गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Wednesday, August 8, 2012


आवेगी पाऊस...

आवेगी पाऊस 
असा बरसला 
देहासि भिडला
धरणीच्या ...

दाहि दिशातुन 

पिसाटत आला 
भोवती घुमला 
हळुवार ...

धिंगाणा घालोनि

वेडावल्यागत 
गर्जना करित 
लोटावला ...

वाटे पावसाचे 

मलमली वस्त्र 
होवोनि विवस्त्र 
पांघरावे ...

लखलखणारी 

एक वीज रेघ 
शक्तीचे अमोघ 
रूप दावि ...

तडतडणार्‍या 

अगणित सरी 
घाट माथ्यावरी 
ताल धरी ...

नवे धबधबे 

दुधाळोनि आले 
गर्जोनि हासले 
फेसाळत ...

ओसाड मनाच्या 

खडकावरती 
नवी जीवशक्ति 
कोंभाळली ...

टंच ओल्याचिंब 

जुन्या आठवणी 
मनाच्या रिंगणी 
फेर धरी ...

सुधाकर कदम 





संगीत आणि साहित्य :