Thursday, October 16, 2014
Saturday, September 20, 2014
Sunday, September 7, 2014
रान-भान...
सुगीच्या दिसात
गर्भारते रान
मोहरते मन
आपसूक...
जाये विसरूनी
भान आपोआप
निसर्गाचे रूप
पाहूनीया...
रानमेव्यासाठी
जीवाचा हपाप
अर्धे-कच्चे रूप
ओढ लावी...
गाभुळली चिंच
खुणावे पोरांना
बाजूला पानांना
सारूनीया...
हुरडता ताट
टवाळ पाखरे
हळु चोच मारे
कणसाला...
पानोपानी कंच
कळ्या उमलती
गंध पसरती
मादक तो...
चारी दिशांमध्ये
चैतन्याचा रंग
जसा की श्रीरंग
गोकुळात...
सुधाकर कदम
सुधाकर कदम
स१.९.२०१४
चित्रकार
राजेंद्र पासलकर
Friday, August 29, 2014
तुझ्यासाठीच मी....मराठी गझल.
युनिव्हर्सल म्युझिक कंपनीतर्फे लवकरच आपल्या सेवेत येत आहे.
गायिका - वैशाली माडे
(सारेगमप महागायिका)
गझलकार - दिलीप पांढरपट्टे
संगीत
गझलगंधर्व सुधाकर कदम
Subscribe to:
Posts (Atom)





