माझे दोन गझलकार मित्र स्व.अनिल कांबळे (पुणे) व स्व. ललित सोनोने (गुंजी,धामणगाव) आज या दोघांचा वाढदिवस ! #आठवण येणे अगदी अपरिहार्यच...
🌹🙏🌹
अनिलच्या व ललितच्या अनेक गझला मी स्वरबद्ध केल्यात.पण ललितच्या गझलांचे माझ्या आवाजातील ध्वनिमुद्रण उपलब्ध नाही.
अनिलच्या मात्र मी व माझ्या मुलींनी तसेच गयिका/संगीतकार प्राजक्ता सावरकर शिंदे यांनी कार्यक्रमात गायिलेल्या अनेक गझला/गीते साउंड सिस्टिमवाल्यांच्या कृपेने उपलब्ध आहेत.त्यातील एक #संपली_अजुनी_कुठे_ही_रात_सजणा ही अनिलची गझल, प्राजक्ता अतिशय सुरेल व उत्कटपणे गायिली आहे.अवश्य ऐका... म्हणजे मराठी गझल गायकी म्हणजे काय व मराठी गझल कशी गायला हवी ते आपणास कळेल.
#तुझ्या_सवे_सखे_मला_फुलांतला_प्रवास_दे
ललितची ही गझल माझा लहान बंधू स्व.प्रशांत कदम याने स्वरबद्ध केली असून संगीत संयोजन मी केले आहे.गायक आहे मयूर महाजन.
"ह्या दोन गझला त्यांची आठवण म्हणून सादर करीत आहे.
●headphone please...

No comments:
Post a Comment