गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Friday, August 7, 2026

तू कवितेतून हरवता...

 


शिल्पा देशपांडे ची एक "युगल गझल"...रसिका जानोरकर व मयूर महाजनच्या आवाजात.

                (●Headphone please)

तू कवितेतून हरवता एकाकी होते अक्षर 

सुरवंट समाधी घेतो कोषात अडकते उत्तर 


केव्हाच्या साजणवेळा क्षितिजावर तिष्ठत बसल्या 

तू रुसल्यावर माझ्याशी हे घडते नाट्य निरंतर 


पारोशा तुजविण वेळा क्षण कळण्याआधी विरती 

डोळ्यांशी लढण्यासाठी अश्रूही होती तत्पर 


तू घरटे सोडुन जाता भिंतींना हसती  दारे 

खिडकीच्या काचेवरती बस एकांताची  टक्कर 


गायक - मयूर महाजन, रसिका जानोरकर 

गझलकार - शिल्पा देशपांडे 

संगीत - गझलगंधर्व सुधाकर कदम  


Live- Sanskruti Arts Festval,  Thane 2015



Wednesday, August 5, 2026

आनंदगाणे


 

माझी शब्द-स्वरसंपदा (भाग १)



 .                      #जगत_मी_आलो_असा 

                             (लेखांक ४०)

.                      #माझी_शब्द_स्वरसंपदा 


       आजमितीस माझ्या नावावर लेखक/कवी म्हणून ’फडे मधुर खावया…’ (स्फूट लेख), ’सरगम’ (स्वरलिपी), ’मीच आहे फक्त येथे पारसा' व 'काळोखाच्या_तपोवनातून' (काव्य संग्रह) 

अशी चार पुस्तके,तसेच ’भरारी’ (मराठी गझल गायनाची महाराष्ट्रातील पहिली कॅसेट), 'अर्चना’ भक्तिगीते (टी सिरीज)', 'खूप मजा करू’ बालगीते (फाऊंटॆन म्युझिक कं), ’ काट्यांची मखमल’ मराठी गझल (युनिव्हर्सल म्युझिक कं), ’ तुझ्यासाठीच मी...’ मराठी गझल ( युनिव्हर्सल म्युझिक कं), काट्यास फूल आले','रे मना!' ह्या कॅसेट्स सीडीज सोबतच खाली दिलेली शेकडो गीते-गझला spotify, gana.com, youtube युट्युब,स्पॉटिफाय व इतर ऑडिओ प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध आहेत.

        मी स्वरबद्ध केलेला  हनीफ़ साग़र,बशर नवाज़ यांच्या उर्दू गझलांचा तीन तासाचा कार्यक्रम विविध गायक गायिका करीत असून. सुरेश वाडकरांपासून पं.शौनक अभिषेकी,

अनुराधा मराठे, वैशाली माडे, वैशाली सामंत,पद्मा सुरेश वाडकर,नेहा दाउदखाने, रसिका जानोरकर, मयूर महाजन,अनन्या सुरेश वाडकर, गाथा जाधव, गायत्री गायकवाड गुल्हाने, प्राजक्ता सावरकर शिंदे, कल्पिता उपासनी,डॉ.सुशील देशपांडे,आदित्य फडके, रफ़िक शेख, वैशाली पुल्लीवार, अविनाश जोशी, सचिन डाखोरे,मोहन भिवरकर सोबतच लहान बंधू शांत कदम व मुली भैरवी,रेणू पर्यंत गुणी गायक- गायकांनी मी स्वरबद्ध केलेल्या रचना गायिल्या आहेत.

       यात मराठीतील कुसुमाग्रज,सुरेशभट,ग.दि.मा.,विंदा करंदीकर,बाबा आमटे,बा.भ.बोरकर,यशवंत देव,मंगेश पाडगावकर,गंगाधर महांबरे,पद्मा गोळे,इंदिरा संत,वसंत भापट,बालकवी,शांता शेळके,सरिता पत्की,शंकर वैद्य,वंदना विटणकर,उ.रा.गिरी,ग्रेस,श्रीकृष्ण राऊर,इलाही जमादार,शिवा राऊत,आशा पांडॆ,श्रद्धा पराते,दिलीप पांढरपट्टे,अनिल कांबळे,संगीता जोषी,म.भा.चव्हाण.रमण रणदिवे,सदानंद डबीर,नारायण कुळकर्णी कवठेकर,शिवाजी जवरे,ललित सोनोने,शंकर बडे,गौतम सुत्रावे,अरूण सांगोळे,बबन सराडकर,शरद पिदडी,नीलकृष्ण देशपांडे,'मलंग',प्रथमेश गिरीधारी, सुनीती लिमये,आनंद रघुनाथ,कलीम खान,गजेश तोंडरे,अनंत ढवळे,चित्तरंजन भट,दीपक करंदीकर,मनोहर रणपिसे,घनशाम धेंडॆ,ए.के.शेख,गंगाधर मुटे,बदिउज्जमा 

बिराजदार,समीर चव्हाण ,जोत्स्ना राजपूत,प्रमोद खराडॆ,

जनार्दन म्हात्रे,महेंद्र राजगुडे,विशाल राजगुरू,जयदीप जोशी,शिल्पा देशपांडे,गजानन मिटके,मीरा सिरसमकर,

रविप्रकाश चापके,ज्योती बालिगा,किरण पिंपळशेंडे,चंदना सोमाणी, संदीप गावंडे,धुमाळ पिता-पुत्र,राज यावलीकर,

रामदास चवरे व दस्तुरखुद्द माझा समावेश आहे.

       तसेच उर्दू-हिंदीतील डॉ राही मासूम रजा, हनुमंत नायडू, शॆरजंग गर्ग, प्रेमनाथ कक्कर, शंकर दीक्षित, श.न.तरन्नुम, बलबीरसिंह रंग, ’राग’ कानपुरी, मोहन वर्मा ’साहिल’, प्रभा ठाकूर, मयंक अकबराबादी, समद रजा, ’शेरी’ भोपाली, ’बेताब’ अलिपुरी, इंदू कौशिक, अशोक अंजूम, सैफुद्दीन सैफ, सुरेश्चंद्र वर्मा, ’निजाम’ रामपुरी, गोवर्धन भारती, विनू महेंद्र, प्यारेलाल श्रीमाल, ’सरसपंडित’ कमलप्रसाद (कँवल), बशर नवाज,हनीफ सागर,कलीम खान,दिलीप पांढरपट्टे,समीर चव्हाण,सहदेव रामटेके या कवी गझलकारांचा समावेश आहे.जुन्या पिढीतील मान्यवर ज्येष्ठांपासून आजच्या नवोदितांपर्यंत अनेक मराठी आणि उर्दू कवी गझलकारांच्या रचना स्वरबद्ध केल्या आहेत.


.                 ■ युट्यूबवरर उपलब्ध असलेल्या रचना


■ मराठी गझल

१.कुठलेच फूल आता -सुरेश भट

२.दिवस है जाती कसे -      "

३.झिंगतो मी कळेना-         "

४.जगत मी आलो असा की- "

५.ही कहाणी तुझ्याच न्हाण्याची-"

६.सुखाच्या सावल्या साऱ्या- "

७.हे तुझे अशा वेळी लाजणे-  "

८.ही न मंजूर वाटचाल-        "

९.आले रडू तरीही कोणी रडू नये-"

१०.लोपला चंद्रमा- श्रीकृष्ण राउत

११.दुःख माझे देव झाले-   "

१२.काट्यांची मखमल होते-दिलीप पांढरपट्टे

१३.दूर गेल्या फुलातल्या वाटा-         "

१४.जीवनाचा खेळ रंगाया हवा-        "

१५.गाऊ नये कुणीही-                     "

१६.घाव ओला जरासा होता-            "

१७.हसू उमटले दुःख भोगता-           "

१८.कळेना कसा हा जगावेगळा-       "

१९.मी सुखाचे गाव शोधत राहिलो-    "

२०.तराणे-                                     "

२१.येता येता गेला पाऊस-                "

२२.किती सावरावे-                          "

२३.उशीर झाला तुला यायला-इलाही जमादार

२४.जीव लावावा असे कोणीच नही-संगीता जोशी

२५.लोक आता बोलवाया लागले-अनिल कांबळे

२६.मी करू सारखा विचार किती-        "

२७.फुलातला प्रवास दे-ललित सोनोने

२८.मस्तीत गीत गा रे-नारायण कुलकर्णी कवठेकर

२९.पियानो-उ.रा.गिरी

३०.जरा सांजता याद येतेस तू-ए.के.शेख

३१.कसे ओठांवरी गाणे-दीपक करंदीकर

३२.शब्द दंगा घालती रक्तात माझ्या-चित्तरंजन भट

३३.एक प्रार्थना ओठांमधुनी-अनंत ढवळे

३४रानात पाखरांची-म.भा.चव्हाण

३५.दुःख विसरून गायचे होते-अनंत ढवळे

३६.अद्याप सारे आठवे-प्रमोद खराडे

३७गझल चांदण्यांची-समीर चव्हाण

३८.कापली नाहीत अजूनी-जनार्दन म्हात्रे

३९.असे कसे तुझ्याविना-ज्योत्स्ना राजपूत

४०.मनातले तुझे मला-विशाल राजगुरु

४१.तू कवितेतून हरवता-शिल्पा देशपांडे

४२.श्यामरंगी रंगताना-मीनाक्षी गोरंटीवार

४३.नाव आता तिचे तू विचारू नको-श्रीकृष्ण राऊत

४४.चंद्र आता मावळाया लागला-सुरेश भट

४५.हे तुझे आभासवाणे-गजानन मिटके

४६.आसवांनी मी मला भिजवू कशाला-सुरेश भट

४७.रंग माझा वेगळा-सुरेश भट

४८.मज झुकता आले नाही-सदानंद डबीर

४९.तुझ्या रूपाचा गुलाब ताजा-म.भा. चव्हाण

५०.जायचेच ना निघून जा-सतीश डुंबरे

५१.तुजपाशी मज टाळायाचे लाख बहाणे होते-सुरेश भट

५२.भास आभासावरी मन-रविप्रकाश चापके

५३.जळलो धुपापरी मी-             "      

५४.जो तो दिसावयाला दिसतो सुखात आहे-     "

५५.मला आठवे ना तुला भेटल्याचे-        "

५६.प्रतिक्षा प्रार्थना झाली-             "

५७.माझी गझल गुलाबो-              "

५८.असे पत्र आता तुला मी लिहावे-            "

५९काट्यास फूल आले-रविप्रकाश चापके

६०.जीवना सांभाळतो मी-सुधाकर कदम

६१.आसवांनी मी मला-सुरेश भट

६२.चंद्र आता मावळाया लागला-सुरेश भट

६३. शेवटी हे दुःख माझे-ज्योती बालिगा

६५. मज सांग आज तुझ्याकडे-ज्योती बालिगा

६६. जेव्हा मला कळे ना-संदीप गावंडे

६७. लिहावे किती मीच माझ्या मनावर-किरण पिंपळशेंडे

६७. शब्दांनाही सूर भेटता मिठीत हरखे गाणे-चंदना सोमाणी

६८. वेदनेचा सूर देउन काळजाला-सुधाकर कदम

६९. हसून वा रडूनिया तुझे तुला जगायचे-   "

७०. सोसण्याचा सूर करणे ज्यास जमले-   "

७१. विसरून वेदनांना मज गायचेच आहे-  "

७२. ये न ये असे कधी चांदणे पुन्हा पुन्हा-ज्योती बालिगा

७३. तू दिलेले दुःख आहे प्राण माझा-राज यावलीकर

७४. काही न बोलण्याची राखून रीत आले-ज्योती बालिगा

७५. जे जे घडावयाचे ते ते घडून गेले-सुधाकर कदम

७६. काय होते या मनाला सांजवेळी-सुधाकर कदम

७७. बावरे होउन कुणाला शोधती डोळे-बबन धुमाळ

७८. जसा हात हातात धरला प्रिये-प्रसन्नकुमार धुमाळ 

७९. स्मरायचे तुला किती-विजयालक्ष्मी वानखेडे

८०. इथेही तिथेही तुझा भास होतो-       "

८१.भीमाच्या गजाली-                         "    

८२. किती रुंजी तरी तिथल्या तिथे घालत रहावे-समीर चव्हाण

८३.अवखळ मन हे ऐकत नाही- सुधाकर कदम

८४. दुःखाशी नाते जडता जडता जडते-मनोहर रणपिसे

८५.या नवा सूर्य आणू चला यार हो-सुरेश भट

८६. हा असा चंद्र अशी रात-                 "

८७.संपली अजुनी कुठे ही रात सजणा- अनिल कांबळे

८८.एकटीच मी निवांत भैरवी बसेन गात-

८९. मला सोसवेना दुरावा तुझा-ज्योती बालिग

९०.उदंड ओसंडुनी कधी वावरता आले- शिवाजी जवरे

९१.रात गेली निघून पाऱ्याची- सुरेश भट

क्रमशः

●मराठी गीते व उर्दू गझल पुढील अंकी...

---------------------------------------------------------------------

दैनिक विदर्भ मतदार,अमरावयी.रविवार दि.१ ऑगष्ट २०२६

भारतीय नागरिक


 

सुधाकरी तोडी

 


      युट्युब आणि इतर सर्व ऑडिओ चॅनल्सवर प्रसिद्ध झालेल्या  #काट्यास_फूल_आले  या गझलकार रविप्रकाश चापके यांच्या अलबम मधील 'माझी गझल गुलाबो' ही गझल मी नव्याने संशोधित केलेल्या सुरावटीत कंपोज केली असून या सुरावटीचे नामकरण बिलासखानी तोडीच्या धर्तीवर '#सुधाकरी_तोडी' असे केले आहे.अशी सुरावट भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये अजूनपर्यंत तरी कुठेच उल्लेखलेली नाही.उत्तर प्रदेशातील 'हाथरस' येथून प्रकाशित झालेल्या #राग_कोष या ग्रंथात  ५०० रागांची माहिती दिली आहे.पण या सुरावटीचा कुठलाही राग त्यात नाही.एवढेच नव्हे तर पंडित भातखंडे यांच्याही सर्व ग्रंथात असली सुरावट मला आढळली नाही. सुरावट अशी आहे...षड्ज, कोमल रिषभ, कोमल गांधार, पंचम, कोमल निषाद... मध्यम व धैवत वर्ज.

      तर,अशा या सुरावटीतील ही गझल संपूर्ण गायकी अंगाने गायक मयूर महाजन यांनी गायिली आहे.तरी आनंद घ्यावा, ही विनंती. (चांगले तुमचे,वांगले आमचे.)


सारंगी - उस्ताद लियाकतअली खान

#ustad_liyakat_ali_khan

तबला - पांडुरंग पवार #pandurang_pawar

बासरी - संदीप कुलकर्णी #sandip_kulkarni

संगीत संयोजन - मिलिंद गुणे #milind_gune

ध्वनीमुद्रण - 'डॉट वेव्ह' स्टुडिओ,पुणे.

मास्टरिंग - मुकुंद फडकुले,एल्कॉम स्टुडिओ,पुणे.

#mukund_phadkule

●आपल्या आवडी-निवडीनुसार प्रतिक्रिया अपेक्षित...धन्यवाद!

●Headphone please



Thursday, July 30, 2026

रे मना !

 

रे मना! तुज काय झाले सांग ना

का असा छळतो जिवाला सांग ना


हारण्याचीही मजा घे एकदा

जिंकुनी तुज काय मिळते सांग ना


हासुनी हसवायचा हा मंत्र घे

दुःख का कुरवाळतो तू सांग ना


सूर लावुन गुणगुणावे गीत हे

ते नि तू का वेगळा रे सांग ना

             ●●●

     मुंबईच्या डॉ.राम पंडितांसारख्या अनेक विद्वान व  रसिक मित्रांनी माझ्या कविता स्वतः स्वरबद्ध करण्याविषयी आग्रह केल्यामुळे अनेक वर्षांनंतर #रे_मना! हा अल्बम तयार झाला.यातील गीत-गझलांना विविध वाद्यांच्या सहाय्याने साजेसे संगीत नियोजन मिलिंद गुणे यांनी केले.यातच मिलिंदच्या आग्रहावरून ग्रूप व्हायोलिन्सचा प्रथमच प्रयोग केला.हा अल्बम युट्युब, स्पॉटिफाय सारख्या जगातील सर्व ऑडिओ प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध असून, त्याला हजारो रसिकांनी आपली पसंती दिली आहे. .त्यातीलच मयुर महाजनने गायिलेले 'रे मना!' हे अतिशय सुंदर असे शीर्षक गीत सादर करीत आहे.या रचनेचा बेस तसा 'बिलासखानी तोडी' हा राग आहे.पण सुगम संगीतामध्ये गीताला अधिक आकर्षक करण्या करीता वेगवेगळ्या सुरावटींचा प्रयोग करून त्याचा गोडवा वाढविल्या जातो.तसेच काहीसे यात केल्या गेले आहे.मुळात ही बंदिश अनेक वर्षांच्या चिंतनानंतर आलेली असल्यामुळे 'दिल को सुकून देनेवाली है' असे मला वाटते..यातील अभिषेक बोरकर यांचे सरोद तर अफलातूनच आहे.आपण ऐका व आनंद घ्या! आवडल्यास प्रतिक्रिया द्या!



Wednesday, July 29, 2026

इतना मुझे चाहा करो ना...उर्दू ग़ज़ल

जनसंमोहिनी  राग पर आधारित यह उर्दू ग़ज़ल आपको ज़रूर पसंद आएगी। इस बंदिशी की विशेषता है छंदों में उच्च स्वरों का प्रयोग। इसे सुनिए...


इतना मुझे चाहा करो ना, इस के मैं क़ाबिल नही

मुझ सा कोई संगदिल न हो, तुम सा कोई बिसमिल नही


अपनी जगह तुम हो सही, अपनी जगह मैं ठीक हूँ

शिकावे-गिले जायज़ मगर,शिकवो से कुछ हासिल नही


चलना ही है ज़िंदादिली चलते रहो चलते रहो

मंज़िल सबब रुकने का ले,बेशक वो ज़िंदादिल नही


मौजे तमन्ना थाम ले कब तक कहाँ तक ऐ 'समीर'

दिल का समंदर है अजीब,इस का कोई साहिल नही

                              ●●●

कलावती और जनसंमोहिनी रागों के बारे में संक्षिप्त जानकारी।

कलावती और जनसंमोहिनी राग इतने मिलते-जुलते हैं कि आम आदमी के लिए इनमें अंतर करना मुश्किल है! दोनों राग बहुत मधुर हैं। ये दोनों राग दक्षिण भारतीय संगीत प्रणाली (कर्नाटक संगीत) से हैं। अपनी मधुरता के कारण ही ये उत्तर भारतीय संगीत प्रणाली में भी लोकप्रिय हुए। इनका थाट खमाज है और निषाद को छोड़कर बाकी सभी स्वर शुद्ध हैं। कलावती राग में ऋषभ नहीं होता। कलावती राग में ऋषभ का प्रयोग करने पर जनसंमोहिनी राग बनता है। इसमें ऋषभ का प्रयोग कल्याण अंग के साथ किया जाता है। जनसंमोहिनी राग का मूल नाम 'शिव कल्याण' भी कहा जाता है।

'कोई सागर दिल को बहलाता नहीं' - यह गाना फिल्म 'दिल दिया दर्द लिया' से है, जिसने मेरे ऑर्केस्ट्रा में रहने के दौरान अपार लोकप्रियता हासिल की। ​​मैं इसे अपने घर के संगीत कार्यक्रमों में गाया करता था। अगर मेरे सामने युवा लड़कियां होतीं, तो मैं इसे बड़े जोश से गाता था। तभी मुझे बुनियादी जानकारी मिली कि यह गाना कलावती राग में है। मुझे बहुत बाद में पता चला कि इस में जनसंमोहिनी राग भी है। इसके बाद, फिल्म 'मुंबईचा जवाई' से रामदास कामत द्वारा गाया गया गाना 'प्रथम तुज पाहता, जीव वेडावला' हम (उस समय के) युवाओं को दीवाना बना दिया था। कई वर्षों तक, मैं इन दोनों गानों को  घर के संगीत कार्यक्रमों में गाता रहा। लेकिन कलावती का असली अर्थ प्रभा अत्रे की 'तन मन धन तो पे वारू' इस बंदिश से। एकताल राग की यह रचना बारहवें छंद से शुरू होती है। सम के ऊपर का 'न' श्रोता को मंत्रमुग्ध कर देता है।उपरोक्त रचना श्रोता को मंत्रमुग्ध कर देती है। उनकी गायन शैली और गीतों से निकलने वाली मधुरता बेहद आकर्षक है। आज भी यह गीत युवा लगता है। इसके अलावा, डॉ. वसंतराव देशपांडे द्वारा गायी गई झपतालकी बंदिश 'ये हो कहे' भी मेरी पसंदीदा थी, क्योंकि यह बहुत ही सुरीली थी।

Monday, July 27, 2026

वेदनेचा सूर...

 


पंडित जसराजजींनी गायिलेल्या राग 'बागेश्री कानडा'

 रागावर आधारित गझल...

वेदनेचा सूर देउन काळजाला

लाविले आयुष्य मी माझे पणाला


गात जातो गोडवे जो तो स्वतःचे

झेलले ज्याने कधी ना वादळाला


न्याय,नीती,रीत आता वेगळी रे

नेमका अंदाज ना ये आपणाला


का दुरावा आपल्या दोघात आला

काय द्यावी करणे या कारणाला


माझिया ओठास जेव्हा स्पर्श केला

पौर्णिमेचे चांदणे आले उशाला


गायक - मयूर महाजन

शब्द आणि संगीत - गझलगंधर्व सुधाकर कदम

संगीत संयोजन - मिलिंद गुणे

ध्वनिमुद्रण - पंचम स्टुडिओ,पुणे.



गझलेचं गाणं होताना....

           एखादी साहित्यकृती एखाद्या रचनाकाराने निर्मिलेली जरी असली तरी ती रचना त्याची रहात नाही. त्या रचनेवर  रसिक श्रोते, प्रेक्षकांचा हक्क व्हायला लागतो. त्या साहित्यकृतीत रसिक श्रोते, प्रेक्षक इतके समरसून जातात, की त्यांना स्वतःचंही भान रहात नाही. ते त्या रचनेमध्ये गुंतून जातात, ती रचना त्यांच्या आयुष्याचा भाग बनते. 

            आता गझलेचंच बघा ना! कित्येक रसिकांना काही गझला जणूकाही आपल्यासाठीच बनल्यात अस वाटत. प्रत्येक श्रोत्याला ह्या गझला आपल्याशा वाटतात.

निदा फाजलींची "होशवालो को खबर क्या बेखुदी क्या चीज है" जावेद अख्तरांची "तुमको देखा तो ये ख्याल आया"सुरेश भटांची "सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे""भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले"इलाही जमादारांची "अंदाज आरशाचा वाटे खरा असावा" अशी बरीच उदाहरणे देता येतील. 

            अगदी तशीच दिलीप पांढरपट्टेनी शब्दबद्ध केलेली, सुधाकर कदम यांनी संगीत स्वरबद्ध केलेली आणि सुरेश वाडकर, वैशाली भैसने माडे यांनी गायिलेली  अप्रतिम गझल 

"#तू_हासलीस_की_सगळ्या_काट्यांची_मखमल_होते". 

     ही गझल रसिक श्रोत्यांची झाली, या गझलेने कित्येकांच्या हृदयावर अधिराज्य केलं. मला ह्या गझलेचं वेड लागलं ते माझा मित्र विद्यासागर कोळीमुळे.  अभ्यासाच्या मधल्या break मध्ये आमच्या शेती, छंद, गाणं, आरोग्य, मित्रमैत्रिणीबाबत चर्चा व्हायच्या. त्यावेळी तो, सुधाकर कदम काका, भैरवी कदम, रेणू चव्हाण यांच्या आठवणी नेहमी सांगायचा. ही गझल त्यानेच मला ऐकवली. आणि मी सहजच गझलकार पाहिले तर ते होते दिलीप पांढरपट्टे. पांढरपट्टे साहेब आमच्या जिल्ह्यात उपजिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी होते. परंतु त्यावेळी गझलेची जाण नसल्यामुळे त्याना फारस ऐकता आल नाही पण ज्यावेळी ही गझल ऐकली आणि या गझलेच्या प्रेमात पडलो. नव्हे, ह्या गझलेच वैशिष्ट्यच अस की ती प्रत्येकाला नक्कीच प्रेमात पडायला भाग पाडते. तुम्ही नक्की ऐका....

दिलीप पांढरपट्टे सरांची गझल "तू हासलीस की सगळ्या #काट्यांची_मखमल होते"

-राजेश देवरुखकर

---------------------------------------------------------------------

● मराठी गझलच्या इतिहासातील पहिली #युगल_गझल  

#सुरेश_वाडकर  आणि #वैशाली_माडे  यांच्या आवाजात...


तू हासलीस की सगळ्या काट्यांची मखमल होते

तू भेटतेस तेव्हा या खडकांची हिरवळ होते


एकाच तुझ्या स्पर्शाने मन फुलते चंचल होते

ते दान तुझे घेताना देहाची ओंजळ होते


तू येत रहा रे दुःखा आता न दुष्मनी माझी

तू भेटलास की माझे गुणगुणणे अवखळ होते


येताच तुझा सांगावा येतात फुले अन गाणी

येतेस एकटी तरीही ही वर्दळ वर्दळ होते


मी बघता बघता माझ्या दुःखाचे गाणे करते

प्रत्येक वेदना माझाही अलबेली मैफल होते


समजूनच आला नाही दुःखाचा गनिमी कावा

जी झुळुक वाटली छोटी ते मोठे वादळ होते


-गझलगंधर्व सुधाकर कदम

Saturday, July 25, 2026

जीवनाची एकतारी,पंढरीच्या महाद्वारी...


 

मन होतसे चकोर...



 काकडारतीच्या वेळी मन होतसे चकोर

व्याकुळले गात्र गात्र होई थेंबास आतूर


करो लागता गजर टाळ वाजतो मृदंग 

पान्हारते चंद्रभागा चोरुनिया अंग अंग


असे सावळे मंथर न्याहाळता इंद्रधनू

मातीतून फुटाळतो शकुनाचा अणू-रेणू


घरघरुनी उठता जात्यामधून विठ्ठल

कष्टवतीच्या घामाचा चोहीकडे परिमल


शाश्वतच्या ललाटाला सटवाईच गोंदते

उतरणीवरतीच अंगा अंगाला शेंदते


शब्द आणि संगीत- गझलगंधर्व सुधाकर कदम

गायक-मयूर महाजन



Monday, July 20, 2026

सरणावर कळले होते...



 .  आज पुनः #सुरेश_भट  आठवले...😢


इतकेच मला जाताना सरणावर कळले होते

मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते


ही दुनिया पाषाणाची बोलून बदलली नाही

मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते


गेलेल्या आयुष्याचा मधुमास गडे विसरू या

पाऊल कधी वाऱ्याचे माघारी वळले होते


घर माझे शोधाया मी वाऱ्यावर वणवण केली

जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते


मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो

मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते


■ जुन्या कॅसेटवरून उतरवलेले.

Live 1980 ●headphone Please

Sunday, July 19, 2026

या नवा सूर्य आणू चला यार हो...

 

.                       साठवणीतील आठवण

१९८० मध्ये जेव्हा सुरेश भट आणि मी मराठी गझल व गझल गायकीच्या प्रचार,प्रसारासाठी महाराष्ट्राच्या भ्रमंतीवर निघालो होतो, तेव्हाच्या अगदी सुरवातीच्या काळात सुरेश भटांच्या उपस्थितीत गायिलेली ही गझल आहे. मी स्वतः हार्मोनियम वाजवून गात असल्यामुळे त्या काळी तबला वादक तालमणी प्रल्हाद माहुलकर आणि मी,असे दोघे मिळून कार्यक्रम करायचो.त्यावेळच्या ध्वनिव्यवस्थापकाने कॅसेटवर  हे ध्वनिमुद्रण केले होते. कॅसेटवरून कसेबसे कॉम्प्युटरवर उतरवले.ते आपणासमोर सादर आहे.आवडण्या न आवडण्याचे स्वातंत्र्य आपणास आहे.चांगली असो वा वाईट,आपली प्रतिक्रिया मात्र आवश्यक.


सूर्य केव्हाच अंधारला यार हो

या नवा सूर्य आणू चला यार हो


हे नवे फक्त आले पहारेकरी

कैदखाना नवा कोठला यार हो


जे न बोलायचे तेच मी बोलतो

मीच माणूस नाही भला यार हो


ओळखीचा निघे रोज मारेकरी

ओळखीचाच धोका मला यार हो


आज घालू नका हार माझ्या गळा

मी कुणाचा गळा कापला यार हो


-#सुरेश_भट


●heasphone please...

Friday, July 17, 2026

पोवाडा...महाराष्ट्र मायभू आमुची...शाहीर अण्णा भाऊ साठे●

 


क्रांतिकारी शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन...🌹🙏🌹



Wednesday, July 15, 2026

'लाजणे बरे नाही' सुरेश भट,सुधाकर कदम.

 




      ●अशी गावी मराठी गझल●

सुरेश भट यांच्या निवेदनासह त्यांचीच गझल...

महाराष्ट्र साहित्य परिषद,पुणे.१९८२


"हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही

चेहरा  गुलाबाने  झाकणे  बरे नाही"


जे तुला दिले होते तेच ओठ दे माझे 

मागचे जुने देणे टाळणे बरे नाही


ऐक तू जरा माझे सोड मोह स्वप्नांचा 

आजकाल स्वप्नांचे वागणे बरे नाही


जाहली न कोणाची आज राख रांगोळी 

आपुलीच रांगोळी काढणे बरे नाही


आज मोकळे  बोलू, आज मोकळे होवू ! 

जीव एकमेकांचा जाळणे बरे नाही


कालचा तुझा माझा, चंद्र वेग‌ळा होता 

हे उन्हात आलेले चांदणे बरे नाही


मैफलीत या माझ्या पाहतेस का खाली 

हाय, लाजणाऱ्याने जागणे बरे नाही


गझल - सुरेश भट

गायक - सुधाकर कदम


● old live... headphon please

वारकरी


 





संगीत आणि साहित्य :