गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Friday, January 6, 2012

'मुझे दोस्त बनके दगा न दे...'


 
"मेरे हमनफ़स,मेरे हमनवा,मुझे दोस्त बनके दगा न दे;
मैं हूँ दर्द--इश्क़ से जाँ-वलब,मुझे ज़िंदगी की दुआ न दे"

         ही शकील बदायुनी यांची गझल अनेक कलाकार गायिले आहेत.पण सर्व प्रथम आठवण येते ती
 बेगम अख़्तर या गझल गायकीच्या महाराणीची ! भारतातीलच नव्हे तर सार्‌या जगातील रसिकांच्या गळ्यातील कंठमणी असलेली ही गायिका १९३४ ते १९७४ अशी तब्बल ४० वर्षे अखंड गात राहिली.कुमार गंधर्व,पं.वसंतराव देशपांडे,पु.लं. सारखी मातब्बर मंडळी त्यांच्या गझलांची वेडी होती,यावरून बाईंच्या गझल गायकीवरील हुकमतीची कल्पना येते.तसा गझल हा गायन प्रकार शास्त्रीय दृष्ट्या दुय्यम मानल्या जातो.परंतू अख़्तरी बाईच्या आवाजात काय जादू होती कोणास ठाऊक,त्यांच्या गझल गायकीला मात्र शास्त्रीय संगीत गाणार्‌या,वाजविणार्‌या सर्व कलाकारांनी मनापासून दाद दिली.यावरुन बाईच्या गायकीची खासियत लक्षात यायला हरकत नाही.बेगम अख़्तरच्या आगे-मागे रसुलनबाई,गौहरजान,शमशाद बेगम,         
अमिरबाई कर्नाटकी,वहिदनबाई,ज़ोहराबाई,कमला झारिया,नूरजहान,मुन्नी बेगम,फ़रीदा ख़ानम यांच्या सारख्या अनेक गझल,ठुमरी गायिका आणि चित्रपटातील पार्श्वगायिका होत्या.परंतू या सगळ्यांमध्ये आपला वेगळा ठसा उमटवणार्‌या बेगम अख़्तर यांच्या गायकीतील वेगळेपणा आपणास सतत जाणवत असतो.सुरवातीच्या काळात त्यांच्या गझल गायकीवरही ठुमरी गायकीची छाप होती परंतू कालांतराने त्यांच्या आवाजानुरूप गझल गायकीचा एक वेगळा बाज तयार होत गेला.(हाच बाज शोभा गुर्टू आणि शुमोना रॉय बिस्वास यांच्या गझल गायकीतही ठळकपणे दिसतो.)गातांना मध्येच एखाद्या ठिकाणी त्यांचा आवाज चिरकल्या सारखा वाटायचा,पण जाणकार याला पत्तीलागणे असे म्हणतात.अशी पत्ती फक्त जव्हारदार आवाजालाच लागते असेही म्हटल्या जाते.’पत्तीचा हा प्रकार सध्याची सुफ़ी गायिका आबेदा परविनही आज-काल करायला जाते,पण तो ओढून-ताणून केल्यासारखा वाटतो.आपोआप लागणेआणि लावणेयात फरक आहे.तसेच अख़्तरीबाईच्या आवाजात जि कशिश आणि गहिरेपणा होता तो आबेदाच्या गाण्यात जाणवत नाही.सूफ़ी-सूफ़ी करून तिचा उदो-उदो होतो आहे पण ज्याने साबरी बंधुंची कव्वाली ऐकली असेल त्याला त्यातला फोलपणा त्वरीत कळतो.
          बेगम अख़्तरचा जन्म ७ ऑक्टोबर १९१४ ला फैज़ाबाद (.प्र.) जिल्ह्यातील भारतकुंड येथे झाला.वडिलांचे नाव असग़र हुसैन...वयाच्या सातव्या वर्षापासून त्यांच्या संगीत शिक्षणाला पाटण्याचे सारंगी वादक उस्ताद इमदाद खान यांचे पासून सुरवात झाली.त्यानंतर पतियाळाचे अता मोहम्मद खान,लाहोरचे मोहम्मद खान,अब्दुल वहीद खान,आणि शेवटी उ.झेंडे खान यांचेकडे त्यांनी शिक्षण घेतले.त्यांचे पहिले मंच प्रदर्शन १९३४ मध्ये वयाच्या १५ व्या वर्षी सरोजिनी नायडू यांचे उपस्थितीत झाले.त्यांची पहिली ध्वनिमुद्रिका मेगाफोनकंपनीने काढली.या ध्वनिमुद्रिकेत त्या गझल,ठुमरी,दादरा गायिल्या.आकर्षक चेहरा आणि सुमधुर गायन यामुळे त्यांना लवकरच चित्रपट सृष्टीत प्रवेश मिळाला.पार्श्वगायनासोबतच त्यांनी चित्रपटात अभिनय सुद्धा केला.त्यांची चित्रपट कारकीर्द खालील प्रमाणे आहे...
) King for a day,1933
) मुमताज़ बेगम,१९३४.
) अमिना,१९३४.
) रूपकुमारी,१९३४.
) जवानीकी नशा १९३५.
) नसीब का चक्कर,१९३६.
) अनारबाला,१९४०.
) रोटी,१९४२. (या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक अनिल बिस्वास आणि निर्माता मेहबूब खान होते.) याचित्रपटानंतर त्यांनी काही अपरिहार्य कारणामुळे मुंबई सोडली व लखनौ येथे मुक्काम ठोकला.१९४५ मध्ये त्याचा विवाह अहमद अब्बासी याचेशी होऊन मुळच्या अख़्तरी फ़ैज़ाबादीच्या बेगम अख्तर झाल्या.लग्ना नंतर त्यांचे गाणे काही काळ बंद झाले.पन पुन्हा त्यांनी १९४९ मध्ये पुन्हा गायला व चित्रपटत काम करायला सुरवात केली.त्यांचा ९ क्रमांकाचा चित्रपट जलसाघर,१९५८ मध्ये प्रदर्शित झाला. (या चित्रपटाचे सुप्रसिद्ध दिग्दर्शन सत्यजित रे यांनी केले होते.) त्यांच्या या सर्व भव्य-दिव्य कामगिरीमुळे पद्मश्री’ (१९६८),संगीत नाटक अकादमी (१९७२), आणि (मरणोपरांत) पद्मविभूषण (१९७५) या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.त्यांचा दुःखद मृत्यू ३०.१०.१९७४ ला एका कार्यक्रमा दरम्यान अहमदाबादला झाला.
           आज आपण त्यांची वरील लोकप्रिय गझल ऐकणार आहोत.हीच गझल मुन्नी बेगम,साबरी बंधू कव्वाल,आसिफ़ अली,फ़रीदा ख़ानम,जगजितसिंग वगैरे मंडळी आपापल्या शैलीत गायिले आहेत.खालील पहिल्या VDO मध्ये पं.जसराज यांनी बेगम अख़्तर विषयी आपले मनोगत व्यक्त केले आहे.(त्यामुळेच मी बेगमच्या गझल गायकी विषयी जास्ती लिहीले नाही.) त्यापुढेच बेगम अख़्तरच्या आवाजातील मेरे हमनफ़स...’ ही गझल आहे.(नाही म्हटले तरी पण थोडे लिहायचा मोह होतोच आहे...) या गझलचा सुरवातीचा आलाप कानावर पडताच ऐकणार्‌याला आपल्याकडे खेचून घेते.मतल्याच्या पहिल्या ओळीतील हमनवाव दुसर्‌या ओळीतील जाँ बलबया शब्दांवरील सुरावटीची नाजूक नक्षी, आपले काम करून वाहवा घेऊन जाते.तसेच दगा न दे...’,दुवा न दे...’ या शब्दांतील आर्तता स्वरांद्वारे जेव्हा कानावर पडते...हाय...हाय...क्या कहने....! अंतर्‌यात टीपेला केलेले स्वरकामही प्रत्येक शेर ऐकण्यास मजबूर करते.हिची बांधणी सात मात्रांच्या रुपक नावाच्या तालात आहे.पहिल्या VDO मध्ये हीच गझल फ़रीदा खानम यांनी त्यांच्या ढंगात,वेगळ्या शैलीत सादर केली आहे.हिचे वैशिष्ठ्य म्हणजे दादराताल....हा सहा मात्रांचा आहे.बंदिश जरी एकच असली तरी तिला फ़रीदा खानम टच आहे.ही गझल सुद्धा सगळ्यांनी जरूर ऐकावी...
Mere Humnafas, Mere Humnawa
Mere Humnafas, Mere Humnawa, Mujhe Dost Ban Ke Daga Na De
Main Hoon Dard-e-Ishq Se Jaan-Valab,
Mujhe Zindagi Ki Dua Na De

Mere Daagh-e-Dil Se Hai Roshni,
Isi Roshni Se Hai Zindagi
Mujhe Darr Hai Ae Mere Chaaragar,
Yeh Chiraag Tu Hi Bujha Na De

Mujhe Ae Chhorh De Mere Haal Par,
Tera Kya Bharosa Hai Chaaragar
Yeh Teri Nawazish-e-Mukhtasar,
Mera Dard Aur Badha Na De

Mera Azm Itna Buland Hai
Ke Paraaye Sholo-n Ka Darr Nahin
Mujhe Khauf Aatish-e-Gul Se Hai,
Yeh Kahin Chaman Ko Jala Na De

Woh Uthein Hain Leke Hom-o-Subu,
Arrey O 'Shakeel' Kahan Hain Tu
Tera Jaam Lene Ko Bazm Mein
Koi Aur Haath Badha Na De!
शकील बदायुनी





संगीत आणि साहित्य :