उशीर झाला तुला यायला अखेर तू आलास तरी
तगमग झाली जरी जिवाची सुटली नाही आस तरी
असा अचानक निघून जाशिल कुठे वाटले स्वप्नांना
सांग कशाला पेरलेस तू सभोवताली भास तरी
परीकथेसम कळ्याफुलांची गोष्ट सांगते मनास मी
सांग कधी आला का येथे एखादा मधुमास तरी
-इलाही जमादार
