Sunday, April 21, 2013
Wednesday, April 17, 2013
Sunday, April 14, 2013
Tuesday, April 9, 2013
मी सहसा कोणत्याही संमेलनास जात नाही.पण माझा (एक उनाड) विद्यार्थी संजय सिंगलवार याने आयोजित केलेल्या देखण्या अशा, महाराष्ट्र वृत्तपत्र लेखक असोशिएशनच्या चौथ्या राज्य स्तरीय शब्द साहित्य सम्मेलनाचा (अलिबाग) आस्वाद घेऊन नुकताच परतलो...फेसबुकवरील मित्र-मैत्रीणींच्या सहवासाचाआनंद,साहित्य, चित्रकला,कविसम्मेलन,मुशायरा,चर ्चा,मुलाखत,गप्पा,एकांकिका अशा अनेक विधांचा आनंद घेऊन एका कौटुंबिक वातावरणातून एकदम बाहेर निघणे थॊडे त्रासदायक झाले...पण पुन्हा लवकरच भेटण्याची आश्वासने मिळत गेल्याने सर्वजण स्वतःला सावरत,येते झाले.
Tuesday, April 2, 2013
"गझलोत्सवप्रतिष्ठानम्"
स्थापून ’प्रतिष्ठाना’, करतात सावकारी
भरवून ’उत्सवाला’, देतात ते ’सुपारी’
दरसाल भरविती हे ’साहित्य सेल’ मोठे
करण्यास नवकवींची पिळणूक छान सारी
लाचार पंडितांना फिरवोनिया सभोती
खंजीर खुपसती ते हळुवार,भर दुपारी
तळमळ कुठे दिसे ना काळीज भेदणारी
तरिही ’अम्ही स्वयंभू’ बोंबा खुशाल मारी
याने असे करावे,त्याने तसे करावे
जो ना करेल त्यांच्या हातात ये ’तुतारी’
संभाविताप्रमाणे देऊन उपाध्या ’त्या’
घेण्यास मस्त बदला करतात साठमारी
तोंडास ना कुणाच्या धरबंध राहिलेला
याची नजर विखारी,त्याचे विचार भारी
’कट्टा’च जो गझलचा,म्हणवोनि ’गझलरंग’
’यू ट्यूब’ वरिल शिर्षक चोरून डींग मारी
(’गझलरंग’ हे यू ट्यूब वरील एका
जुन्या लोकप्रिय ’चॅनल’चे नाव आहे.)
अनुदान शासनाचे पाडून घेत पदरी
गझलेस देत आहे ते नवनवी उभारी
सुधाकर कदम
माझ्या निवेदनासह...’काट्यांची मखमल...’
गायक-आदित्य फडके (शिष्य)
कवी-दिलीप पांढरपट्टे
संगीत-सुधाकर कदम
सारंगी-उ.लियाकत अली खान
तबला-आशिष झा
साइड र्हिदम-निषाद कदम
दूरदर्शन कार्यक्रम १३.१.१३
Subscribe to:
Posts (Atom)










