गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Monday, August 26, 2013

‘शब्द’ माझे...


मी असा आहे कलंदर मसनजोगी
पेटवीतो रोज धुनि पुन्हा नव्याने...


Sunday, August 18, 2013


वस्ती उजाड झाली,चाहूल ना कुणाची

गातोस तू कशाला, येथे तुझी विराणी

sudhakar kadam

Thursday, August 8, 2013

पुणे येथील गझल : कार्यशाळा , मुशायरा आणि गायन मैफल...

// पुणे येथील गझल : कार्यशाळा , मुशायरा आणि गायन मैफलीचा स्वल्प वृत्तांत // (कलीम खान यांच्या शब्दात)

6 जुलाई 2013 पर 08:50 अपराह्न
मित्रहो ,
पुणे येथील दि. ३० जून रोजी झालेली " गझल : कार्यशाळा " आटोपून आर्णीला परतलोय .

* कार्यशाळेमुळे बराच लाभ झाल्याचे सहभागी प्रतिनिधींनी सांगितले . मला हि समाधान आहे .

* संध्याकाळचा मुशायरा हि बहारदार झाला . प्रतिथयशांसोबातच नावोदितांनीही आपल्या रचना सादर केल्यात .

*रात्री श्री.सुधाकर कदम व रेणू कदम-चव्हाण यांची गझल-गायन मैफिल अत्यंत सुरेल झाल्याची पावती उपस्थितांच्या टाळ्या देत होत्या .

* मुंबई-पुणेच नव्हे तर सांगली , सोलापूर ,इंदूर इत्यादी ठिकाणावरून प्रतिनिधी आले होते .एक विस्थापित काश्मिरी पंडित हि दिवसभर उपस्थित होते .त्यांनी हि विस्थापितांच्या वेदना मांडणारी रचना मुशायऱ्यात सदर केली .

* श्री संजय सिंगलवार व त्यांच्या चमू ने कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी घेतलेल्या परिश्रमाचे कौतुक करावे तेव्हढे कमीच आहे .

* कार्यक्रमास उपस्थित असलेल्या प्रतिनिधींनी व इतरांनी हि कृपया ,आपल्या प्रतिक्रिया नोंदवाव्यात ; हि विनंती .

आपला नम्र ,
कलीम खान , 
०३ / ०७ / २०१३


उदघाटन समारंभ...
उदघाटन समारंभ...

कार्यशाळा घेताना...
श्री कलीम खान
कार्यशाळा घेताना... श्री कलीम खान

मुशायरा...
मुशायरा...

मुशायरा...
मुशायरा...

मुशायरा...
मुशायरा...

मुशायरा...
मुशायरा...

मुशायरा...
मुशायरा...

मुशायरा...
मुशायरा...

मुशायरा...
मुशायरा...

रसिक व प्रशिक्षणार्थी...
रसिक व प्रशिक्षणार्थी...

रसिक व प्रशिक्षणार्थी...
रसिक व प्रशिक्षणार्थी...

आम्ही सारे...
आम्ही सारे...

गझल गायन मैफिल...
गझल गायन मैफिल...

गझल गायन मैफिल...
गझल गायन मैफिल...

गझल गायन मैफिल...
गझल गायन मैफिल...

भावमुद्रा...
भावमुद्रा...

भावमुद्रा...
रेणू कदम चव्हाण.
भावमुद्रा... रेणू कदम चव्हाण.

भावमुद्रा...
निषाद कदम.
भावमुद्रा... निषाद कदम.

भावमुद्रा...
रेणू कदम चव्हाण.
भावमुद्रा... रेणू कदम चव्हाण.



भावमुद्रा...
भावमुद्रा...

भावमुद्रा...
भावमुद्रा...

भावमुद्रा...
भावमुद्रा...

भावमुद्रा...
भावमुद्रा...

Tuesday, August 6, 2013

खारट घास...



जगण्याच्या या खारट घासा 
गिळून घ्यावा, जरी नकोसा 

वळणाची ही वाट,तरी पण 
चालत जावे विसरुन मी पण

खळाळुनी हसण्याचा ठेवा 
जगण्यासाठी पुरवित जावा 

धसमुसळे हे तुझे वागणे 
तटस्थ होऊन बघत राहणे 

रडण्यालाही हवा बहाणा 
नकळत श्वासांचा धिंगाणा 

भिंग्रीसम भिरभिरुनी येते 
अन् हळूच मग मिठीत शिरते

आभाळुन जरि आले अंगण 
छोटे-मोठे घाला रिंगण

नरड्यामध्ये एक हुंदका  
गिळून घ्यावा,जरी नकोसा


सुधाकर कदम




संगीत आणि साहित्य :