जगण्याच्या या खारट घासा
गिळून घ्यावा, जरी नकोसा
वळणाची ही वाट,तरी पण
चालत जावे विसरुन मी पण
खळाळुनी हसण्याचा ठेवा
जगण्यासाठी पुरवित जावा
धसमुसळे हे तुझे वागणे
तटस्थ होऊन बघत राहणे
रडण्यालाही हवा बहाणा
नकळत श्वासांचा धिंगाणा
भिंग्रीसम भिरभिरुनी येते
अन् हळूच मग मिठीत शिरते
आभाळुन जरि आले अंगण
छोटे-मोठे घाला रिंगण
नरड्यामध्ये एक हुंदका
गिळून घ्यावा,जरी नकोसा
सुधाकर कदम
No comments:
Post a Comment