गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Saturday, August 22, 2015

gazalgazal.blogspot.com/ मस्त !
गझल समजू इच्छिणारासाठी मोठा खजिना !  
  अहो, आजकाल जे गझलकारांचं पीक आलंय (की तण माजलंय असं म्हणू..?) त्यांना गझल आणि गझलगायकीचा अभिन्न सम्बन्ध असतो हेच माहीत नाहीये.....! गेल्या हिवाळ्यात महाराष्ट्रात आलो असताना चुकून गझलच्या एका कार्यक्रमाला बसावं लागलं.... (तरन्नुम नव्हतीच, त्यामुळे त्या कार्यक्रमाला ’मुशायरा’ म्हणायची माझीतरी तयारी नाही.) आजूबाजूला बसलेले लोक काहीजणांच्या काव्यवाचनाला खुर्चीतून उसळून दाद देत होते. शेवटी एकानं न राहवून मला विचारलं की मी एकदम शान्त कसा बसलोय...? मी सांगितलं की जे काही ऐकू येतंय, त्यात शेर कुठेच नाहीयेत, हिन्दी फिल्लमचे डायलॉग असावेत तसं काहीतरी आहे हे.... आणि भलाभला संगीतकार शीर्षासन करून उभा राहिला तरी यातल्या ओळींना चाल लावू शकणार नाही..... आता यांना मी गझलेचे शेर कसे म्हणू आणि काय दाद देऊ...?आणि अशा वेळी कविवर्य भटांनी आपली प्रत्येक रचना आपल्याला गायला लावून एका अर्थाने गझल आणि गायकीचा अभिन्न सम्बन्ध लोकांसमोर ठेवला होता, तो सगळा इतिहास आठवतो............ असो.

स्वामीजी निश्चलानन्द (हिमाचल प्रदेश)

No comments:





संगीत आणि साहित्य :