गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Wednesday, November 11, 2026

मन अभारसे बळो...कलाली बोली गीत.

 डॉ.रामदास चवरे यांची कलाली बोलीतील चार गाण्यांचे ध्वनिमुद्रण नुकतेच पार पडले.त्यापैकी #हरदीके_हात_ओले  

Link https://youtu.be/nFDEgVEOuKI?si=jFd1oHrqSFEuR_Dx

हे गीत आपण ऐकले उत्तम प्रतिसाद दिला त्याबद्दल मनःपूर्वक आभार.आज #मन_अभारसे_बळो हे गीत सादर करीत आहे.ऐका,थोडी वेगळी बोली असली शब्दार्थ खाली दिलेले असल्यामुळे अर्था सोबत या भाषेचा गोडवा आपणास कळून येईल.त्यामुळे हे गीत आपणास नक्कीच आवडेल याची अशी मला खात्री आहे.


मन अभारसे बळो ओको अंतच लगेना 

मन मुंगीको पाय है आँखीसेभी हू दिखेना...


मन लोखंड टणक ओखे तोळणे कायसे 

मन फुलकी पाकरी मुर्झावय तपनसे...


मन विखारी इतको बिचारसे लगे डर 

मन साजरो इतको लगे देखखे नजर...


मन लाळको इतलो जरा जरा से खे रुसे 

जहाँ वहाँ मन जाये ओळखने कसे


असो कसो मन हय ओके रूप कितीतरी 

मोज सकोन चांदणी पण मनकी बात न्यारी...


गायिका - प्राजक्ता सावरकर शिंदे 

गीत - डॉ. रामदास चवरे

संगीत - सुधाकर कदम 

संगीत संयोजक - मिलिंद गुणे

सहगायिका - भाग्यश्री अभ्यंकर,मानसी कार्लेकर,श्रेया गंधे

तालवाद्ये - विक्रम भट

व्हायोलिन - रुचिर इंगळे

ध्वनिमुद्रक - श्रेयस दांडेकर

ध्वनिमुद्रण - पंचम स्टुडिओ,पुणे

मिक्सिंग/मास्टरिंग - अजय अत्रे

व्हिडीओ - विवेक काजरेकर


शब्दार्थ :- अभारसे-आकाशाहून, बळो-मोठे, ओको-त्याचा, लगेना-लागत नाही, मुंगीको-मुंगीचा, ओखे-त्याला, तोळणे-तोडणे, कायसे-कशाने, पाकरी-पाकळी, मुर्झावय-कोमेजते, असो-असे, तपनसे-उन्हाने, विखारी-विषारी, इतको-इतके, विचारसे-विचाराने, इतलो-इतके, देखखे-पाहून,

हय-आहे, देखने-पाहायचे, असो कसो-असेकसे, ओके-त्याचे, मोज सकोन-मोजू शकाल



No comments:





संगीत आणि साहित्य :