.
-तबलापटू शेखर सरोदे आणि मी-
...तेव्हा मी एक तास सरोद वादन व एक तास मीच स्वरबद्ध केलेल्या गीत-गझलांचा कार्यक्रम करायचो. तबल्याच्या साथीला यवतमाळचाच, हैदराबादचे उस्ताद दाऊदखान साहेबांचा गंडाबंद शागिर्द आणि सध्याचा पुण्यातील प्रसिद्ध वकील असीम सरोदे याचा काका शेखर सरोदे हा असायचा.ऑर्केस्ट्रा बंद झाल्यावर आर्णीला नोकरी करत असतानाचा १९७६ ते १९८३ असा हा जवळ-जवळ आठ वर्षांचा कालखंड होता.विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातील #अशी_गावी_मराठी_गझल ह्या सुरेश भटांनी शीर्षक दिलेल्या व स्वतः सूत्र संचालन केलेल्या अनेक कार्यक्रमात त्याच्या तबला संगतीने रंगत यायची.शेखर पुण्यात स्थायिक झाल्यावर उत्कृष्ट तबला वादक म्हणून ओळख व्हायला लागली असताना एका कार्यक्रमातून परत येताना कार अपघातात त्याचे निधन झाले.देखणा, रुबाबदार व्यक्तिमत्व असलेला व मैत्रीला जपणारा अतिशय मनमिळावू,आमच्या कुटूंबातील एक भाग बनलेला जिवलग आम्हाला सोडून गेल्याने मित्र मंडळीला व यवतमाळकरांना फार मोठा धक्का बसला होता.त्याच्या अनेक आठवणी हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवल्या आहेत.आपल्या आयुष्यात अनेक मित्र मिळतात.पण असे जिवाला चटका लावून जाणारे दोन-चारच असतात....
●छायाचित्रांमध्ये शेखर आणि मी....