गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Wednesday, December 7, 2022

Pioneer gazal singer in marathi...


वर्ष १९८१

बँ.अंतुले मुख्यमंत्री असतांना,नागपुरच्या हिवाळी अधिवेशनात मा.रा.सु.गवई यांचे काँटेजवर एका भव्य शामियान्यात काव्य - संगीत मैफल सुरेश भटांनी आयोजित केली होती.मी चळवळीचा कार्यकर्ता असल्यामुळे गवई साहेबांच्या काँटेजवरच होतो.या मैफिलीत एक तरूण गायक मराठी गझला पेश करून उपस्थितांची दाद घेताना मी पाहिला.मैफिल अतिशय सुंदर झाली.कार्यक्रमानंतर अंतुले साहेबांचे हस्ते त्या तरुणाचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.त्याच प्रसंगी मा.जवाहरलालजी दर्डा यांनी त्या तरूण गायकाला मिठी मारुन ’हा आमच्या यवतमाळचीच नव्हे तर विदर्भाची शान आहे’ असे जाहीरपणे सांगितले. शामियान्याच्या एका कोप-यात उभे राहून हा सर्व सोहळा मी याची देही याची डोळा पाहिला.हा तरूण गायक म्हणजे सुधाकर कदम होय. सुधाकर कदमांना मी सर्वप्रथम येथे पाहिले.यावेळी सुरेश भटांसोबत सावलीप्रमाणे वावरणारा एक तरुण होता.त्याचे नाव शाहिर सुरेशकुमार वैराळकर.

त्या नंतर मा.शरद पवारांनी वर्धा या गावी १८ ते २० सप्टेंबर १९८१ ला भव्य शेतकरी मेळावा घेतला होता.तेथेही सुधाकर कदमांचा कार्यक्रम झाला.त्यात ’सूर्य केव्हाच आंधारला यार हो’ ही सुरेश भटाची गझल गाऊन समा बांधला होता.या प्रसंगी शरद पवार,पद्मसिंह पाटील,सुधाकरराव देशमुख,रावसाहेब वडनेरकर,सुरेश भट,ना.धो.महानोर,विट्ठल वाघ,प्रा.देविदास सोटे वगैरे मंडळी उपस्थित होती.

त्या नंतर यवतमाळ जिल्ह्यातील बेलोरा या गावी दि.२७ व २८ मार्च १९८२ ला बाबुराव बागुल यांचे अध्यक्षतेखाली दलित साहित्य सम्मेलन झाले.याचे उद्घाटन म.रा.साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डाँ.सुरेंद्र बारलिंगे यांचे हस्ते झाले होते.तेथेही मी होतो.या साहित्य संम्मेलनात सुधाकर कदमांचा मराठी गझल गायनाचा रंगलेला कार्यक्रम मी स्वतः पाहिला.या वेळेपर्यंत फक्त मराठी गझल गायनाचा तीन तासाचा कार्यक्रम करणारा एकही कलाकार महाराष्ट्रात नव्हता.आणि जे कोणी करत असतील तो फुटकळ स्वरुपाचा प्रयत्न असावा.तसे नसते तर सुरेश भटांनी निश्चीतच या संदर्भात कोणाचा तरी उल्लेख केला असता.या कालावधीत औरंगाबादचे नाथ नेरळकरही आशालता करलगीकर यांना सोबत घेऊन हिमांशु कुळकर्णी यांच्या गझलांचे कार्यक्रम करीत असल्याचे दिसून येते.परंतू पुढे त्यांनी ते बंद केले.तरीही जर कोणी दावा करीत असेल तर त्याने लेखी पुरावे द्यावे.मी मरेपर्यंत त्याची गुलामी करीन.

१९८१ मध्ये ’महाराष्ट्राचे मेहदी हसन’म्हणून सुरेश भटांनी त्यांना गौरविले.१९८२ मध्ये ’गझलनवाज’उपाधी दिली.१९८३ मध्ये महाराष्ट्र जेसीजने ’Out Standing Young Person'हा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविले.गोंदिया येथे ३०/१०/१९८३ रोजी मा.छेदीलालजी गुप्ता यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.(जेसीजने दिलेल्या सन्मानपत्रात ’#Pioneer_in_the_introduction_of_MARATHI_GAZALS' असा स्पष्ट उल्लेख आहे.) आता मला सांगा वरील सर्व मान-सन्मान सुधाकर कदमांना काहीच न करता मिळाले असतील काय ? या अगोदर ५/७ वर्षे तरी त्यांनी मराठी गझल गायकीसाठी मेहनत घेतली असेल ना ?

मराठी गझल गायकीला तशी फार मोठी परंपरा नाही.जास्तीत जास्त ३५ वर्ष,फारच ओढाताण केली तर ४० वर्षे,बस्स ! तेही ओढून ताणूनच,त्यापलीकडे ही परंपरा जात नाही.त्यातही महाराष्ट्रातील विविध वर्तमानपत्रांचे लेखी पुरावे जर पाहिले तर हा काळ आणखी कमी होतो.आणि इतिहास लिहीतांना तोंडी माहितीपेक्षा लेखी माहितीला जास्ती महत्व असते.लेखी पुरावे आणि विविध संस्थांनी मराठी गझल गायकीतील योगदानाबद्दल दिलेल्या पुरस्कारांचा विचार केला तर मराठी गझल गायकीची सुरवात सुधाकर कदम यांचे पासून झाल्याचे दिसून येते.सुरवातीच्या काळात सुरेश भट आणि सुधाकर कदम विदर्भात फिरले.नंतर मराठवाडा आणि शेवटी पश्चिम महाराष्ट्र.या वेळी कार्यक्रमाचे निवेदन कधी सुरेश भट तर कधी डाँ.सुरेशचंद्र नाडकर्णी करायचे.३/४ वर्षे महाराष्ट्रभर भ्रमंती केल्यानंतर "अशी गावी मराठी गझल" ह्या कार्यक्रमाची सांगता १५ जुलै १९८२ ला पुण्यात महाराष्ट्र परिषदेच्या माधव ज्युलियन सभागृहात झाली.या कार्यक्रमाचे निवेदन स्वतः सुरेश भटांनी केले.प्रमूख उपस्थिती डाँ,सुरेशचंद्र नाडकर्णी यांची होती.आयोजक होते ग.वा.बेहरे (कार्याध्यक्ष) आणि राजेंद्र बनहट्टी (कार्यवाह).

यानंतर कदमांनी एकट्याने कार्यक्रम करणे सुरु केले.या कार्यक्रमाचे निवेदन आर्णीचे कवी कलीम खान करायचे.(काही कार्यक्रमांचे निवेदन प्रसिद्ध कवी प्रा.नारायण कुळकर्णी कवठेकर यांनी सुद्धा केले) मध्यप्रदेशातील इंदूर येथील जाल सभागृहातील दि.२८ आँक्टोबर १९८९ चा कार्यक्रम या दोघांनी चांगलाच गाजवला.मराठी गझल गायनाचा मध्यप्रदेशातील हा पहिला वहिला कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला मध्यप्रदेशातील सुप्रसिद्ध रंगकर्मी श्री बाबा डिके आणि अभिनेता चंदू पारखी उपस्थित होते.

"अशी गावी मराठी गझल" या कार्यकमावरील तत्कालीन विविध वर्तमानपत्रांच्या निवडक प्रतिक्रीया...

१) स्थानिक ’स्वरशोधक’ मंडळातर्फे यवतमाळचे सुधाकर कदम यांच्या मराठी गझल गायनाचा कार्यक्रम को-आँपरेटीव्ह बँकेच्या सभागृहात संपन्न झाला.सतत तीन तास पर्यंत बहुसंख्य रसिक या आगळ्या मैफिलीची खुमारी लुटत होते.स्वर आणि शब्दांची उत्कृष्ट सांगड घालून सादर केलेल्या गझला वर्धेच्या रसिकांच्या बराच काळ पर्यंत स्मरणात राहतील. ..............

●दै.नागपुर पत्रिका,११/४/१९८१


२) कोमल हळवी गझल श्री सुधाकर कदम त्यातल्या भावनेला फंकर घालीत हळुवारपणे फुलवितात.त्यातील शब्दांच्या मतितार्थाचे हुबेहुब चित्र रसिकांपुढे प्रकट करतात..............

●दै.लोकसत्ता,मुंबई.१४/७/१९८२


३) सुधाकर कदम याच्या गझल गायकीने,रसिक पुणेकरांना बेहद्द खूष केले.हा तरूण गायक प्रथमच पुण्यात आला,पुणेकरांनी त्याला प्रथमच ऐकले. आणि परस्परांच्या तल्लीनतेने साहित्य परिषदेच्या सभागृहाला श्रवण सुखाचे नवे लेणे अर्पण केले.सुधाकर कदम सुंदर गातात.त्यांच्या मधुर स्वरांना सारंगीची आणि तबल्याचीही सुरेख साथ लाभली होती.त्यामुळे आजचा कार्यक्रम चांगलाच रंगला............

●दै. तरूण भारत,पुणे.१६/७/१९८२.


४) सुरेश भटांनी शाबासकी दिलेल्या विदर्भातील सुधाकर कदम यांची ऐकण्यास उत्सुक असलेले पुणेकर कार्यक्रमाअगोदर सभागृहात हजर झाले होते. सुधाकर कदमांनी ’सा’ लावला मात्र पुणेकरांनी टाळ्यांचा कडकडाट करून त्यांचे उत्स्फूर्तपणॆ स्वागत केले.आणि मग अशी रंगली मैफल की काही विचारू नका....गझल ही भावगीत किंवा सुगम संगीताच्या चालीवर गायची नसते तर शब्दाच्या मूळ अर्थाला आणखी अर्थ लावून शब्दाचा आनंद सामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी गझल गायनाचा हा केलेला महाराष्ट्रातील पहिला प्रयत्न निश्चितच अभिनंदनीय आहे............

.●सुभाष इनामदार, सा.लोकप्रभा,मुंबई.दि.१५ आँगष्ट १९८२.


५) सुरेश भटांचे शब्द आणि सुधाकर कदम यांचे स्वर यातून फुललेली गझल भावपूर्ण,अर्थपूर्ण आणि उत्कंठापूर्ण होती.गझल गायनाचा ढंग हा शब्दांना अधिक अर्थ देतो.गझलांचे जे वैशिष्ठ्य उत्कंठा वाढवून धक्का देणे-तो प्रकार सुधाकर कदम यांच्या गायकीत प्रामुख्याने दिसला........................... 

●दै.लोकसत्ता,२३/७/१९८२.


६) ’हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही’ या गझलेचा प्रारंभच कदमांनी नजाकतीने केला.त्यातील ’नाही’ या शब्दावरील स्वरांचा हळुवारपणा सुखावुन गेला..............

●दै.केसरी,पुणे. दि.२५/७/१९८२.


७) मराठी गझल कशी गावी हे जाणून घ्यायचे असेल तर श्री सुधाकर कदमांची मैफल एकदा तरी ऐकावी..........

 ●दै.सकाळ,पुणे.


८) गायकीतील फारसं कळो वा न कळो सुरेश भटांचे शब्द आणि सुधाकर कदमांचे स्वर एक वेगळं इंद्रधनुष्य घेऊन येतं.त्यांच्या मैफिलीत कधी चांदण्यांचे स्वर तर कधी स्वरांचे चांदणे होते.......................

●अनंत दीक्षित,दै.सकाळ,कोल्हापुर.६ जुलै १९८२


९) सुधाकर कदम यांनी उर्दू गझलप्रमाणे मराठी गझल कशा गायिल्या जातात याचे उत्कृष्ट दर्शन यावेळी रसिकांना करून दिले............

●दै.लोकमत,औरंगाबाद.३/३/१९८२


१०) Mr.Kadam's speciality is his throw of words coupled with exact modulations.His presentation is perfect & systematic wich at once impresses & touches................

●The Hitwad,Nagpur.23/4/1984


११) सुधाकर कदम की गायकी के अंदाज़ को समय समय पर दाद मिली...

●दै.नवभारत,नागपुर. ६ जुलाई १९८४


१२) कदाचित सुरेश भट यांच्या गझलची प्रकृती आणि सुधाकर कदम यांच्या आवाजाची जातकुळी एक असावी म्हणून सुरेश भटांच्या गझलमधील आत्मा सुधाकर कदम यांच्या आवाजाला गवसला असावा............

●दै.लोकमत,नागपुर.१३/७/१९८४


१३) मराठी गज़ले भी उर्दू की तरह सुमधूर होती है....................

●दै.चौथा संसार,इंदौर.२७/१२/१९८९


-मस्त कलंदर

१४.१०.२०११

No comments:





संगीत आणि साहित्य :