"सुवर्णाची आभा" या सुरेश वाडकर यांनी गायिलेल्या प्रेमगीतानंतर डॉ.रामदास चवरे यांचे दुसरे गीत 'उन्ह पावसाचा खेळ' आपल्या सेवेत सादर करीत आहे.गायिका आहे प्राजक्ता सावरकर शिंदे.प्राजक्ता म्हणजे 'प्राजक्तच' आहे.सुरांद्वारे सुगंध पसरविणारी.या गीतातील 'पक्षी भरारले दूर' ही ओळ मी सरळ सरळ सांगितली होती.पण तिने 'दूर' हा शब्द 'दुsssssssर' असा गाऊन 'पक्षी दूरवर गेल्याचे दाखविले' ही तिची कल्पना होती.गीत ऐकल्यावर मी काय म्हणतो ते आपणास कळेल.खरे म्हणजे एखादी कलाकृती जेव्हा जन्माला येते.तेव्हा कवी,गायक/गायिका,संगीतकार,
संगीत संयोजक,ध्वनिमुद्रक,ध्वनिमेळ मिळविणारा (sound Engineer) VDO creator या सगळ्यांचा मोलाचा वाटा असतो.या सगळ्यांचा कृतज्ञतापूर्ण उल्लेख करणे माझे कर्तव्य ठरते.असो! आपण हे गीत ऐकावे,
आवडल्यास प्रतिक्रिया नक्की द्याव्या.प्रतिक्रिया म्हणजे मी एक प्रकारचा आशीर्वाद समजतो. त्याने माझी ऊर्जा वाढून अधिक चांगले काम करण्यास प्रोत्साहन मिळते.
गीताच्या मागणीनुसार संगीत संयोजन करण्यात हातखंडा असलेले मिलिंद गुणे यांनी नेहमीप्रमाणे गीत सजविले आहे.ध्वनिमुद्रण पंचम स्टुडिओ.न कंटाळता माझ्या सूचनेप्रमाणे अनेक बदल करत मिक्सिंग,
मास्टरिंग करून देणारा 'मास्टर' आहे अजय अत्रे.
अप्रतिम असा व्हिडीओ मुंबईचे श्री विवेक काजरेकर यांनी तयार केला.या सगळ्यांना मनःपूर्वक धन्यवाद.

No comments:
Post a Comment