(व्होकल कॉर्ड्सचा त्रास असतानाही प्रत्येक गझलकट्ट्यात एक तरी गझल सादर करावीच लागायची.😊)
●सुरेश भटांच्या बहुतेक गझला त्यांच्या हयातीत स्वरबद्ध झालेल्या आहेत.त्यामुळे त्यांच्या ह्या गझलांच्या सुरवटींना माझ्या लेखी वेगळेच मोल आहे.कारण त्यावर #त्यांच्या_पसंतीचा_शिक्का_आहे.
#रानात_गाणी
या फुलांनी छेडिली रानात गाणी
का गडे आलीस तू याही ठिकाणी
मी जरी नक्षत्र देशातून आलो
माणसांची शोधतो आता निशाणी
रोज दुःखी लोक हे दारात येती
रोज माझी वेदना ओशाळवाणी
तू सुखा सांगू नको माझी खुशाली
हे पहा आले तुझ्या डोळ्यात पाणी
-सुरेश भट
●Mobile recording... headphone or earphone please.
#gazal #मैफल #music #संगीत #बैठक #गझल #composition #मराठीगझल #गीतकार #musician #संगीतकार #sudhakarkadamscomposition

No comments:
Post a Comment