गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Tuesday, November 3, 2026

राग मारुबिहाग


 .                                       राग रंग

     कोणत्याही कलेच्या निरंतर विकासासाठी त्यावर चर्चा, समालोचन होत राहणे आवश्यक असते.कलेच्या उपयुक्त मानदंडाच्या अभावामुळे लोग आपापला ढोल पिटून आपापला राग आलापत राहतात.कलाजन्य आनंदामध्ये साधन बनणारी विशेषता 'गुण' या संज्ञेत मोडते.तर 'रसभंगाचे' कारण बनणारी विशेषता 'दोष' या संज्ञेस पात्र ठरते.पण आज-काल चिकित्सा, साधक-बाधक चर्चा करणाऱ्यांचा अभाव आहे.जे समोर ठेवल्या गेले तेच अंतिम सत्य,व आम्ही जे करतो तेच योग्य असे काहीसे सुरू आहे.

     एखाद्या गायकाचे गाणे अत्यंत चमत्कृतीपूर्ण असल्यामुळे सामान्य श्रोत्यास चकित करते.तो विचार करतो की, "वाह! किती मुश्किल 'बल' काढले.सारंगीवाला भांबावून गेला.आहा!  काय मुखडा घेतला...तबलजी तोंडच बघत राहिला." हे सगळे वेफर्स खात खात सुरू असते.खरे म्हणजे चकित करणे वेगळी बाब आहे.आणि आपल्या कलेने श्रोत्यांना संपूर्णतः मग्न करणे एकदम भिन्न बाब आहे. यातील साधक-बाधक सत्य रसिकांपर्यंत पोहोचवणे हे निरुपणकाराचे वा टिकाकाराचे काम आहे.पण असे होत नाही!

        अनेक राग कालौघात जनसामान्यांपासून दूर गेले तर अनेक नवीन रागाची उत्पत्ती पण झाली आहे.तसे पाहिले तर येणे-जाणे हा निसर्ग नियम आहे.पण संगीतालाही तो लागू व्हावा काय? हा प्रश्न आहे.खरे म्हणजे संगीतामध्ये एका रागातून दुसरा राग,दुसऱ्यातून तिसरा असे शेकडो वर्षांपासून सुरू आहे.बिहाग रागात कोमल निषादाचा वापर केला की 'बिहगडा' राग होतो.बिहागच्या पूर्वांगात 'नट' घेऊन, ग म कोमल नि ध प ग म ग असे स्वर घेतले की 'नट बिहाग' होतो.न्यासचे स्वर बदलले की राग पण बदलतो.आता मारू बिहागच बघा...कल्याण थाटातून उत्पन्न झालेल्या बिहाग रागात स्वरांचा थोडा-फार फेरबदल करून मारू बिहाग तयार झाला आहे.बिहाग रागात अल्प असलेले रिषभ व धैवत मारू बिहाग रागात स्पष्टपणे लागतात.या गोड आणि प्रसिद्ध रागाच्या निर्मितेचे ( सुरावटीच्या combinationचे) श्रेय उस्ताद अल्लादिया खां साहेबांना जाते. हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक आधुनिक राग आहे.मनाला स्पर्श करणाऱ्या या रागात ख्याल,ठुमरी,सुगम शास्त्रीय व सुगम संगीत इत्यादी प्रकार खुलून दिसतात. हा तसा म्हटला तर रोमँटिक फ्लेवरचा राग मानतात. याला संधीप्रकाश राग असेही म्हणतात.जाती औडव-संपूर्ण असून दोन्ही माध्यमाचा प्रयोग केल्या जातो.याचा वादी स्वर गांधार व संवादी स्वर निषाद आहे.हा राग म्हणजे सरळ-सरळ कल्याण व बिहाग रागाचे मिश्रण होय. बिहाग रागात 'प तीव्र म ग कोमल म ग' ही माध्यमाला घेणारी स्वरसंगती आहे.तर मारू बिहागमध्ये कोमल म चा प्रयोग आरोहात सा सोबत केल्या जातो.


     १९६३ मध्ये प्रसिद्ध चित्रपट निर्माता, दिग्दर्शक व्ही.शांताराम यांनी 'सेहरा' चित्रपट प्रदर्शित केला होता.चित्रपटाचे संगीतकार वाराणाशीचे प्रसिद्ध कुशल शहनाई वादक रामलाल यांनी संगीतबद्ध केलेल्या 'तुम तो प्यार हो' या लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायिलेल्या गाण्यात मारू बिहाग स्पष्टपणे दिसतो.हे गाणे 'रसिया हो न जा' या बड्या ख्यालाच्या सुरावटीवरून बेतल्याचे स्पष्टपणे जाणवते.

● मारू बिहागवर आधारित चित्रपट गीते...

'लट उलझी सुलझा जा रे बालम' नूरजहाँ. चित्रपट-पूजा, चित्रपट-सवाल, संगीत-राशिद अत्रे attre.

'ऐ दिले बेकरार क्यूँ' के.एल.सैगल. चित्रपट-शहाजहान, संगीत-नौशाद (१९४६). 

'अब आगे तेरी मर्जी' चित्रपट-देवदास, संगीत-एस.डी. बर्मन (१९५५). 

''मतवाली नार ठुमक ठुमक चली जाय' मुकेश. चित्रपट-एक फूल चार कांटे, संगीत-शंकर जयकिशन (१९६०). 

'तुम तो प्यार हो' लता,रफी. चित्रपट-सेहरा, संगीत-रामलाल हिरापन्ना (१९६३). 

'पायलवाली देखना' किशोर कुमार. चित्रपट-एक राज, संगीत-चित्रगुप्त (१९६३). 

तुम्हारी मस्त नजर गर इधर नहीं होती' लता,मुकेश. चित्रपट-दिल ही तो है, संगीत-रोशन (१९६३). 

'दिल जो न कह सका वो राज-ए-दिल' रफी. चित्रपट-भीगी रात, संगीत-रोशन (१९६५). 

'बिती ना बिताई रैना' लता,भुपेंद्र. चित्रपट-परिचय, संगीत-आर.डी. बर्मन (१९७२). 

'जमुना किनारे आजा' लता. चित्रपट-मेहबुबा, संगीत-आर.डी. बर्मन (१९७६). 

'ये क्या जगह है दोसतो' आशा भोसले. चित्रपट-उमराव जान, संगीत-खैय्याम [बिहाग,मारुबिहाग रागाचे मिश्रण] (१९८१).  

'बडा दुख दीना तेरे लखन ने' लता. चित्रपट-राम लखन, संगीत-लक्ष्मीकांत प्यारेलाल (१९८९). 

'पिया तोरा कैसा अभिमान' शुभा मुद्गल.चित्रपट-रेनकोट, संगीत-देबोज्योति मिश्रा (२००४). 

●नॉन फिल्मी...

'जनम तेरा बातों ही बीत गयो' अनूप जलोटा.कबीर भजन.

'का करू री माई' शिवप्रितसिंग.(बॉलिवूड)

● मराठी...

'बाई मी विकत घेतला शाम' आशा भोसले. चित्रपट-जगाच्या पाठीवर, संगीत-सुधीर फडके (१९६०). 

'जीवनात ही घडी अशीच राहू दे' लता. चित्रपट-कामापुरता मामा, संगीत-यशवंत देव (१९६५). 

'तुजसाठी शंकरा भिल्लीण मी झाले' लता.चित्रपट-चिमुकला पाहुणा, संगीत-स्नेहल भाटकर (१९६७). 

 'पळविली रावणे सीता' गीत रामायण.

------------------------------------------------------------------

दैनिक उद्याचा मराठवाडा, 'नक्षत्र' रविवार पुरवणी.

No comments:





संगीत आणि साहित्य :