गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Wednesday, April 29, 2026

चार श्वासांचा पसारा...वैशाली सामंत


    सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत प्रथमच माझ्या संगीत दिग्दर्शनाखाली गात आहे.त्यांचे 'दाजीबा' हे गाणे खूप लोकप्रिय झाले होते.त्या गाण्याचा व माझ्या संगीत दिग्दर्शनाचा एकूणच बाज वेगळा आहे.त्यामुळे राज यावलीकरांचे हे गीत कसे होईल याची काळजी लागली होती.पण वैशाली चौफेर गाणारी आहे हे मला ध्वनिमुद्रण प्रसंगी लक्षात आले.प्रथम तर दोनेक महिने अगोदर सुरावट लक्षात घेवून पूर्णपणे आत्मसात केली.आणि अत्यंत भावपूर्ण,सुरेल गायिली.ध्वनिमुद्रणाचे वेळी काही नविन जागा गळ्यातून निघाव्या म्हणून अक्षरशः घोकंपट्टी केली.जमिनीवर पाय असणारे कलाकार असेच असतात.संगीतकाराचे समाधान होईपर्यंत गात राहतात.

धन्यवाद वैशाली! लवकरच दुसरे गाणे पण आपणास ऐकायला मिळेल.

       उत्कृष्ट संगीत संयोजन नेहमीप्रमाणे मिलिंद गुणेंचे असून मास्टरिंग अजय अत्रेचे आहे.ध्वनिमुद्रण पंचम स्टुडिओ,पुणे.व्हाईस डबिंग आजिवासन स्टुडिओ,मुंबई.

तबला- अपूर्व द्रविड, व्हायोलिन - रुचिर इंगळे

व्हिडीओ-विवेक काजरेकर,मुंबई.


●पूर्ण गीत ऐकण्यासाठी युट्युब लिंक...

https://youtu.be/DcWW721jZZs?si=DlwA44uyepjsNZM0





संगीत आणि साहित्य :