खास संक्रांतिनिमित्त ज्येष्ठ गझलकारा ज्योती राव बालिगा यांनी रसिकांना आज एक अनोखी भेट दिली आहे.एक अप्रतिम गझल.... 'जोगिया'. यात अलवार शब्दात दुःख गुंफले आहे.'दुःखाच्या उमलण्यासोबत सोबत जोगिया छेडणे'असो,'एकांतास आकाश मागणे असो,:जिवाच्या पाकळ्या','आसवांचे बोलणे' वगैरे वगैरेअप्रतिमच...ही गझल #मारवा रागाच्या आर्त स्वरात बांधली असून,मुर्छना पद्धतीचा वापर करून गझलेतील शब्दार्थ स्वरांद्वारे पोहचविण्याचा मी प्रयत्न केला आहे.या बंदिशीमधील मुर्छनांच्या जागा हेरून मिलिंद गुणे यांनी अप्रतिम संगीत संयोजन केल्यामुळे गझलेलतील आर्तता अधिक वाढली.आणि तीच आर्तता आपल्या गायनातून गायिका कल्पिता उपासनीने अत्यन्त समर्पकपणे गझलमध्ये उतरवली आहे,हे गझलमधील 'जोगिया' या शब्दावरील 'हरकत' ऐकल्यावर कळेलच.एकूणच आम्ही आमच्यातील जे जे चांगले ते ते 'तिळगुळ' म्हणून आपल्यासमोर ठेवले.आपले अभिप्राय अपेक्षित."ऐकत जावी मस्त गझलबोलत जावे गोड सरल..."-सुधाकर कदम●ध्वनिमुद्रण - पंचम स्टुडिओ,पुणे.#मराठी_गझल #marathi #gazal #composition #गझल#jyotiraobaliga #shevtihedukhamajhelagaleumlayala#selfcompoesdgazal #marathigazal #gazalgandharv #sudhakarkadam #sudhakarkadamghazal
Friday, January 20, 2023
जोगिया...
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment