युट्युब आणि इतर सर्व ऑडिओ चॅनल्सवर प्रसिद्ध झालेल्या #काट्यास_फूल_आले या गझलकार रविप्रकाश चापके यांच्या अलबम मधील 'माझी गझल गुलाबो' ही गझल मी नव्याने संशोधित केलेल्या सुरावटीत कंपोज केली असून या सुरावटीचे नामकरण बिलासखानी तोडीच्या धर्तीवर '#सुधाकरी_तोडी' असे केले आहे.अशी सुरावट भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये अजूनपर्यंत तरी कुठेच उल्लेखलेली नाही.उत्तर प्रदेशातील 'हाथरस' येथून प्रकाशित झालेल्या #राग_कोष या ग्रंथात ५०० रागांची माहिती दिली आहे.पण या सुरावटीचा कुठलाही राग त्यात नाही.एवढेच नव्हे तर पंडित भातखंडे यांच्याही सर्व ग्रंथात असली सुरावट मला आढळली नाही. सुरावट अशी आहे...षड्ज, कोमल रिषभ, कोमल गांधार, पंचम, कोमल निषाद... मध्यम व धैवत वर्ज.
तर,अशा या सुरावटीतील ही गझल संपूर्ण गायकी अंगाने गायक मयूर महाजन यांनी गायिली आहे.तरी आनंद घ्यावा, ही विनंती. (चांगले तुमचे,वांगले आमचे.)
सारंगी - उस्ताद लियाकतअली खान
#ustad_liyakat_ali_khan
तबला - पांडुरंग पवार #pandurang_pawar
बासरी - संदीप कुलकर्णी #sandip_kulkarni
संगीत संयोजन - मिलिंद गुणे #milind_gune
ध्वनीमुद्रण - 'डॉट वेव्ह' स्टुडिओ,पुणे.
मास्टरिंग - मुकुंद फडकुले,एल्कॉम स्टुडिओ,पुणे.
#mukund_phadkule
●आपल्या आवडी-निवडीनुसार प्रतिक्रिया अपेक्षित...धन्यवाद!
●Headphone please

No comments:
Post a Comment