. जेव्हा कुणीही मराठी गझल गात नव्हते तेव्हा #मराठी #गझल व #गझल_गायकीच्या #प्रचार_प्रसारासाठी सुरेश भट व मी महाराष्ट्रभर फिरत होतो.त्यावेळी आम्ही दोघेही अर्धा-अर्धा कार्यक्रम करायचो.सुरवातीला भट त्यांच्या पद्धतीने व मध्यंतरानंतर हार्मोनियम तबल्याच्या साथीसह मी स्वरबद्ध केलेल्या गझला सादर करायचो. एकदा प्रयोग म्हणून दोघांनीही अधून मधून (मिक्स) गझला सादर करण्याचा एक प्रयोग १९८१ मध्ये यवतमाळ जिह्यातील #पांढरकवडा या गावी करून पाहिला...पण या पद्धतीमध्ये आम्ही दोघेही व्यवस्थित 'सेट' न होता 'डिस्टर्ब' होत गेलो.म्हणून यानंतर पुढे दोघांनी मिळून जितके कार्यक्रम केले ते अर्धे अर्धे...
आज अचानक जुन्या फाईलमध्ये नागपुरहून प्रकाशित होणाऱ्या दैनिक #लोकमतचे खालील कात्रण दिसले ते मुद्दाम सादर करीत आहे.
No comments:
Post a Comment