गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Wednesday, May 13, 2026

इथेही ,तिथेही,तुझा भास होतो...

 


मला हा असा का,उगा त्रास होतो.
इथेही ,तिथेही,तुझा भास होतो.

नको काळजा दोष देऊ कुणाला
तुला चोरणारा ,तुझा खास होतो.

तुझे राज्य आहे,तुझी जादुगारी
तुला पाहतो तो तुझा दास होतो.

कुठे राहिला तो भरोसा ऋतूंचा?
तुझ्या हासण्यानेच मधुमास होतो.

तुझ्या सोबतीला, अता सांजवेळी
तुझ्या दारचा मीच गुलबास होतो.

गायक - सुरेश वाडकर #sureshwadkar​
गझल - विजयालक्ष्मी वानखेडे
संगीत - #गझलगंधर्व​ सुधाकर कदम
     गीताच्या मागणीनुसार संगीत संयोजन करण्यात हातखंडा असलेले मिलिंद गुणे यांनी नेहमीप्रमाणे गीत सजविले आहे.Rhythm side अपूर्व द्रविड याने सांभाळली.अतिशय सुरेल व समर्पक बासरी संदीप कुळकर्णी यांची तर गिटार वादक आहेत विशाल थेलकर. ध्वनिमुद्रण पंचम स्टुडिओ.न कंटाळता माझ्या सूचनेप्रमाणे अनेक बदल करत मिक्सिंग,मास्टरिंग करून देणारा 'मास्टर' आहे अजय अत्रे.

#गझल​ #gazal​ #मराठीगझल​ #music​ #संगीतकार​
#गीतकार​ #lyrics​ #composition​
#sudhakarkadamscomposition​





संगीत आणि साहित्य :