गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Tuesday, May 19, 2026

राजकारण


 

बाबा... कालचे,आजचे.


 

पुणे-उणे


 

बुद्ध


 

साठवणीतील आठवण

 यवतमाळ येथे ऑर्केस्ट्राच्या काळात परिसरातील नाटकांना संगीत देणे, शाळा-शाळातील 'गॅदरींग' मध्ये गाणी बसवून देणे, कुठे कुठे अकॉर्डिअनची साथ देणे असे सांगीतिक उपद्व्याप सुरू असताना नेहरू युवक केंद्राच्या प्रेरणा युवा मंचाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाची जबाबदारी केंद्र प्रमुख श्री भांड यांनी माझ्यावर सोपविली.या मंचातर्फे महाराष्ट्रच नव्हे तर पंजाबातील जगराव येथील राष्ट्रीय एकात्मता शिबिरासाठी मी एक ग्रुप करून तेथे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.त्यावेळी नुकतेच अमृतसरला 'ब्ल्यू स्टार' ऑपरेशन झाले होते.

त्यामुळे पंजाबातील परिस्थिती अत्यंत संवेदनशील असल्यामुळे महाराष्ट्रातून कोणताच ग्रुप जायला तयार नव्हता. पण मी माझ्या ग्रुपला घेऊन गेलो. जवळ जवळ १५ वर्षे मी प्रेरणा युवा मंचाशी संलग्न राहिलो. नंतर सुरेश भटांसोबत मराठी गझल व गझल गायकीच्या प्रचार-प्रचारासाठी झोकून दिल्यामुळे नेहरू युवक केंद्रापासून दूर गेलो.खालील छायाचित्र यवतमाळच्या नगर भवनातील कार्यक्रमासाठी मी बसविलेल्या वाद्यवृंदाचे आहे.कृष्ण-धवल ओरिजनल आहे.त्याचे रूपांतर AI द्वारे मित्रवर्य देवदत्त संगेप यांनी करून दिले.त्यांना धन्यवाद!

या पोस्टला कारणीभूत तेच आहेत.😊

● छायाचित्रात डावीकडून केंद्र प्रमुख भांड (सतार),श्री खंडकर (व्हायोलिन),महादेव शिरे (तानपुरा),अस्मादिक (हार्मोनियम),श्री निंभेकर (सारंगी),श्री भांडेगावकर (बासरी),शेखर सरोदे (तबला).





संगीत आणि साहित्य :