रे मना! तुज काय झाले सांग ना
का असा छळतो जिवाला सांग ना
हारण्याचीही मजा घे एकदा
जिंकुनी तुज काय मिळते सांग ना
हासुनी हसवायचा हा मंत्र घे
दुःख का कुरवाळतो तू सांग ना
सूर लावुन गुणगुणावे गीत हे
ते नि तू का वेगळा रे सांग ना
●●●
मुंबईच्या डॉ.राम पंडितांसारख्या अनेक विद्वान व रसिक मित्रांनी माझ्या कविता स्वतः स्वरबद्ध करण्याविषयी आग्रह केल्यामुळे अनेक वर्षांनंतर #रे_मना! हा अल्बम तयार झाला.यातील गीत-गझलांना विविध वाद्यांच्या सहाय्याने साजेसे संगीत नियोजन मिलिंद गुणे यांनी केले.यातच मिलिंदच्या आग्रहावरून ग्रूप व्हायोलिन्सचा प्रथमच प्रयोग केला.हा अल्बम युट्युब, स्पॉटिफाय सारख्या जगातील सर्व ऑडिओ प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध असून, त्याला हजारो रसिकांनी आपली पसंती दिली आहे. .त्यातीलच मयुर महाजनने गायिलेले 'रे मना!' हे अतिशय सुंदर असे शीर्षक गीत सादर करीत आहे.या रचनेचा बेस तसा 'बिलासखानी तोडी' हा राग आहे.पण सुगम संगीतामध्ये गीताला अधिक आकर्षक करण्या करीता वेगवेगळ्या सुरावटींचा प्रयोग करून त्याचा गोडवा वाढविल्या जातो.तसेच काहीसे यात केल्या गेले आहे.मुळात ही बंदिश अनेक वर्षांच्या चिंतनानंतर आलेली असल्यामुळे 'दिल को सुकून देनेवाली है' असे मला वाटते..यातील अभिषेक बोरकर यांचे सरोद तर अफलातूनच आहे.आपण ऐका व आनंद घ्या! आवडल्यास प्रतिक्रिया द्या!

No comments:
Post a Comment