मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)
अहो, आजकाल जे गझलकारांचं पीक आलंय (की तण माजलंय असं म्हणू..?) त्यांना गझल आणि गझलगायकीचा अभिन्न सम्बन्ध असतो हेच माहीत नाहीये.....! गेल्या हिवाळ्यात महाराष्ट्रात आलो असताना चुकून गझलच्या एका कार्यक्रमाला बसावं लागलं.... (तरन्नुम नव्हतीच, त्यामुळे त्या कार्यक्रमाला ’मुशायरा’ म्हणायची माझीतरी तयारी नाही.) आजूबाजूला बसलेले लोक काहीजणांच्या काव्यवाचनाला खुर्चीतून उसळून दाद देत होते. शेवटी एकानं न राहवून मला विचारलं की मी एकदम शान्त कसा बसलोय...? मी सांगितलं की जे काही ऐकू येतंय, त्यात शेर कुठेच नाहीयेत, हिन्दी फिल्लमचे डायलॉग असावेत तसं काहीतरी आहे हे.... आणि भलाभला संगीतकार शीर्षासन करून उभा राहिला तरी यातल्या ओळींना चाल लावू शकणार नाही..... आता यांना मी गझलेचे शेर कसे म्हणू आणि काय दाद देऊ...?आणि अशा वेळी कविवर्य भटांनी आपली प्रत्येक रचना आपल्याला गायला लावून एका अर्थाने गझल आणि गायकीचा अभिन्न सम्बन्ध लोकांसमोर ठेवला होता, तो सगळा इतिहास आठवतो............ असो.
या अगोदर माझ्या दोन लेखांमध्ये तोडी रागाचा उल्लेख आलेला आहे.त्यात "मिलकर जुदा हुए","तुम्हारे शहर
का मौसम" तसेच मधुरानीने गायिलेल्या "वो जो हममे तुममे क़रार था" या गझलांच्या बंदिशींवर,त्यातील वशिष्ठ्यांसह लिहिले होते.आज बशर नवाज़ साहेबांची "न इस तरह भी खयालों मे कोई बस जाए" या गझलच्या माझ्या बंदिशीबद्दल थोडे सांगावेसे वाटते आहे.या गझलची पहिली ओळ मंद्र सप्तकातील कोमल धैवतापासून सुरू होऊन मध्य सप्तकातील कोमल धैवतावर जाऊन वापस मंद्र सप्तकातील कोमल धैवतावर येऊन मंद्र सप्तकातील भरदार निषाद दाखवून षड्जावर स्थीर होते.दुसर्या ओळीतील "किसीकी याद आए" यातील हळवेपणा, मध्य सप्तकातील निषादावरून मींड्ने मंद्र सप्तकातील धैवतावर येऊन दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.अंतर्यामध्ये इतकी विविधता आहे...ती ऐकल्याशिवाय कळणार नाही.तेथे तोडी न
राहता,तोडीमध्ये नसलेला कोमल निषाद,शुद्ध गांधार इतक्या चपखलपणे येतो,की प्रत्येक शेर ऐकताना हे काय गौडबंगाल आहे ते मतल्यावर येईपर्यंत कळत
जन्म-१३/११/१९४९.
आद्य मराठी गझल गायक म्हणून सुरेश भट आणि संगीतकार यशवंत देव यांनी गौरविले.ज्या वेळी महाराष्ट्रात मराठी गझल गायनाचा कार्यक्रम कोणीच करीत नव्ह्ते तेव्हा गझल गायनाचा तीन तासाचा कार्यक्रम करीत होतो.महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर शेकडो वैयक्तिक कार्यक्रम केलेत. १९८० ते १९८३ या चार वर्षात सुरेश भट आणि मी,मराठी गझल गायकी लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून "अशी गावी मराठी गझल"हा कार्यक्रम करीत पदराला खार लावीत एस.टी.ने तर कधी रेल्वेने अक्षरशः महाराष्ट्रभर वणवणलो.या कार्यक्रमाचे निवेदन बहुतेक सुरेश भट करायचे तर कधी कधी सुरेशचंद्र नाडकर्णी करायचे.(आमच्या या मेहनतीचे फ़ळ सध्याचे गायक चाखत आहेत)
१९८३ मध्ये"भरारी"नामक मराठी गझल गायनाची पहिली वहिली ध्वनिफ़ित तयार केली. मराठी गझल गायकीतील भरीव कामगिरीबद्दल "Outstanding Young Person"(१९८३),"समाजगौरव"(१९९५),"संगीत भूषण"(१९९६),
"Man Of TheYear2001"(यु.एस.ए.),"कलादूत"(२००२),"कलावंत"(२००३),
"शान-ए-गज़ल"(२००५),"महाकवी संतश्री विष्णुदास पुरस्कार"(२००६)"गझल गंगेच्या तटावर..."(२००८),"सुरेश भट पुरस्कार" आणि,"गझल गंधर्व" उपाधी(२००९) वगैरे सन्मान मिळाले.अनेक
म्युझिक अल्बमचे संगीत दिग्दर्शन केले.सध्या नवोदित गायकांना मराठी गझल गायकीचे शिक्षण देत आहे.तसेच गझलकार,गायक,वादक यांनी दर महिन्याला एकत्र येण्याकरीता "गझलकट्टा" आयोजित करीत आहे.