गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Tuesday, May 29, 2012


 तांबट रेषा...


भोवतालचा घोर अंध अंधार पाहुनी ना घाबरतो
लटकुन मुटकुन छ्तास तिथल्या दिवाभितासम जागत बसतो

दुर्दैवाने विरून जाता आकाशाची सीमारेषा 
झोक सावरुन,वाट धरोनी स्वप्नदेशीचा प्रवास करतो

रानामधल्या हिरव्या वाटा घेरुन येता कवटाळाया 
धावत धावत,अवखळ खळखळ,निर्झरासवे हळू सटकतो

सुख दुःखाच्या अनुभूतीचे मार्ग अचानक गरगर फिरता
पुण्याईच्या काल प्रवाही भय-अभयाचा हिशेब करतो

जरी अचानक सरून गेला आयुष्याचा घाट उतरता
मावळतीच्या पुर्वांगाला तांबट रेषा हळुच ओढतो 


Sudhakar Kadam

No comments:





संगीत आणि साहित्य :