गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Wednesday, August 8, 2012


आवेगी पाऊस...

आवेगी पाऊस 
असा बरसला 
देहासि भिडला
धरणीच्या ...

दाहि दिशातुन 

पिसाटत आला 
भोवती घुमला 
हळुवार ...

धिंगाणा घालोनि

वेडावल्यागत 
गर्जना करित 
लोटावला ...

वाटे पावसाचे 

मलमली वस्त्र 
होवोनि विवस्त्र 
पांघरावे ...

लखलखणारी 

एक वीज रेघ 
शक्तीचे अमोघ 
रूप दावि ...

तडतडणार्‍या 

अगणित सरी 
घाट माथ्यावरी 
ताल धरी ...

नवे धबधबे 

दुधाळोनि आले 
गर्जोनि हासले 
फेसाळत ...

ओसाड मनाच्या 

खडकावरती 
नवी जीवशक्ति 
कोंभाळली ...

टंच ओल्याचिंब 

जुन्या आठवणी 
मनाच्या रिंगणी 
फेर धरी ...

सुधाकर कदम 

Friday, August 3, 2012

सुरेश वाडकर आणि वैशाली माडे यांची पहिली मराठी युगल-गझल...



                                       
                                                     काट्यांची मखमल                                                                                                                                                       
                                                    (युनिव्हर्सल म्युझिक कंपनी.)
                                                   

Saturday, June 23, 2012

येता येता गेला पाऊस...



singer-SURESH WADKAR & VAISHALI MADE
lyric-DILIP PANDHARPATTE
music-SUDHAKAR KADAM.

अल्बम-काट्यांची मखमल 
(युनिव्हर्सल म्युझिक कंपनी)

(बातचित "Katyanchi Makhmal"...  on 94.3 Radio One with  MJ Suhrud —  Gazal Gandharv Sudhakar Kadam के साथ | Part V)

Saturday, June 16, 2012

पहाटे पहाटे मला जाग आली...




 सुरेश भटांचे हे गीत आतापर्यंत सी.रामचंद्र,सुरेश वाडकर या दिग्गजांनी गायिले आहे.मी सुद्धा १९८० मध्ये स्वरबद्ध करून गायचा प्रयत्न केला.आवडण्याचे स्वातंत्र्य आपणास आहे...



Sunday, June 3, 2012


रेशमाची रात...


रेशमाची रात 
हळूच  सरते 
नभांगण रिते 
करोनिया...


शुभ्र धुक्यातून  
उकले पहाट 
उत्साहाचे लोट 
घेवोनिया...


कासव गतीने
दिवस निघतो
उसासे टाकतो
मध्यान्हीला...


तरूवर वेली 
पेंगती उन्हात 
घेवोनि कुशीत 
गोधनाला...


उतरता ऊन्ह 
पोळलेले श्वास
सोडती निश्वास
हळूवार...


सांजवेळ येता 
क्षितिजावरती 
रंगांची  नवती 
नव्हाळते...


रात्रीची चाहूल
लागता,पेटती
समईच्या ज्योती
घरोघरी...


रेशमाची रात 
हळूच चढते 
गात्र गात्र रिते
करावया...

सुधाकर कदम

Tuesday, May 29, 2012


 तांबट रेषा...


भोवतालचा घोर अंध अंधार पाहुनी ना घाबरतो
लटकुन मुटकुन छ्तास तिथल्या दिवाभितासम जागत बसतो

दुर्दैवाने विरून जाता आकाशाची सीमारेषा 
झोक सावरुन,वाट धरोनी स्वप्नदेशीचा प्रवास करतो

रानामधल्या हिरव्या वाटा घेरुन येता कवटाळाया 
धावत धावत,अवखळ खळखळ,निर्झरासवे हळू सटकतो

सुख दुःखाच्या अनुभूतीचे मार्ग अचानक गरगर फिरता
पुण्याईच्या काल प्रवाही भय-अभयाचा हिशेब करतो

जरी अचानक सरून गेला आयुष्याचा घाट उतरता
मावळतीच्या पुर्वांगाला तांबट रेषा हळुच ओढतो 


Sudhakar Kadam




संगीत आणि साहित्य :