Monday, October 9, 2023
उत्कट भावनेची सर्वस्पर्शी कविता
राग-रंग (लेखांक २७) बिलावल
Saturday, October 7, 2023
आठवणीतील शब्द-स्वर....
Saturday, September 30, 2023
राग_रंग (लेखांक २६) राग पिलू.
झिंझोटी,खमाज,पहाडी सारखाच शास्त्रकारांनी पिलू रागालाही क्षुद्र प्रकृतीचा राग मानले आहे.खरे म्हणजे हा लोकसंगीताचा राग आहे.म्हणजेच शास्त्रीय रागाचे मूळ.पण मुळालाच हीन स्थान देण्याचे कारण काय तेच कळत नाही. कलेच्या विभिन्न शैलींमध्ये तसा काही भेद नसायला हवा.कला ही गुण विशेषतेने मोठी वा महान बनू शकते. म्हणून खरी श्रेष्ठता कलाकारालाच प्राप्त करावी लागते.पिलू राग समजायला मला कित्येक वर्षे लागली.कारण त्यात घेतल्या जाणाऱ्या विविध सुरावटी! पहाडी किंवा पिलू राग गाण्यासाठी खरंच तपश्चर्या करावी लागते.भूप,दुर्गा,तोडी वगैरे रागासारखं हे सरळसोट काम नाही.या रागाला (शास्त्रकार याला रागही मानत नाही.) पिलू हे नाव कसे पडले हे एक कोडेच आहे.प्राचीन ग्रंथांमध्येसुद्धा याचा उल्लेख नाही.ग्रामीण भागात गायीच्या बछड्याला,शेरडीच्या बछड्याला 'पिल्लू' म्हणायचे.पण या शब्दाचा व पिलू रागाचा काहीच संबंध नाही.कदाचित अनेक राग यातून दिसत असल्यामुळे किंवा दाखविता येत असल्यामुळे अनेक रागाचे पिल्लू म्हणजे तर पिलू राग नाही ना! असे काहीसे चमत्कारिक विचार डोक्याचे तरळून जातात.ते काही असो पण पिलू राग म्हणा किंवा धून म्हणा अतिशय गोड आहे.अनेक रागांचा छटा त्यात दाखविता येत असल्यामुळे पिलूची रंजकता वाढत जाते.या रागात ख्याल अभावानेच आढळतात.दादरा,ठुमरी,भक्तीगीत,नाट्यगीत, भावगीत,चित्रपट गीत,गझल यात हा छान रमतो.मध्यमाला षड्ज करून गायिल्या जाणाऱ्या रागांमधील पिलू हा राग अत्यंत लोकप्रिय आहे.भैरवी प्रमाणे यात बाराही स्वरांचा उपयोग ज्यांच्या त्यांच्या कुवतीप्रमाणे केल्या जाऊ शकतो.त्यामुळे वादकांमध्ये तर तो अधिकच प्रिय असल्याचे दिसून येते..अनेक जुन्या नव्या वादकांनी आपापल्या वाद्यांवर पिलू अतिशय समर्थपणे रंगविला आहे.पूर्वी दक्षिण भारतीय संगीतामध्ये पिलू रागाचे अस्तित्व दिसत नव्हते.पण आता मात्र जसे तिकडचे राग इकडे (उत्तर भारतात) स्वीकारल्या गेले तसे इकडचे राग पण तिकडे स्वीकारल्या गेलेत.त्यात पिलूही आहे.
आजची गायन शैली व प्राचीन गायन शैली,तसेच आजचे राग रूप व प्राचीन (काही रागाचे) राग रूप यामध्येही बऱ्याच मोठ्या प्रमाणात तफावत आहे,सामवेदतील संगीत वेगळे,खुसरो काळातील संगीत वेगळे, व आजचे संगीत वेगळे.राग जरी तेच असले तरी त्यांच्या मांडणीत पिढी दरपिढी बदल होत गेला.खुसरोच्या काळातील ख्याल गायकीचे स्वरूप आजच्या ख्याल
गायकीपेक्षा निश्चितच वेगळे असावे.आजची ख्यालगायकी अनेक वर्षातील वेगवेगळ्या संगीत तज्ज्ञाच्या व गायकांच्या त्यांच्या त्यांच्या कंठातील संस्कारातून तयार झाली आहे.घराणे कोणतेही असो राग मात्र तेच आहेत.बदल दिसतो तो फक्त गायकीत.
मला शोभा गुर्टूच्या 'होरी खेलन कैसे जाऊं' या ठुमरीतील आर्तनेने व्याकुळ केले होते.'नदिया किनारे मोरा गाव','तुम राधे बनो शाम','मोरे सैंय्या नहीं आये' वगैरेतून बरेच काही शिकायला मिळाले.बेगम अख्तरची 'सुध बिसराई' ठुमरी अप्रतिम आहे.यात नाना मुळेंनी तबला संगत व पुरुषोत्तम वालावलकरानी हार्मोनियम संगत केली आहे.अमानत अली व फतेह अली खान यांनी गायिलेली 'बिरहा की रैन' ठुमरी आनंददायी आहे.'शाम भई बिन शाम' उस्ताद राशीद खान,'गोरी तोरे नैन'आणि 'बरसन लागी' गुलाम अली, 'नथ,बेसर, बालम मंगवा दे' (दादरा) अजय चक्रवर्ती,'पिया बिदेस गयो रे' (ठुमरी) व्यंकटेश कुमार.वादकांमधील बहुतेक वादकांनी वाजविलेला पिलू,मिश्र पिलू मी ऐकला आहे.प्रत्येक वेळी तो वेगळाच वाटला. उस्ताद सख़ावत हुसेन खान साहेबांचा एक व्हीडिओ १९३६ मध्ये वाडिया फिल्म्स द्वारा निर्माण करण्यात आला.उस्ताद अली अकबर खान,उस्तादअमजद अली खान यांची कमाल त्यांच्या वादनातील हुकूमत,
विचार,नजर यातून दिसून येते.ताज्या दमाचा सरोद वादक सौमिक दत्त याने सरोदवर सादर केलेला पिलू पण कमाल आहे.शहनाई वादक उस्ताद बिस्मिल्ला खान यांच्या बद्दल मी पामराने काय बोलावे. खरेच पहाडी,पिलू,मांड असे, ज्याला धून म्हणून हिणवले जाते ते राग रंगवणे अत्यंत कौशल्याचे काम आहे.तेथे पाहिजे जातीचे... ऐऱ्या गैऱ्याचे ते काम नोहे!
काफी थाटातून निर्माण झालेला पिलू दिवसाच्या तिसऱ्या प्रहरी गावा, असं शास्त्रकारांनी लिहून ठेवलं आहे. मात्र या परिभाषेच्या पलीकडे जाऊन संगीतकाराची दृष्टी या रागाचा एक आगळावेगळा भावबंध शोधतात. क्वचित गहिरा भक्तिभाव, करुण, आर्त भाव, भजनातली तल्लीनता, समूहगानात एकरूप झालेला समर्पित भाव, यांसाठी या रागाचा आकृतिबंध त्यांना मोह घालतो. मग कधी स्पष्टपणे, तर कधी संमिश्र रूपात 'पिलू'चे स्वर तुमच्याभोवती अगदी परिचित असा संमोहनाचा मंत्र टाकतात.
● हिंदी चित्रपट गीते...
'प्रभुजी प्रभुजी तुम राखो लाज हमारी' कानन देवी.चित्रपट-हॉस्पिटल. 'काहे गुमान करे' के.एल.सैगल. चित्रपट-तानसेन.'पा लागू कर जोरी रे' लता.चित्रपट-आप की सेवा मे. 'मोरे सैंयाजी उत्तरेंगे पार' लता.चित्रपट-उडन खटोला. 'झुले मे पवन की आयी बहार' लता,रफी.
चित्रपट-बैजू बावरा. 'पी के घर आज दुल्हनिया चली' शमशाद बेगम.चित्रपट-मदर इंडिया. 'नैना काहे को लगाये' आशा भोसले.चित्रपट-जोर का गुलाम. 'जिंदगी ख्वाब है' मुकेश.चित्रपट-जागते रहो.'मुरली बैरन भई' लता.चित्रपट-न्यू दिल्ली. 'मैं सोया अखियां मीचे' आशा,रफी,चित्रपट-फागुन. 'कैसा जादू बलमा तुने' गीता दत्त.चित्रपट-12 0'clock. 'काली घटा छाये मोरा जिया लहराये' गीता दत्त.चित्रपट-सुजाता. 'सच कहती है दुनिया' लता.चित्रपट-इश्क पर जोर नहीं. 'बडी देर भई कब लोगे खबर' रफी.चित्रपट-बसंत बहार. 'सुर ना सजे क्या गाऊं मैं' मन्ना डे.चित्रपट-बसंत बहार. 'बावरी रे जीने का सहारा' लता.चित्रपट-एक फुल चार कांटे. 'तेरे प्यार का आसरा चाहता हूँ' लता,महेंद्र कपूर.चित्रपट-धूल का फूल.
'विकल मोरा मनवा' लता. चित्रपट-ममता. 'चंदन का पलना रेशम की डोरी' हेमंत कुमार.चित्रपट-शबाब. 'झुले मे पवन के आयी बहार' लता,रफी.चित्रपट-बैजू बावरा. 'अजहू न आये बालमा सावन बीता जाय' रफी,सुमन कल्याणपूर. चित्रपट-सांज और सवेरा. 'धीरे से आजा री अखियां में निंदिया' लता.चित्रपट-अलबेला. 'धड़कते दिल की तमन्ना हो मेरा प्यार हो तुम' सुरेय्या.चित्रपट-शमा.
ल 'चल चलीये दुनिया दी' नूरजहां,मेहदी हसन.पाकिस्तानी चित्रपट-दुनिया पैसे दी. 'कभी आर कभी पार' शमशाद बेगम.चित्रपट-आर पार. 'अब के बरस भेजो भैय्या को बाबुल' आशा भोसले.चित्रपट-बंदिनी. 'ढुंढो ढुंढो रे साजना ढुंढो' लता.चित्रपट-गंगा जमुना. 'मत मारो शाम पिचकारी' लता.चित्रपट-दुर्गेश नंदिनी. 'तीर ये चुपके' आशा भोसले. चित्रपट -फागुन. 'तेरे बिन सूने नैन हमारे'लता,रफी.
चित्रपट-मेरी सूरत तेरी आंखे. 'पिया पिया ना लागे मोरा जिया' आशा भोसले.चित्रपट-फागुन. 'धीरे से आजा रे निंदिया' लता.चित्रपट-अलबेला. 'बनवारी रे जिने का सहारा तेरा नाम रे' लता.एक फूल चार कांटे. 'तू जो मेरे सूर में गुनगूना ले' येसुदास,हेमलता.चित्रपट-चितचोर.
'परदेसीयों से ना अखियां मिलाना' रफी.चित्रपट-जब जब फुल खिले. 'अपनी कहो कुछ मेरी सुनो' लता, तलत महमूद.चित्रपट-परछाईं. 'तेरे बिन सूने नैन हमारे' रफी,लता.चित्रपट-मेरी सुरत तेरी आंखे.'न झटको जुल्फ से पानी' रफी.चित्रपट-शहनाई.'आज की रात बड़ी शौक बड़ी नटखट है' रफी.चित्रपट-नई उम्र की नई फसल.'अल्ला मेघ दे,पानी दे छाया दे. एस.डी. बर्मन. चित्रपट-गाईड.'बहारों ने मेरा चमन लूटकर' मुकेश.चित्रपट-देवर.'मैं सोया अंखियां मीचे' मोहम्मद रफ़ी और आशा भोंसले.चित्रपट -
'बरसो रे हये बैरी बदरवा बरसो रे' आशा भोसले. चित्रपट -
'छम छम घुंघरू बोले' आशा भोसले .चित्रपट-काजल.
'पिया पिया ना लागे मोरा जिया' आशा भोसले.
चित्रपट-फागुन. 'सून जा पुकार' आशा भोसले .चित्रपट-फागुन. 'बना दे प्रभुजी' मोहम्मद रफी आणि आशा भोसले. चित्रपट-फागुन. 'एक परदेसी मेरा दिल ले गया' मोहम्मद रफ़ी और आशा भोंसले.चित्रपट-फागुन. 'मैं ने शायद तुम्हे पहले भी कभी देखा है' रफी. चित्रपट-बरसात की रात. 'मेरी छोड़ दे कलाई' मोहम्मद रफ़ी और आशा भोंसले. चित्रपट-फागुन. 'न जाओ सैंय्या छुडा के बैंय्या' गीता दत्त.चित्रपट-साहिब बीबी और गुलाम.
'तुम रूठ के मत जाना' मोहम्मद रफ़ी और आशा भोंसले.चित्रपट-फागुन. 'है है रसिया तू बड़ा बेदर्दी' आशा भोसले.चित्रपट-दिल दिया दर्द लिया. 'कौन गली गयो शाम' परवीन सुलताना, चित्रपट-पाकिजा. 'दिन सारा गुजारा तोरे अंगना' लता,रफी. चित्रपट-जंगली. 'जाइये आप कहां जायेंगे' आशा.मेरे सनम. 'मेरा प्यार वो है के मरकर भी तुझ को' महेंद्र कपूर. चित्रपट-ये रात फिर न आयेगी.'नदिया किनारे' लता.चित्रपट-अभिमान. 'दे दे प्यार दे प्यार दे प्यार दे रे' किशोर कुमार.चित्रपट-शराबी.
'ये तो सच है के भगवान है' हरिहरन,प्रतिमा राव,घनश्याम वासवानी,संतोष तिवारी,रवींद्र रावल. 'मैं ने रंग ली आज चुनरिया' लता.चित्रपट-दुल्हन एक रात की. 'आज की रात बड़ी शौक़ बड़ी नटखट है' मोहम्मद रफ़ी और आशा भोंसले.चित्रपट-नयी उमर की नयी फसल.'देखती ही रहो आज दर्पण ना तुम' मुकेश.चित्रपट-नयी उमर की नयी फसल.-'इसको भी अपनाता चल' मोहम्मद रफ़ी.चित्रपट
-नयी उमर की नयी फसल. 'कारवां गुज़र गया' मोहम्मद रफी.चित्रपट-नयी उमर की नयी फसल.'मेरी सैंया गुलबिया का फूल: - सुमन कल्याणपुर और मीनू पुरूषोत्तम.-चित्रपट-नयी उमर की नयी फसल. 'ना मानू ना मानू' लता.गंगा जमुना. 'मेरा प्यार भी तू है' लता,मुकेश.-चित्रपट-साथी. 'शोख शोक आँखें' आशा भोसले.चित्रपट-फागुन. 'चेहरा है या चांद खिला है' किशोर कुमार.चित्रपट-सागर. 'तुम्हे दिल से चाहा था हम ने' मोहम्मद अजीज.चित्रपट-मीरा का मोहन.'आज सोचा तो आंसू भर आये' लता.हंसते जख्म.'गैरों पे करम अपनो पे सितम' लता.चित्रपट-आंखे.'तेरे इश्क का मुझ पे हुवा ये असर' आशा भोसले.चित्रपट-नागिन.बाबूल की दुवाये लेती जा' रफी.चित्रपट-नीलकमल. 'ऐ मालिक तेरे बंदे हम' लता,मन्ना डे. चित्रपट-दो आंखे बारह हाथ.(याचा अंतरा मालकंस रागात आहे) 'सावन के झुलों ने मुझको बुलाया' मोहम्मद अजीज.चित्रपट-निगाहें. 'देर से आना जल्दी जाना' अलका याज्ञिक,मनहर उधास.चित्रपट-खलनायक. 'सुरमई अखियों मे' येसुदास. चित्रपट-सदमा./'चुरा लिया है तुम ने जो दिल को' आशा,रफी.यादों की बारात.'ओ साथी रे तेरे बिना भी क्या जीना' किशोर कुमार. चित्रपट-मुकद्दर का सिकंदर.'मैनू इश्क दा लगिया रोग' अनुराधा पौडवाल.चित्रपट-दिल है के मानता नहीं. 'मोरे कान्हा जो आये पलट के' आरती अंकलीकर.सरदारी बेगम. 'घनन घनन' उदित नारायण, सुखविंदर सिंह, अलका याग्निक, शंकर महादेवन, शान, किशोरी गोवारिकर.चित्रपट-लगान. 'तुमको पाया है तो जैसे खोया हूँ' राज सोधा,सैयद अली.चित्रपट-ओम् शांती ओम्.
● नॉन फिल्मी...
'मैं खयाल हूँ किसी और का' -नुसरत फतेह अली खान.'जिन के होटों पे हंसी पाव मे छाले होंगे' -गुलाम अली. 'चिठ्ठी न कोई संदेस' नज्म-जगजीत सिंग.'चाहत देस से आनेवाले' -पंकज उधास. 'नई उमर की नये सितारों'- भूपिंदर सिंह'यह शुभ सुहाग की रात' - मन्ना डे
● मराठी...
'अरे वेड्या मना ' नाटक-शाकुंतल.
'कोण तुजसम सांग' नाटक- सौभद्र.
'परवशता पाश दैवे' नाटक-रणदुंदुभी.
'पावना वामना' नाटक- सौभद्र.
'मी अधना' नाटक-मानापमान.
'हरी मेरो जीवन प्राण अधार' नाटक-मंदारमाला.
'नच सुंदरी करू कोपा' नाटक-सौभद्र.
'तुमबिन मोरी कौन खबर ली' नाटक-अमृतसिद्धी.
'लाविते मी निरांजन' नाटक-वाहतो ही दुर्वांची जुडी.
'दे रे कान्हा चोळी लुगडी' लता.चित्रपट-पिंजरा.
'लावते मी निरांजन' -माणिक वर्मा.
'सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले' -सुमन कल्याणपूर.
'या इथे लक्ष्मणा' सुधीर फडके. गीत रामायण.
'सागरा प्राण तळमळला' -मंगेशकर भावंडं.
'माझे माहेर पंढरी' किशोरी आमोणकर.
'दिवस तुझे हे फुलायचे' -अरुण दाते.
__________________________________________
दैनिक उद्याचा मराठवाडा,'नक्षत्र' रविवार पुरवणी.दि. १ ऑक्टोंबर २०२३.
Saturday, September 23, 2023
राग रंग (लेखांक २५) देस राग
साहित्यसंगीतकला-विहीन:
साज्ञात् पशु-पुच्छविषाण हीन:
अर्थात:- साहित्य, संगीत आणि कला विहीन व्यक्ती शिंग आणि शेपटी विहीन पशू समान आहे.
देस राग खमाज थाटोत्पन्न राग आहे.खमाज थाटातील इतर रागांप्रमाणे हा ही अतिशय गोड राग आहे.शास्त्रकारांच्या दृष्टीने हा राग चंचल प्रकृतीचा आहे.(रागांची प्रकृती व
उच-नीचता ठरविणाऱ्याच्या बुद्धीचे कौतूक करावे वाटते).त्यामुळे या रागात अधिकतर छोटा ख्याल व ठुमरी वगैरे गायिल्या/वाजविल्या जाते.असे शास्त्रकार म्हणतात.वादी स्वर रिषभ असून संवादी स्वर पंचम आहे.याचा गानसमय रात्रीचा दुसरा प्रहर आहे.गानसमय ठरविण्याची पद्धत अशी:-
रागांचे उत्तरांग व पूर्वांग विभाजित करण्यासाठी सप्तकातील सात स्वरांसोबत तार सप्तकातील षड्ज स्वर घेऊन आठ स्वरांची योजना करून दोन भागात वाटतात. पहिला भाग षड्ज ते मध्यम पूर्वांग,पंचम ते तार षड्ज उत्तरांग.या प्रकारे जो राग दिवसाच्या पहिल्या भागात म्हणजे दिवसाचे १२ वाजल्यापासून रात्रीच्या १२ वाजेपर्यंत गायिल्या/वाजविल्या जाणारे राग,ते पूर्व राग.आणि जे राग रात्रीच्या १२ वाजेपासून दिवसाचे १२ वाजेपर्यंत गायिल्या/वाजविल्या जातात ते उत्तर राग.उत्तर भारतीय संगीतामध्ये ज्या रागांचा वादी स्वर सप्तकाच्या पूर्वांगात असेल ते राग दिवसाच्या पूर्वार्धात व ज्या रागांचा वादी स्वर सप्तकाच्या उत्तरांगात असेल ते राग दिवसाच्या उत्तरार्धात गायिल्या/वाजविल्या जायला हवे.असा नियम आहे.रागाचा वादी स्वर जर सप्तकाच्या पूर्वांगात असेल तर संवादी स्वर निश्चितच सप्तकाच्या उत्तरांगात असेल.याच प्रकारे वादी स्वर जर सप्तकाच्या उत्तरांगात असेल तर संवादी स्वर सप्तकाच्या पूर्वांगात असेल.
संगीताशी जोडलेलले स्वर,लय,भाव ह्या सर्व बाबी नैसर्गिक आहेत.निसर्गाशी जोडलेल्या आहेत.आपल्या हृदयाचे ठोके किती नियमित लयीत असतात ना! त्यात थोडा जरी फरक झाला तर काहीतरी बिघडल्याचे लक्षात येते.तसेच संगीताचे आहे.स्वर,ताल,लय बिघडली की गाणं बिघडतं.
या बिघडण्यावरून कॉलेजमध्ये असतानाचा एक किस्सा आठवला.संगीत कक्षात जवळ जवळ वीसेक मुला, मुलींना एकत्र शिकविल्या जायचे.आमच्या संगीताच्या प्राध्यापकांनी देस राग शिकवायला घेतला तेव्हाची ही गोष्ट आहे. देसचा छोटा ख्याल 'रब गुना गाय रे तू मना' चार-पाच तासिकांमध्ये संपला. त्यानंतर एक तराणा शिकवायला सुरवात केली.त्याचा अंतरा होता 'नादिर दानी तुंदीर दानी दानी तदारे दानी'. माझ्यासारखे बाल वयापासून संगीत शिकणारे काही, हा अंतरा व्यवस्थित म्हणायचे.कारण त्यांचा तो अगोदरच झालेला होता.पण दहावी नंतर कॉलेजमध्ये (त्यावेळी दहावी नंतर कॉलेजमध्ये प्रवेश मिळायचा.यातील प्रथम वर्षाला 'प्री युनिव्हर्सिटी' म्हणायचे) प्रथमच संगीत विषय घेणारे विद्यार्थी वरील तराणा म्हणताना 'तुंदिर'चे 'उंदीर' करून गायचे. ते असे :- नादिर दानी उंदीर दानी दानी तदारे दानी'. आणि मग वर्गात हलकीसी खसखस पिकायची.खसखस का पिकते हे शेवटपर्यंत प्राध्यापकांना कळले नाही.कारण हे सगळे 'उंदीर' शेवटच्या दोन रांगात बसायचे.असो!
युट्युबवर खालील कलाकारांनी गायीला/वाजविलेला देस राग विविध तालात आपण ऐकू शकता.गायन...'कारी घटा घिर आयी' उस्ताद बडे गुलाम अली खान.ताल-त्रिताल. 'पिया मत जा' उस्ताद मुबारक अली खान.ताल-झपताल. 'चितवन रोके ना रही'.पंडित जसराज,ताल-रूपक.'कारी घटा छा रही' किशोरी आमोणकर.ताल-दादरा. 'होरी खेलन को चल कन्हैय्या' मालिनी राजूरकर,ताल-त्रिताल.'नदिया बैरी भई' प्रसिध्द ठुमरी.'करम कर दीजे' उस्ताद राशीद खान.ताल-अध्दा त्रिताल. 'नादान बिछुवा' पं. राजन साजन मिश्र.ताल-त्रिताल. 'कारी घटा घिर आयी' पं. अजय चक्रवर्ती.
ताल-धिमा त्रिताल.'सखी,घन गरजत'पं. उल्हास कशाळकर.ताल-धिमा त्रिताल.'वाजत नगारे' शोभा मुद्गल.ताल त्रिताल.'आये अनोखे खिलाडी कान्हा होरी खेलहूँ न जाने' पौर्णिमा धुमाळ.ताल-अध्दा त्रिताल. 'येरी आओ रे आओ मंगल गाओ' महेश काळे.ताल-त्रिताल.'बाजे बधाईयां वे सैयां नंददे दरबार' गिरीधर गोपालजी. ताल-आडा चौताल.
वादन...पं. रवी शंकर-सतार. उस्ताद विलायत खान-सतार. उस्ताद अमजद अली खान-सरोद.पं. शिवकुमार शर्मा-संतूर.पं. हरिप्रसाद चौरसिया-बासरी.उस्ताद शाहीद परवेज-सतार.राकेश चौरसिया-बासरी.
● देस रागावर आधारित चित्रपट गीते...
'दुख के दिन अब बितत नाही' के.एल.सैगल.
चित्रपट-देवदास.संगीत-तिमिर बरन (१९३६)
'कदम चले आगे' के.एल.सैग.चित्रपट-भक्त सूरदास.संगीत-ग्यानदत्त (१९४२). 'मिलने का दिन आ गया' के.एल.सैगल,सुरेय्या.चित्रपट-
'दूर कोणी गाये' शमशाद बेगम , मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर.चित्रपट-बैजू बावरा.संगीत-नौशाद (१९५२)
'मेरे प्यार में तुझे क्या मिला' लता.चित्रपट-देश.संगीत-अनिल बिश्वास (१९५४).'सैंय्या जा जा मोसे ना बोलो काहे को नेहा लगाये' लता.चित्रपट-झनक झनक पायल बाजे. संगीत-वसंत देसाई (१९५५). 'ठंडी ठंडी सावन की फुहार' आशा भोसले.चित्रपट-जागते रहो.संगीत-सलील चौधरी (१९५६)
'बेकसी हद से जब गुजर जाये' आशा भोसले. चित्रपट-कल्पना. संगीत-ओ.पी.नैय नैय्यर. यात खमाज,देस असे मिश्रण आहे. (१९६०).
'पाडवे रागमयी' पी.सुशिला.चित्रपट-सीता राम कल्याणम् (कर्नाटक) संगीत-जी.नरसिंह राव (१९६१).
'हिया जरत रहत दिन रैन' मुकेश.चित्रपट-गोदान. संगीत-रवी शंकर (१९६३).
'हम तेरे प्यार में सारा आलम खो बैठे' लता. चित्रपट-दिल एक मंदिर.संगीत-शंकर जयकिशन (१९६३).
'मेरे प्यार में तुझे क्या मिला' लता.चित्रपट-मान.संगीत-अनिल बिस्वास (१९६४).
'गोरी तोरे नैना,नैनवा कजर बिन कारे' आशा,रफी.चित्रपट-मैं सुहागन हूँ.संगीत-लच्छीराम (१९६४).
'अजी रुठकर अब कहां जाईएगा' लता,रफी.चित्रपट-आरजू. संगीत-शंकर जयकिशन (१९६५).
'आपको प्यार छुपाने की बुरी आदत है' रफी,आशा.चित्रपट-नीला आकाश. संगीत-मदन मोहन (१९६५).
'माना मेरे हसीं सनम' रफी.चित्रपट-दी अडव्हेंचर ऑफ रॉबिनहूड.संगीत-जी.एस.कोहली (१९६५).
'फिर कहीं कोई फूल खिला' मन्ना डे. चित्रपट-अनुभव.संगीत-कनू रॉय (१९७१).
'आयी रुत सावन की' भुपेंद्र,फैयाज.चित्रपट-आलाप.सं
'सांवरे के रंग रांची' वाणी जयराम. चित्रपट. मीरा.संगीत-रवी शंकर (१९७९)
'केसरिया बालमा' लता.चित्रपट-लेकिन. संगीत-हृदयनाथ मंगेशकर (१९९१).
'दिल ने कहा चुप के से' कविता कृष्णमूर्ती.चित्रपट १९४२ लव्ह स्टोरी.संगीत-आर.डी. बर्मन (१९९३).
'तकदीर का फसाना जाकर किसे सुनाए' लता,रफी.चित्रपट-सेहरा. संगीत-रामलाल हिरापन्ना (१९६३)
मोरा सायं तो है परदेस' नुसरत फतेह अली खान.चित्रपट-डाकू रानी (१९९४).
'सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है' सोनू निगम. चित्रपट-द लिजेंड ऑफ भगतसिंग.संगीत-ए.आर.रहमान (२००२).
'अगर तुम साथ हो' अलका याज्ञिक,अरिजित सिंग.चित्रपट-तमाशा.संगीत-ए.आर.
● गैर फिल्मी...
'सखी बाजे पग पैजनी' गायक-पुरुषोत्तम दास जलोटा,अनूप जलोटा.
'चदरीया झिनी रे झिनी' कबीर भजन.गायक-अनूप जलोटा.
'हम तो है परदेस में देस में निकला होगा चांद' -जगजीत,चित्रा.
'वंदे मातरम्' लता.चित्रपट-आनंदमठ
रवींद्रनाथ टागोरांच्या बऱ्याचशा बंदिशी देस रागावर आधारित आहेत.
'बजे सरगम' दूरदर्शन चित्रपट.
● मराठी...
'भारती सृष्टीचे सौंदर्य खेळते दारीच सतत रूप आगळे' गायिका-वसंती. चित्रपट-कुंकू. संगीत-केशवराव भोळे (१९३७) .
'मधुकर वनवन फिरत गुंजारवाला' बाल गंधर्व. नाटक-विद्याहरण.
'रूपास भाळलो मी, भुललो तिच्या गुणाला' सुधीर फडके,आशा भोसले.चित्रपट-अवघाची संसार.संगीत-वसंत पवार.
'मन मंदिरा तेजाने' शिवम् महादेवन.चित्रपट-कट्यार काळजात घुसली.संगीत-शंकर,एहसान,लॉय.
__________________________________
दैनिक उद्याचा मराठवाडा,'नक्षत्र' पुरवणी, रविवार दि.२४.९.२०२३






