गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Thursday, April 30, 2026

महाराष्ट्रदिन,कामगारदिन आणि बुद्धपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आणि नमन 🌹💞🌹

        #महाराष्ट_मायभू_अमुची_मराठी_भाषिकांची 

     आर्णी (जि.यवतमाळ) येथे संगीत शिक्षक म्हणून कार्यरत असताना १९८६ मध्ये शिक्षक कलाकार,विद्यार्थी/विद्यार्थिनी यांना घेऊन इयत्ता १ ते १० च्या पाठ्यपुस्तकातील कवितांना स्वरबद्ध करून तीन भागांमध्ये #झुला नामक कॅसेट तयार केल्या होत्या.त्यात अण्णा भाऊ साठे यांचा जोशपूर्ण असा खालील #पोवाडा पण होता.आज महाराष्ट्रदिना निमित्त आपणा समोर सादर करीत आहे.या कॅसेटमधील बहुतेक कवितांच्या स्वरलिपीचे #सरगम नामक पुस्तक पण प्रकाशित केले होते.या कवितांचे ध्वनिमुद्रण आर्णीलाच आहुजाच्या डेकवर केले होते. त्यामुळे स्टुडिओतील ध्वनिमुद्रणाइतकी सफाई दिसणार नाही.पण जोश मात्र नक्कीच जाणवेल...

गायक - मामा मरगडे,शिक्षक.आर्णी.

संगीत - अर्थातच माझे

सहकलाकार - खंदारे गुरुजी,पुसद.(ढोलकी),  करपे गुरुजी,आर्णी.(हार्मोनियम,कोरस),गजानन घोडेराव गुरुजी,अविनाश गिरी (कोरस).

No comments:





संगीत आणि साहित्य :