. #नुसत्याच_तुझ्या_हसण्याने
नुसत्याच तुझ्या हसण्याने जगण्याचे दुःख वितळले
एकाच तुझ्या स्पर्शाने आभाळ मनाचे भरले
अक्षरे पुसटली आणिक हरवली खुणेची पाने
जाणून इशारा मी ही मग पुस्तक माझे मिटले
हे उदास एकांताला छेदते कुणाचे गाणे
हे कुणी मध्यरात्रीला उबदार उन्ह अंथरले
शिणवला जन्म मी सारा बेईमान स्वप्नांसाठी
सरणावर जळता जळता हे रहस्य मज उलगडले
गायिका-वैशाली माडे
गझल-दिलीप पांढरपट्टे
संगीत-सुधाकर कदम

No comments:
Post a Comment