गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Monday, May 27, 2013

किरकेट...



क्रिकेट आमुचा 
अति सभ्य खेळ 
फिक्सिंगचा मेळ 
जमोणारा...

अजहरुद्दीन
अजय जडेजा 
नमनाचे राजा 
फिक्सिंगचे...

नविन मोहरे 
चव्हाण अंकित
चंडिल अजित 
व श्री शांत...

IPL सर्कस
खेळवी खेळाडू 
सट्टॆबाज भिडू 
मालामाल...

सदाच ‘दसरा’ 
सट्टेबाजांसाठी 
खेळाडूंच्या घरी
‘दीपवाळी’...

अति मोहाच्या 
चक्रव्युहामध्ये
अडकले गधे
स्वतःहून...

हागून भरवू
जेथे खाऊ तेथे
असे हे दिवटे
भडभुंजे...

क्रिकेटच्या उद्धारा
‘संत’ची विभूति
पै,पोरी भोगती
मुक्तपणे...

छी थू झाली जरी
देशाची तरी ही
लाज ना जराही
कोणालाच...

म्हणती क्रिकेट
आमुचे जीवन
खाऊन पिऊन
ढेकरण्या...

‘सुधा’म्हणे गेला 
खेळ मसनात 
मालक झालेत  
धनवान... 

सुधाकर कदम

Wednesday, May 22, 2013

काय फरक पडंदू ?


आळवणी...



 
पृथ्वीला लागल्या
आलिंगन कळा
घेऊन ये ना रे
घन घन माळा
 
वेदनेलाला येई
उदयास्ताचे रंग
रोजची दुपार
पेटविते अंग
 
पशु पक्षी सारे
लाहा लाहा करी
बरसव आता
सरीवर सरी
 
वैराण वावरे
निष्पर्ण खराटे
घेई जगण्याशी
रोज रोज खेटॆ
 
कधी नव्हे अशी
तापून निघाली
दोन थेंबांसाठी
काया आसुसली
 
पिण्यासाठी नसे
चुल्लूभरपाणी
मरणही करी
त्याची आळवणी
 
देहा फुटे झरा
पाणी शोधताना
कोसकोस घाव
वेगाने घेताना
 
डोळ्यावर दाटे
कारुण्याचे धुके
जनावरांचेही
हंबरणे मुके
 
ओढाळ हा वारा
उदास होउनी
उन्हाच्या कुशीला
मारतो ढोसणी
 
काळ्या धरतीची
भेगाळली काया
लवकर येई
तिजला झाकाया
 
सुधाकर कदम
..२०१३

Sunday, May 12, 2013

दस्त-ऐवज



 
 तुम्ही उघडले आहे
दस्तऐव
नोंदणी कार्यालय
(दस्तऐवज म्हंजे काय रे भौ ?)
पुंगळ्या करून
जमा करण्यासाठी
जे कोणालाच नंतर दिसत नाही,
(म्हणजे तो एक इतिहास झाला तर !)
या ऐतिहासिक नोंदींना
दस्तऐवज म्हणावे की दस्तावेज ?
आम्ही गावंढळ,
अशुद्ध बोलणारे,लिहिणारे
तुम्ही मात्र कार्यालयीन
ग्रांथिक भाषा बोलणारे,सुसंस्कृत
(’भैय्या ! दुधमे पानी कम मिसळोनावाले…!)
म्हणून विचारले !
 
आम्ही धटींगण
(’अबे,दुधात पानी मिसळतं का बे भडव्या…!’)
असा दम देणारे
उद्धट…! असंस्कृत…!
म्हणून सांगतो,
आम्हाला अर्थ कळो वा नाकळो...
कृपया
आमचा इतिहास बदलण्याच प्रयत्न
करू नकानाही तर,
आमचे दस्ततुमचा ऐवज
निकामी केल्याशिवाय
राहणार नाही…!
 
सुधाकर कदम
..२०१३

Wednesday, May 8, 2013

याचा संग धरो नये…



 
गाढवाशी मैत्री
लाथांचा सुकाळ
सदा सर्वकाळ
चालतसे...
 
किती गूळ चारा
फरक ना पडे
चवीचे वाकडे
जन्मभरी...
 
हिरव्या कुरणी
जोमात चरोनि
झाडतो दुगाणी
धन्यावरी...
 
कितीही शिकवा
’गमभन’ त्याला
गावंढळ मेला
समजे ना...
 
भींतीच्या कडेला
राहोनिया उभा
धरो पाहे गाभा
सावलीचा...
 
स्थितप्रज्ञाचीच
लक्षणे दिसती
परी ना मानती
योगी त्याला...
 
पाजळोनि बुद्धी
असे अर्धवट
सांगती अचाट
तत्वज्ञान…
 
’सुधा’ म्हणे उगि
बेगडाचा रंग
गाढवाचा संग
धरो नये…
 
सुधाकर कदम




संगीत आणि साहित्य :