Sunday, January 1, 2012
Saturday, December 31, 2011
"कुठलेच फूल आता मजला पसंत नाही..."
’अबके हम बिछडे तो शायद कभी ख्व्वाबों मे मिले...’ अतिशय तरल काव्य आणि त्याला साजेशी बंदिश,असे फार कमी योग येतात... यालाच दुग्ध-शर्करा योग म्हणत असावे.मला तरूण वयातच या गझलने इतकी भुरळ पाडली पाडली,की आज साठी नंतरही तिचा दरवळ हृदयात दरवळत आहे.या गझलची बंदिश अप्रसिद्ध अशा ’कोमल धैवत भूप’ या रागात आहे.हे नाव ’कोमल रिषभ आसावरी’ रागाच्या धर्तीवर मी ठेवले आहे. ’भूप’ रागातील शुद्ध धैवत कोमल केला की हा राग तयार होतो.स्वर आहेत...सा रे ग प ध सां,सां ध प ग रे सा.यालाच आपल्याकडे भूपेश्वरी किंवा कृष्णरंजनी असे नाव दिल्या गेल्याचे कुठल्यातरी एका पुस्तकात वाचण्यात आले. त्यावरून मी पं.भातखंडे यांच्या संगीतावरील समग्र ग्रंथांचा धांडोळा घेतला असता कुठेही या नावाच्या रागांचा उल्लेख आढळला नाही.तसेच संगीत कार्यालय (हाथरस ऊ.प्र.) येथून प्रसिद्ध झालेल्या ’राग-कोष’ या ग्रंथातही या रागांचा तसेच सुरावटीचा उल्लेख दिसला नाही.या ग्रंथाचे लेखक ’वसंत’ असून संपादन लक्ष्मीनारायण गर्ग यांचे आहे.यात उत्तर व दक्षिण भारतीय ५०० रागांचे संपुर्ण वर्णन आहे.अर्थात एखाद्या नविन सुरावटीला काही तरी नाव द्यायचे म्हणून शिवरंजनीच्या धर्तीवर कृष्णरंजनी,भूपेश्वरी वगैरे वगैरे..शात्रीय संगीतातील.
विद्वानांनी यातील कोणते तरी एक नाव पक्के करावे,म्हणजे नावा बाबतचा भ्रम राहणार नाही.
(भूपातील गांधार कोमल केला की शिवरंजनी नामक अतिशय सुरेल, पण शास्त्रीय गायकांना भूपासारखाच न पेलणारा राग तयार होतो.या रागाचा हिंदी चित्रपटात संगीतकारांनी अतिशय सुंदर उपयोग केला आहे.’ओ बसंती पवन पागल...’,’दिल के झरोखे में तुझको बिठाकर...’,’ओ मेरे सनम ओ मेरे सनम,दो जिस्म मगर इक जान है हम...’,’जाने कहाँ गये वो दिन...’ ही त्याची काही सुरेल उदाहरणे...)
राजसा किती दिसात लाभला निवांत संग..."
या रचनेकरीता करून, लाताबाईचा मधाळ आवाज घेतला...कलिजा खल्लास...!
वातावरण निर्माण करू शकतात ते...! ’अबके हम बिछडे...’ आणि ’मालवून टाक...’ ची तरलता येथे संपून जाते...तरीही ही कव्वाली लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचते.असो...
याच दरम्यान म्या पामरानेही प्रयत्न केला.गझल होती...
"कुठलेच फूल आता मजला पसंत नाही,
कळते मला अरे हा माझा वसंत नाही...".
कवी सुरेश भटच...
कळते मला अरे हा माझा वसंत नाही
जमवूनही तुझ्याशी माझे तुझे जमेना
इतुका तुझ्याप्रमाणे मी शोभिवंत नाही
मी सोडणार नाही हे गाव आपल्यांचे
सारीच माणसे अन् कोणीच संत नाही
थकुनी किती प्रवासी पडले धुळीत मागे
रस्त्यास वाहणा-या कसलीच खंत नाही
मी रंग पाहिला या मुर्दाड मैफिलीचा
कुठल्याच काळ्जाचा ठोका जिवंत नाही
संगीतकार,गायक - सुधाकर कदम
गझल- सुरेश भट
(सूचना - मी गायिलेल्या रचना परवानगी शिवाय जाहीर कार्यक्रमात गाऊ नये.)
Labels:
गझल- सुरेश भट,
गायक - सुधाकर कदम,
संगीतकार
Thursday, December 29, 2011
’एक प्रार्थना...’
आमच्या गझल कट्ट्यात सादर झालेली डॉ. .अनंत ढवळे यांची खालील गझल माझी अतिशय आवडती आहे.माझ्या दृष्टीने शब्द आणि स्वरांचा सुंदर मेळ यात जमला आहे.ध्वनिचित्रमुद्रण इतके चांगले नाही परंतू कळण्या इतपत नक्कीच आहे.या गझलची बंदिश तयार झाल्याबरोबर दोन-तीन दिवसातच सादर केल्यामुळे सादरीकरणात कच्चेपणा आहे.कारण सतत गात राहिल्या शिवाय पक्केपणा येत नाही.आणि दर महिन्यात नविन रचना देण्याचे आव्हान संगीतकट्ट्यामुळे गझलकार,संगीतकार आणि गायकांसमोर असायचे. यामुळे प्रत्येकाला,आपल्याला काहीतरी नविन द्यायचे आहे या प्रेरणॆने कोणाचे लिहून व्हायचे,कोणाची चाल बसवणे सुरू असायचे.कोणाची गाण्याची तयारी सुरु असायची.या निमित्ताने सर्वजण एकत्र यायचे.सगळे काही नविन असल्यामुळे त्यातल्या त्रुटी कळायच्या,एकमेकांशी चर्चा व्हायची.एकूणच बढीया माहौल तयार झाला होता.पण.....
उत्स्फुर्तपणे झालेली या गझलची बंदिश कोण्या एका रागात आहे असे सांगता येत नाही.कारण कुठे-कुठे शब्दागणिक तर कुठे-कुठे ओळींगणिक वेगवेगळ्या सुरावटी यात आलेल्या आहेत.माझ्या बहुतेक चाली आतून आलेल्या आहेत.कधी त्या एखाद्या रागाला धरुन तर कधी उन्मुक्त....ही चाल उन्मुक्त आहे.कुठे ’पटदीप’ रागाचा भास होतो.तर लगेच ’भीमपलासीची’ छाया त्यावर पडलेली दिसते.मध्येच तीव्र ’मध्यम’ चमकुन जातो.अंतर्यामध्ये आणखीनच वेगळी सुरावट येऊन ’सरोवराचे गूढ’ उलगडण्याचा प्रयत्न केल्या जातो.’पाऊस आला’ ह्या शब्दांसाठी झालेला कोमल धैवताचा प्रयोग लक्षणीय वाटतो.’फुटत राहिल्या आयुष्याच्या बिलोर काचा" या शब्दांची आर्तता स्वरांद्वारे व सुरांद्वारे दाखविण्यासाठी केलेला भैरवीचा प्रयत्न निश्चितच प्रशंसनीय आहे,असे या कार्यक्रमाचे सूत्र संचलन करणारे पुण्यातील सुप्रसिद्ध गझलकार म.भा.चव्हाण यांनी यावेळी काढले.हे माझ्यासाठी संगीतकार म्हणून प्रेरणा देणारे होते.
माझ्या दोन्ही मुली भैरवी आणि रेणू लग्न होऊन दिल्ली,कानपुर येथे स्थायिक झाल्या.जावई समीर चव्हाण गणित विश्वात रमणारे असूनही मराठी गझल लिहिण्याचा त्यांचा व्यासंग कौतुकास्पद आहे.ते पुण्यात असेपर्यंत निषाद आणि ते गझल कट्ट्याचे आयोजनाकरीता झटायचे.समीर IIT कानपुरला प्रोफेसर म्हणून रुजू झाले नि गझलकट्टा बंद पडला.पुन्हा सुरु व्हावा ही ईच्छा आहे.परंतु एका व्यक्तीच्या इच्छेने होणारी ही गोष्ट नाही.जगन्नाथाच्या रथाप्रमाणे सगळ्यांचे हात लागले तरच हे शक्य आहे.असो...
गझल ऐकू या.....................................................
एक प्रार्थना ओठांमधुनी निघत राहिली
काल रात्रभर तुझी वेदना जळत राहिली
कळूनही त्या सरोवराचे गूढ न कळले
प्रतिबिंबाची वलये नुसती हलत राहिली
जुन्या दिसांची साद घेऊनी पाऊस आला
गेली वर्षे नभातुनी मग गळत राहिली
फुटत राहिल्या आयुष्याच्या बिलोर काचा
दिवस मात्र वर्षांची शकले फुटत राहिली
गायिका-भैरवी कदम देव
गझलकार-डॉ.अनंत ढवळे
संगीत-सुधाकर कदम
तबला-निशाद कदम
व्हायोलिन-प्रमोद जांभेकर
हार्मोनिअम-दस्तुर्खुद्द
Monday, December 26, 2011
हिरवे हिरवे गर्द चिमुकले...
वृंदावनी सारंग रागातीलच हे एक वेगळ्या ’मूडचे’ २००७ मध्ये स्वरबद्ध केलेले
या बालगीताच्या अल्बम मधील निसर्ग गाणे...
हिरवे हिरवे गर्द चिमुकले
दाट धुक्यांनी हळु पांघरले
बेट नव्हे ते नंदनवन जणू
निळ्या जांभळ्या जळात वसले
हिरवे हिरवे...
या बेटाचा समुद्र गहिरा
लाटांमधुनी खेळे वारा
हलति होड्या डुलती नौका
सोडुन थोडा दूर किनारा
हिरवे हिरवे...
तिथली झाडे अन फुलवेली
रंग सृष्टीचे मोहक ल्याली
क्षणात हसती,क्षणी कुजबुजती
जाणुन पक्षांची मधुबोली
हिरवे हिरवे...
सुंदर तिथला हिरवा डोंगर
मेघ चुंबितो त्याचे शिखर
पायथ्याशी त्या घरे चिमुकली
पलिकडे ते पवित्र मंदिर
हिरवे हिरवे...
गायिका-नेहा दाऊदखाने
हिरवे हिरवे...
हिरवे हिरवे...
हिरवे हिरवे...
पलिकडे ते पवित्र मंदिर
हिरवे हिरवे...
Friday, December 23, 2011
सावळा घनशाम रे...
'जादुगर सैयाँ,छोड मोरी बैयाँ’ हे ’नागिन’ (१९५४) या चित्रपटातील हेमंतकुमार यांनी स्वरबद्ध केलेलं आणि लताबाईंनी गायिलेलं त्या काळात अतिशय गाजलेलं गाणं वृंदावनी सारंग या रागातच आहे.’रानी रुपमती’ (१९५९) या चित्रपटातील एस.एन.त्रिपाठी यांनी संगीतबद्ध केलेले भरत व्यास यांचे ’आ लौटके आजा मेरे मीत...’ हे गीत मधमाद सारंग या रागात आहे.याच चित्रपटातील रफी-लता यांनी गायिलेले ’झननन झन झननन झन बाजे पायलिया...’ हे अती सुंदर गीत वृंदावनी सारंग रागात आहे. ’संथ वाहते कृष्णा माई...’ हे ग.दि.मां.चे.दत्ता डावजेकरांनी संगीतबद्ध केलेले आणि सुधीर फडके यांनी गायिलेले सर्वांगसुंदर गीतही वृंदावनी सारंग या रागात आहे.एवढेच नव्हे तर ’कजरा मोहब्बतवाला,अखियों मे ऐसा डाला...’ हे ’किस्मत’ (१९६८) या चित्रपटातील ओ.पी.नैय्यर यांनी संगीत दिलेलं आणि आशाबाईंनी गायिलेलं धडकेबाज गाणंही वृंदावनी सारंग याच रागात आहे.
मी ही थोडा वेगळा प्रयत्न करून पाहिला.यातील ’घन’ या शब्दावरील बारिकशी सुरावट आणि दुसर्या कडव्यात याच्या जवळच्याच ’देस’ रागाच्या सुरावटीचा उपयोग करून गोडवा आणण्याचा प्रयत्न केला...आपणास आवडले तर बघा...
(’स्वरानंद प्रतिष्ठान’ आयोजित, ’अर्चना’ या भक्तिगीतांच्या अल्बमचा लोकार्पण सोहळा,यशवंतराव चव्हाण ,पुणे.२००६)
Subscribe to:
Posts (Atom)

