आयुष्यात आपली वाहवा व्हावी, सत्कार व्हावा, एखादा तरी पुरस्कार मिळावा असे प्रत्येकालाच वाटत असते, नुसतेच वाटत नसते तर प्रत्येकजण या सुखाकरीता आसुसलेला असतो, पण काही खास लोकांच्याच नशिबी हे सर्व प्रकार असतात त्याला आपण काय करू शकतो ?
मोठं-मोठे राजकारणी,कवी,साहित्यिक,
संशोधक,उद्योजक कुठेतरी वर्णी लागावी म्हणून राजकीय कोलांट उड्या घेवून डोंबाऱ्याचा खेळ करीत असल्याचे दिसून येते. माझा एक मित्र असाच कोल्हाट्याचा खेळ करण्यात प्रसिद्ध होता. कोणत्या तरी महामंडळाच्या अध्यक्षपदाचा सन्मान आपल्याला मिळावा माणून त्याने निळ्या टोपीचा आश्रय घेवून काँग्रेसशी अंग संग सुरू करून, दतितोद्धारक अशी प्रतिमा निर्माण करण्याकरीता अनेक सोंगे केली. पण दलित काही फसले नाही आणि एका निवडणुकीत आपला हातही दाखविला. तसेच काँग्रेसवाल्यांनीही धतुरा दाखविला, तरी पण काँग्रेसचे शासन असेपर्यंत त्याचे लांगुलचालन सुरुच होते. एवढेच नव्हे तर ज्या काँग्रेसी पुढाऱ्याला ते शिव्या द्यायचे त्यांच्याच घरी खरकटे सावडायचेही काम त्याने केले. काही दिवसांनी काँग्रेसचे राज्य जाऊन यूतीचे राज्य आले. तर या कवी मित्राने लगेच कोलांट उडी घेवून एकदम भगवी पताका खांद्यावर घेतली व सेना भवनाच्या वाऱ्या करून 'किर्तन' करणेही सुरू केले आणि बाळासाहेबांसमोर नतमस्तक होवून काँग्रेस पक्ष किती वाईट होता यावर साहित्य निर्मीतीही सुरू केली. हे सगळे कशासाठी तर मान सन्मान, अध्यक्षपद, सत्कार, पुरस्कार या 'आत्मिक' सुखासाठी! भगवे सरकारही याला पुर्णपणे ओळखून असल्यामुळे त्याची वर्णी कुठेच लागली नाही, त्यामुळे थोड्याच दिवसात हा 'वार'करी भगवी पताका उत्तरवून भगवी-हिरवी पताका खांद्यावर घेता झाला. पण हिरवे-भगवेही त्याला ओळखून असल्यामुळे हे घडले नाही. तर मंडळी पुरस्काराची लालसा माणसाला किती लाचार बनवते हे आपल्या लक्षात आलेच असेल.
आदर्श शिक्षकाचा पुरस्कार मिळावा असे मलाही खूप वाटत होते. पण त्याकरीता करावे लागणारे तांगुलचालन न जमल्यामुळे, जिल्हा समितीने निवड केल्यावरही मला टाळण्यात आले.दुसऱ्या वर्षी शिक्षणाधिकाऱ्याने पुनः नाव पुढे केले.तेव्हाही मला टाळल्या गेले.खोलात जाऊन चौकशी केल्यावर कळले की, आर्णीत शिवजयंती उत्सव सुरु केल्यामुळे लागतेल्या कलमांमुळे पुरस्कारापासून वंचित करण्यात आले आहे. आपल्याच महाराष्ट्रात छत्रपतींची जयंती साजरी केल्यामुळे आपल्यावरच कलमा लागू शकतात व त्यामुळे न्यायालयाचे खेटेही ध्यावे लागतात हे माहीत नव्हते.दुसरे असे की,किरकोळ कलमा लागल्यामुळे आपल्या देशात पुरस्कारापासून वंचित केल्या जावू शकते, पण ३०२ ते ४२० पर्यंतच्या कलमा लागलेली व्यक्ती मात्र आमदार, खासदार व मंत्री होवू शकते हे पाहून तर मला माझ्या शिक्षकी पेशाची लाज वाटून आपण शिवजयंती सारखे समाज विघातक काम करण्यापेक्षा खून, मारामाऱ्या, बलात्कार, जाळपोळ वगैरेसारखी 'राष्ट्रीय' कार्य केली नाही याचे वैषम्य वाटायला लागते.
यावरून शासकीय पुरस्कार मिळविणे ही ही एक कला आहे हे आम्हाला पटायला लागले. ज्याने काहीही न करता फक्त 'कलाबाजी' केली तो जिंकला, व जो नुसतेच कार्य करीत राहिला तो हरला। शासकीय पुरस्कार मिळविण्याकरीता समोरची व्यक्ती आदर्शच असली पाहिजे असे काही नाही. ती फक्त दर्शनीय असली तरी चालते. एकतर त्या व्यक्तीला राजकीय वजन हवे किंवा राजकीय वजन पेलण्याची क्षमता तरी हवी, तसेच लाळघोटेपणा हा ही दुसरा गुण त्याच्या रोमरोमात भिनलेला असायला पाहिजे. (हे दुसरे क्वालिफिकेशन' यात अतिशय महत्वाचे ठरते) अर्थात योग्य व्यक्तींना पुरस्कार मिळतच नाही असेही म्हणता येत नाही. कधी मधी चुकून माकून योग्य माणसालाही पुरस्कृत केल्या जाते. पण अशी उदाहरणे कमीच!
पुरस्कार मिळाल्यावरही कधी कधी काय गंमत घडते बघा. आर्णीला संगीत शिक्षक म्हणून कार्यरत असताना १९८६ मध्ये मला माझ्या मराठी गझल गायकीच्या क्षेत्रातील अतुल्य सांगीतिक योगदानाबद्दल नागपूरच्या मा. बा. गांधी चॅरिटेबल ट्रस्टने कै. मोतीलालजी बंग हा प्रतिष्ठेचा समजला जाणारा पुरस्कार (५००० रु.व शाल श्रीफळ आणि मानपत्र) जाहीर केला. पुरस्कार वितरणाचा नयनरम्य सोहळा आर्णीतच झाल्यामुळे पाहुणा व यजमान अशी दुहेरी भूमिका माझ्या वाट्याला आली, सरस्वती स्तवन, स्वागतगीत माझ्याच दिग्दर्शनाखाली सादर केल्या गेले. व थोड्याच वेळात पुरस्कार घ्यायलाही पुढे झालो. त्यामुळे आपल्या लग्नात आपणच बँड वाजवण्याचा जानंद काय असतो तो मला उपभोगायला मिळाला.
पुरस्कारामुळे माणसाचे मोठेपण वाढते की माणसामुळे पुरस्काराला मोठेपणा येतो है अजूनपर्यंत मला कळले नाही, कारणा काही सामान्य व्यक्ती पुरस्कारामुळे मोठ्या झाल्याचे व काही पुरस्कार व्यक्तीमुळे मोठे झाल्याचे मी पाहिले आहे. थोर समाजसेवकाला दंगली भडकवितांना पाहून, आदर्श शिक्षकाला मद्यपान करून गटारात लोळताना पाहून, गुणवंत कामगाराचे अवगुण पाहून, समाज गौरवाचा 'माज' पाहून, देशबंधूच्या देशविघातक कारवाया पाहून, हरिभक्त परायणाची स्त्री भक्ती पाहून, वनमित्राची आरामशीन पाहून, पर्यावरणवाद्यांचा (वृक्षमित्र) लाकडांचा धंदा पाहून, सर्वोदय वाद्याच्या अनेक खाजगी संस्था व जमवलेली माया पाहून, वेदशात्र संपन्नांचे बायाबापड्यांना नादी लावणे पाहून, व्यसनमुक्तीवाल्यांचे दारुकाम पाहून उपाध्या व पुरस्कार हे किती तकलादू असतात ते कळते. तरीपण त्याची ओढ मात्र कमी होत नाही.
---------------------------------------------------------------
दै.विदर्भ मतदार, अमरावती. रविवार दि.२०/९/२६