गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.

Saturday, February 11, 2023

दै. देशोन्नती,रविवार पुरवणी.दि.१२/०२/२०२३

          -उर्दू_गझल_गायकीचा_भारतीय_बादशहा-

         हिंदुस्थानी संगीतातील सगळ्यात लोकप्रिय सुगम संगीत प्रकार म्हणून गझलची गणना करायला हवी.हा एकमेव असा प्रकार आहे की,यात काव्य व संगीत याचा समसमान आनंद घेता येतो.तसे ठुमरी,दादरा, चैती, कजरी वगैरे प्रकारात होत नाही.भारतात शास्त्रीय संगीत पद्धतीमध्ये शब्दांना तसे फारसे  महत्व दिल्या जात नाही.स्वरांना आधार देण्यापुरतेच त्याचे महत्व असते.अर्थात शास्त्रीय संगीताचे गायक हे मान्य करणार नाही,पण हे कटू सत्य आहे.मी संगीताचे प्राथमिक शिक्षण घेतानाच्या चिजा आठवल्या की अजूनही हसायला येतं. उदा:- "तेंडेरे कारण मेंडेरे यार"....किंवा कॉलेजमध्ये शिकविलेल्या देस रागातील तरण्याचा अंतरा "नादिर दानी तूंदिर दानी दानी त दारे दानी"...ही ओळ गाताना अनेक विद्यार्थी (कारण तो सामूहिक वर्ग असायचा) "नादिर दानी तुंदिर दानी च्या ऐवजी "उंदिर दानी" असे गायचे...अशा अनेक चिजा आम्ही शिकलो.पण अर्थ कळला नाही.... कळले ते फक्त रागांचे स्वर-रूप.

            साहित्यातील एक उत्तम प्रकार म्हणून गझलचा छान उपयोग झाला.पण संगीत प्रकार म्हणून जसा व्हावा तसा विचार शास्त्रीय संगीतामध्ये झाला नाही.ज्या लोकसंगीतामधून शास्त्रीय संगीताची उत्पत्ती झाली त्या लोकगीतांनाच शास्त्रकारांनी दूर ठेवून दुय्यम स्थान दिले,ते गझलला कसे काय मोठे स्थान देतील?आपल्या देशात संगीताचे फार मोठे भांडार प्रादेशिक संगीतामध्ये उपलब्ध होते/आहे.यातूनच विविध गान प्रकार तयार झालेत.पण शास्त्रीय संगीताचे पक्के शास्त्र बनवताना  या सर्व प्रकारांना सुगम मानून शास्त्रीय संगीताच्या परिघाबाहेर ठेवल्या गेले.त्यामुळे संगीताची एक प्रकारे हानीच झाली.

            खरे तर गझल गायकाला चार अवधाने सांभाळावी लागतात.अभ्यास करावा लागतो.
१.
त्याला शास्त्रीय संगीताचे सखोल ज्ञान असणे आवश्यक असते.
२.
तो उत्कृष्ट गायक असायला हवा.
३.
त्याला साहित्याची पण चांगली जाण असायला हवी.(म्हणजे अभ्यास आलाच.)
४.
अत्यंत महत्वाचे म्हणजे तो उत्कृष्ट संगीतकारही असायला हवा.

असे असूनही गझल गायन प्रकाराला 'सुगम' म्हणणे हास्यास्पद आहे.

पं. रामकृष्णबुवा वझे सारखे थोर शास्त्रीय गायक गझल गायकीबद्दल काय म्हणतात ते बघा...

      "गझल गायकीला आपलं असं स्वतःचं एक आगळं वेगळं अती मोहक स्थान आहे.शब्दोच्चार स्पष्ट असते आणि ते विविध अंगांनी नटविण्याची कुवत गायकात असली तर गझल गायनातून ख्याल गायनाइतकी रसोत्पत्ती होऊ शकते आणि ती सुलभ रित्या श्रोत्यांपर्यंत पोहचू शकते".

        तसेच माझे मित्र सुप्रसिद्ध तबला वादक तालयोगी पद्मश्री सुरेश तळवलकर म्हणतात,"गझल गायनामध्ये काव्याच्या बरोबरीने सांगीतिक रचनाही तितकीच दर्जेदार असली तर ती रचना अतिशय सहजतेने श्रोत्यांच्या हृदयापर्यंत पोहोचते.भिडते..."असो....

          उर्दू गझल गायकीचा शोध घेताना आपल्याला ध्वनीमुद्रणाचा शोध लागल्यानंतर निघालेल्या  ध्वनीमुद्रिकांचा अभ्यास करावा लागेल.या इतिहासाचा धांडोळा घेताना भारतीय शास्त्रीय संगीतात  उर्दू गझल गायकीचा विकास ठुमरी सोबत झाल्याचे दिसून येते.सुरवातीच्या  गायक/गायिकांचे गझल गायन हे गायन न वाटता पठण वाटत होते असा उल्लेख अशोक दा रानडे यांच्या एका लेखात वाचल्याचे आठवते...यातुन गायकी अंगाने पुढे जाणाऱ्यांमध्ये गोहरजान,शमशाद, सुंदराबाई आणि त्यावेळच्या इतर गायिका दिसतात.पण खऱ्या अर्थाने गझल गायनाची सर्व यांत्रिक पद्धतीतून मुक्तता होऊन गझल गझलसारखी गाण्याची सुरवात करण्याचे श्रेय बेगम अख्तर व बरकतअली खान साहेब यांना जाते.
      उर्दू गझल गायकी तीन प्रकारांनी आपल्या समोर येते...

१. ठुमरी प्रमाणे - बेगम अख्तर

२. गीतांप्रमाणे - सैगल,मल्लिका पुखराज

३. टप्पा अंगाने - बरकत अली खान

       गझल गायकी लोकप्रिय करण्यात या गायक/गायिकांच्या ध्वनिमुद्रीकांसोबतच चित्रपटांचाही मोठा वाटा आहे.

          गझल गायकी ही शब्द व संगीत श्रोत्यांपर्यंत पोहचविण्याची अतिशय सुंदर प्रक्रिया आहे.विसाव्या शतकात भावपूर्ण सादरीकरणासोबतच दरबारी,यमन,मल्हार वगैरे  भारदस्त म्हणविल्या जाणाऱ्या रागांमध्ये बंदिशी बनवायला लागले.तसेच काव्य निवडही उत्तम व्हायला लागली.आपापल्या कुवतीप्रमाणे अविर्भाव-तिरोभाव, मूर्च्छना पद्धतीचा वापर करायला लागले.सगळ्याच गझल गायक/गायिकांचा उल्लेख या लेखात करणे अशक्य आहे.कारण प्रत्येक गायक/गायिकेचा आपला एक ढंग आहे.त्यावर लिहायचे तर प्रत्येकावर एक लेख होऊ शकतो.पण इथे अत्यंत लोकप्रिय अशा काही गझल गायकांच्या गायकीची मला दिसलेली वैशिष्ठ्ये थोडक्यात उद्धृत करण्याचा प्रयत्न करतो.

         सर्वप्रथम भारत पाकिस्तानातील जुन्या-नव्या उर्दू गझल गायक/गायिकांची नावे माहिती करून घेऊ.

●मल्लिका पुखराज,उ.अमानत अली खान,अहमद रश्दी,नूरजहां,एम.बी.जॉन,मेहदी हसन,फरीदा खानम,अहमद परवेज,इकबाल बानो,मुन्नी बेगम,हमीद अली खान,हुसैन बख्श,परवेज मेहदी,गुलाम अली,नुसरत फतेह अली, मेहनाज बेगम,नैय्यरा नूर,आबिदा परवीन, असद अमानत अली खान,शफाकत अमानत अली खान,आसिफ मेहदी,सज्जाद अली....पाकिस्तान.

●बेगम अख्तर,तलत महमूद,सैगल,मधुरानी,पंकज उधास, अनुप जलोटा, चंदन दास,जगजित/चित्रा सिंग,भुपेंद्र/मिताली सिंग,राजेंद्र/नीना मेहता, पिनाज मसानी,तलत अजीज,हरिहरन,रुपकुमार राठोड,अहमद,महंमद हुसेन,जसविंदर सिंग...भारत.

(अनवधानाने काही नावे सुटली असल्यास क्षमस्व!)

उर्दू गझल गायकीतील सर्वच गायक/गायिकांचे त्यांच्या त्यांच्या परीने मोलाचे योगदान आहे.सगळ्यांवर लिहिणे या एका लेखात शक्य होणार नाही.त्यातल्या त्यात मला भावलेल्या काही जणांच्या गायकीवर थोडे फार भाष्य करण्याचा प्रयत्न करतो.

           माझ्या मते उर्दू गझल गायकीत रागदारीचा उत्कृष्ट उपयोग बेगम अख्तर यांनी केला आहे.त्यांची गझल गायकी ठुमरी,दादरा अंगाने जात होती.पण जव्हारदार मधाळ, मधूनच पत्ती लागणाऱ्या आवाजाने तेव्हाच्या रसिकांना वेड लावले होते.आजही त्यांनी गायिलेल्या गझला लोकप्रिय असून गायिल्या जातात.

             मेहदी हसन यांची गायकी म्हणजे शब्दांना न्याय देत कसे गावे याची पाठशाळाच....

            फरीदा खानम...शांत,संयत पण ठसठशीत गायकी असलेली गायिका.त्यांच्या "दिल जलाने की बात करते हो","ना रवा ... ","गुलों की बात करो","वो मुझ से हुए" वगैरे गझला ऐकल्यानंतर गायकीची प्रचिती येते.

               गुलाम अली म्हणजे अनवट बंदीशीचा बादशहा.गुलाम अली इतका सरगमचा वापर दुसऱ्या कुणीही केला नाही.शब्दानुरूप वेगवेगळ्या सुरावटींचा वापर आणि कार्यक्रमाचे वेळीची  देहबोली रसिकांकडून दाद घेणारी..."कहाँ आके रुकने थे रास्ते" या गझलमधील "जहां मोड था" येथील 'मोड',"दिल में इक लहर सी उठी हैं अभी" मधील 'हमींग' व 'लहर' या शदावरील वेगवेगळ्या सुरावटी त्यांच्या गझल गायकीचे वेगळेपण सिद्ध करते.त्यांच्या "चुपके चुपके रात दिन आंसू बहाना याद है" या गझलने जगभरातील रसिकांना वेड लावलेले सगळ्यांनीच पाहिले.

              जगजीत सिंग म्हणजे उर्दू गझल गायकीला पडलेले सुरेल स्वप्न आहे.मेहदी हसन प्रमाणेच खर्जयुक्त जव्हारदार  मधाळ आवाज,वाद्यवृंदाचा योग्य वापर,गझलांची निवड यामुळे भारतातीलच नव्हे तर जगभरातील रसिकांनी जगजीत-चित्रा जोडीला डोक्यावर घेतले.जगजीत सिंग हे उत्कृष्ट 'कंपोजर' असल्यामुळे इतर गायक/गायिकांच्या जोडयांपेक्षा ही जोडी जास्ती लोकप्रिय ठरली.गायक जर उत्कृष्ट संगीतकार असेल तर गाणे नक्कीच उठावदार होते,हे अनेक संगीतकार गायकांच्या गायनावरून लक्षात येते.ह्या साऱ्या वैशिष्ठयांमुळे आपल्या देशात जगजीत सिंग इतकी लोकप्रियता  बेगम अख्तर नंतर कुणालाच मिळाली नाही.
        मी जगजीत सिंग यांच्या गझलगायकीचा चाहता आहे.त्यांचे बहुतेक अल्बम मी विकत घेऊन ऐकले आहेत.त्यातील 'कम अलाइव्ह' व 'अनफर्गेटेबल' हे दोन अलबम म्हणजे मला मलई (क्रीम) वाटतात.यातील बहुतेक गझला मी अजूनही गुणगुणतो.याचा अर्थ असा नाही की,इतर अल्बम चांगले नव्हते.प्रत्येक अलबममध्ये  काही ना काही वेगळा प्रयोग त्यांनी केलेला असायचा. मग तो ऑर्केस्ट्रेशनचा असो की कोरसचा असो की ध्वनिमुद्रणाचा असो. कायम प्रयोगशीलता हा जगजीत सिंग यांचा फार मोठा गुण होता.त्यांच्या यशाचे हे सुद्धा एक कारण आहे.
     जगजीतजी उत्कृष्ट गायक होते तितकेच मोठे संगीतकार पण होते.त्यांनी स्वरबद्ध करून गायिलेल्या काही गझलांचा उल्लेख करून त्यातील सुरवटीची खासियत मांडण्याचा मोह मला आद्य मराठी गझल गायक व संगीतकार म्हणून आवरता आला नाही.

१.
'कम अलाईव्ह' मधील
'कोई पास आया सवेरे सवेरे
मुझे आज़माया सवेरे सवेरे...
       या गझलची बंदिश  ललित रागात आहे.आणि तो त्यांनी शुद्ध स्वरूपात वापरला.परंतू सुरवातीचा आलाप घेताना मुर्च्छनाद्वारे भुपालीचा भास निर्माण करून माध्यमावर येण्याची त्यांची प्रक्रिया भल्या भल्यांना बुचकळ्यात पाडणारी होती.तसेच या गझल करीता केलेली तालाची रचना सुद्धा तशीच अनवट होती.१० मात्राच्या झपतालात काही रचना सुगम संगीतात वा चित्रपटात दिसतात.पण जगजीतजींनी या गझल करीता फक्त पाच मात्रांचा उपयोग करून रंगत आणली.माझ्या पाहण्यातील हा पहिला व शेवटचा प्रयोग आहे.याच अल्बम मधील 'मेरी तनहाईयों मुझको लगा लो सीने से'....ही पण रचना हटके आहे.भैरवीमध्ये अशी बंदिश जगजीतजीच करू जाणे!
२.
'अ माईलस्टोन' मधील 'मिलकर जुदा हुए तो' ही गझल तोडी रागात बांधलेली आहे.यातील मतल्याची पहिली ओळ मध्य सप्तकातील कोमल धैवतावरून सुरू होऊन मंद्र सप्तकातील शुद्ध निषादावर स्थिरावते.आणि येथून खरी गम्मत सुरू होते ती अशी की,निषादावर मूर्च्छना करून दुसऱ्या ओळीत भूप रागाची छाया दाखवत पुन्हा कोमल धैवतापासून  पहिली ओळ सुरू होते.अशी गम्मत प्रबुद्ध संगीतकरच करू शकतो.

३.
गझलच्या शब्दानुरूप रागाची निवड करून 'मेलोडीअस' सुरावट तयार करून गाणे हे पण जगजीतजींचे वैशिष्ठय होते.हे 'गरज बरस प्यासी धरतीपर' ह्या 'इन साईट' मधल्या गझलेवरून दिसून येते.

४.
'उम्र जलवो में बसर हो' ही गझल live कार्यक्रमात गाताना 'शेख करता तो है मस्जिद मे खुदा को सजदे' ही ओळ गाताना 'अजान'ची अरबी सुरावट 'मनमोही' होऊन जाते.
      खरे म्हणजे जगजीतजींच्या 'कंपोझिशन'वर एक मोठा लेख होऊ शकतो. म्हणून विस्तारभयास्तव इथेच थांबतो.
      जगजीतजींच्या आयुष्यातील अनेक घटना सर्वसामान्य रसिकांना माहीत नाहीत.त्यांचे बालपण,वैवाहिक जीवन,चित्राजींचा न गाण्याचा निर्णय,उत्तरार्धातील भक्तिमार्ग या सगळ्याची मांडणी करताना सगळे प्रसंग वैभवकुमार शिंदे यांनी त्यांच्या 'गझलजीत' या पुस्तकातून आपल्या डोळ्यासमोर उभे केले आहेत.ते वाचताना आपल्याला गलबलून न आले तर नवलच!जगजीतजींच्या उत्तरार्धातील live कार्यक्रमातील गझलगायनातून ही व्यथा स्पष्टपणे दिसून येते.तसेच नंतरच्या भक्तीगीतातूनही व्यथा व समर्पण ठायी ठायी जाणवते.'हे राम' व 'जय राधा माधव' पहिल्यांदा ऐकले तेव्हा माझ्या डोळ्यात केव्हा पाणी आले ते कळलेच नाही.
     'दर्द से मेरा दामन भर दे' असे म्हणणाऱ्या या थोर गायकाला शेवटी शेवटी अनेक 'दर्द'ला सामोरे जावे लागले हे अतिशय दुःखद आहे.

गझलगंधर्व
सुधाकर कदम
सी१सी/१३,गिरीधर नगर,
वारजे माळवाडी,
पुणे. ५८
8888858850

Tuesday, February 7, 2023

जगजितसिंग यांच्या जन्मदिनानिमित्त...

           -#उर्दू_गझल_गायकीचा_भारतीय_बादशहा-

         हिंदुस्थानी संगीतातील सगळ्यात लोकप्रिय सुगम संगीत प्रकार म्हणून गझलची गणना करायला हवी.हा एकमेव असा प्रकार आहे की,यात काव्य व संगीत याचा समसमान आनंद घेता येतो.तसे ठुमरी,दादरा, चैती, कजरी वगैरे प्रकारात होत नाही.भारतात शास्त्रीय संगीत पद्धतीमध्ये शब्दांना तसे फारसे  महत्व दिल्या जात नाही.स्वरांना आधार देण्यापुरतेच त्याचे महत्व असते.अर्थात शास्त्रीय संगीताचे गायक हे मान्य करणार नाही,पण हे कटू सत्य आहे.मी संगीताचे प्राथमिक शिक्षण घेतानाच्या चिजा आठवल्या की अजूनही हसायला येतं. उदा:- "तेंडेरे कारण मेंडेरे यार"....किंवा कॉलेजमध्ये शिकविलेल्या देस रागातील तरण्याचा अंतरा "नादिर दानी तूंदिर दानी दानी त दारे दानी"...ही ओळ गाताना अनेक विद्यार्थी (कारण तो सामूहिक वर्ग असायचा) "नादिर दानी तुंदिर दानी च्या ऐवजी "उंदिर दानी" असे गायचे...अशा अनेक चिजा आम्ही शिकलो.पण अर्थ कळला नाही.... कळले ते फक्त रागांचे स्वर-रूप.

            साहित्यातील एक उत्तम प्रकार म्हणून गझलचा छान उपयोग झाला.पण संगीत प्रकार म्हणून जसा व्हावा तसा विचार शास्त्रीय संगीतामध्ये झाला नाही.ज्या लोकसंगीतामधून शास्त्रीय संगीताची उत्पत्ती झाली त्या लोकगीतांनाच शास्त्रकारांनी दूर ठेवून दुय्यम स्थान दिले,ते गझलला कसे काय मोठे स्थान देतील?आपल्या देशात संगीताचे फार मोठे भांडार प्रादेशिक संगीतामध्ये उपलब्ध होते/आहे.यातूनच विविध गान प्रकार तयार झालेत.पण शास्त्रीय संगीताचे पक्के शास्त्र बनवताना  या सर्व प्रकारांना सुगम मानून शास्त्रीय संगीताच्या परिघाबाहेर ठेवल्या गेले.त्यामुळे संगीताची एक प्रकारे हानीच झाली.

            खरे तर गझल गायकाला चार अवधाने सांभाळावी लागतात.अभ्यास करावा लागतो.
१.
त्याला शास्त्रीय संगीताचे सखोल ज्ञान असणे आवश्यक असते.
२.
तो उत्कृष्ट गायक असायला हवा.
३.
त्याला साहित्याची पण चांगली जाण असायला हवी.(म्हणजे अभ्यास आलाच.)
४.
अत्यंत महत्वाचे म्हणजे तो उत्कृष्ट संगीतकारही असायला हवा.

असे असूनही गझल गायन प्रकाराला 'सुगम' म्हणणे हास्यास्पद आहे.

पं. रामकृष्णबुवा वझे सारखे थोर शास्त्रीय गायक गझल गायकीबद्दल काय म्हणतात ते बघा...

      "गझल गायकीला आपलं असं स्वतःचं एक आगळं वेगळं अती मोहक स्थान आहे.शब्दोच्चार स्पष्ट असते आणि ते विविध अंगांनी नटविण्याची कुवत गायकात असली तर गझल गायनातून ख्याल गायनाइतकी रसोत्पत्ती होऊ शकते आणि ती सुलभ रित्या श्रोत्यांपर्यंत पोहचू शकते".

        तसेच माझे मित्र सुप्रसिद्ध तबला वादक तालयोगी पद्मश्री सुरेश तळवलकर म्हणतात,"गझल गायनामध्ये काव्याच्या बरोबरीने सांगीतिक रचनाही तितकीच दर्जेदार असली तर ती रचना अतिशय सहजतेने श्रोत्यांच्या हृदयापर्यंत पोहोचते.भिडते..."असो....

          उर्दू गझल गायकीचा शोध घेताना आपल्याला ध्वनीमुद्रणाचा शोध लागल्यानंतर निघालेल्या  ध्वनीमुद्रिकांचा अभ्यास करावा लागेल.या इतिहासाचा धांडोळा घेताना भारतीय शास्त्रीय संगीतात  उर्दू गझल गायकीचा विकास ठुमरी सोबत झाल्याचे दिसून येते.सुरवातीच्या  गायक/गायिकांचे गझल गायन हे गायन न वाटता पठण वाटत होते असा उल्लेख अशोक दा रानडे यांच्या एका लेखात वाचल्याचे आठवते...यातुन गायकी अंगाने पुढे जाणाऱ्यांमध्ये गोहरजान,शमशाद, सुंदराबाई आणि त्यावेळच्या इतर गायिका दिसतात.पण खऱ्या अर्थाने गझल गायनाची सर्व यांत्रिक पद्धतीतून मुक्तता होऊन गझल गझलसारखी गाण्याची सुरवात करण्याचे श्रेय बेगम अख्तर व बरकतअली खान साहेब यांना जाते.
      उर्दू गझल गायकी तीन प्रकारांनी आपल्या समोर येते...

१. ठुमरी प्रमाणे - बेगम अख्तर

२. गीतांप्रमाणे - सैगल,मल्लिका पुखराज

३. टप्पा अंगाने - बरकत अली खान

       गझल गायकी लोकप्रिय करण्यात या गायक/गायिकांच्या ध्वनिमुद्रीकांसोबतच चित्रपटांचाही मोठा वाटा आहे.

          गझल गायकी ही शब्द व संगीत श्रोत्यांपर्यंत पोहचविण्याची अतिशय सुंदर प्रक्रिया आहे.विसाव्या शतकात भावपूर्ण सादरीकरणासोबतच दरबारी,यमन,मल्हार वगैरे  भारदस्त म्हणविल्या जाणाऱ्या रागांमध्ये बंदिशी बनवायला लागले.तसेच काव्य निवडही उत्तम व्हायला लागली.आपापल्या कुवतीप्रमाणे अविर्भाव-तिरोभाव, मूर्च्छना पद्धतीचा वापर करायला लागले.सगळ्याच गझल गायक/गायिकांचा उल्लेख या लेखात करणे अशक्य आहे.कारण प्रत्येक गायक/गायिकेचा आपला एक ढंग आहे.त्यावर लिहायचे तर प्रत्येकावर एक लेख होऊ शकतो.पण इथे अत्यंत लोकप्रिय अशा काही गझल गायकांच्या गायकीची मला दिसलेली वैशिष्ठ्ये थोडक्यात उद्धृत करण्याचा प्रयत्न करतो.

         सर्वप्रथम भारत पाकिस्तानातील जुन्या-नव्या उर्दू गझल गायक/गायिकांची नावे माहिती करून घेऊ.

●मल्लिका पुखराज,उ.अमानत अली खान,अहमद रश्दी,नूरजहां,एम.बी.जॉन,मेहदी हसन,फरीदा खानम,अहमद परवेज,इकबाल बानो,मुन्नी बेगम,हमीद अली खान,हुसैन बख्श,परवेज मेहदी,गुलाम अली,नुसरत फतेह अली, मेहनाज बेगम,नैय्यरा नूर,आबिदा परवीन, असद अमानत अली खान,शफाकत अमानत अली खान,आसिफ मेहदी,सज्जाद अली....पाकिस्तान.

●बेगम अख्तर,तलत महमूद,सैगल,मधुरानी,पंकज उधास, अनुप जलोटा, चंदन दास,जगजित/चित्रा सिंग,भुपेंद्र/मिताली सिंग,राजेंद्र/नीना मेहता, पिनाज मसानी,तलत अजीज,हरिहरन,रुपकुमार राठोड,अहमद,महंमद हुसेन,जसविंदर सिंग...भारत.

(अनवधानाने काही नावे सुटली असल्यास क्षमस्व!)

उर्दू गझल गायकीतील सर्वच गायक/गायिकांचे त्यांच्या त्यांच्या परीने मोलाचे योगदान आहे.सगळ्यांवर लिहिणे या एका लेखात शक्य होणार नाही.त्यातल्या त्यात मला भावलेल्या काही जणांच्या गायकीवर थोडे फार भाष्य करण्याचा प्रयत्न करतो.

           माझ्या मते उर्दू गझल गायकीत रागदारीचा उत्कृष्ट उपयोग बेगम अख्तर यांनी केला आहे.त्यांची गझल गायकी ठुमरी,दादरा अंगाने जात होती.पण जव्हारदार मधाळ, मधूनच पत्ती लागणाऱ्या आवाजाने तेव्हाच्या रसिकांना वेड लावले होते.आजही त्यांनी गायिलेल्या गझला लोकप्रिय असून गायिल्या जातात.

             मेहदी हसन यांची गायकी म्हणजे शब्दांना न्याय देत कसे गावे याची पाठशाळाच.... 
            फरीदा
खानम...शांत,संयत पण ठसठशीत गायकी असलेली गायिका.त्यांच्या "दिल जलाने की बात करते हो","ना रवा ... ","गुलों की बात करो","वो मुझ से हुए" वगैरे गझला ऐकल्यानंतर गायकीची प्रचिती येते.

               गुलाम अली म्हणजे अनवट बंदीशीचा बादशहा.गुलाम अली इतका सरगमचा वापर दुसऱ्या कुणीही केला नाही.शब्दानुरूप वेगवेगळ्या सुरावटींचा वापर आणि कार्यक्रमाचे वेळीची  देहबोली रसिकांकडून दाद घेणारी..."कहाँ आके रुकने थे रास्ते" या गझलमधील "जहां मोड था" येथील 'मोड',"दिल में इक लहर सी उठी हैं अभी" मधील 'हमींग' व 'लहर' या शदावरील वेगवेगळ्या सुरावटी त्यांच्या गझल गायकीचे वेगळेपण सिद्ध करते.त्यांच्या "चुपके चुपके रात दिन आंसू बहाना याद है" या गझलने जगभरातील रसिकांना वेड लावलेले सगळ्यांनीच पाहिले.

              जगजीत सिंग म्हणजे उर्दू गझल गायकीला पडलेले सुरेल स्वप्न आहे.मेहदी हसन प्रमाणेच खर्जयुक्त जव्हारदार  मधाळ आवाज,वाद्यवृंदाचा योग्य वापर,गझलांची निवड यामुळे भारतातीलच नव्हे तर जगभरातील रसिकांनी जगजीत-चित्रा जोडीला डोक्यावर घेतले.जगजीत सिंग हे उत्कृष्ट 'कंपोजर' असल्यामुळे इतर गायक/गायिकांच्या जोडयांपेक्षा ही जोडी जास्ती लोकप्रिय ठरली.गायक जर उत्कृष्ट संगीतकार असेल तर गाणे नक्कीच उठावदार होते,हे अनेक संगीतकार गायकांच्या गायनावरून लक्षात येते.ह्या साऱ्या वैशिष्ठयांमुळे आपल्या देशात जगजीत सिंग इतकी लोकप्रियता  बेगम अख्तर नंतर कुणालाच मिळाली नाही.
        मी जगजीत सिंग यांच्या गझलगायकीचा चाहता आहे.त्यांचे बहुतेक अल्बम मी विकत घेऊन ऐकले आहेत.त्यातील 'कम अलाइव्ह' व 'अनफर्गेटेबल' हे दोन अलबम म्हणजे मला मलई (क्रीम) वाटतात.यातील बहुतेक गझला मी अजूनही गुणगुणतो.याचा अर्थ असा नाही की,इतर अल्बम चांगले नव्हते.प्रत्येक अलबममध्ये  काही ना काही वेगळा प्रयोग त्यांनी केलेला असायचा. मग तो ऑर्केस्ट्रेशनचा असो की कोरसचा असो की ध्वनिमुद्रणाचा असो. कायम प्रयोगशीलता हा जगजीत सिंग यांचा फार मोठा गुण होता.त्यांच्या यशाचे हे सुद्धा एक कारण आहे.
     जगजीतजी उत्कृष्ट गायक होते तितकेच मोठे संगीतकार पण होते.त्यांनी स्वरबद्ध करून गायिलेल्या काही गझलांचा उल्लेख करून त्यातील सुरवटीची खासियत मांडण्याचा मोह मला आद्य मराठी गझल गायक व संगीतकार म्हणून आवरता आला नाही.

१.
'कम अलाईव्ह' मधील
'कोई पास आया सवेरे सवेरे
मुझे आज़माया सवेरे सवेरे...
       या गझलची बंदिश  ललित रागात आहे.आणि तो त्यांनी शुद्ध स्वरूपात वापरला.परंतू सुरवातीचा आलाप घेताना मुर्च्छनाद्वारे भुपालीचा भास निर्माण करून माध्यमावर येण्याची त्यांची प्रक्रिया भल्या भल्यांना बुचकळ्यात पाडणारी होती.तसेच या गझल करीता केलेली तालाची रचना सुद्धा तशीच अनवट होती.१० मात्राच्या झपतालात काही रचना सुगम संगीतात वा चित्रपटात दिसतात.पण जगजीतजींनी या गझल करीता फक्त पाच मात्रांचा उपयोग करून रंगत आणली.माझ्या पाहण्यातील हा पहिला व शेवटचा प्रयोग आहे.याच अल्बम मधील 'मेरी तनहाईयों मुझको लगा लो सीने से'....ही पण रचना हटके आहे.भैरवीमध्ये अशी बंदिश जगजीतजीच करू जाणे!
२.
'अ माईलस्टोन' मधील 'मिलकर जुदा हुए तो' ही गझल तोडी रागात बांधलेली आहे.यातील मतल्याची पहिली ओळ मध्य सप्तकातील कोमल धैवतावरून सुरू होऊन मंद्र सप्तकातील शुद्ध निषादावर स्थिरावते.आणि येथून खरी गम्मत सुरू होते ती अशी की,निषादावर मूर्च्छना करून दुसऱ्या ओळीत भूप रागाची छाया दाखवत पुन्हा कोमल धैवतापासून  पहिली ओळ सुरू होते.अशी गम्मत प्रबुद्ध संगीतकरच करू शकतो.

३.
गझलच्या शब्दानुरूप रागाची निवड करून 'मेलोडीअस' सुरावट तयार करून गाणे हे पण जगजीतजींचे वैशिष्ठय होते.हे 'गरज बरस प्यासी धरतीपर' ह्या 'इन साईट' मधल्या गझलेवरून दिसून येते.

४.
'उम्र जलवो में बसर हो' ही गझल live कार्यक्रमात गाताना 'शेख करता तो है मस्जिद मे खुदा को सजदे' ही ओळ गाताना 'अजान'ची अरबी सुरावट 'मनमोही' होऊन जाते.
      खरे म्हणजे जगजीतजींच्या 'कंपोझिशन'वर एक मोठा लेख होऊ शकतो. म्हणून विस्तारभयास्तव इथेच थांबतो.
      जगजीतजींच्या आयुष्यातील अनेक घटना सर्वसामान्य रसिकांना माहीत नाहीत.त्यांचे बालपण,वैवाहिक जीवन,चित्राजींचा न गाण्याचा निर्णय,उत्तरार्धातील भक्तिमार्ग या सगळ्याची मांडणी करताना सगळे प्रसंग वैभवकुमाल शिंदे यांनी त्यांच्या 'गझलजीत' या पुस्तकातून आपल्या डोळ्यासमोर उभे केले आहेत.ते वाचताना आपल्याला गलबलून न आले तर नवलच!जगजीतजींच्या उत्तरार्धातील live कार्यक्रमातील गझलगायनातून ही व्यथा स्पष्टपणे दिसून येते.तसेच नंतरच्या भक्तीगीतातूनही व्यथा व समर्पण ठायी ठायी जाणवते.'हे राम' व 'जय राधा माधव' पहिल्यांदा ऐकले तेव्हा माझ्या डोळ्यात केव्हा पाणी आले ते कळलेच नाही.
     'दर्द से मेरा दामन भर दे' असे म्हणणाऱ्या या थोर गायकाला शेवटी शेवटी अनेक 'दर्द'ला सामोरे जावे लागले हे अतिशय दुःखद आहे.

गझलगंधर्व
सुधाकर कदम
सी१सी/१३,गिरीधर नगर,
वारजे माळवाडी,
पुणे. ५८
8888858850

Saturday, January 28, 2023

आर्णी येथील निवासस्थान...

 .     आज दि.२८ जानेवारी २०२३... 
आर्णीचा (जि. यवतमाळ,जिथे मी ३१ वर्षे संगीत शिक्षक म्हणून काम केले.) विद्यार्थी (आणि तेव्हाचा सख्खा शेजारी) किशोर सनसेटवार याने ज्या घरी सुरेश भट येऊन माझ्याकडे राहायचे त्या घराचा व्हिडीओ मला पाठवला.(त्याच्याच शब्दात "तुमच्या वास्तव्याने पावन झालेली वास्तू.) या चंद्रमौळी घरात मी भाड्याने राहायचो.या घराच्या समोरच्या गल्लीत खुर्ची टाकून भट बसायचे."हा असा चंद्र अशी रात फिरयासाठी" ही गझल १९८१ मध्ये या गल्लीत बसून त्यांनी लिहिली होती.आणि माझी स्वररचनाही याच घरात झाली होती.ही गझल १९८२ मध्ये अमरावतीला अरविंद ढवळे या सुरेश भटांच्या मित्राकडे पं. हृदयनाथ मंगेशकरांसमोर झालेल्या माझ्या मैफिलीत भटांनी आवर्जून गायला लावली होती.

     या घरात प्रत्येक भेटीत त्यांनी अनेक गझला लिहिल्या."उजाड वैराण वाळवंटी खळाळणार झरा मुहम्मद" ही मराठीतील पहिली 'नात' सुद्धा याच घरात भटांनी लिहिली.(१२/९/१९८१) तसेच कवी शंकर बडे, कलीम खान,मी आणि आर्णीतील गझल रसिक यांच्यातील अनेक चर्चा याच घरात रंगल्या.
     (१९८६ मध्ये माझे स्वतःचे घर झाले.२००३ पर्यंत, म्हणजे आर्णी सोडून पुण्यात स्थायिक होईपर्यंत माझे वास्तव्य या नवीन घरात होते.)
       आज किशोरने पाठविलेल्या 'त्या' घराच्या व्हिडिओमुळे अनेक सुखद-दुःखद आठवणी ताज्या झाल्यात.धन्यवाद किशोर!
-------------------------------------------------------------------------
●किशोरच्या शब्दात...
     या गल्लीतून जातांना प्रत्येकवेळेस तुमची आठवण येतेच येते... आणि आज मी हा video काढून आपणास पाठविला... लहानपणी या गल्लीतून जातांना संगीताचे सप्तसुर येथे मी अनुभवले आहे...

Friday, January 27, 2023

#काळोखाच्या_तपोवनातून...

      -सुधाकर कदम ह्यांची जीवननिष्ठा जपणारी कविता-

     मराठीचे #आद्य_गझलगायक  असलेले आणि '#गझल_गंधर्व' या नावाने ओळखले जाणारे सुधाकर कदम  यांच्या कवितांची ओळख  महाराष्ट्रातील काव्य रसिकांना '#मीच_आहे_येथे_फक्त_पारसा' ह्या संग्रहात द्वारे झालेलीच आहे. मुळात गायक-संगीतकार असलेले सुधाकर कदम गीतकार, गझलकार, अभंग रचनाकार, सशक्त विडंबनाकार अशा सर्व पातळीवर आपल्याला पुन्हा भेटतात ते त्यांच्या  काळोखाचा तपोवनातून ह्या दुसऱ्या काव्यसंग्रहातून, या संग्रहात सुधाकर कदम यांनी मराठीतील जवळपास सर्व काव्यप्रकार हाताळले आहेत हे विशेष.  दीर्घ आणि व्यापक असा अनुभव, सकारात्मक विचारशैली,  उस्फुर्त सृजनशीलता, शब्द सौंदर्य ह्या सोबत नेमक्या सुरांची साथ त्यामुळे कवितेला लाभलेली लयबद्धता ह्या सर्व अनुषंगाने सुधाकर कदम यांची कविता काव्य रसिकांना आकर्षून घेणारी ठरते.  पुण्यासारख्या आधुनिक शहरामध्ये राहत असले तरीही मूळ विदर्भातील रहिवासी असलेल्या सुधाकर कदम यांना ग्रामीण भागात जगणाऱ्या शेतकऱ्याच्या दुःखाची आणि वेदनेची जाणीव आहे. आपल्या कवितेमधून शेतकऱ्यांचे दुःख मांडतांना कवी म्हणतात,

 चिल्यापिल्यासंगे।उन्हापावसात
 राबतो शेतात। सालोसाल...
 जीवापलीकडे। मेहनत करी
 तरीही भाकरी। मिळेचि ना...
  ए.सी.त बसोनि। शेतकऱ्यावरी
 लिही कादंबरी। मुंबईत...

      वर्षानुवर्ष शेतामध्ये राबत कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये सालोसाल अंधारच आहे. जिवापाड मेहनत करून  आपल्या देशामध्ये शेतकऱ्याला आणि त्याच्या कुटुंबियांना दोन वेळचे जेवण सुद्धा मिळत नाही. अंगावर  व्यवस्थित कपडे सुद्धा मिळत नाहीत. अशा दयनीय अवस्थेत शेतकरी जगत असताना त्याचे हिरवेगार शेत पाहून शेठ सावकार त्याला त्याने घेतलेल्या कर्जासाठी तोडत असतात. अनेकदा तर कर्जबाजाऱ्याला आत्महत्या सोडून दुसरा उपाय दिसत नाही. अशावेळी मुंबईसारख्या मेट्रो सिटी मध्ये बसून वातानुकूलित वातावरणात बसून काही लोक शेतकऱ्यांच्या जीवनावर कथा कादंबरी कविता लिहीत असतात आणि शेतकऱ्यांची व्यथा आणि वेदना समजून घेतली म्हणून  त्यांना पुरस्कारही मिळत असतात. हा विरोधाभास आपल्या कवितेतून व्यंगार्थ स्वरूपात सुधाकर कदम यांनी चपखलपणे व्यक्त केला आहे. सुधाकर कदम यांचे शेती जीवनाविषयीचे निरीक्षण फार उत्तम आहे. जेव्हा शेतकरी शेतामध्ये काबाडकष्ट करतो त्यावेळी शेतकऱ्याची पत्नी  किंवा ग्रामीण शेती मातीतील स्त्री जे काम करत असते त्याबद्दल ते म्हणतात,

 घरघरून उठता जात्यामधून विठ्ठल
 कष्टवतीच्या घामाचा चोहीकडे परीमल

      शेती-मातीत राबणाऱ्या स्त्रीच्या घामाला येणाऱ्या  वासाला परीमल म्हणणे आणि कष्ट करणाऱ्या स्त्रीला कष्टवती  म्हणून संबोधने हे काम बहुदा मराठी भाषेमध्ये  सुधाकर कदम यांनी पहिल्यांदा केले असावे. सौंदर्यवती, लावण्यवती, रुपवती ह्या शब्दासोबत स्त्रीसाठी पहिल्यांदा 'कष्टवती' हा शब्द  वापरून मराठी भाषेत नव्या शब्दांची भर टाकत भाषेला समृद्ध करण्याचे कामही सुधाकर कदम करत आहेत असे म्हणणे जास्त सोयीस्कर ठरते.  कष्ट करून शेतकऱ्याला समर्थ साथ देणाऱ्या स्त्री बद्दल बोलताना म्हणतात,

 किती संकटे येऊ दे
 दूर ठेऊया दुःखाला
 तू  असता संगे माझ्या
 घरपण येई घरट्याला

       फक्त शेतकऱ्यासंदर्भातच नव्हे तर संपूर्ण मानव जातीच्या अर्धांगिनीच्या कार्याचा गौरव  करत स्त्रीचे महत्त्व अधोरेखित करणारी घरपण ही कविता आहे असे आपल्या लक्षात येते.
 सुधाकर कदम यांचे निसर्गभान खूप लाघवी आहे. आपल्या कवितेमध्ये आपल्या शब्दातून त्यांनी अतिशय विलोभनीय असा निसर्ग टिपला आहे. शेती आणि निसर्ग यांचा समन्वय आपल्या शब्दातून मांडताना कवी म्हणतात,

अवघं लाघव हिरवं तुडुंब
द्यावी वाटे येथे मनालाही डूब
भरल्या  शेताच दर्शन घडता
सृष्टीपुढे झुके आपसुक माथा

     बहरलेले हिरवेगार शेत, रानामध्ये उभा जोंधळा, बरबटी अशी वेगवेगळी पिके, माळरानावर फुललेली रानफुले असे सृष्टीचे वेगळे रंग आणि हिरवा निसर्ग पाहून  ह्या निसर्गामध्ये रममाण झाले पाहिजे, डुबून गेले पाहिजे अशी भावना कवी व्यक्त करतात. निसर्गावरील अनिल कविता या संग्रहामध्ये आपल्याला वाचायला मिळतात. अनवट सूर सारख्या कवितेमधून वर्षा ऋतूचे वर्णन श्यामरंग सारख्या कवितेतून  निसर्ग, प्रेम, राधाकृष्ण अशा अलवार संदर्भातून कवी आपला मनोभाव उलगडतात.  पाऊस,चैत्रपालवी, निसर्ग किमया अशा रचनांमधून तर जिवंत निसर्ग आपल्या शब्दातून कवींनी रेखाटला आहे. आठवण सारख्या कवितेमधून संध्या समयीच्या कातर आठवणी असताना विविध ऋतूंचे रंग पृथ्वीचे अंगण सजवतात आणि आठवणीचा न्यारा श्रावण  व्याकूळ करतो अशी भावना कवी व्यक्त करतात. निसर्गाचे हे अल्हाददायक रूप असे वाचकाला भुरळ घालते.  तसेच रणरणत्या उन्हात निसर्गाचे भयावह रूप सुद्धा कधी कधी दिसून येते. रखरखत्या उन्हात दिसणारा निसर्ग टिपताना सुधाकर कदम म्हणतात,

 वेदनेला येई। उदयास्ती रंग
 रोजची दुपार। पेटवीते अंग
 देहा फुटे झरा। पाणी शोधताना
 कोस कोस धाव। वेगाने घेताना
 डोळ्यावर दाटे।  कारूण्याचे धुके
 जनावरांचेही। हंबरणे मुके

      उन्हाळ्यामध्ये पाण्यासाठी होणारी तगमग, जीवाची होणारी लाहीलाही, घोटभर पाण्यासाठी मैलोनमैल प्रवास करणारी जनता, पाण्यावाचून जनावराचे हंबरणे हे सर्व अंगावर येणारे दाहक वर्णन निसर्गाचाच एक भाग आहे. तोही तितक्याच प्रभावीपणे चितारण्याचे काम कवींनी केलेले दिसून येते. अर्थात  जिथे पाण्याचे दुर्भिक्ष  आपल्या कवितेमधून दाहकतेने कवी मांडत असतात त्याच वेळी,

डोईवर एक। दुजी कटीवर
घेउनी घागर। सुंदरी ही...

     अशा शब्दात पाणी भरायला निघालेल्या रमणीचे वर्णन सुद्धा कवी तितके स्थापनेने करत असतात. सुधाकर कदम यांनी नजाकत भरल्या अश्या प्रणय रचना काळोखाच्या तपोवनातून ह्या संग्रहातून काव्यरसिकांच्या समोर ठेवल्या आहेत. कल्लोळ सारखी  प्रणयरम्य कविता गणितीय भाषेत जाते. पूर्णत्वा, वर्तुळ, लांब त्रिज्येला जोडता  अशा शब्दात  प्रणयाचे पूर्णत्व कवींनी अधोरेखित केले आहे. प्रणयरम्य कवितेमध्ये गणितीय भाषा हा एक वेगळाच प्रयोग सुधाकर कदम यांनी या कवितेत केलेला दिसून येतो. ताळेबंद, प्रेमामध्ये, अत्तराचा फाया, रेशीम रात, भुलवा अशा अनेक कविता या संग्रहात प्रणयाच्या नवीन, अल्लड आणि आल्हाददायक भावभावनासह आलेल्या आहेत.

 नसे तू राधिका। नसे मीही कृष्ण
 बासरीची तान। नसे तेथे...
 (भुलवा)

 किंवा

 ना मी कृष्णा ना तू राधा
 का व्हावी गे सावळ बाधा ?

      असे प्रश्न विचारत कवींनी राधा-कृष्णाची प्रीत शब्दांकित केली आहे. राधा,कृष्ण, ययाती, द्रोपदी, जानकी अशा काही पुरातन व्यक्ती प्रतिमांचा आणि प्रतिकांचा वापर सुधाकर कदम यांनी आपल्या कवितेत फार सहजतेने केलेला दिसून येतो. स्त्रियांवरील अन्याय अत्याचार ह्याबाबत बोलत असताना कवी म्हणतात,

 ना महाभारत, न रामायण तरीही
 जानकी अन् द्रोपदी लागे पणाला

 असे सांगून मर्यादा पुरुषोत्तम राम किंवा भीष्म द्रोणाचार्य विदुर आणि पांडव असे धर्माचे रक्षण करते लोक बसलेले असताना स्त्रियांवर रामायण महाभारत काळातही अन्याय झाला आहे  असेल तर कवी सांगतातच पण आजच्या काळामध्ये रामायण महाभारत नसले तरी  आजही स्त्रियांना डावावर लावावे अशी वस्तू समजले जाते असे ते निक्षून सांगतात. स्त्रियांना फक्त पुरुषापासून त्रास होतो असे नाही तर स्त्री सुद्धा स्त्रीची शत्रू असल्याचे कवी आपल्या कवितेचे सांगताना म्हणतात,

सासुरवासिनी 
चाहूल घेऊन 
सडासंमार्जन 
करो लागे...

      या कडव्यामध्ये एक स्त्री आपले घर-अंगण सारवते आहे सजवते आहे. असे वर्णन दिसत असले तरी सासुरवाशीण ह्या एकाच शब्दात सासूच्या दडपणाखाली, धाकाखाली काम करणारी स्त्री आपल्या समोर उभी राहते. स्त्रीवरील अन्याय आणि अत्याचार  याप्रमाणेच आपल्या समाजातील जातिभेद अजूनही कायम आहेत. त्यालासुद्धा सुधाकर कदम यांनी आपल्या कवितेतून वाचा फोडली आहे.

 किती प्रबोधन केले तरीही
 जात नसे त्या असती जाती

       या ओळी मधून संत काळापासून तर महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक विभूतींनी  जात हे संबोधन नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले.  मात्र तरीही या समाजातील जातीभेद संपला नाही. 'नाठाळाचे माथी लाठी' अशी भूमिका घेतली तरी  तुकारामाचे कुणी ऐकले नाही. आणि जीवनभर विठ्ठल विठ्ठल करणाऱ्या चोखामेळ्याला जिवंतपणी तर गाभाऱ्यात प्रवेश मिळालाच नाही. आणि  मरणोत्तर  पायरीवर जागा मिळाली म्हणून धन्यता मानावी लागली. ही सर्व शोकांतिका सुधाकर  कदम यांनी आपल्या रचनेत कधी व्यंगात्मक रीतीने तर कधी सरळसोट हल्ला चढवत मांडली आहे. देवाधर्माच्या नावाने जो व्यवहार या जगात चालू आहे त्याच्यावर अनेक ठिकाणे कवींनी  शाब्दिक हल्ला चढविला आहे.

 विश्वात्मकतेला
 चौकटीत कोणी
 बांधतो अज्ञानी
 न्यूनगंडे...

      अशा अभंगरचना मधून आज अज्ञानी लोक संपूर्ण  विश्व भावनेला चौकटीमध्ये बंदिस्त करत आहे. ही जाणीव कवींना अस्वस्थ करते. जगाच्या कल्याणासाठी समाधानासाठी 'अत्त दीप भव' ही भावना मनामध्ये रुजली पाहिजे, वाढली पाहिजे असे कवीला आवर्जून वाटते. तशी ती जाणीव त्यांनी 'रे मना' या कवितेमध्ये व्यक्त सुद्धा केलेली दिसून येते. एकंदर समृद्ध काव्यानुभूती, विविध प्रतीके प्रतिमांचा वापर, समर्पक आणि चपलख उदाहरणे, सकारात्मक जीवननिष्ठा ह्या सर्वांचा एकत्रित दस्तावेज म्हणजे काळोखाच्या तपोवनातून  हा संग्रह आहे असे म्हणावे वाटते. स्वयं प्रकाशन पुणे त्यांनी प्रकाशित केलेल्या ह्या सुंदर संग्रहाचे मुखपृष्ठ यवतमाळ जिल्ह्यातील पुसदचे प्रा.अविनाश वानखेडे यांनी तयार केलेले असून, ते अगदी समर्पक असे आहे. राम पंडित यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना संग्रहाची श्रीमंती वाढवते. कवितेचे बहुतांश प्रकार सुधाकर कदम यांनी या संग्रहात हाताळले आहेत. मात्र मुक्तछंद हा काव्यप्रकार यात दिसून येत नाही. कवी मुळात गायक असल्यामुळे आपल्या कविता लयबद्ध कशा होतील याचा विचार त्यांच्या अंतर्मनात असल्याने  तसे घडले असावे असे वाटते. कवी शब्दाचे ऋण मानतात, शब्द आणि कविता त्यांच्यासाठी काय आहे ते त्यांच्याच शब्दात सांगायचे तर,

 आकळेल अर्थ
 घालता आवर्त
 एका एका आर्त
 शब्दाचा तो...
 शब्दाचा तो भाव
 समजून घेता
 संपेल आर्तता
 मनातील...

      शब्दांचा भाव म्हणजेच अर्थ समजून घेतला म्हणजे मनातील  सर्व जळमटे आणि दुःख नष्ट होतील अशी अपेक्षा कवी सुधाकर कदम यांनी व्यक्त केली असून ती यथार्थ पणे योग्य आणि रास्त आहे यात शंका नाही. सुधाकर कदम यांच्या काळोखाच्या तपोवनातून ह्या संग्रहासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देत वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!

- किरण शिवहर डोंगरदिवे
 वॉर्ड नंबर 7 समता नगर मेहकर
 ता मेहकर जि बुलढाणा 443301
मोबा 7588565576

 काळोखाच्या तपोवनातून ( कविता)
 सुधाकर कदम  मो.8888858850
 स्वयं प्रकाशन पुणे
 पृष्ठ 96, किंमत 150
-------------------------------------------------------------------------
●दैनिक देशोन्नती, अकोला. २२ जानेवारी २०२३

Friday, January 20, 2023

जोगिया...

      खास संक्रांतिनिमित्त ज्येष्ठ गझलकारा ज्योती राव बालिगा यांनी  रसिकांना आज एक अनोखी भेट दिली आहे.एक अप्रतिम गझल.... 'जोगिया'. यात अलवार शब्दात दुःख गुंफले आहे.'दुःखाच्या उमलण्यासोबत सोबत जोगिया छेडणे'असो,'एकांतास आकाश मागणे असो,:जिवाच्या पाकळ्या','आसवांचे बोलणे' वगैरे वगैरे
अप्रतिमच...
      ही गझल #मारवा रागाच्या आर्त स्वरात बांधली असून,मुर्छना पद्धतीचा वापर करून गझलेतील शब्दार्थ स्वरांद्वारे पोहचविण्याचा मी प्रयत्न केला आहे.या बंदिशीमधील मुर्छनांच्या जागा हेरून मिलिंद गुणे यांनी अप्रतिम संगीत संयोजन केल्यामुळे गझलेलतील आर्तता अधिक वाढली.आणि तीच आर्तता आपल्या गायनातून गायिका कल्पिता उपासनीने अत्यन्त समर्पकपणे गझलमध्ये उतरवली आहे,हे गझलमधील 'जोगिया' या शब्दावरील 'हरकत' ऐकल्यावर कळेलच.
     एकूणच आम्ही आमच्यातील जे जे चांगले ते ते 'तिळगुळ' म्हणून आपल्यासमोर ठेवले.आपले अभिप्राय अपेक्षित.

"ऐकत जावी मस्त गझल
बोलत जावे गोड सरल..."

-सुधाकर कदम

●ध्वनिमुद्रण - पंचम स्टुडिओ,पुणे.

#मराठी_गझल #marathi #gazal #composition   #गझल

#jyotiraobaliga #shevtihedukhamajhelagaleumlayala
 #selfcompoesdgazal #marathigazal #gazalgandharv #sudhakarkadam  #sudhakarkadamghazal

Sunday, December 25, 2022

सुधाकर कदमांची शब्द-स्वरसंपदा...

      आजमितीस सुधाकरच्या नावावर लेखक/कवी म्हणून ’#फडे_मधुर_खावया…’ (स्फूट लेख),’#सरगम’ (स्वरलिपी), ’#मीच_आहे_फक्त_येथे_पारसा' व '#काळोखाच्या_तपोवनातून' (काव्य संग्रह) अशी चार पुस्तके,तसेच ’#भरारी’ (मराठी गझल गायनाची महाराष्ट्रातील पहिली कॅसेट), '#अर्चना’ (टी सिरीज)', '#खूप_मजा_करू’ (फाऊंटॆन म्युझिक कं), ’#काट्यांची_मखमल’ (युनिव्हर्सल म्युझिक कं), ’#तुझ्यासाठीच_मी...’( युनिव्हर्सल म्युझिक कं) ह्या कॅसेट्स सीडीज आहेत.नव्याने केलेला #रे_मना हा त्यानेच लिहिलेल्या स्वरबद्ध गीत-गझलांचा अलबम spotify या ऑडिओ चॅनलवर उपलब्ध आहे.तसेच रविप्रकाश चापके यांच्या मराठी गझलांचा #गझल_गुलाबो हा अलबम लवकरच spotify वर प्रसिद्ध होत आहे.

        सुधाकरनेच स्वरबद्ध केलेला  हनीफ़ साग़र,बशर नवाज़ यांच्या उर्द गझलांचा तीन तासाचा कार्यक्रम विविध गायक गायिका करीत आहेत. सुरेश वाडकरांपासून पं.शौनक अभिषेकी,अनुराधा मराठे, वैशाली माडे, नेहा दाउदखाने, रसिका जानोरकर, मयूर महाजन, गाथा जाधव, गायत्री गायकवाड गुल्हाने, प्राजक्ता सावरकर शिंदे, आदित्य फडके, रफ़िक शेख, वैशाली पुल्लीवार, अविनाश जोशी, सचिन डाखोरे सोबतच लहान बंधू शांत कदम व मुली भैरवी,रेणू पर्यंत गुणी गायक- गायकांनी त्याने स्वरबद्ध केलेल्या रचना गायिल्या आहेत.

       यात मराठीतील कुसुमाग्रज,सुरेश भट,ग.दि.मा.,विंदा करंदीकर,बाबा आमटे,बा.भ.बोरकर,यशवंत देव,मंगेश पाडगावकर,गंगाधर महांबरे,पद्मा गोळे,इंदिरा संत,वसंत बापट,बालकवी,शांता शेळके,सरिता पत्की,शंकर वैद्य,वंदना विटणकर,उ.रा.गिरी,ग्रेस,श्रीकृष्ण राऊत,इलाही जमादार,शिवा राऊत,आशा पांडॆ,श्रद्धा पराते,दिलीप पांढरपट्टे,अनिल कांबळे,संगीता जोशी,म.भा.चव्हाण.रमण रणदिवे,सदानंद डबीर,नारायण कुळकर्णी कवठेकर,शिवाजी जवरे,ललित सोनोने,शंकर बडे,गौतम सुत्रावे,अरूण सांगोळे,बबन सराडकर,शरद पिदडी,नीलकृष्ण देशपांडे,'मलंग',प्रथमेश गिरीधारी, सुनीती लिमये,आनंद रघुनाथ,कलीम खान,गजेश तोंडरे,अनंत ढवळे,चित्तरंजन भट,दीपक करंदीकर,मनोहर रणपिसे,घनशाम धेंडॆ,ए.के.शेख,गंगाधर मुटे,बदिउज्जमा बिराजदार,समीर चव्हाण ,जोत्स्ना राजपूत,प्रमोद खराडॆ,जनार्दन म्हात्रे,महेंद्र राजगुडे,विशाल राजगुरू,जयदीप जोशी,शिल्पा देशपांडे,गजानन मिटके,मीरा सिरसमकर,रविप्रकाश चापके व दस्तुरखुद्द सुधाकर कदम हे आहेत.

        आणि उर्दू-हिंदीतील डॉ राही मासूम रजा, हनुमंत नायडू, शॆरजंग गर्ग, प्रेमनाथ कक्कर, शंकर दीक्षित, श.न.तरन्नुम, बलबीरसिंह रंग, ’राग’ कानपुरी, मोहन वर्मा ’साहिल’, प्रभा ठाकूर, मयंक अकबराबादी, समद रजा, ’शेरी’ भोपाली, ’बेताब’ अलिपुरी, इंदू कौशिक, अशोक अंजूम, सैफुद्दीन सैफ, सुरेश्चंद्र वर्मा, ’निजाम’ रामपुरी, गोवर्धन भारती, विनू महेंद्र, प्यारेलाल श्रीमाल, ’सरसपंडित’ कमलप्रसाद (कँवल), या कवी गझलकारांचा समावेश आहे.जुन्या पिढीतील मान्यवर ज्येष्ठांपासून आजच्या नवोदितांपर्यंत अनेक मराठी आणि उर्दू कवी गझलकारांच्या रचना स्वरबद्ध करण्याचे खूप मोठे काम त्याने केले आहे....

आयुष्याच्या अत्यंत समृद्ध टप्प्यावर माझा हा कलंदर मित्र उभा आहे.त्याला आरोग्यपूर्ण,समृद्ध दीर्घ आयुष्य लाभॊ यासाठी माझ्या शुभेच्छा..

-शाहीर सुरेशकुमार वैराळकर

संस्थापक अध्यक्ष

सुरेश भट गझल मंच

पुणे.

(चकव्यातून फिरतो मौनी मधून...)

-----------------------------------------------

.                 #युट्यूब्वर_उपलब्धअसलेल्या_रचना

#मराठी_गझल

१.कुठलेच फूल आता -सुरेश भट

२.दिवस है जाती कसे -      "

३.झिंगतो मी कळेना-         "

४.जगत मी आलो असा की- "

५.ही कहाणी तुझ्याच न्हाण्याची-"

६.सुखाच्या सावल्या साऱ्या- "

७.हे तुझे अशा वेळी लाजणे-  "

८.ही न मंजूर वाटचाल-        "

९.आले रडू तरीही कोणी रडू नये-"

१०.लोपला चंद्रमा- श्रीकृष्ण राउत

११.दुःख माझे देव झाले-   "

१२.काट्यांची मखमल होते-दिलीप पांढरपट्टे

१३.दूर गेल्या फुलातल्या वाटा-         "

१४.जीवनाचा खेळ रंगाया हवा-        "

१५.गाऊ नये कुणीही-                     "

१६.घाव ओला जरासा होता-            "

१७.हसू उमटले दुःख भोगता-           "

१८.कळेना कसा हा जगावेगळा-       "

१९.मी सुखाचे गाव शोधत राहिलो-    "

२०.तराणे-                                     "

२१.येता येता गेला पाऊस-                "

२२.किती सावरावे-                          "

२३.उशीर झाला तुला यायला-इलाही जमादार

२४.जीव लावावा असे कोणीच नही-संगीता जोशी

२५.लोक आता बोलवाया लागले-अनिल कांबळे

२६.मी करू सारखा विचार किती-        "

२७.फुलातला प्रवास दे-ललित सोनोने

२८.मस्तीत गीत गा रे-नारायण कुलकर्णी कवठेकर

२९.पियानो-उ.रा.गिरी

३०.जरा सांजता याद येतेस तू-ए.के.शेख

३१.कसे ओठांवरी गाणे-दीपक करंदीकर

३२.शब्द दंगा घालती रक्तात माझ्या-चित्तरंजन भट

३३.एक प्रार्थना ओठांमधुनी-अनंत ढवळे

३४रानात पाखरांची-म.भा.चव्हाण

३५.दुःख विसरून गायचे होते-अनंत ढवळे

३६.अद्याप सारे आठवे-प्रमोद खराडे

३७.गझल चांदण्यांची-समीर चव्हाण

३८.कापली नाहीत अजूनी-जनार्दन म्हात्रे

३९.असे कसे तुझ्याविना-ज्योत्स्ना राजपूत

४०.मनातले तुझे मला-विशाल राजगुरु

४१.तू कवितेतून हरवता-शिल्पा देशपांडे

४२.श्यामरंगी रंगताना-मीनाक्षी गोरंटीवार

४३.नाव आता तिचे तू विचारू नको-श्रीकृष्ण राऊत

४४.चंद्र आता मावळाया लागला-सुरेश भट

४५.हे तुझे आभासवाणे-गजानन मिटके

४६.आसवांनी मी मला भिजवू कशाला-सुरेश भट

४७.रंग माझा वेगळा-सुरेश भट

४८.मज झुकता आले नाही-सदानंद डबीर

४९.तुझ्या रूपाचा गुलाब ताजा-म.भा. चव्हाण

५०. जायचेच ना निघून जा-सतीश डुंबरे

५१.तुजपाशी मज टाळायाचे लाख बहाणे होते-सुरेश भट

५२.माझी गझल गुलबो-रविप्रकाश चापके

५३.मला सोसवेना दुरावा तुझा-         "

५४.जळलो धुपापरी मी-                  "

५५.प्रतीक्षा पार्थना झाली-                "

५६.काट्यास फूलआले -                  "

५७.जो तो दिसावयाला दिसतो सुखात "

५७.असे पत्र आता तुला मी लिहावे-    "

५८.नाव आता तिचे तू विचारू नको-श्रीकृष्ण राऊत

#मराठी_गीते

१.गीत गंगेच्या तटावर-सुरेश भट

२.पहाटे पहाटे-                "

३.मी असा आहे कलंदर-    "

४.गे मायभू-                     "

५.तसे किती काटे रुतले-     "

६.भरात आला श्रावण महीना-ग.दि.माडगुळकर

७.झोपडीच्या झापाम्होरं-                 "

८.महाराष्ट्रगीत-कुसुमाग्रज

९.पोवाडा-शाहीर अण्णा भाऊ साठे

१०.सरस्वतीची भूपाळी-गोविंद

११.सकाळ-उ.रा.गिरी

१२.मराठी हजल-शिवजी जवरे

१३.मन-बहिणाबाई

१४.मानवांनो आत या रे-विंदा करंदीकर

१५.घोडा (बालगीत) शांता शेळके

१६.जवळ येता तुझ्या-अनिल कांबळे

१७.झिंगले चांदणे-श्रीकृष्ण राउत

१८.मराठी माहिया-घनश्याम धेण्डे

१९.सांगू कशी राया तुले (वऱ्हाडी गीत) शंकर बडे

२०.श्याम घन घनश्याम-आशा पांडे

२१.ये मंत्राची घुमवित वीणा-   "

२२.शक्ती दे तू आज मजला-   "

२३.दयासागरा-                      "

२४.तुझीच सुमने-                   "

२५.करुणा अपार आहे-           "

२६.वेद झाले वेदनांचे-              "

२७.तूच माझे गीत कोमल-         "

२८.सरगम तुझ्याचसाठी-सुधाकर कदम

२९.पावसात जाऊ-मीरा सिरसमकर

३०बारीकराव-                    "

३१.रिमझिम पाऊस-            "

३२.हिरवे हिरवे गर्द चिमुकले- "

३३.बागेतल्या फुलांशी मैत्री-   "

३४.रानातले पक्षी-                 "

३५.थेंब-                              "

३६.इवलसं बी-                     "

३७.खूप मजा करू-                "

३८.उठ उठ सह्याद्रे

३९.आभाळ वाजलं

४०.पीक खुशीत डोलतय सारं

४१.राम कृष्ण हरी-विश्वनाथ स्वामी

४२.चतुर्वेद जैसा तानपुरा बोले-गंगाधर महांबरे

४३.घर अपुले बांधू आपण-गजेश तोंडरे

४४.रे मना तुज काय झाले सांग ना-सुधाकर कदम

४५.काकडारतीच्या वेळी मन होतसे चकोर- "

४६.हा भाव-भावनांचा चालूय खेळ सारा-    "

४७.स्पर्शून एकदा तू केले मला ययाती-       "

४८.कशी वेदना विसरायाची सांग मला तू-   "

४९.जीवनाची एकतारी-                           "

५०.आर्त गाण्यातून फुलता एक नात्याची कहाणी "

५१.माझ्यावरी हरीची करुणा अपार आहे-आशा पांडे

५३.मला सोसवेना दुरावा तुझा-ज्योती राव (बालिगा)

#उर्दू_ग़ज़ल

१.आग जो दिल में लगी है-हनीफ़ साग़र

२.दिल लगाया है तो नफरत-     "

३.न इस तऱ्हा भी खयालों मे-बशर नवाज़

४.यकायक चांदनी चमकी-दिलीप पांढरपट्टे

५.गयी लज्जत पिलाने की-         "

६.तू मेरी दुश्मन नहीं-कलीम खान

७.तुम्हारे हुस्न में जो सादगी है-हनीफ़ साग़र 

८.मैं झुकाऊं सर कहीं भी-           "

९.सब में रहकर भी जुदा लगता है तू-   "

१०.बारहा हम जो मुस्कुराए है-प्रथम गिरीधारी

११.कल जो अपने थे अब पराए है-बेताब अलीपुरी

१२.ना सही लब न खोलिए साहब-हनीफ़ साग़र 

१३.उनकी गलियों से उठाई है ग़ज़ल-अशोक अंजुम

----------------------------------------------------

#हाथरस (उत्तर प्रदेश) येथून प्रसिद्ध होणाऱ्या संगीतास वाहिलेल्या भारतातील एकमेव #संगीत या मासिकातील '#नग़्म_ए_ग़ज़ल' आणि '#प्रसार_गीत' या स्तंभांतर्गत प्रकाशित गझल गीतांची यादी...

#उर्दू_ग़ज़ल

१.

छोटी सी बात की मुझे...अशोक अंजुम...जुलाई १९८६

२.

पत्थरों के शहर में....         "                 नवम्बर १९८६

३.

इतने करीब मेरे...        मोहन वर्मा 'साहिल'  मार्च  १९९०

४.

किसीका क्या भरोसा है...बेदील हाथरसी.   अप्रैल १९९० 

५.

कोई बात बने...             श.न.तरन्नुम ...       मई  १९९०

६.

मत पुछिए...                  शेरजंग गर्ग...    जुलाई १९९०

७.

दूर से आए थे साक़ी.नजीर 'अकबराबादी' अक्तूबर१९९०

८.

वक़्त से पूछ लो...डॉ.राही मासुम रज़ा...     मार्च  १९९१

९.

उनकी गलियों से....अशोक अंजुम...         अप्रैल १९९१

१०.

 ग़म को सीने से लगाकर...'राग' कानपुरी...  जून  १९९१

११.

आज सदीयों की घनी...कलीम खान...        जून १९९२

१२.

जलाए जब तुम्हे शबनम...   "                 सितंबर १९९२

१३.

आदमी गुज़रता है...किरन भारती...        अक्तूबर १९९२

१४.

हमने पाया है तुम्हे...श्रद्धा पराते...                मई १९९३

१५.

हसीन चांद नहीं...'मयंक'अकबराबादी...    नवंबर १९९३

१६.

करीब मौत खडी है...सैफुद्दीन सैफ़ ...      अक्तूबर १९९३

१७.

ज़ख्म-ए-दिल...प्रताप सोमवंशी...                मई १९९४

१८.

बद्दुआ भी...नित्यानंद 'तुषार'...               सितंबर १९९५

१९.

चाक दामां है...अल्लाम 'खिजर'...          अक्तूबर १९९५

२०.

चाह थी इस दिल से...यश खन्ना 'नीर'...    दिसंबर १९९५

२१.

तेरे आगे कली की नाज़ुकी...कमलप्रसाद...  मार्च १९९६

२२.

आग़ाज़ तो होता है...मीनाकुमारी...          अगस्त १९९६

२३.

वो शख़्स जाते जाते...डॉ.पूर्णिमा 'पूनम'..सितंबर १९९७

#गीत

१.

अमर रहे स्वातंत्र्य... नर्मदाप्रसाद खरे...     अगस्त १९८६

२.

जय जय भारती... वल्लभेश दिवाकर...    अगस्त १९९०

३.

 गदराई उमरिया...शंकर दीक्षित...             अप्रैल १९९१

४.

तुम साज़ प्रिये...वेदमणिसिंह ठाकूर...           मई १९९१

५.

दरशन देना नंददुलारे... कृपालू महाराज...    जून १९९१

६.

रखता उंची शान तिरंगा....हरीश निगम...  अगस्त १९९१

७.

उम्र पल पल ... श्रद्धा पराते...                अक्तूबर १९९१

८.

जय स्वरदायिनी...कृष्णराव भट्ट 'सरस'...      मार्च १९९२

९.

परमेश आनंद धाम हो...पथिक...             अप्रैल १९९२

१०.

ये बरखा की रुत... शामकृष्ण वर्मा...        जुलाई १९९२

११.

सह्यो न जाय...श्रद्धा पराते...                 अक्तूबर १९९२

१२.

ओस की बुंदे...डॉ.राही मासुम रज़ा...        नवंबर १९९२

१३.

अर्चना तुम,वंदना तुम....रवि शुक्ल...       दिसंबर १९९२

१४.

देह हुई सरगम सी...राजनारायण चौधरू.. दिसंबर १९९२

१५.

चांद सूरज एक है...माया भट्टाचार्य...            मई १९९३

१६.

सतरूप प्रभो अपना... पथिक...                  जून १९९३   

१७.

राष्ट्र आराधन... डॉ.विश्वनाथ शुक्ल...      सितंबर १९९३

१८.

तू दयालू दीन मैं... तुलसीदास...             सितंबर १९९३

१९.

गाईए गणपती जग वंदन...तुलसीदास...  अक्तूबर १९९३

२०.

ज्योति तुम,मैं वर्तिका हूँ... डॉ.रंजना...      नवंबर २९९३

२१.

गीत मैं ने रचे...शंकर सुलतानपुरी...            मार्च १९९४

२२.

ऐसा भी देखा है...प्रभा ठाकूर...                अप्रैल १९९५

२३.

जब यौवन मुसकाता है...चंद्रशेखर सेनगुप्ता...मई १९९४

२४.

राम नाम जपना... डॉ.प्यारेलाल श्रीमाल...    जून १९९४

२५.

तुमने लिखी न पाती...श्रद्धा पराते...         अगस्त १९९४

२६.

आंख से ओझल तुम हो...विनू महेंद्र...     अक्तूबर १९९४

२७.

उड रे पखेरू  ...शाह हुसेन...                  दिसंबर १९९४

२८.

वह गीत फिर सुना दो.डॉ.विश्वनाथ शुक्ल.अक्तूबर १९९५

२९.

तनहाई मेरे साथ तो है...चंद्रशेखर सेनगुप्ता...मार्च १९९६

३०.

रात का पथ... मधुर शास्त्री...                       मई १९९६

३१.

पपिहा की बोली...सियाराम शर्मा 'विकल'..जुलाई १९९६

३२.

पी ले रे अवधू हो मतवाला...चरणदास...सितंबर १९९६

-निषाद कदम

-------------------------------------------------------------------

●ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२२ मधील फेसबुकवरील स्वररचना...

-मराठी-

१.तुझे माझ्याजवळ असणे सुखद होते-विद्या देशपांडे

२.प्रेम होते कसे स्वप्न पडते कसे-संजय गोरडे

३.एखाद्या दुपारवेळी मी खिन्न एकटा असतो-प्रियंका गिरी

४.जे जे मला मिळाले साभार देत आहे-आशा पांडे

५.डोळ्यात आसवांना मी आणणार नाही-डॉ.मनोज सोनोने

६.भेटून काय सांगू माझी व्यथा कुणाला-अनिल जाधव

७.तुझ्या माझ्यातला आता दुरावा वाढतो आहे-कविकुमार

८.केवढे झाले सहज जाणे तुझे-शरद काळे

९.नेहमी तुझ्याच आसपास मी-अश्विनी बोंडे

१०.ओठात नाव येता सांजावला शहारा-साईनाथ फुसे

११.अशा सांजवेळी दिवेलागणीला-सविता बन्सोड

१२.दिवस येतो दिवस जातो-डॉ.अविनाश सांगोलेकर

१३.वंचना जखमा जुन्या उसवून येते-अमिता गोसावी

१५.कुणीच नसले सोबतीस की घुसमट होते-सचिन साताळकर

१६.आपण सारे इथे बुडबुडे-अशोक कुलकर्णी

१७.दुःखात का जीवाला झुरवत बसायचे-गौरी शिरसाट 

१८.एकरूप व्हायचे, प्रेमगीत गायचे-दीपाली वझे

१९.पुन्हा थांबेन जर ती यायची आहे-स्मिता गोरंटीवार

२०.झिजल्याशिवाय दरवळ नाही-मीनाक्षी गोरंटीवार

२१.दिशा शृंगारल्या होत्या हवा गंधाळली होती-प्रशांत वैद्य

२२.झाल्या चुका असू दे रस्ता नवा धरू या-प्रतिभा सराफ

२३.दुःख माझे दूर करण्या धावते माझी गझल-प्रसन्नकुमार धुमाळ 

२४.सांग तुजला काय आता आठवाया लागले-सुधाकर इनामदार

२५.ऐक ना! बोलायचे राहून गेले-निर्मला सोनी

२६.कुठे कुणाची सोबत पुरते आयुष्याला-अल्पना देशमुख नायक

२७.भकास झाले हसरे अंगण तू गेल्यावर-मसूद पटेल

२८.हळूच बोलणे तुझे तसे हळूच हासणे-हेमंत जाधव 

२९.तुला उगाच वाटते तुझ्याविना मरेन मी-दिवाकर जोशी

३०.मी तरी आता व्यथांचे पांघरू शेले किती-वंदना पाटील वैराळकर

३१.मिठीत तुझिया येउन झाला निवांत वारा-डॉ.संगीता म्हसकर

३२.दुःख माझे तुला पण कळू लागले-भैय्या पेठकर

३३.अचानक जीभ ही अडते-अनिल पाटील 

३४.सांजकोवळी क्षितिजावरती-संजय इंगळे तिगावकर

३५.उदास झाले हसरे अंगण-व्यंकटेश कुलकर्णी

३६.केलेत केवढे तू उपकार काय सांगू-श्रीराम गिरी

३७.पुन्हा का तेच ते होते-कीर्ती वैराळकर

३८.तुझ्यावर भाळलेल्या वेदनांचे काय मग?-अंजली पंडित दीक्षित

३९.ओठी जरी कधीचे स्वातंत्र्यगान आहे-म्.भा.चव्हाण

४०.संध्येच्या शामल डोही-श्रद्धा पराते

४१.दूर तिथे घन बरसे हलकासा-सदानंद डबीर

४२.दुःखाशी नाते जडता जडता जडते-मनोहर रणपिसे

४३.रात गेली निघून पाऱ्याची-सुरेश भट

४४.मज कळले तू माझी पण सगळे घडल्यावर-उ.रा.गिरी

४५.आदिशक्ती तू,आई रेणुके-निलकृष्ण देशपांडे

४६.घाली अमृताचा पान्हा कृपेची साऊली-शिवा राऊत 

४७.भेटली तू मला वादळासारखी-श्रीकृष्ण राऊत 

४८.सोसण्याचा सूर करणे ज्यास जमले-सुधाकर कदम

-हिंदी/उर्दू-

४९.तुमने किया है प्यार कि घायल किया हमे-डॉ.प्यारेलाल श्रीमाल

५०.जो भी तेरी गली में आता है-हनीफ़ साग़र

५१.इल्म ऐसा वो सीखकर आया-अमित झा राही

५२.शाम होते ही सितारे भी चमक जाते है-सुधीर बल्लेवर 'मलंग'

५३.हो अगर दिल में उजाले तो ग़ज़ल होती है-एजाज़ शेख

५४.दिल तो टूटा है दिल लगाने से-उमाशंकर अश्क

संगीत आणि साहित्य :