सोनोने,शंकर बडे,गौतम सुत्रावे,अरूण सांगोळे,बबन सराडकर,शरद पिदडी,नीलकृष्ण देशपांडे,'मलंग',प्रथमेश गिरीधारी, सुनीती लिमये,आनंद रघुनाथ,कलीम खान,गजेश तोंडरे,अनंत ढवळे,चित्तरंजन भट,दीपक करंदीकर,मनोहर रणपिसे,घनशाम धेंडॆ,ए.के.शेख,गंगाधर मुटे,बदिउज्जमा बिराजदार,समीर चव्हाण ,जोत्स्ना राजपूत,प्रमोद खराडॆ,जनार्दन म्हात्रे,महेंद्र राजगुडे,विशाल राजगुरू,जयदीप जोशी,शिल्पा देशपांडे,गजानन मिटके,मीरा सिरसमकर,रविप्रकाश चापके व दस्तुरखुद्द सुधाकर कदम हे आहेत.

        आणि उर्दू-हिंदीतील डॉ राही मासूम रजा, हनुमंत नायडू, शॆरजंग गर्ग, प्रेमनाथ कक्कर, शंकर दीक्षित, श.न.तरन्नुम, बलबीरसिंह रंग, ’राग’ कानपुरी, मोहन वर्मा ’साहिल’, प्रभा ठाकूर, मयंक अकबराबादी, समद रजा, ’शेरी’ भोपाली, ’बेताब’ अलिपुरी, इंदू कौशिक, अशोक अंजूम, सैफुद्दीन सैफ, सुरेश्चंद्र वर्मा, ’निजाम’ रामपुरी, गोवर्धन भारती, विनू महेंद्र, प्यारेलाल श्रीमाल, ’सरसपंडित’ कमलप्रसाद (कँवल), या कवी गझलकारांचा समावेश आहे.जुन्या पिढीतील मान्यवर ज्येष्ठांपासून आजच्या नवोदितांपर्यंत अनेक मराठी आणि उर्दू कवी गझलकारांच्या रचना स्वरबद्ध करण्याचे खूप मोठे काम त्याने केले आहे....

आयुष्याच्या अत्यंत समृद्ध टप्प्यावर माझा हा कलंदर मित्र उभा आहे.त्याला आरोग्यपूर्ण,समृद्ध दीर्घ आयुष्य लाभॊ यासाठी माझ्या शुभेच्छा..

-शाहीर सुरेशकुमार वैराळकर

संस्थापक अध्यक्ष

सुरेश भट गझल मंच

पुणे.


(चकव्यातून फिरतो मौनी मधून...)

-----------------------------------------------

.                 #युट्यूब्वर_उपलब्धअसलेल्या_रचना

#मराठी_गझल

१.कुठलेच फूल आता -सुरेश भट

२.दिवस है जाती कसे -      "

३.झिंगतो मी कळेना-         "

४.जगत मी आलो असा की- "

५.ही कहाणी तुझ्याच न्हाण्याची-"

६.सुखाच्या सावल्या साऱ्या- "

७.हे तुझे अशा वेळी लाजणे-  "

८.ही न मंजूर वाटचाल-        "

९.आले रडू तरीही कोणी रडू नये-"

१०.लोपला चंद्रमा- श्रीकृष्ण राउत

११.दुःख माझे देव झाले-   "

१२.काट्यांची मखमल होते-दिलीप पांढरपट्टे

१३.दूर गेल्या फुलातल्या वाटा-         "

१४.जीवनाचा खेळ रंगाया हवा-        "

१५.गाऊ नये कुणीही-                     "

१६.घाव ओला जरासा होता-            "

१७.हसू उमटले दुःख भोगता-           "

१८.कळेना कसा हा जगावेगळा-       "

१९.मी सुखाचे गाव शोधत राहिलो-    "

२०.तराणे-                                     "

२१.येता येता गेला पाऊस-                "

२२.किती सावरावे-                          "

२३.उशीर झाला तुला यायला-इलाही जमादार

२४.जीव लावावा असे कोणीच नही-संगीता जोशी

२५.लोक आता बोलवाया लागले-अनिल कांबळे

२६.मी करू सारखा विचार किती-        "

२७.फुलातला प्रवास दे-ललित सोनोने

२८.मस्तीत गीत गा रे-नारायण कुलकर्णी कवठेकर

२९.पियानो-उ.रा.गिरी

३०.जरा सांजता याद येतेस तू-ए.के.शेख

३१.कसे ओठांवरी गाणे-दीपक करंदीकर

३२.शब्द दंगा घालती रक्तात माझ्या-चित्तरंजन भट

३३.एक प्रार्थना ओठांमधुनी-अनंत ढवळे

३४रानात पाखरांची-म.भा.चव्हाण

३५.दुःख विसरून गायचे होते-अनंत ढवळे

३६.अद्याप सारे आठवे-प्रमोद खराडे

३७.गझल चांदण्यांची-समीर चव्हाण

३८.कापली नाहीत अजूनी-जनार्दन म्हात्रे

३९.असे कसे तुझ्याविना-ज्योत्स्ना राजपूत

४०.मनातले तुझे मला-विशाल राजगुरु

४१.तू कवितेतून हरवता-शिल्पा देशपांडे

४२.श्यामरंगी रंगताना-मीनाक्षी गोरंटीवार

४३.नाव आता तिचे तू विचारू नको-श्रीकृष्ण राऊत

४४.चंद्र आता मावळाया लागला-सुरेश भट

४५.हे तुझे आभासवाणे-गजानन मिटके

४६.आसवांनी मी मला भिजवू कशाला-सुरेश भट

४७.रंग माझा वेगळा-सुरेश भट

४८.मज झुकता आले नाही-सदानंद डबीर

४९.तुझ्या रूपाचा गुलाब ताजा-म.भा. चव्हाण

५०. जायचेच ना निघून जा-सतीश डुंबरे

५१.तुजपाशी मज टाळायाचे लाख बहाणे होते-सुरेश भट

५२.माझी गझल गुलबो-रविप्रकाश चापके

५३.मला सोसवेना दुरावा तुझा-         "

५४.जळलो धुपापरी मी-                  "

५५.प्रतीक्षा पार्थना झाली-                "

५६.काट्यास फूलआले -                  "

५७.जो तो दिसावयाला दिसतो सुखात "

५७.असे पत्र आता तुला मी लिहावे-    "

५८.नाव आता तिचे तू विचारू नको-श्रीकृष्ण राऊत


#मराठी_गीते


१.गीत गंगेच्या तटावर-सुरेश भट

२.पहाटे पहाटे-                "

३.मी असा आहे कलंदर-    "

४.गे मायभू-                     "

५.तसे किती काटे रुतले-     "

६.भरात आला श्रावण महीना-ग.दि.माडगुळकर

७.झोपडीच्या झापाम्होरं-                 "

८.महाराष्ट्रगीत-कुसुमाग्रज

९.पोवाडा-शाहीर अण्णा भाऊ साठे

१०.सरस्वतीची भूपाळी-गोविंद

११.सकाळ-उ.रा.गिरी

१२.मराठी हजल-शिवजी जवरे

१३.मन-बहिणाबाई

१४.मानवांनो आत या रे-विंदा करंदीकर

१५.घोडा (बालगीत) शांता शेळके

१६.जवळ येता तुझ्या-अनिल कांबळे

१७.झिंगले चांदणे-श्रीकृष्ण राउत

१८.मराठी माहिया-घनश्याम धेण्डे

१९.सांगू कशी राया तुले (वऱ्हाडी गीत) शंकर बडे

२०.श्याम घन घनश्याम-आशा पांडे

२१.ये मंत्राची घुमवित वीणा-   "

२२.शक्ती दे तू आज मजला-   "

२३.दयासागरा-                      "

२४.तुझीच सुमने-                   "

२५.करुणा अपार आहे-           "

२६.वेद झाले वेदनांचे-              "

२७.तूच माझे गीत कोमल-         "

२८.सरगम तुझ्याचसाठी-सुधाकर कदम

२९.पावसात जाऊ-मीरा सिरसमकर

३०बारीकराव-                    "

३१.रिमझिम पाऊस-            "

३२.हिरवे हिरवे गर्द चिमुकले- "

३३.बागेतल्या फुलांशी मैत्री-   "

३४.रानातले पक्षी-                 "

३५.थेंब-                              "

३६.इवलसं बी-                     "

३७.खूप मजा करू-                "

३८.उठ उठ सह्याद्रे

३९.आभाळ वाजलं

४०.पीक खुशीत डोलतय सारं

४१.राम कृष्ण हरी-विश्वनाथ स्वामी

४२.चतुर्वेद जैसा तानपुरा बोले-गंगाधर महांबरे

४३.घर अपुले बांधू आपण-गजेश तोंडरे

४४.रे मना तुज काय झाले सांग ना-सुधाकर कदम

४५.काकडारतीच्या वेळी मन होतसे चकोर- "

४६.हा भाव-भावनांचा चालूय खेळ सारा-    "

४७.स्पर्शून एकदा तू केले मला ययाती-       "

४८.कशी वेदना विसरायाची सांग मला तू-   "

४९.जीवनाची एकतारी-                           "

५०.आर्त गाण्यातून फुलता एक नात्याची कहाणी "

५१.माझ्यावरी हरीची करुणा अपार आहे-आशा पांडे

५३.मला सोसवेना दुरावा तुझा-ज्योती राव (बालिगा)


#उर्दू_ग़ज़ल


१.आग जो दिल में लगी है-हनीफ़ साग़र

२.दिल लगाया है तो नफरत-     "

३.न इस तऱ्हा भी खयालों मे-बशर नवाज़

४.यकायक चांदनी चमकी-दिलीप पांढरपट्टे

५.गयी लज्जत पिलाने की-         "

६.तू मेरी दुश्मन नहीं-कलीम खान

७.तुम्हारे हुस्न में जो सादगी है-हनीफ़ साग़र 

८.मैं झुकाऊं सर कहीं भी-           "

९.सब में रहकर भी जुदा लगता है तू-   "

१०.बारहा हम जो मुस्कुराए है-प्रथम गिरीधारी

११.कल जो अपने थे अब पराए है-बेताब अलीपुरी

१२.ना सही लब न खोलिए साहब-हनीफ़ साग़र 

१३.उनकी गलियों से उठाई है ग़ज़ल-अशोक अंजुम

----------------------------------------------------


#हाथरस (उत्तर प्रदेश) येथून प्रसिद्ध होणाऱ्या संगीतास वाहिलेल्या भारतातील एकमेव #संगीत या मासिकातील '#नग़्म_ए_ग़ज़ल' आणि '#प्रसार_गीत' या स्तंभांतर्गत प्रकाशित गझल गीतांची यादी...

#उर्दू_ग़ज़ल

१.

छोटी सी बात की मुझे...अशोक अंजुम...जुलाई १९८६

२.

पत्थरों के शहर में....         "                 नवम्बर १९८६

३.

इतने करीब मेरे...        मोहन वर्मा 'साहिल'  मार्च  १९९०

४.

किसीका क्या भरोसा है...बेदील हाथरसी.   अप्रैल १९९० 

५.

कोई बात बने...             श.न.तरन्नुम ...       मई  १९९०

६.

मत पुछिए...                  शेरजंग गर्ग...    जुलाई १९९०

७.

दूर से आए थे साक़ी.नजीर 'अकबराबादी' अक्तूबर१९९०

८.

वक़्त से पूछ लो...डॉ.राही मासुम रज़ा...     मार्च  १९९१

९.

उनकी गलियों से....अशोक अंजुम...         अप्रैल १९९१

१०.

 ग़म को सीने से लगाकर...'राग' कानपुरी...  जून  १९९१

११.

आज सदीयों की घनी...कलीम खान...        जून १९९२

१२.

जलाए जब तुम्हे शबनम...   "                 सितंबर १९९२

१३.

आदमी गुज़रता है...किरन भारती...        अक्तूबर १९९२

१४.

हमने पाया है तुम्हे...श्रद्धा पराते...                मई १९९३

१५.

हसीन चांद नहीं...'मयंक'अकबराबादी...    नवंबर १९९३

१६.

करीब मौत खडी है...सैफुद्दीन सैफ़ ...      अक्तूबर १९९३

१७.

ज़ख्म-ए-दिल...प्रताप सोमवंशी...                मई १९९४

१८.

बद्दुआ भी...नित्यानंद 'तुषार'...               सितंबर १९९५

१९.

चाक दामां है...अल्लाम 'खिजर'...          अक्तूबर १९९५

२०.

चाह थी इस दिल से...यश खन्ना 'नीर'...    दिसंबर १९९५

२१.

तेरे आगे कली की नाज़ुकी...कमलप्रसाद...  मार्च १९९६

२२.

आग़ाज़ तो होता है...मीनाकुमारी...          अगस्त १९९६

२३.

वो शख़्स जाते जाते...डॉ.पूर्णिमा 'पूनम'..सितंबर १९९७


#गीत


१.

अमर रहे स्वातंत्र्य... नर्मदाप्रसाद खरे...     अगस्त १९८६

२.

जय जय भारती... वल्लभेश दिवाकर...    अगस्त १९९०

३.

 गदराई उमरिया...शंकर दीक्षित...             अप्रैल १९९१

४.

तुम साज़ प्रिये...वेदमणिसिंह ठाकूर...           मई १९९१

५.

दरशन देना नंददुलारे... कृपालू महाराज...    जून १९९१

६.

रखता उंची शान तिरंगा....हरीश निगम...  अगस्त १९९१

७.

उम्र पल पल ... श्रद्धा पराते...                अक्तूबर १९९१

८.

जय स्वरदायिनी...कृष्णराव भट्ट 'सरस'...      मार्च १९९२

९.

परमेश आनंद धाम हो...पथिक...             अप्रैल १९९२

१०.

ये बरखा की रुत... शामकृष्ण वर्मा...        जुलाई १९९२

११.

सह्यो न जाय...श्रद्धा पराते...                 अक्तूबर १९९२

१२.

ओस की बुंदे...डॉ.राही मासुम रज़ा...        नवंबर १९९२

१३.

अर्चना तुम,वंदना तुम....रवि शुक्ल...       दिसंबर १९९२

१४.

देह हुई सरगम सी...राजनारायण चौधरू.. दिसंबर १९९२

१५.

चांद सूरज एक है...माया भट्टाचार्य...            मई १९९३

१६.

सतरूप प्रभो अपना... पथिक...                  जून १९९३   

१७.

राष्ट्र आराधन... डॉ.विश्वनाथ शुक्ल...      सितंबर १९९३

१८.

तू दयालू दीन मैं... तुलसीदास...             सितंबर १९९३

१९.

गाईए गणपती जग वंदन...तुलसीदास...  अक्तूबर १९९३

२०.

ज्योति तुम,मैं वर्तिका हूँ... डॉ.रंजना...      नवंबर २९९३

२१.

गीत मैं ने रचे...शंकर सुलतानपुरी...            मार्च १९९४

२२.

ऐसा भी देखा है...प्रभा ठाकूर...                अप्रैल १९९५

२३.

जब यौवन मुसकाता है...चंद्रशेखर सेनगुप्ता...मई १९९४

२४.

राम नाम जपना... डॉ.प्यारेलाल श्रीमाल...    जून १९९४

२५.

तुमने लिखी न पाती...श्रद्धा पराते...         अगस्त १९९४

२६.

आंख से ओझल तुम हो...विनू महेंद्र...     अक्तूबर १९९४

२७.

उड रे पखेरू  ...शाह हुसेन...                  दिसंबर १९९४

२८.

वह गीत फिर सुना दो.डॉ.विश्वनाथ शुक्ल.अक्तूबर १९९५

२९.

तनहाई मेरे साथ तो है...चंद्रशेखर सेनगुप्ता...मार्च १९९६

३०.

रात का पथ... मधुर शास्त्री...                       मई १९९६

३१.

पपिहा की बोली...सियाराम शर्मा 'विकल'..जुलाई १९९६

३२.

पी ले रे अवधू हो मतवाला...चरणदास...सितंबर १९९६


-निषाद कदम

-------------------------------------------------------------------

●ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२२ मधील फेसबुकवरील स्वररचना...


-मराठी-


१.तुझे माझ्याजवळ असणे सुखद होते-विद्या देशपांडे

२.प्रेम होते कसे स्वप्न पडते कसे-संजय गोरडे

३.एखाद्या दुपारवेळी मी खिन्न एकटा असतो-प्रियंका गिरी

४.जे जे मला मिळाले साभार देत आहे-आशा पांडे

५.डोळ्यात आसवांना मी आणणार नाही-डॉ.मनोज सोनोने

६.भेटून काय सांगू माझी व्यथा कुणाला-अनिल जाधव

७.तुझ्या माझ्यातला आता दुरावा वाढतो आहे-कविकुमार

८.केवढे झाले सहज जाणे तुझे-शरद काळे

९.नेहमी तुझ्याच आसपास मी-अश्विनी बोंडे

१०.ओठात नाव येता सांजावला शहारा-साईनाथ फुसे

११.अशा सांजवेळी दिवेलागणीला-सविता बन्सोड

१२.दिवस येतो दिवस जातो-डॉ.अविनाश सांगोलेकर

१३.वंचना जखमा जुन्या उसवून येते-अमिता गोसावी

१५.कुणीच नसले सोबतीस की घुसमट होते-सचिन साताळकर

१६.आपण सारे इथे बुडबुडे-अशोक कुलकर्णी

१७.दुःखात का जीवाला झुरवत बसायचे-गौरी शिरसाट 

१८.एकरूप व्हायचे, प्रेमगीत गायचे-दीपाली वझे

१९.पुन्हा थांबेन जर ती यायची आहे-स्मिता गोरंटीवार

२०.झिजल्याशिवाय दरवळ नाही-मीनाक्षी गोरंटीवार

२१.दिशा शृंगारल्या होत्या हवा गंधाळली होती-प्रशांत वैद्य

२२.झाल्या चुका असू दे रस्ता नवा धरू या-प्रतिभा सराफ

२३.दुःख माझे दूर करण्या धावते माझी गझल-प्रसन्नकुमार धुमाळ 

२४.सांग तुजला काय आता आठवाया लागले-सुधाकर इनामदार

२५.ऐक ना! बोलायचे राहून गेले-निर्मला सोनी

२६.कुठे कुणाची सोबत पुरते आयुष्याला-अल्पना देशमुख नायक

२७.भकास झाले हसरे अंगण तू गेल्यावर-मसूद पटेल

२८.हळूच बोलणे तुझे तसे हळूच हासणे-हेमंत जाधव 

२९.तुला उगाच वाटते तुझ्याविना मरेन मी-दिवाकर जोशी

३०.मी तरी आता व्यथांचे पांघरू शेले किती-वंदना पाटील वैराळकर

३१.मिठीत तुझिया येउन झाला निवांत वारा-डॉ.संगीता म्हसकर

३२.दुःख माझे तुला पण कळू लागले-भैय्या पेठकर

३३.अचानक जीभ ही अडते-अनिल पाटील 

३४.सांजकोवळी क्षितिजावरती-संजय इंगळे तिगावकर

३५.उदास झाले हसरे अंगण-व्यंकटेश कुलकर्णी

३६.केलेत केवढे तू उपकार काय सांगू-श्रीराम गिरी

३७.पुन्हा का तेच ते होते-कीर्ती वैराळकर

३८.तुझ्यावर भाळलेल्या वेदनांचे काय मग?-अंजली पंडित दीक्षित

३९.ओठी जरी कधीचे स्वातंत्र्यगान आहे-म्.भा.चव्हाण

४०.संध्येच्या शामल डोही-श्रद्धा पराते

४१.दूर तिथे घन बरसे हलकासा-सदानंद डबीर

४२.दुःखाशी नाते जडता जडता जडते-मनोहर रणपिसे

४३.रात गेली निघून पाऱ्याची-सुरेश भट

४४.मज कळले तू माझी पण सगळे घडल्यावर-उ.रा.गिरी

४५.आदिशक्ती तू,आई रेणुके-निलकृष्ण देशपांडे

४६.घाली अमृताचा पान्हा कृपेची साऊली-शिवा राऊत 

४७.भेटली तू मला वादळासारखी-श्रीकृष्ण राऊत 

४८.सोसण्याचा सूर करणे ज्यास जमले-सुधाकर कदम


-हिंदी/उर्दू-


४९.तुमने किया है प्यार कि घायल किया हमे-डॉ.प्यारेलाल श्रीमाल

५०.जो भी तेरी गली में आता है-हनीफ़ साग़र

५१.इल्म ऐसा वो सीखकर आया-अमित झा राही

५२.शाम होते ही सितारे भी चमक जाते है-सुधीर बल्लेवर 'मलंग'

५३.हो अगर दिल में उजाले तो ग़ज़ल होती है-एजाज़ शेख

५४.दिल तो टूटा है दिल लगाने से-उमाशंकर अश्क

Saturday, December 17, 2022

राग #तोडी आणि मी...


        तोडी या रागात सा रे ग म ध नि असे स्वर लागतात.(अवरोहात पंचम स्वराचा वापर काही गायक करतात.)यातील रिषभ,गांधार,धैवत स्वर कोमल असून मध्यम तीव्र आहे.गानसमय सकाळचा आहे...अर्थात ही वेळ फक्त शास्त्रीय गायन,वादन करणा‌ऱ्यांसाठीच आहे.कारण या रागातील जेवढी काही चित्रपट व चित्रपटाबाहेरची गीते,भावगीते,भक्तिगीते आहेत ती सर्वकाळ गोड वाटतात,हा आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे.
        तोडी राग जवळ-जवळ प्रत्येक गायक-वादकाने गायिला-वाजविला असावा.पं.भीमसेन जोशींच्या तोडीतील ताना, मेघांच्या गडगडटाला आव्हान देणार्‌या होत्या.तर प्रत्येक स्वराचे महत्व जाणून त्याचा अतिसुंदर विस्तार किशोरीबाईंच्या गाण्यात दिसून येतो.पं.जसराज यांची प्रत्येक राग गाण्याची आपली एक वेगळी शैली आहे.तेथे कदाचित शास्त्र थोडे बाजूला पडत असेल.पण ज्याला ’मेलोडी’ म्हणतात ती त्यांच्या गायनात,ऐकतांना सतत जाणवते.याचा अर्थ इतर गायकांनी गायिलेला तोडी ऐकण्या सारखा नाही किंवा नसतो असे नाही.उदाहरण देतांना लोकप्रिय कलाकारांचेव नाव घ्यावे लागते,त्याला इलाज नाही.
          अशा या तोडी रागाचे मला सर्वप्रथम आठवते ते ’आशिर्वाद’ या चित्रपटातील ’एक था बचपन...’ हे गाणे.त्यानंतर ’भावभोळ्या भक्तिची ही एकतारी...’हे श्रीनिवास खळे यांनी तोडीच्या स्वरांसोबत इतर स्वरांचा ताना-बाना करून विणलेल अतिशय तलम गाणं,संगीतकाराच्या प्रतिभेची उत्तुंग झेप दाखविते.खळ्यांनीच स्वरबद्ध केलेला तुकारामाचा अभंग ’अगा करूणाकरा...’ हा अभंग ऐकतांना डोळे आपोआप झरायला लागतात.तसेच ’पिंजरा’ या चित्रपटाती. राम कदमांनी स्वरबद्ध केलेलं व सुधीर फडक्यांनी गायिलेलं ’कशी नशीबानं थट्टा आज मांडली...’हे ही गाणे तोडी रागा मध्येच आहे.’अमर प्रेम’ या चित्रपटातील ’रैना बीती जाए...’ याचा मुखडाही याच रागात आहे.'मिलकरजुदा' ही अप्रतिम गझल जगजीत-चित्रा यांनी अमर करून ठेवली आहे.
          साबरी बंधुंनी गायिलेली ’अल्ला हे अल्ला...’ ही कव्वाली त्यांच्या गायकीने रात्रीच्या वेळी सुद्धा वेगळ्या विश्वात नेवून तल्लीन करते.त्यांनी दुसर्‌या ओळीत कोमल मध्यमाचा वापर वापर करून केलेली स्वरांची बांधणी भल्या-भल्यांना बुचकळ्यात टाकते.त्यांच्या गाण्यातील आर्तता सरळ हृदयात घुसून अमिर खुस्रोच्या ’सूफी’ संगीताची ’खरी’ ओळख पटवते.मध्यमाचा असाच काहीसा प्रयोग अनूप जलोटा यांनी ’तुम्हारे शहर का मौसम बडा सुहाना लगे’ या गझलच्या बंदिशीत केला आहे,तो पण श्रवणीय आहे.
          माझ्या मते गानसमयापेक्षाही त्या त्या रागातील स्वरांचा उपयोग संगीतकार कशा प्रकारे करतो,
गायक-गायिका कशा प्रकारे प्रस्तुती करते आणि वाद्यमेळ कसा जमतो यावर श्रोत्यांची आवड-निवड ठरत असावी.तसे नसते तर तोडी रागातील गाणी सकाळ सोडून इतर वेळी कानाला गोड लागलीच नसती.काही-काही गोष्टी परंपरेने ठरवून-ठरवून डोक्यात भरविल्या जातात त्यातलाच गानसमय हा प्रकार असावा असे मला प्रामाणिकपणे वाटते.असो...हा वादाचा मुद्दा आहे.असो!
       मी सुद्धा काही मराठी-उर्दू गझला तोडी रागात स्वरबद्ध केल्या आहेत.नुकतीच #गझल_गुलाबो या अल्बम करीता रविप्रकाश चापके यांची "जो तो दिसावयाला दिसतो सुखात आहे" ही गझल स्वरबद्ध करून ध्वनिमुद्रण केले.यातील पहिल्या ओळीची सुरवात कोमल धैवतापासून सुरू होऊन निषादावरील ठहरावासह 'भूप' रागाची अनुभूती देऊन, 'आहे' या शब्दावरील पंचम आणि पूर्ण ओळीत षड्ज नसणे हे  वैशिष्ठयपूर्ण असून हीच ओळ दुसऱ्यांदा गाऊन षड्जावर सोडण्याची प्रक्रिया सुद्धा आनंददायी आहे.तसेच शेरांमध्ये केलेला तोडी रागात नसलेल्या कोमल निषादाचा आणि कोमल मध्यमाचा प्रयोग सुद्धा अत्यंत वेगळ्या विश्वात नेणारा आहे. स्वरांचा हा चक्रव्यूह रसिकांना  नक्कीच भावेल.ऐका तर...
        
जो तो दिसावयाला दिसतो सुखात आहे
गर्दीत माणसांना एकांत खात आहे

आता तुझ्या स्मृतींची फुलपाखरे उडाली
बेरंग बाग नुसती जळते मनात आहे

ये ना तुझा नशीबा मी हात पाहते रे
माझे नशीब माझ्या ह्या मनगटात आहे

ऐकून घ्या परंतू सांगू नका कुणाला
जो जो सुखात आहे,तो तो भ्रमात आहे

गायिका-गायत्री गायकवाड गुल्हाने



 

 

Wednesday, December 7, 2022

Pioneer gazal singer in marathi...


वर्ष १९८१

बँ.अंतुले मुख्यमंत्री असतांना,नागपुरच्या हिवाळी अधिवेशनात मा.रा.सु.गवई यांचे काँटेजवर एका भव्य शामियान्यात काव्य - संगीत मैफल सुरेश भटांनी आयोजित केली होती.मी चळवळीचा कार्यकर्ता असल्यामुळे गवई साहेबांच्या काँटेजवरच होतो.या मैफिलीत एक तरूण गायक मराठी गझला पेश करून उपस्थितांची दाद घेताना मी पाहिला.मैफिल अतिशय सुंदर झाली.कार्यक्रमानंतर अंतुले साहेबांचे हस्ते त्या तरुणाचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.त्याच प्रसंगी मा.जवाहरलालजी दर्डा यांनी त्या तरूण गायकाला मिठी मारुन ’हा आमच्या यवतमाळचीच नव्हे तर विदर्भाची शान आहे’ असे जाहीरपणे सांगितले. शामियान्याच्या एका कोप-यात उभे राहून हा सर्व सोहळा मी याची देही याची डोळा पाहिला.हा तरूण गायक म्हणजे सुधाकर कदम होय. सुधाकर कदमांना मी सर्वप्रथम येथे पाहिले.यावेळी सुरेश भटांसोबत सावलीप्रमाणे वावरणारा एक तरुण होता.त्याचे नाव शाहिर सुरेशकुमार वैराळकर.

त्या नंतर मा.शरद पवारांनी वर्धा या गावी १८ ते २० सप्टेंबर १९८१ ला भव्य शेतकरी मेळावा घेतला होता.तेथेही सुधाकर कदमांचा कार्यक्रम झाला.त्यात ’सूर्य केव्हाच आंधारला यार हो’ ही सुरेश भटाची गझल गाऊन समा बांधला होता.या प्रसंगी शरद पवार,पद्मसिंह पाटील,सुधाकरराव देशमुख,रावसाहेब वडनेरकर,सुरेश भट,ना.धो.महानोर,विट्ठल वाघ,प्रा.देविदास सोटे वगैरे मंडळी उपस्थित होती.

त्या नंतर यवतमाळ जिल्ह्यातील बेलोरा या गावी दि.२७ व २८ मार्च १९८२ ला बाबुराव बागुल यांचे अध्यक्षतेखाली दलित साहित्य सम्मेलन झाले.याचे उद्घाटन म.रा.साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डाँ.सुरेंद्र बारलिंगे यांचे हस्ते झाले होते.तेथेही मी होतो.या साहित्य संम्मेलनात सुधाकर कदमांचा मराठी गझल गायनाचा रंगलेला कार्यक्रम मी स्वतः पाहिला.या वेळेपर्यंत फक्त मराठी गझल गायनाचा तीन तासाचा कार्यक्रम करणारा एकही कलाकार महाराष्ट्रात नव्हता.आणि जे कोणी करत असतील तो फुटकळ स्वरुपाचा प्रयत्न असावा.तसे नसते तर सुरेश भटांनी निश्चीतच या संदर्भात कोणाचा तरी उल्लेख केला असता.या कालावधीत औरंगाबादचे नाथ नेरळकरही आशालता करलगीकर यांना सोबत घेऊन हिमांशु कुळकर्णी यांच्या गझलांचे कार्यक्रम करीत असल्याचे दिसून येते.परंतू पुढे त्यांनी ते बंद केले.तरीही जर कोणी दावा करीत असेल तर त्याने लेखी पुरावे द्यावे.मी मरेपर्यंत त्याची गुलामी करीन.

१९८१ मध्ये ’महाराष्ट्राचे मेहदी हसन’म्हणून सुरेश भटांनी त्यांना गौरविले.१९८२ मध्ये ’गझलनवाज’उपाधी दिली.१९८३ मध्ये महाराष्ट्र जेसीजने ’Out Standing Young Person'हा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविले.गोंदिया येथे ३०/१०/१९८३ रोजी मा.छेदीलालजी गुप्ता यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.(जेसीजने दिलेल्या सन्मानपत्रात ’#Pioneer_in_the_introduction_of_MARATHI_GAZALS' असा स्पष्ट उल्लेख आहे.) आता मला सांगा वरील सर्व मान-सन्मान सुधाकर कदमांना काहीच न करता मिळाले असतील काय ? या अगोदर ५/७ वर्षे तरी त्यांनी मराठी गझल गायकीसाठी मेहनत घेतली असेल ना ?

मराठी गझल गायकीला तशी फार मोठी परंपरा नाही.जास्तीत जास्त ३५ वर्ष,फारच ओढाताण केली तर ४० वर्षे,बस्स ! तेही ओढून ताणूनच,त्यापलीकडे ही परंपरा जात नाही.त्यातही महाराष्ट्रातील विविध वर्तमानपत्रांचे लेखी पुरावे जर पाहिले तर हा काळ आणखी कमी होतो.आणि इतिहास लिहीतांना तोंडी माहितीपेक्षा लेखी माहितीला जास्ती महत्व असते.लेखी पुरावे आणि विविध संस्थांनी मराठी गझल गायकीतील योगदानाबद्दल दिलेल्या पुरस्कारांचा विचार केला तर मराठी गझल गायकीची सुरवात सुधाकर कदम यांचे पासून झाल्याचे दिसून येते.सुरवातीच्या काळात सुरेश भट आणि सुधाकर कदम विदर्भात फिरले.नंतर मराठवाडा आणि शेवटी पश्चिम महाराष्ट्र.या वेळी कार्यक्रमाचे निवेदन कधी सुरेश भट तर कधी डाँ.सुरेशचंद्र नाडकर्णी करायचे.३/४ वर्षे महाराष्ट्रभर भ्रमंती केल्यानंतर "अशी गावी मराठी गझल" ह्या कार्यक्रमाची सांगता १५ जुलै १९८२ ला पुण्यात महाराष्ट्र परिषदेच्या माधव ज्युलियन सभागृहात झाली.या कार्यक्रमाचे निवेदन स्वतः सुरेश भटांनी केले.प्रमूख उपस्थिती डाँ,सुरेशचंद्र नाडकर्णी यांची होती.आयोजक होते ग.वा.बेहरे (कार्याध्यक्ष) आणि राजेंद्र बनहट्टी (कार्यवाह).

यानंतर कदमांनी एकट्याने कार्यक्रम करणे सुरु केले.या कार्यक्रमाचे निवेदन आर्णीचे कवी कलीम खान करायचे.(काही कार्यक्रमांचे निवेदन प्रसिद्ध कवी प्रा.नारायण कुळकर्णी कवठेकर यांनी सुद्धा केले) मध्यप्रदेशातील इंदूर येथील जाल सभागृहातील दि.२८ आँक्टोबर १९८९ चा कार्यक्रम या दोघांनी चांगलाच गाजवला.मराठी गझल गायनाचा मध्यप्रदेशातील हा पहिला वहिला कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला मध्यप्रदेशातील सुप्रसिद्ध रंगकर्मी श्री बाबा डिके आणि अभिनेता चंदू पारखी उपस्थित होते.

"अशी गावी मराठी गझल" या कार्यकमावरील तत्कालीन विविध वर्तमानपत्रांच्या निवडक प्रतिक्रीया...

१) स्थानिक ’स्वरशोधक’ मंडळातर्फे यवतमाळचे सुधाकर कदम यांच्या मराठी गझल गायनाचा कार्यक्रम को-आँपरेटीव्ह बँकेच्या सभागृहात संपन्न झाला.सतत तीन तास पर्यंत बहुसंख्य रसिक या आगळ्या मैफिलीची खुमारी लुटत होते.स्वर आणि शब्दांची उत्कृष्ट सांगड घालून सादर केलेल्या गझला वर्धेच्या रसिकांच्या बराच काळ पर्यंत स्मरणात राहतील. ..............

●दै.नागपुर पत्रिका,११/४/१९८१


२) कोमल हळवी गझल श्री सुधाकर कदम त्यातल्या भावनेला फंकर घालीत हळुवारपणे फुलवितात.त्यातील शब्दांच्या मतितार्थाचे हुबेहुब चित्र रसिकांपुढे प्रकट करतात..............

●दै.लोकसत्ता,मुंबई.१४/७/१९८२


३) सुधाकर कदम याच्या गझल गायकीने,रसिक पुणेकरांना बेहद्द खूष केले.हा तरूण गायक प्रथमच पुण्यात आला,पुणेकरांनी त्याला प्रथमच ऐकले. आणि परस्परांच्या तल्लीनतेने साहित्य परिषदेच्या सभागृहाला श्रवण सुखाचे नवे लेणे अर्पण केले.सुधाकर कदम सुंदर गातात.त्यांच्या मधुर स्वरांना सारंगीची आणि तबल्याचीही सुरेख साथ लाभली होती.त्यामुळे आजचा कार्यक्रम चांगलाच रंगला............

●दै. तरूण भारत,पुणे.१६/७/१९८२.


४) सुरेश भटांनी शाबासकी दिलेल्या विदर्भातील सुधाकर कदम यांची ऐकण्यास उत्सुक असलेले पुणेकर कार्यक्रमाअगोदर सभागृहात हजर झाले होते. सुधाकर कदमांनी ’सा’ लावला मात्र पुणेकरांनी टाळ्यांचा कडकडाट करून त्यांचे उत्स्फूर्तपणॆ स्वागत केले.आणि मग अशी रंगली मैफल की काही विचारू नका....गझल ही भावगीत किंवा सुगम संगीताच्या चालीवर गायची नसते तर शब्दाच्या मूळ अर्थाला आणखी अर्थ लावून शब्दाचा आनंद सामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी गझल गायनाचा हा केलेला महाराष्ट्रातील पहिला प्रयत्न निश्चितच अभिनंदनीय आहे............

.●सुभाष इनामदार, सा.लोकप्रभा,मुंबई.दि.१५ आँगष्ट १९८२.


५) सुरेश भटांचे शब्द आणि सुधाकर कदम यांचे स्वर यातून फुललेली गझल भावपूर्ण,अर्थपूर्ण आणि उत्कंठापूर्ण होती.गझल गायनाचा ढंग हा शब्दांना अधिक अर्थ देतो.गझलांचे जे वैशिष्ठ्य उत्कंठा वाढवून धक्का देणे-तो प्रकार सुधाकर कदम यांच्या गायकीत प्रामुख्याने दिसला........................... 

●दै.लोकसत्ता,२३/७/१९८२.


६) ’हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही’ या गझलेचा प्रारंभच कदमांनी नजाकतीने केला.त्यातील ’नाही’ या शब्दावरील स्वरांचा हळुवारपणा सुखावुन गेला..............

●दै.केसरी,पुणे. दि.२५/७/१९८२.


७) मराठी गझल कशी गावी हे जाणून घ्यायचे असेल तर श्री सुधाकर कदमांची मैफल एकदा तरी ऐकावी..........

 ●दै.सकाळ,पुणे.


८) गायकीतील फारसं कळो वा न कळो सुरेश भटांचे शब्द आणि सुधाकर कदमांचे स्वर एक वेगळं इंद्रधनुष्य घेऊन येतं.त्यांच्या मैफिलीत कधी चांदण्यांचे स्वर तर कधी स्वरांचे चांदणे होते.......................

●अनंत दीक्षित,दै.सकाळ,कोल्हापुर.६ जुलै १९८२


९) सुधाकर कदम यांनी उर्दू गझलप्रमाणे मराठी गझल कशा गायिल्या जातात याचे उत्कृष्ट दर्शन यावेळी रसिकांना करून दिले............

●दै.लोकमत,औरंगाबाद.३/३/१९८२


१०) Mr.Kadam's speciality is his throw of words coupled with exact modulations.His presentation is perfect & systematic wich at once impresses & touches................

●The Hitwad,Nagpur.23/4/1984


११) सुधाकर कदम की गायकी के अंदाज़ को समय समय पर दाद मिली...

●दै.नवभारत,नागपुर. ६ जुलाई १९८४


१२) कदाचित सुरेश भट यांच्या गझलची प्रकृती आणि सुधाकर कदम यांच्या आवाजाची जातकुळी एक असावी म्हणून सुरेश भटांच्या गझलमधील आत्मा सुधाकर कदम यांच्या आवाजाला गवसला असावा............

●दै.लोकमत,नागपुर.१३/७/१९८४


१३) मराठी गज़ले भी उर्दू की तरह सुमधूर होती है....................

●दै.चौथा संसार,इंदौर.२७/१२/१९८९


-मस्त कलंदर

१४.१०.२०११





संगीत आणि साहित्य :