गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Saturday, December 13, 2025

यवतमाळची शकुंतला

 .                        #जगत_मी_आलो_असा                                                           लेखांक ८                   

      शीर्षक वाचून तुम्हाला दुष्यंताची शकुंतला आठवली असेल.ती ही शकुंतला नाही.ही आमची यवतमाळची 'आगीनगाडी' होय.रंभेच्या मुलीचे रक्षण शकुन पक्षाने केले म्हणून दुष्यंताच्या शकुंतलेचे नाव शकुंतला पडले.काही काळ दुष्यंताला  शकुंतलेचा विसर पडला होता ही कथा सुद्धा आपणास माहीत असेलच.अशी ही शकुंतला  पुराणात वर्णन केल्याप्रमाणे सुस्वरूप,देखणी कण्व ऋषींच्या आश्रमात वाढलेली वगैरे वगैरे... पण जिला रंग ना रूप अशा यवतमाळच्या 'यवतमाळ ते मूर्तिजापूर' चालणाऱ्या छोट्या (नॅरो गेज) आगीनगाडीला (आगीनगाडी कसली ढक्कलगाडी म्हटले तरी चालेल.) शकुंतला हे सुंदर नाव देणाऱ्या यवतमाळकर रसिकास दाद द्यावी लागेल.ही गाडी इंग्रजांच्या काळात क्लिक निक्सन अँड कंपनीच्या माध्यमातून २५ डिसेंबर १९०३ मध्ये जिल्ह्यातील कापूस इंग्लंडमधील मँचेस्टरला पोहोचवण्याच्या दृष्टीने सुरू करण्यात आली होती. यवतमाळ रेल्वे स्टेशनचा कोड आहे ytl. येथे दोन प्लॅटफॉर्म आहेत.पण विना शेड! (सध्या नवीन रेल्वे स्टेशनचे काम सुरू असल्याचे  कळते.खरे खोटे सरकारला माहीत.)


     तर मित्रहो, ही गोष्ट आहे १९६५ ते १९७० च्या दरम्यानची.बोरी अरब जवळील लाडखेड येथे ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम होता. लाडखेड हे यवतमाळ मूर्तिजापूर रेल्वे मार्गावर असल्यामुळे सर्व लवाजमा घेऊन 'शकुंतले'ने लाडखेडला गेलो.त्यावेळी शकुंतलेला वाफेचे इंजिन होते.कार्यक्रम करून दुसऱ्या दिवशी शकुंतलेनेच यवतमाळला निघालो. यवतमाळ जवळच्या लोहारा या गावापर्यंत आल्यावर गाडी आचके देत थांबली.ती सुरूच होईना.चौकशीअंती (ड्रायव्हरच्या म्हणण्यानुसार) बॉयलर थंड झाल्याचे कळले.बऱ्याच प्रयत्नानंतर अर्ध्या तासाने गाडी धकली, पण थोडे दूर जात नाही तो पुन्हा थांबली.पुनः चौकशी केली असता 'गाडीत बिघाड झाल्यामुळे केव्हा सुरू होईल होईल हे सांगता येत नाही' असे उत्तर आले.गाडी ना धड लोहारा गावत ना धड यवतमाळात.(या परिस्थितीमुळे 'ना घर के ना घाट के' म्हणजे काय ते कळून आले.) लोहारा ते यवतमाळ अंतर तसे तीन साडेतीन किलोमीटर.गाडी चालती असती तर दहा/पंधरा मिनिटात यवतमाळला पोहोचलो असतो.पण एवढ्या अंतरासाठी शकुंतलेने अख्खा एक तास घेऊनही मधेच मुक्काम ठोकला.सायंकाळ होत आली होती.रात्री पुनः यवतामाळातच कार्यक्रम होता.गाडी अशा ठिकाणी थांबली होती की, दुसरे कुठलेही वाहन मिळणे शक्य नव्हते.काय करावे कोणालाच सुचेना.बराच खल झाल्यावर सगळ्यांनी आपापली वाद्ये घेऊन रुळा रुळाने चालत रेल्वे स्टेशन गाठायचे व तेथून टांग्याने गावात आमच्या (ऑर्केस्ट्राच्या) रूमवर जायचे ठरले.गायक मंडळी आपापले गळे घेऊन निघाली.बाकी वादक मंडळी पण आपापले वाद्य घेऊन चालू लागली.या प्रकरणात बासरीवाला मजेत होता.सगळ्यात गोची माझी होती.कारण अकॉर्डियन...! तेही अवजड असे पियानो अकॉर्डियन.तबलेवाल्याने तबल्याची झोळी खांद्यावर घेतली.बॉंगोवाल्याने बॉंगो एका हातात घेतला.

कोंगोवल्याची पंचाईत झाली.त्याने सरळ ते धूड डोक्यावर घेतले.ते पाहून मीही अकॉर्डियनचे धूड डोक्यावर घेतले.व सगळेजण 'हर हर महादेव' म्हणत रस्त्याने (रुळाने) लागलो. यवतमाळच्या चौकीजवळ (सध्याचे दर्डा नगर) आल्यावर आमची 'वरात' पाहून आंबटशौकीन रसिक जमा होऊन गंमत बघायला लागले.आम्हाला मेल्याहून मेल्यासारखे झाले.पण इलाज नव्हता. कसे बसे स्टेशवर पोहोचलो व तेथून टांग्याने ऑर्केस्ट्राच्या खोलीवर! आयुष्यात पाहिल्यांदा या गाडीत बसलो.त्यानंतर बॉयलरचा धसका घेऊन पुनः प्रवास करण्याची हिंमत केली नाही.

--------------------------------------------------------------------

दि.१४ डिसेंबर २०२५ दैनिक विदर्भ मतदार,अमरावती.



Thursday, December 11, 2025

अशी गावी मराठी गझल

● कविवर्य सुरेश भट यांच्या समर्थ लेखणीतून प्रसवलेल्या गझलांना खरा न्याय दिला तो आर्णी (जि.यवतमाळ) येथील #प्रख्यात_मराठी_गझल_गायक सुधाकर कदम यांनी. प्रसिद्ध मराठी कवी #कलीम_खान  यांच्या रसाळ सूत्रसंचालनाखाली या जोडगोळीचा "#अशी_गावी_मराठी_गझल" 
हा कार्यक्रम महाराष्ट्रभर गाजला. इंदूर,उजैन,नागदा या मध्यप्रदेशातल्या शहरांमध्ये झालेल्या सुधाकर कदम आणि कलीम खान याच्या मैफिलीच्या आठवणी आजही तिथल्या रसिकांच्या मनात दरवळत आहेत. नंतर मराठी गझलेच्या क्षितिजावर भीमराव पांचाळे यांचा उदय झाला.

-डॉ.अजीम नवाज राही-
दै.सकाळ,नागपुर.दिं.११/११/२००९

------------------------------------------------------
         #मराठी_ग़ज़लें_भी_उर्दू_की_तरह_मधुर_होती_हैं
● इंदौर की इस अनोखी गजल निशा के दुसरे आकर्षण थे कलीम खान। सुधाकर कदमजी के संपूर्ण कार्यक्रम का संचालन अपनी मधुर आवाज और विशिष्ठ अंदाज मे कर उपस्थित मराठी भाषियों का दिल जीत लिया।

-प्रभाकर पुरंदरे
दै. चौथा संसार,इंदौर
डिसेंबर १९८९
------------------------------------------------------
 ● त्यांना (कलीम खान यांना) गझलेची खरी ओळख झाली ती सुधाकर कदम यांच्या संपर्कात आल्यानंतर! कदमांच्या अनेक गझल मैफिलींचे निवेदन कलीम खान करायचे. 

-अमोल शिरसाट
दै.अजिंक्य भारत,गझलयात्रा स्तंभ
३ मार्च २०२१

#मराठी_गझल #गझल #gazal #गझल_गायकी #sudhakarkadam


 

माझी कविता...


 

काही भिकारड्यांना दिलदार मानले मी...


 

माझी मस्ती,माझे जगणे...


 

माझी कविता


 

गझल


 

Tuesday, December 9, 2025

तुझे तुला जगायचे...

 


हसून वा रडूनिया तुझे तुला जगायचे
असेच दुःख झेलुनी सुखासवे फुलायचे

कधी कुठे असायचे कधी कुठे नसायचे
खुडून टाकले तरी नभात भिरभिरायचे

सुगंध घेउनी सवे दवात रोज न्हायचे
पुन्हा पुन्हा फलूनिया खुशाल दर्वळायचे

मधाळ चांदरातही न राहिली मिठीत या
म्हणून का उगीच मी तुझ्याविना झुरायचे

हवे तसे जगावयास ना मिळे कुणासही
कठोर सत्य हेच तर कशास मग रडायचे

गायक - मयूर महाजन,प्राजक्ता सावरकर शिंदे

गझल आणि संगीत गझलगंधर्व सुधाकर कदम

सहकलाकार-मुकुंद पेटकर (हार्मोनियम),प्रभंजन पाठक (व्हायोलिन), ओंकार भुसारे (तबला),आशिष कदम (की बोर्ड) आणि सूत्र संचालन - शाहीर सुरेशकुमार वैराळकर.

दि.१५ नोव्हेंबर २०२५,महाराष्ट्र साहित्य परिषद,पिंपरी चिंचवड शाखा.शांता शेळके सभागृह, प्राधिकरण,निगडी,पुणे

Sunday, December 7, 2025

सुरेश वाडकर,सुधाकर कदम ...ध्वनिमुद्रण,आजिवासन स्टुडिओ,

 



सुरेशजींसोबत काम करण्यात मजा येते. हा व्हिडीओ त्याची साक्ष आहे. #सुरेश_वाडकर  #सुधाकर_कदम

सांजवेळी


काय होते या मनाला सांजवेळी

ही उदासी दाटते का सांजवेळी


येत नाही गीत ओठी नेहमीचे

आसवेही मूक होती सांजवेळी


प्रेम केले हाच का माझा गुन्हा, 

एकटी मौनात जळते सांजवेळी


दूर कोठे सूर उठता बासरीचा

होत जातो दर्द गहिरा सांजवेळी


गायिका - प्राजक्ता सावरकर शिंदे

शब्द आणि संगीत - #गझलगंधर्व​ सुधाकर कदम

सहकलाकार-मुकुंद पेटकर (हार्मोनियम),प्रभंजन पाठक (व्हायोलिन), ओंकार भुसारे (तबला),आशिष कदम (की बोर्ड) आणि सूत्र संचालन - शाहीर सुरेशकुमार वैराळकर.

दि.१५ नोव्हेंबर २०२५,महाराष्ट्र साहित्य परिषद,पिंपरी चिंचवड शाखा.शांता शेळके सभागृह, प्राधिकरण,निगडी,पुणे.

तुझ्या रूपाचा गुलाब ताजा...

तुझ्या रूपाचा गुलाब ताजा अजून माझ्या मनात आहे
अजूनही मी दवाप्रमाणे गडे तुझ्या पाकळ्यात आहे...

उगीच तू टाकलीस माझ्या अंगावरती फुले जुईची
क्षणभर झाला भास मलाही अजून मी चांदण्यात आहे

कधीच नाही मला भेटली रूपगर्विता वसंतसेना
तरी कुणाची हिरवी सळसळ आयुष्याच्या बनात आहे

गायक - मयूर महाजन 
शब्द - म.भा.चव्हाण
संगीत - #गझलगंधर्व​ सुधाकर कदम

सहकलाकार-मुकुंद पेटकर (हार्मोनियम),प्रभंजन पाठक (व्हायोलिन), ओंकार भुसारे (तबला),आशिष कदम (की बोर्ड) आणि सूत्र संचालन - शाहीर सुरेशकुमार वैराळकर.

दि.१५ नोव्हेंबर २०२५,महाराष्ट्र साहित्य परिषद,पिंपरी चिंचवड शाखा.शांता शेळके सभागृह, प्राधिकरण,निगडी,पुणे.


 

The pioneer gazal singer in Marathi.

 वर्ष १९८१

     बॅ.अंतुले मुख्यमंत्री असतांना,नागपुरच्या हिवाळी अधिवेशनात मा.रा.सु.गवई यांचे कॉटेजवर एका भव्य शामियान्यात काव्य - संगीत मैफल सुरेश भटांनी आयोजित केली होती.मी चळवळीचा कार्यकर्ता असल्यामुळे गवई साहेबांच्या कॉटेजवरच होतो.या मैफिलीत एक तरूण गायक मराठी गझला पेश करून उपस्थितांची दाद घेताना मी पाहिला.मैफिल अतिशय सुंदर झाली.कार्यक्रमानंतर अंतुले साहेबांचे हस्ते त्या तरुणाचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.त्याच प्रसंगी मा.जवाहरलालजी दर्डा यांनी त्या तरूण गायकाला मिठी मारुन ’हा आमच्या यवतमाळचीच नव्हे तर विदर्भाची शान आहे’ असे जाहीरपणे सांगितले. शामियान्याच्या एका कोप-यात उभे राहून हा सर्व सोहळा मी याची देही याची डोळा पाहिला.हा तरूण गायक म्हणजे सुधाकर कदम होय. सुधाकर कदमांना मी सर्वप्रथम येथे पाहिले.यावेळी सुरेश भटांसोबत सावलीप्रमाणे वावरणारा एक तरुण होता.त्याचे नाव शाहिर सुरेशकुमार वैराळकर.


     त्या नंतर मा.शरद पवारांनी वर्धा या गावी १८ ते २० सप्टेंबर १९८१ ला भव्य शेतकरी मेळावा घेतला होता.तेथेही सुधाकर कदमांचा कार्यक्रम झाला.त्यात ’सूर्य केव्हाच आंधारला यार हो’ ही सुरेश भटाची गझल गाऊन समा बांधला होता.या प्रसंगी शरद पवार,पद्मसिंह पाटील,सुधाकरराव देशमुख,रावसाहेब वडनेरकर,सुरेश भट,ना.धो.महानोर,विट्ठल वाघ,प्रा.देविदास सोटे वगैरे मंडळी उपस्थित होती.


    त्या नंतर यवतमाळ जिल्ह्यातील बेलोरा या गावी दि.२७ व २८ मार्च १९८२ ला बाबुराव बागुल यांचे अध्यक्षतेखाली दलित साहित्य सम्मेलन झाले.याचे उद्घाटन म.रा.साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ.सुरेंद्र बारलिंगे यांचे हस्ते झाले होते.तेथेही मी होतो.या साहित्य संम्मेलनात सुधाकर कदमांचा मराठी गझल गायनाचा रंगलेला कार्यक्रम मी स्वतः पाहिला.या वेळेपर्यंत फक्त मराठी गझल गायनाचा तीन तासाचा कार्यक्रम करणारा एकही कलाकार महाराष्ट्रात नव्हता.आणि जे कोणी करत असतील तो फुटकळ स्वरुपाचा प्रयत्न असावा.तसे नसते तर सुरेश भटांनी निश्चीतच या संदर्भात कोणाचा तरी उल्लेख केला असता.या कालावधीत औरंगाबादचे नाथ नेरळकरही आशालता करलगीकर यांना सोबत घेऊन हिमांशु कुळकर्णी यांच्या गझलांचे कार्यक्रम करीत असल्याचे दिसून येते.परंतू पुढे त्यांनी ते बंद केले.तरीही जर कोणी दावा करीत असेल तर त्याने लेखी पुरावे द्यावे.मी मरेपर्यंत त्याची गुलामी करीन.


     १९८१ मध्ये ’#महाराष्ट्राचे_मेहदी_हसन’म्हणून सुरेश भटांनी त्यांना गौरविले.१९८२ मध्ये ’#गझलनवाज’उपाधी दिली.१९८३ मध्ये महाराष्ट्र जेसीजने ’#Out_Standing_Young_Person'हा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविले.गोंदिया येथे ३०/१०/१९८३ रोजी मा.छेदीलालजी गुप्ता यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.(जेसीजने दिलेल्या सन्मानपत्रात ’#Pioneer_in_the_introduction_of_MARATHI_GAZALS' असा स्पष्ट उल्लेख आहे.) आता मला सांगा वरील सर्व मान-सन्मान सुधाकर कदमांना काहीच न करता मिळाले असतील काय ? या अगोदर ५/७ वर्षे तरी त्यांनी मराठी गझल गायकीसाठी मेहनत घेतली असेल ना ?


     मराठी गझल गायकीला तशी फार मोठी परंपरा नाही.जास्तीत जास्त ३५ वर्ष,फारच ओढाताण केली तर ४० वर्षे,बस्स ! तेही ओढून ताणूनच,त्यापलीकडे ही परंपरा जात नाही.त्यातही महाराष्ट्रातील विविध वर्तमानपत्रांचे लेखी पुरावे जर पाहिले तर हा काळ आणखी कमी होतो.आणि इतिहास लिहीतांना तोंडी माहितीपेक्षा लेखी माहितीला जास्ती महत्व असते.लेखी पुरावे आणि विविध संस्थांनी मराठी गझल गायकीतील योगदानाबद्दल दिलेल्या पुरस्कारांचा विचार केला तर मराठी गझल गायकीची सुरवात सुधाकर कदम यांचे पासून झाल्याचे दिसून येते.सुरवातीच्या काळात सुरेश भट आणि सुधाकर कदम विदर्भात फिरले.नंतर मराठवाडा आणि शेवटी पश्चिम महाराष्ट्र.या वेळी कार्यक्रमाचे निवेदन कधी स्वतः सुरेश भट तर कधी डॉ.सुरेशचंद्र नाडकर्णी करायचे.३/४ वर्षे महाराष्ट्रभर भ्रमंती केल्यानंतर "#अशी_गावी_मराठी_गझल" ह्या कार्यक्रमाची सांगता १५ जुलै १९८२ ला पुण्यात महाराष्ट्र परिषदेच्या माधव ज्युलियन सभागृहात झाली.या कार्यक्रमाचे निवेदन स्वतः सुरेश भटांनी केले.प्रमूख उपस्थिती डॉ.सुरेशचंद्र नाडकर्णी यांची होती.आयोजक होते ग.वा.बेहरे (कार्याध्यक्ष,महाराष्ट्र साहित्य परिषद) आणि राजेंद्र बनहट्टी (कार्यवाह,म.सा.प.).


     यानंतर कदमांनी एकट्याने कार्यक्रम करणे सुरु केले.या कार्यक्रमाचे निवेदन आर्णीचे कवी कलीम खान करायचे.(काही कार्यक्रमांचे निवेदन प्रसिद्ध कवी प्रा.नारायण कुळकर्णी कवठेकर यांनी सुद्धा केले) मध्यप्रदेशातील इंदूर येथील जाल सभागृहातील दि.२८ ऑक्टोबर १९८९ चा कार्यक्रम या दोघांनी चांगलाच गाजवला.मराठी गझल गायनाचा मध्यप्रदेशातील हा पहिला वहिला कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला मध्यप्रदेशातील सुप्रसिद्ध रंगकर्मी श्री बाबा डिके आणि अभिनेता चंदू पारखी उपस्थित होते.


"अशी गावी मराठी गझल" या कार्यकमावरील तत्कालीन विविध वर्तमानपत्रांच्या निवडक प्रतिक्रीया...


१) स्थानिक ’स्वरशोधक’ मंडळातर्फे यवतमाळचे सुधाकर कदम यांच्या मराठी गझल गायनाचा कार्यक्रम को-ऑपरेटीव्ह बँकेच्या सभागृहात संपन्न झाला.सतत तीन तास पर्यंत बहुसंख्य रसिक या आगळ्या मैफिलीची खुमारी लुटत होते.स्वर आणि शब्दांची उत्कृष्ट सांगड घालून सादर केलेल्या गझला वर्धेच्या रसिकांच्या बराच काळ पर्यंत स्मरणात राहतील. ..............

●दै.नागपुर पत्रिका,११/४/१९८१


२) कोमल हळवी गझल श्री सुधाकर कदम त्यातल्या भावनेला फंकर घालीत हळुवारपणे फुलवितात.त्यातील शब्दांच्या मतितार्थाचे हुबेहुब चित्र रसिकांपुढे प्रकट करतात..............

●दै.लोकसत्ता,मुंबई.१४/७/१९८२


३) सुधाकर कदम याच्या गझल गायकीने,रसिक पुणेकरांना बेहद्द खूष केले.हा तरूण गायक प्रथमच पुण्यात आला,पुणेकरांनी त्याला प्रथमच ऐकले. आणि परस्परांच्या तल्लीनतेने साहित्य परिषदेच्या सभागृहाला श्रवण सुखाचे नवे लेणे अर्पण केले.सुधाकर कदम सुंदर गातात.त्यांच्या मधुर स्वरांना सारंगीची आणि तबल्याचीही सुरेख साथ लाभली होती.त्यामुळे आजचा कार्यक्रम चांगलाच रंगला............

●दै. तरूण भारत,पुणे.१६/७/१९८२.


४) सुरेश भटांनी शाबासकी दिलेल्या विदर्भातील सुधाकर कदम यांची ऐकण्यास उत्सुक असलेले पुणेकर कार्यक्रमाअगोदर सभागृहात हजर झाले होते. सुधाकर कदमांनी ’सा’ लावला मात्र पुणेकरांनी टाळ्यांचा कडकडाट करून त्यांचे उत्स्फूर्तपणॆ स्वागत केले.आणि मग अशी रंगली मैफल की काही विचारू नका....गझल ही भावगीत किंवा सुगम संगीताच्या चालीवर गायची नसते तर शब्दाच्या मूळ अर्थाला आणखी अर्थ लावून शब्दाचा आनंद सामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी गझल गायनाचा हा केलेला महाराष्ट्रातील पहिला प्रयत्न निश्चितच अभिनंदनीय आहे............

.●सुभाष इनामदार, सा.लोकप्रभा,मुंबई.दि.१५ आँगष्ट १९८२.


५) सुरेश भटांचे शब्द आणि सुधाकर कदम यांचे स्वर यातून फुललेली गझल भावपूर्ण,अर्थपूर्ण आणि उत्कंठापूर्ण होती.गझल गायनाचा ढंग हा शब्दांना अधिक अर्थ देतो.गझलांचे जे वैशिष्ठ्य उत्कंठा वाढवून धक्का देणे-तो प्रकार सुधाकर कदम यांच्या गायकीत प्रामुख्याने दिसला........................... 

●दै.लोकसत्ता,२३/७/१९८२.


६) ’हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही’ या गझलेचा प्रारंभच कदमांनी नजाकतीने केला.त्यातील ’नाही’ या शब्दावरील स्वरांचा हळुवारपणा सुखावुन गेला..............

●दै.केसरी,पुणे. दि.२५/७/१९८२.


७) मराठी गझल कशी गावी हे जाणून घ्यायचे असेल तर श्री सुधाकर कदमांची मैफल एकदा तरी ऐकावी.......... ●दै.सकाळ,पुणे.


८) गायकीतील फारसं कळो वा न कळो सुरेश भटांचे शब्द आणि सुधाकर कदमांचे स्वर एक वेगळं इंद्रधनुष्य घेऊन येतं.त्यांच्या मैफिलीत कधी चांदण्यांचे स्वर तर कधी स्वरांचे चांदणे होते.......................

●अनंत दीक्षित,दै.सकाळ,कोल्हापुर.६ जुलै १९८२


९) सुधाकर कदम यांनी उर्दू गझलप्रमाणे मराठी गझल कशा गायिल्या जातात याचे उत्कृष्ट दर्शन यावेळी रसिकांना करून दिले............

●दै.लोकमत,औरंगाबाद.३/३/१९८२


१०) Mr.Kadam's speciality is his throw of words coupled with exact modulations.His presentation is perfect & systematic wich at once impresses & touches................

●The Hitwad,Nagpur.23/4/1984


११) सुधाकर कदम की गायकी के अंदाज़ को समय समय पर दाद मिली...

●दै.नवभारत,नागपुर. ६ जुलाई १९८४


१२) कदाचित सुरेश भट यांच्या गझलची प्रकृती आणि सुधाकर कदम यांच्या आवाजाची जातकुळी एक असावी म्हणून सुरेश भटांच्या गझलमधील आत्मा सुधाकर कदम यांच्या आवाजाला गवसला असावा............

●दै.लोकमत,नागपुर.१३/७/१९८४


१३) मराठी गज़ले भी उर्दू की तरह सुमधूर होती है....................

●दै.चौथा संसार,इंदौर.२७/१२/१९८९


-#मस्त_कलंदर

१४.१०.२०११




Friday, November 21, 2025

म.सा परिषद, पिंपरी चिंचवड तर्फे सत्कार...

महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखाध्यक्ष श्री राजन लाखेंच्या हस्ते सत्कार स्वीकारताना...१५/११/२०२५

 

म.सा.प.पिंपरी चिंचवड कार्यक्रम...



'हसून वा रडूनिया तुझे तुला जगायचे 
असेच दुःख झेलुनी सुखासवे फुलायचे '

'गाऊन सोसले मी, सोसून गायिले मी 
आयुष्य जाळले मी, प्रिये तुझ्याचसाठी... '

ह्या गझला आहे गझल गंधर्व सुधाकर कदम यांच्या, तर

'लोपला चंद्रमा लाजली पौर्णिमा, चांदण्यांनी तुझा चेहरा पाहिला 
सांगतो मी खरे, फार झाले बरे, फक्त त्यांनी तुझा चेहरा पाहिला... '

ही गझल आहे गझलकार श्रीकृष्ण राऊत यांची. अशा एकाहून एक सरस गझलांनी रंगलेल्या मैफलीत रसिक वृंद न्हाऊन निघाले. महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी-चिंचवड आयोजित 'सरगम तुझ्याचसाठी' हा संगीतमय कार्यक्रम निगडी येथील साहित्य परिषदेच्या शांता शेळके सभागृहात संपन्न झाला. या वेळी व्यासपीठावर महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष राजन लाखे, संगीतकार सुधाकर कदम उपस्थित होते. सुनीता बोडस यांनी सर्व कलाकारांची ओळख करून दिली.
आयुष्याच्या वाटचालीत येणारे अनुभव, सुख दुःखाच्या विविध भावना असलेल्या आशयपूर्ण रचना गायक मयुर महाजन आणि प्राजक्ता सावरकर शिंदे यांनी सादर करून रसिकांची मने जिंकली. त्यावेळी सहकलाकार मुकुंद पेटकर (हार्मोनियम), प्रभंजन पाठक (व्हायोलिन), ओंकार भुसारे (तबला), आशिष कदम (की बोर्ड) यांनी साथ दिली. सदर कार्यक्रमात ईला पवार यांचा त्यांच्या सांगीतिक वाटचालीबद्दल सत्कार करण्यात आला.
राजन लाखे यांनी प्रास्ताविकात या कार्यक्रमामागची भूमिका स्पष्ट केली. शाहीर सुरेशकुमार वैराळकर यांनी सूत्रसंचालन केले आणि चोखंदळ रसिकांचे आभार मानले.


 

ये न ये टिपूरसे चांदणे पुन्हा पुन्हा...

ये न ये टिपूरसे चांदणे पुन्हा पुन्हा
हो न हो कधी असे जागणे पुन्हा पुन्हा

का जपून बोलशी ? शब्द शब्द तोलशी ?
हे असे न व्हायचे  बोलणे पुन्हा पुन्हा

माझिया मनातला चंद्र मी तुला दिला
का अनोळखी तुझे वागणे पुन्हा पुन्हा

दुःख जीवनातले काय मी न सोसले?
हे तुझे न सोसवे  हासणे पुन्हा पुन्हा

सांग एकदा मला ही तुझी कशी  कला?
जाळणे पुन्हा पुन्हा. टाळणे पुन्हा पुन्हा

गायक - मयूर महाजन आणि प्राजक्ता सावरकर शिंदे.

शब्द - ज्योती राव ( बालिगा )

सहकलाकार - मुकुंद पेटकर (हार्मोनियम),प्रभंजन पाठक (व्हायोलिन), ओंकार भुसारे (तबला),आशिष कदम (की बोर्ड) आणि सूत्र संचालन - शाहीर सुरेशकुमार वैराळकर.



 

सरगम तुझ्याचसाठी...

                       सरगम तुझ्याचसाठी, गीते तुझ्याचसाठी
                       गातो गझल मराठी, प्रीये तुझ्याचसाठी

व्याकुळ ही विराणी, गाते तुझी कहाणी
शिवरंजनी दिवाणी, प्रीये तुझ्याचसाठी

घन सावळा गरजतो, बेबंद तान घेतो
बरसून शांत होतो, प्रीये तुझ्याचसाठी

सोसून गायिले मी, गाऊन सोसले मी
आयुष्य जाळले मी, प्रीये तुझ्याचसाठी

सहकलाकार-मुकुंद पेटकर (हार्मोनियम),प्रभंजन पाठक (व्हायोलिन), ओंकार भुसारे (तबला),आशिष कदम (की बोर्ड) आणि सूत्र संचालन - शाहीर सुरेशकुमार वैराळकर.

दि.१५ नोव्हेंबर २०२५,महाराष्ट्र साहित्य परिषद,पिंपरी चिंचवड शाखा.शांता शेळके सभागृह, प्राधिकरण,
निगडी,पुणे.


 

तुझे तुला जगायचे...



हसून वा रडूनिया तुझे तुला जगायचे
असेच दुःख झेलुनी सुखासवे फुलायचे

कधी कुठे असायचे कधी कुठे नसायचे
खुडून टाकले तरी नभात भिरभिरायचे

सुगंध घेउनी सवे दवात रोज न्हायचे
पुन्हा पुन्हा फलूनिया खुशाल दर्वळायचे

मधाळ चांदरातही न राहिली मिठीत या
म्हणून का उगीच मी तुझ्याविना झुरायचे

हवे तसे जगावयास ना मिळे कुणासही
कठोर सत्य हेच तर कशास मग रडायचे

गायक - मयूर महाजन 
गायिका - प्राजक्ता सावरकर शिंदे
शब्द आणि संगीत - #गझलगंधर्व​ सुधाकर कदम

सहकलाकार-मुकुंद पेटकर (हार्मोनियम),प्रभंजन पाठक (व्हायोलिन), ओंकार भुसारे (तबला),आशिष कदम (की बोर्ड) आणि सूत्र संचालन - शाहीर सुरेशकुमार वैराळकर.

दि.१५ नोव्हेंबर २०२५,महाराष्ट्र साहित्य परिषद,पिंपरी चिंचवड शाखा.शांता शेळके सभागृह, प्राधिकरण,
निगडी,पुणे.


 .

Sunday, October 26, 2025

अक्षरवेध (सुरेश भट विशेषांक) दिवाळी अंकाचे प्रकाशन.महाराष्ट्र साहित्य परिषद,पिंपरी चिंचवड शाखा.संपादक-राजन लाखे.●माझे_मनोगत.

 

  


   



                 आणि 'अक्षरवेध' मधील लेख

.                          ●सुरेश भट आणि मी●

 

          माझी आणि भटांची पहिली भेट मुंबईला झाली. मी आणि शंकर बडे त्या वेळी मुंबानगरीत हात पाय मारत होतो. १९७७-७८ ची घटना असावी. दिवसभर दूरदर्शन, एच.एम.व्ही संगीतकार श्रीकांत ठाकरे यांची भेट अशी भटकंती करुन थकलेल्या अवस्थेत रात्री पंढरीनाथ सावंतांकडे खास माशाच्या कोकणी कालवणाचे जेवण झाल्यावर चर्चा सुरू असताना अचानक पंढरीनाथ सावंतांनी सुरेश भट मुंबईत असल्याचे सांगितले. आम्ही दुसरे दिवशी भटांना भेटायला आमदार निवासात पोहचलो. शंकरची भटांशी नुकतीच ओळख झाली होती. त्याने माझी ओळख करून दिली. लगेच भटांनी सवयीप्रमाणे ‘‘गाऊन दाखवा’’ असा आदेश दिला. बिना साथीने मला जसे जमेल तसे गाऊन दाखवले, हे प्रकरण इथेच संपले. त्यानंतर नागपुरच्या विदर्भ साहित्य संघाच्या संगीत विभागाच्या उद्घाटनाप्रित्यर्थ गडकरी सभागृहात माझा कार्यक्रम होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेश भट होते.या कार्यक्रमाच्या पूर्वार्धात मी सरोद वादन केले. त्यानंतर मराठी-उर्दू गझला सादर केल्या. माझ्या स्वररचना भटांना आवडल्या. इथून आमची मैत्री सुरु झाली. सुरुवातीला त्यांनी ‘हा ठोकरुन गेला’ ‘कुठलेच फुल आता पसंत नाही’ अशा आणखी तीन गझला स्वरबद्ध करायला दिल्या. एक महिन्यानंतर नागपूरला चक्कर झाली तेव्हा त्यांना ‘ठोकरुन’ व ‘पसंत नाही’ या दोन गझला ऐकवल्या. ‘ठोकरुन’ची बंदिश त्यांना आवडली. पण ‘पसंत नाही’ वर मात्र ‘तू घरंदाज बाईला तमाशात नाचवले’ अशा शेरा मारला. (नंतर याच गझलच्या बंदीशीवरून मला '#महाराष्ट्राचे_मेहदी_हसन' ही उपाधी पण दिली.) त्यावरुन काहीतरी चुकल्याचे लक्षात आले. माझा पडलेला चेहरा पाहून गझलची शब्दानुरुप बंदिश कशी असायला हवी हे कळावे म्हणून मेहदी हसन, फरीदा खानम, गुलामअली यांच्या ध्वनिफिती देऊन त्यांच्या गायकीचा अभ्यास करायला सांगितले. तो पर्यंत मी अनेक गाणी बसविली होती, अनेक नाटकांना संगीत दिले होते. दहा वर्षांचा ऑर्केस्ट्राचा अनुभव होता. तरी सतत वर्षभर या ध्वनिफितीतील बंदिशी, शब्दोच्चार, शब्दानुसार स्वररचना, शब्दफेक, भावाभिव्यक्ती याचा अभ्यास केला आणि नंतर आमचा मराठी गझला महाराष्ट्रभर पोहचवण्याचा ऐतिहासिक दौरा #अशी_गावी_मराठी_गझल सुरु झाला.

 

      या दरम्यान मी जसा नागपूरला जायचो,तसे भटही आर्णीला यायचे.आर्णीला गझल आणि संगीत याशिवाय दुसरी चर्चा नसायची. भटांच्या गझला, माझ्या बंदिशी आणि रंगलेल्या मैफिली असा नुसता जल्लोष असायचा. 


       भटांसोबतच्या काही वर्षांच्या सहवासात अनेक मजेदार घटना घडल्या. खरे म्हणजे ‘त्या’ आमच्यातील वैयक्तिक ठेवा  आहेत. एकदा नागपूरला गायक अनिल खोब्रागडे, कादरभाई, गायिका प्रमोदिनी क्षत्रिय, व्हायोलिन वादक प्रभाकर धाकडे वगैरे मंडळी सोबत मैफल जमविण्याचे ठरले होते. मैफल रात्री होती. मी दुपारी भटांकडे पोहोचलो. सायंकाळ झाल्यावर त्यांनी आपण जरा बाहेर जाऊ असे म्हणून व त्यांच्याकडे असलेली हार्मोनियम त्यात टाकून आम्ही निघालो. भटांचा त्या दिवशीचा मूड जरा वेगळाच वाटला. सदैव बोलणारे भट त्या दिवशी अबोल होते. जवळ-जवळ एक तास दिशाहीन भटकंती झाल्यावर हळूच म्हणाले ‘‘सुधाकर आपण कुठं तरी बसू या का?" या वेळेपर्यंत ८ वाजले होते. ९ वाजता आमची मैफल ठरली असल्यामुळे मी त्या काळजीत. पण भटांनीच कुठेतरी बसू म्हटल्यावर नाही म्हणणे शक्य नव्हते. म्हणून माझ्या साळ्याकडे-अनिल चांदेकरकडे मोर्चा वळवला. त्याच्याकडे पोहोचल्याबरोबर सौ. चांदेकरांना झुणका भाकर व पोळ्या करण्याचा हुकूम करुन भट बैठकीत एका बाजूला कागद पेन घेऊन बसले. एव्हाना रात्रीचे १० वाजले. आमच्या मैफलीचे काय झाले ते आपण समजू शकता. थोड्याच वेळात त्यांनी ‘हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही, चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही’ हा मतला मला दिला व चाल बसत गेली, तिकडे गझल पूर्ण होत गेली. रात्री दोन अडीच वाजता पूर्ण गझल लिहून मला कागद दिला व जेवण वाढायला सांगितले.आमची ठरलेली मैफल हुकली पण रात्र मात्र संस्मरणीय ठरली. या गझलने माझ्या प्रत्येक कार्यक्रमात दाद घेतली हे मला अभिमानाने सांगावेसे वाटते.


- औरंगाबाद, देगलूर, मानवत, नांदेड असा मराठवाड्याचा दौरा आटोपून परत नागपूरला निघालो असताना भटांनी नांदेडला एक तलवार व एक कुकरी विकत घेतली. ती सांभाळण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविली. माझ्या दुर्दैवाने आमची एस.टी. बस मधल्या कुठल्यातरी थांब्यावर बंद पडली. एस. टी. बदलणे, त्यात सामान टाकून आसन मिळवणे या प्रकारात तलवार व कुकरी बंद पडलेल्या एस. टी. बसमध्येच राहिली. आमची बस व्हाया यवतमाळ नागपुर असल्यामुळे मी यवतमाळला उतरुन दुस-या बसने आर्णीला जाणार होतो. यवतमाळला मी बसमधून बॅग घेऊन उतरत असताना तलवार व कुकरी कुठे आहे असे भटांनी विचारले तसे मी सामान ठेवायची जागा पाहू लागलो व दोन्ही शस्त्र बंद पडलेल्या एस. टी. त राहिल्याचे लक्षात आले. ही गोष्ट मी भटांना सांगितली तसे भट मिश्किलपणे म्हणाले ‘‘कसा रे तू मराठा? साधी तलवार व कुकरी सांभाळता आली नाही!’’ मी क्षणभर विचार केला अन उत्तरलो ‘‘मी तर तलवार अन कुकरीच गमावली तुम्ही तर अख्खी मराठेशाही गमावली !’’ यावर जोरजोरात हसत त्यांनी ‘‘क्या बात है!’’ असा प्रतिसाद दिला.

         विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र असे दौरे आटोपल्यावर, पुण्यात ‘अशी गावी मराठी गझल’ नावाचा कार्यक्रम झाल्यावर नागपुरातील रसिक मंडळींनी धनवटे सभागृहात माझा एकट्याचा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमाचे निमंत्रण द्यायला मी भटांकडे गेलो. बराच वेळ गप्पाटप्पा झाल्यावर कार्यक्रमाविषयी सांगून उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले. त्यावर

‘‘मी काहून कार्यक्रमाले यावं? असा प्रश्न भटांनी केला.

‘‘माझा कार्यक्रम आहे म्हणून’’ मी.

‘‘तू कोन टिकोजी लागला का?’’ भट.

‘‘टिकोजी नाही पण तुमचा कोणी तरी लागतो ना?’’ मी.

‘‘तुले तं मालूम आहे का मी ऐ-या गै-याच्या कार्यक्रमाले जात नाही!’’ भट.

अशी गंमत सुरू असताना भटांनी कपाटातली ‘अंगूर की बेटी’ काढली.  मलाही आग्रह केला परंतु दिवसाढवळ्या ‘दारूकाम’ न करण्याचे ठरवल्यामुळे ‘नाही’ म्हणालो. लगेच भट म्हणाले ‘‘आता सांग तू का म्हंतं ते!’’ यावर मी, ‘‘पिदाडांशी जास्ती बोलत नसतो’’असे म्हणताच भट खो खो करुन हसायला लागले व ‘‘लयच चालू आहे रे तू!’’ असे म्हणून पुन्हा जोरजोरात हसायला लागले.

 मराठवाडा दौ-याचे वेळी औरंगाबाद मुक्कामी लोकमत कार्यालयातील कार्यक्रम आटोपल्यावर दुसरे दिवशी सकाळीच भटांना गझलचा मुखडा सुचला तो मला दिला. मी चाल बसवायला लागलो व भट लिहायला लागले. चौथा शेर मला त्यांनी दिला परंतु वाचल्यानंतर त्याचा अर्थ उमगायला वेळ लागला. म्हणून मी भटांना म्हटले ‘‘हा शेर गझल मध्ये ठेवू नका, कारण याचा अर्थ पटकन ध्यानात येत नाही. तुमच्या म्हणण्याप्रमाणे शेर वाचला की ऐकणा-याला पटकन कळायला हवा." यावर भट म्हणाले ‘‘कवी कोण आहे? मी का तू? तू आपलं काम कर’’ त्यावेळी मी चूप बसलो. या प्रसंगानंतर काही महिन्यांनी पुण्याला कार्यक्रम होता. आम्ही भटांच्या सासुरवाडीत सदाशिवपेठेत मुक्कामी होतो. कार्यक्रम सायंकाळी असल्यामुळे दुपारी घरीच मैफल जमली. त्यावेळचे सर्व नवोदित गझलकार याप्रसंगी उपस्थित होते. ‘‘मी असा त्या बासरीचा सूर होतो, नेहमी ओठांपुनी मी दुर होतो’’ ही गझल गायला सुरवात केली. यमनमधील या बंदिशीत दुसरा शेर सादर करताना दोन्ही मध्यमांचा वापर केला. गझल संपल्यावर भट म्हणाले ‘‘तो दुस-या शेरात तू कोणता सुर लावला तो काही जमल्यासारखा वाटला नाही’’ माझ्या मनात औरंगाबाद खदखदत होतेच. मी लगेच म्हणालो ‘‘बावाजी संगीतकार कोण आहे? मी का तुम्ही? भटांच्या लगेच लक्षात आले व म्हणाले ‘‘वा औरंगाबादकर!’’. आणि आम्ही दोघेही हसायला लागलो. सुरेश भटांमुळे मी मराठी गझल गायक झालो असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. त्यांच्यामुळेच मला अमरावतीत झालेल्या डॉ. नईमभाईंच्या चर्चेत सहभागी होता आले. इस्लामपूर्व गझलेचा शेर नईमभाईंनी सुरेश भटांना काढून दिला या ऐतिहासिक प्रसंगाला उपस्थित राहू शकलो. भटांमुळेच सुरवातीच्या काळात वर्धेसाठी शेतकरी मेळाव्यात श्री शरद पवारांसमोर कार्यक्रम करु शकलो. बॅ. अंतुले मुख्यमंत्री असताना नागपूरच्या अधिवेशन काळात रा. सु. गवई यांचे कॉटेजवर अंतुले, जवाहरलाल दर्डा प्रभृतींसमोर कार्यक्रम सादर करु शकलो. सत्कारही स्वीकारु शकलो. शाहीर सुरेशकुमार वैराळकर या प्रसंगी हजर होते. १९८२ पासून तिकीट लावून माझे कार्यक्रम सुरू झालेत याचे श्रेयही भटांनाच आहे. ते मला तेव्हाच ‘#गझलनवाज़’ म्हणायचे परंतु मेहदी हसन, गुलाम अली, जगजित सिंग सारख्या मंडळीसमोर आपण क:पदार्थ असल्यामुळे स्वत:ला ‘गझलनवाज़’ म्हणवून घेणे मला पटले नाही. त्याची गरजही वाटली नाही, वाटत नाही.

       आठवणींच्या गराड्यात अनेक आठवणी पिंगा घालीत आहेत. एक महत्वाची आठवण नमुद करुन संपवितो. मिरजेतील नवरात्र संगीत महोत्सवातील कार्यक्रम आटपून महाराष्ट्र एक्सप्रेसने धामणगाव-यवतमाळ असा प्रवास करुन आर्णीला साडेचार वाजता पोहोचलो. तर घरी भटांची तार येऊन पडलेली ‘‘ताबडतोब निघुन अमरावतीला ढवळेंकडे यावे, हृदयनाथ मंगेशकर येत आहेत’’ ही घटना १९८१-८२ च्या दरम्यानची असावी. त्यावेळी आर्णीहून बाहेरगावी जाण्यासाठी एकही बस नव्हती. पदर पसरून कशीबशी एकाजणाची मोटारसायकल मिळवून वासुदेव भगत या जिवलग मित्राला सोबत घेऊन अमरावतीकडे निघालो. यवतमाळच्या थोडे पुढे जात नाही तो मोटारसायकल बंद पडली. भगत हे कसलेले मेकॅनिक असल्यामुळे कसेबसे सकाळपर्यंत अमरावतीला पोहोचलो. भटांची भेट झाल्यावर रात्री ढवळेंकडे हृदयनाथांसोबत जेवण व माझी मैफल असा कार्यक्रम असल्याचे कळले. सायंकाळी ६ वाजता मंगेशकर आले. सगळ्यांशी गप्पा झाल्यावर भटांनी मला व हृदयनाथांना एका खोलीत नेऊन बसवले. आमची दर्जेदार‘व्यवस्था’करून दिली व ‘चलने दो’ चा इशारा करुन खोलीतून निघून गेले. आम्ही दोघांनी मस्तपैकी आस्वाद घेत संगीत नियोजन, बंदिशी, ध्वनीमुद्रण यावर एक दीड तास चर्चा केली. नंतर सोबत जेवण केले. मैफल जमवली. हृदयनाथ मंगेशकरांसमोर गाणे म्हणजे तोंडाचा खेळ नव्हता. परंतु भटांनी अतिशय समजुतदारपणे आमची अगोदरची ‘‘बैठक’’ जमविल्यामुळे मैफल जमवायला त्रास झाला नाही. मैफिलीनंतरही रात्री दोन वाजेपर्यंत मी आणि मंगेशकर गप्पा मारीत बसलो होतो. हे सगळे भटांमुळेच होऊ शकले.

       सर्व सामान्यापेक्षा वेगळं रसायन कवटीत घेवून जन्मलेले एक अफलातून व्यक्तिमत्व म्हणजे सुरेश भट होय. त्यांच्यामधे नेहमी एक कवी, तत्त्वज्ञ वावरायचा त्याच वेळी एक क्षणात रागावणारं, क्षणात गळ्यात पडणारं, क्षणात हसणारं, क्षणात आकांडतांडव करणार अवखळ निरागस व हट्टी मूलही त्यांच्यात हुंदडत असायचं... त्यांच्यातली मिश्किली भल्याभल्यांना कोड्यात टाकायची. सुरेश भटांच्या सहवासातील अनेक वर्षात मी त्यांच्या स्वभावाची जवळ-जवळ सर्व रुपे पाहिली. त्यातील काही रुपे आजही स्वच्छपणे समोर दिसतात. त्यांचे नवोदित गझलकारांना पोटतिडकीने मार्गदर्शन करतांनाचे आणि त्यांच्या आकाशवाणीवरील ६५ च्या कराराकरीता केंद्र निदेशकाशी वाद घालतानाचे भट... नवीन गझल लिहीणा-यांमध्ये एखादा फार जवळीक निर्माण करणारा जर परिस्थितीने गांजला असेल तर त्याला स्वत: व आमच्या सारख्यांना सांगून धान्य पुरवणारे कुटूंबप्रमुख भट... एखाद्याचा मुद्दा पटला नाही तर तोंडावर सांगण्याचा सडेतोडपणा व आवडला तर आवर्जून सांगणारे भट... जगण्यातील बिनधास्तपणा व त्यामुळे घडणा-या प्रसंगाला तोंड देणारे बिनधास्त भट... एखाद्या विषयी कसा का होईना गैरसमज झाला तर कोणी कितीही आणि कसेही समजाऊन सांगितले तरी न ऐकता गैरसमज कायम ठेवणारे एक वेगळे भट... जेवताना किंवा काही खाताना इतरांकडे लक्ष न देता ‘‘पार्वती पते हरहर महादेव’’ करणारे लहान मुलासारखे भट... जेवणातील एखादा पदार्थ आवडला तर बनविणा-या सुगृहिणीचे/बल्लवाचार्याचे मनापासून कौतुक करून त्यांची रेसिपी समजून घेणारे खवय्ये भट... भल्या-भल्यांशी पंगा घेणारे भट... स्वत:च्या मुलाच्या- हर्षवर्धनच्या भविष्याच्या काळजीने व्यथित होणारे भट... सामाजिक कार्यात पोटतिडकीने भाग घेणारे भट... सामाजिक, राजकीय व्यंगावर रोखठोकपणे लिहिणारे भट... जेवणापेक्षाही चहा-तंबाखूवर जास्ती प्रेम करणारे भट...सुरेश भटांची अशी कितीतरी रूपं माझ्या स्मरणात  अजूनही दरवळतात.

         आमची ही मैत्री म्हणजे एक वेगळं विश्व होतं आम्ही भांडायचो, वाद व्हायचे, प्रसंगी अबोला-रुसवा सुद्धा व्हायचा. शेवटी शेवटी मतभेदांमुळे थोडा दुरावा येत गेला पण मैत्री शेवटपर्यंत टिकून राहिली. त्यांच्या कडू-गोड आठवणी आणि स्वरबद्ध केलेल्या त्यांच्या चाळीस गझला व दहा गीते आजही मला साथ देत आहे. वरून फणसासारखा भासणा-या सुरेश भटांचे अंतरंग अच्छा-अच्छांना कळले नाही.केवळ त्यांच्या खाण्या-‘पिण्याची’ चवीने चर्चा करणा-यांना ते कधी कळणारही नाही.या फणसातील गोड गरे चाखण्याची संधी मला मिळाली हे मी माझे भाग्य समजतो.

 

-सुधाकर कदम

सी-१-सी/१३,गिरीधर नगर,

वारजे-माळवाडी,पुणे-५८.

 मोबा.8888858850


(● हा लेख माझा वैयक्तिक अनुभवाचा ठेवा आहे. यातील कुठल्याही घटनेचा उल्लेख कुणी स्वतःच्या लेखात करण्या अगोदर परवानगी घेणे आवश्यक.)


◆ ज्या गझलच्या बंदीशिवरून 'महाराष्ट्राचे मराठी मेहदी हसन' ही उपाधी सुरेश भटांनी दिली,त्या गझलची युट्युब लिंक.

https://youtu.be/pnu2_4bjcPE?si=KlXN9J8e3d02sgUD

Tuesday, September 9, 2025

रे मना, तुज काय झाले सांग ना!


  


   दक्षिण भारतीय संगीत तज्ज्ञ म्हणतात की,भारतीय शास्त्रीय संगीताला काही मुसलमान संगीकारांनी भ्रस्ट केले.तर काही मुसलमान संगीतकरांचे म्हणणे आहे की,मुसलमान संगीत तज्ज्ञांनी  भारतीय शास्त्रीय संगीताला त्यांनी सजवले,त्यास सौंदर्यपूर्ण केले.

      इतिहास पहिला तर भारतीय व्यापाऱ्यांचे अरब व्यापाऱ्यांशी शेकडो वर्षांपासून व्यापरिक संबंध होते.हजरत मुहम्मदाच्या जन्मापूर्वीचे काही अरबी ग्रंथ रामपूरच्या 'रजा पुस्तकालयात' सुरक्षित आहेत,त्यात काही विशिष्ठ गीतांची 'स्वरलिपी' पण आहे.जी सामगायन करणाऱ्या 'गात्रवीणा विधी'ने प्रभावित आहे.यावरून हे लक्षात येते की,अरब लोक इस्लामचा उदय होण्या अगोदरपासून भारतीय स्वरविधीशी परिचित होते.दक्षिण भारताशी तर अरब व्यापाऱ्यांचा संबंध फार प्राचीन आहे.इसवी सन ८६८ मध्ये जाहज नामक एका अरबी लेखकाने भारतीय संगीताची भरपूर तारीफ केली आहे.यात विशेषकरून 'एकतारा'ची (एकतंत्री वीणा) चर्चा महत्वाची समजल्या जाते.स्पेनचा इतिहासकार काजी साइद उदलूस्मीने,ज्यात रागांच्या स्वरांचे वर्णन आहे असे भारतीय ग्रंथ आमच्यापर्यंत पोहोचले असा उल्लेख इसवी सन १०१७ मध्ये केला आहे.(संदर्भ:-'अरब और हिंद के ताल्लुकात', लेखक-सैयद सुलेमान नदवी, हिंदुस्तानी एकेडेमी,पृ.१५७.) अमीर खुसरोने भारतीय संगीत जगात सर्वश्रेष्ठ असल्याचे म्हटले आहे.(संदर्भ:-'अरब और हिंद के ताल्लुकात', लेखक-सैयद सुलेमान नदवी, हिंदुस्तानी एकेडेमी,पृ.१५८.) भारतीय संगीत शिकण्यासाठी विदेशातून अनेक विद्यार्थी भारतात येत असल्याचा उल्लेख 'खिलजी कालीन भारत,या ग्रंथातील पृष्ठ क्रमांक १८० वर आहे.इसवी सन ७५३ ते ७७४ च्या मधल्या काळात अनेक भारतीय ग्रंथ अरबस्थानात नेऊन त्याचे अरबी भाषांतर करण्यात आले.त्यावेळी बगदादमध्ये खलिफा मन्सूर याचे शासन होते.खलिफा हारूनच्या (७८६ ते ८०८) काळात अनेक अरब विद्यार्थ्यांना विभिन्न विद्यांच्या अध्ययनासाठी भारतात पाठविले व भारतातील विद्वानांना बगदादला बोलविले.प्रसिद्ध संगीत तज्ज्ञ शेख बहाउद्दीन झकेरीयाचा संगीत संप्रदाय अरबी संगीताच्या प्रभावाखाली होता.झकेरीया सुफींच्या सुहरवर्दी परंपरेचे महापुरुष होते.यांचे कार्यक्षेत्र सिंध प्रांत असल्यामुळे पंजाब आणि सिंधच्या लोकगीतांचा  या संप्रदायावर पूर्ण प्रभाव होता.खैबर खिंडीतून आलेले मुसलमान व अरबस्थानातून आलेले मुसलमान यांचा स्वभाव,चरित्र,संगीत इत्यादींमध्ये  खूप तफावत होती. भलेही दोघांचे धार्मिक संबंध असेल पण सांस्कृतिक संबंध नव्हते. अरबी संगीत आणि इराणी संगीत भिन्न आहे.अमीर खुसरोला याचे ज्ञान होते.इरानी संगीताचे चार 'उसूल' आणि 'बारा पडद्यांचा' अभ्यास असूनही त्याने भारतीय संगीतालाच श्रेष्ठ मानले आहे.चिश्ती परंपरेतील प्रसिद्ध पुरुष शेख निजामुद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्यावर खुसरोच्या ज्या रचना गायिल्या जातात, त्या सर्व भारतीय लोकधुनांवर आधारित शुद्ध भारतीय आहे.(संदर्भ - 'संगीत चिंतामणी)

       अकबराच्या दरबारात ग्वाल्हेर परंपरेचे मर्मज्ञ तसेच फारसी परंपरेचे विदेशी कलाकार पण होते.या काळची परिस्थिती संगीतामध्ये नव-नवीन प्रयोग करण्यास अतिशय अनुकूल अशी होती. असे अबुल फजल यांच्या 'आईने अकबरी' मधील उल्लेखावरून कळून येते.या काळात अनेक प्रयोग झाले.या प्रयोगातूनच तानसेनाचा 'मियां मल्हार,'दरबारी कानडा'   

(कानडा हा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील रागांचा समूह आहे, ज्याला कान्हडा म्हणूनही ओळखले जाते. कानडा हे नाव कर्नाटक संगीत परंपरा आणि कन्नड देशात उद्भवले असावे असे सुचवते. या गटातील राग वेगवेगळ्या थाटांचे आहेत, परंतु विशेषतः आसावरी किंवा काफी थाटाचे आहेत.कानड्याचे एकूण १८ प्रकार मानले जातात.त्यात 

शाम कानडा,मंगल कानडा, कोलाहल कानडा, मुद्रिक कानडा, नागध्वनी कानडा, टंकी कानडा, जैजवंती कानडा, गारा कानडा, काफी कानडा, बागेश्री कानडा, सुघराई कानडा, सुहा कानडा, शहाणा कानडा, अडाना कानडा, हुसैनी कानडा,अभोगी कानडा, कौशी कानडा, नायकी कानडा हे प्रकार आहेत.यातील अनेक प्रकार आज नामशेष झाले आहेत.)  

'मियां की तोडी'(गुजरी अथवा गुर्जरी तोडी,देसी तोफा,हुसैनी तोडी,आसावरी उर्फ कोमल रिषभ आसावरी असे तोडीचे अनेक प्रकार प्रसिद्ध आहेत.)  

धोंधूचा 'धोंधू की मल्हार', चरजूचा 'चरजू की मल्हार' (मेघ मल्हार,रामदासी मल्हार,गौड मल्हार,सूर मल्हार,देश मल्हार,नट मल्हार,धुलिया मल्हार,मीरा की मल्हार असे मल्हारचे पण अनेक प्रकार आहेत).या प्रकारे नवीन राग संगीत जगताला मिळत गेले.ही परंपरा पुढेही सुरू राहिली.

     जहांगीरच्या काळात तानसेनाचा मुलगा बिलास खान याने 'बिलासखानी तोडी' नामक अतिशय गोड रागाची रचना केली. हा राग भैरवी थाटोत्पन्न मानतात.याला जवळचे असे भैरवी, भूपाल तोडी व कोमल रिषभ आसावरी हे तीन राग आहेत. हे तीनही राग समप्रकृतिक असले तरी चलन,स्वर लागाव,वर्ज स्वर यामुळे एकदम वेग-वेगळे आहेत.बिलासखानी तोडीचे चलन तोडीप्रमाणे असल्यामुळे यातील गांधार स्वर तोडीप्रमाणेच अती कोमल लावायला हवा.यात पंचम हा न्यास स्वर आहे.पण अवरोहात याला घेतल्या जात नाही.तसेच आरोहात वर्ज असलेला निषाद कधी कधी रंजकता वाढविण्याकरिता घेतल्या जातो.हा एक अतिशय गोड आहे पण गायला मात्र कठीण आहे.हा मींडप्रधान राग आहे.याची प्रकृती शास्त्रानुसार शांत आणि गंभीर आहे.या रागात हिंदी वा मराठीत गाणी नसल्यातच जमा आहे.'लेकिन' या चित्रपटातील गुलजार यांचे शब्द व हृदयनाथ मंगेशकरांचे संगीत दिग्दर्शन असलेल्या 'झुठे नैना बोले सांची बतीया' ह्या आशा भोसले व पं.सत्यशील देशपांडे यांनी गायिलेल्या एका अप्रतिम गाण्यासाठी हा लेख प्रपंच केला आहे. ज्या रसिकाने हे गाणे ऐकले नसेल त्याने जरूर ऐकावे! 

     बिलासखानी रागावर आधारित एक माझेच गीत २०१८ मध्ये स्वरबद्ध केले होते..स्पॉटिफाय (spotify) युट्युब (youtube) सह इतर सर्व ऑडिओ प्लॅटफॉर्मवर हे गीत उपलब्ध आहे.अलबमचे शीर्षक आहे '#रे_मना!

https://youtu.be/kCYnWcTeP5o?si=6fFq1WZ2B0p86xTu


                 #मैफल 


रे मना, तुज काय झाले सांग ना!

का असा छळतो जीवाला सांग ना!


हारण्याचीही मजा घे एकदा

जिंकुनी तुज काय मिळते सांग ना!


हासुनी हसवायचा हा मंत्र घे

दुःख का कुरवळतो तू सांग ना!


सूर लावून गुणगुणावे गीत हे

ते नि तू का वेगळा रे सांग ना!


गीत/संगीत - सुधाकर कदम

गायक - मयूर महाजन

तबला - किशोर कोरडे

सरोद -नितीश पुरोहित




Tuesday, August 19, 2025

गझलेचे उपयोजित छंदःशास्त्र...डॉ.श्रीकृष्ण राऊत



मित्रहो,

गझलेच्या आकृतिबंधाची सांगोपांग चर्चा करणारे पुस्तक सुरेश भटांना लिहायचे होते.या संदर्भात आमची अनेकदा चर्चा झाली होती.'#गझलनामा ' असे त्या पुस्तकाचे शीर्षकही त्यांनी निश्चित केले होते. पण पुस्तक लिहिण्याएवढी सवड आयुष्याने त्यांना दिली नाही. तो ड्रिमप्रोजेक्ट पूर्ण करण्याचे काम नियतीने मित्रवर्य श्रीकृष्ण राऊत याचेकडून करवून घेतले. पुसदच्या संमेलनात दि.१७ ऑगस्ट २५ ला नुकताच प्रकाशित झालेला 'गझलेचे उपयोजित छंदःशास्त्र ' हाच श्रीकृष्ण राऊत याचा तो ग्रंथ होय.

      श्रीकृष्णाचा गझललेखनाचा अनुभव प्रदीर्घ आहे. तेवढाच त्यांचा छंदःशास्त्राचा व्यासंगही दांडगा आहे.या ग्रंथात त्यांने संस्कृत छंद:शास्त्र आणि फारसी छंदःशास्त्राची केलेली तौलनिक चिकित्सा हे त्यांचे मौलिक योगदान आहे.गझललेखनातील अनेक बारकावे जसे की, वृत्त निवडताना घ्यावयाची दक्षता, वृत्तामधील यतिस्थान, वृत्तातील लवचिकता, वृत्तात उपयोजिलेल्या शब्दांच्या उच्चाराची ओढाताण ह्याबद्दल त्यांनी सोदाहरण केलेल्या सूचना अत्यंत उपयुक्त आहेत. काफियांचे प्रकार, काफियांची पुनरावृत्ती,काफियांचे दोष या विषयी त्यांनी केलेले वस्तुनिष्ठ विश्लेषण मराठी गझलेला समृद्ध करणारे आहे. सुबोध भाषा हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे. गझल ह्या सशक्त काव्यप्रकाराबाबत नवोदित आणि ज्येष्ठांच्या मनात अनेक शंका येतात, उदा. मात्रावृत्ते, स्वरकाफिया, दीवान इ. अशा शंकांचे निरसन करणारा हा ग्रंथ, गझलप्रेमी, गझलकार, गझल अभ्यासक या सर्वांसाठीच अत्यंत मौलिक ठरणार आहे. तसेच ज्यांना गझल लिहिण्याचं वेड असते आणि ज्यांचे खयालही दर्जेदार असतात परंतु कुठेतरी ज्यांच्यापुढे गझल-व्याकरणाच्या मापदंडावर गझल खरी उतरली आहे की नाही असा संभ्रम जेव्हा उपस्थित होतो,त्या सर्व गझल लिहिणाऱ्यांसाठी सुस्पष्ट दिशा दाखविणारा आहे.

     मराठीमध्ये छंद:शास्त्राच्या उपयोजनाच्या अंगाने सांगोपांग व सुस्पष्ट असे लेखन आजवर क्वचितच झाले आहे. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात (सन १९२७) डॉ. माधवराव पटवर्धन (कविवर्य माधव जुलियन) यांनी प्रथमच “#छंदोरचना” हा ग्रंथ लिहून मराठीला छंद:शास्त्राची भक्कम परंपरा दिली.त्यामुळे गझल या प्रकाराचा परिचय मराठीत करून देण्याचे श्रेय डॉ. माधवराव पटवर्धन यांना जाते. नंतर कविवर्य सुरेश भट यांनी या प्रकाराला नवे व्याकरण, नवी अभिव्यक्ती आणि लोकमान्यता दिली. मात्र, त्यांनी अपेक्षित स्वरूपातील उपयोजित छंदशास्त्र प्रत्यक्षात उभे करू शकले नाहीत.त्याची कमी श्रीकृष्णाच्या या  ग्रंथाचे भरून काढली आहे.

     या ग्रंथात कुठेही अवघड किंवा किचकट शास्त्रीय मांडणी नाही. सोप्या, सरळ आणि सुस्पष्ट भाषेत गझलेच्या अंतरंगाबरोबरच बहिरंगाचे विवेचन करण्यात आले आहे. त्यामुळे या ग्रंथाचे मूल्य अधिकच वाढते. पूर्वसूरींचा मान ठेवूनही श्रीकृष्ण राऊत याचा हा ग्रंथ समकालीन गझलकारांसाठी निश्चितच मार्गदर्शक ठरेल याची मला खात्री आहे.


-गझलगंधर्व सुधाकर कदम

सी१सी/१३,गिरीधर नगर

मुंबई बंगलोर महामार्ग

वारजे माळवाडी

पुणे ४११ ०५८

मोबाईल ८८८८८५८८५०

--------------------------------------------------------------------------

□ गझलेचे उपयोजित छंदःशास्त्र 

( मराठी गझलेचे व्याकरण )

□ लेखक : श्रीकृष्ण राऊत

□ स्वयं प्रकाशन, सासवड, पुणे 9890811567

□ मुखपृष्ठ : सतीश पिंपळे, अकोला 9850199323

□ प्रस्तावना : डॉ.अविनाश  सांगोलेकर

□ पाठराखण - सुरेशकुमार वैराळकर,

□ पृष्ठे : २७६

□ किंमत : ४००/-

□ पोस्टेज : ६५/-

□ गुगल पे / फोन पे :9284253805

□ व्हॉटसअप नं. 8668685288

Friday, August 15, 2025

श्रीकृष्ण राऊत यांना हार्दिक शुभेच्छा!

दि.१७ ऑगष्टला पुसद येथे संपन्न होत असलेल्या गझल मंथन साहित्य संस्थेच्या एक दिवसीय विदर्भ स्तरीय गझलसंमेलनाचे अध्यक्षपद माझा जिवलग मित्र डॉ.श्रीकृष्ण राऊत भूषवत आहे.त्याबद्दल त्याचे मनःपूर्वक अभिनंदन! तसेच याच संमेलनात श्रीकृष्णाने गेली २५ वर्षे अत्यन्त परिश्रम घेऊन लिहिलेल्या #गझलेचे_उपयोजित_छंदशास्त्र (मराठी गझलेचे व्याकरण) ह्या अत्यन्त महत्वाच्या ग्रंथाचे प्रकाशन होत आहे.त्याबद्दल त्याला आणि गझल सम्मेलनाला माझ्या हार्दिक शुभेच्छा! 
                                🌹💞🌹


 

तुझ्यासाठीच मी...राग यमनपर आधारित मराठी गझल

●अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडल प्रकाशन,
'#संगीत_कला_विहार', अगस्त २०२५.#राग  #यमन

     यमन राग के नाम के बारे में कई सारी भिन्न भिन्न राय हैं। कुछ लोग इसे फारसी भाषा के 'इमन' का यमन में हुआ बदलाव मानते हैं। उसी तरह यह राग अमीर खुसरो नाम के अल्लाउद्दीन खिलजी के समय के विद्वान संगीतकार ने प्रचलित किया है ऐसा भी माना जाता है। यह बात निश्चित है कि खुसरो के समय में नये नये राग प्रचार में आ गये। इन में फारसी, इरानी सुरावटें और भारतीय रागों का मिलाप हो गया था। गोपाल नायक यह संगीत का एक बड़ा विद्वान खुसरो का समकालीन था। दक्षिण के पंडित यमन राग यह 'यमुना कल्याण' राग का एक प्रकार समझते है। इस नाम का उल्लेख दक्षिण के ग्रंथों में भी है लेकिन यमुना कल्याण और यमन इन दो रागों में नाम के सिवा और कोई भी समानता नहीं है। भातखंडे जी ने लिखे हुए उत्तर भारतीय संगीत शास्त्र इस ग्रंथ में यह राग कल्याण ठाटसे उत्पन्न हुआ है ऐसा लिखा है, लेकिन भातखंडे जी का पुरा आदर करके में यह कहना चाहता हूं कि इसका भी कुछ आधार नहीं है। (मेरी बात कई लोगों को पसंद नहीं आयेगी) लेकिन पुराने ग्रंथों में भी यमन नाम के राग का कहीं भी जिक्र किया हुआ नहीं दिखाई देता है। और किसी एक शब्द से इस राग का नाम आया है ऐसा भी लगता नहीं क्यूँ कि राग निर्मिती यह एक प्रक्रिया आहे. जो अचानक से होनेवाली नहीं है।

     कुछ लोग इसे यमन कल्याण भी बोलते हैं लेकिन इस में भी कुछ खास अर्थ नहीं है। यमन राग में विवादी सुरों की तरह कभी कभी कोमल मध्यम लगाने से वह यमन कल्याण हो जाता है। इसे भी किसी ग्रंथ का आधार नहीं है। इस प्रकार एक स्वर बदल कर या एक सूर जादा लगाकर या फिर विवादी के स्तर पर किसी अलग सूर का प्रयोग करके वह प्रचलित करना ऐसे कई उदाहरण हमें दिखाई देते हैं लेकिन वो सब छोड़ दिजीये। इसके बावजूद भी यमन राग बहुत लोकप्रिय है इसमें कोई संदेह नहीं। मैं तो इसे 'पैदाइशी अमीर' राग कहता हूं। इस पर अगर लिखा जाये तो सुरज, सागर, अवकाश या धूमकेतू पर लिखने जैसा है। इतना बड़ा विस्तार रखनेवाला दूसरा कोई राग मैंने कभी देखा नहीं। वैसे भी मेरी राय के मुताबिक 'कल्याण' नहीं, बल्कि यमन यही ठाट होना चाहिये और इसे ही शुद्ध ठाट की मान्यता मिलनी चाहिये थी। क्यूंकि इसमें सात ही स्वर शुद्ध याने तीव्र है। शुद्ध ठाट कहलाने जानेवाले बिलावल ठाटके कोमल मध्यम और कोमल निषाद का उपयोग विद्यार्थियों को सोचने पर मजबूर कर देता है।

(शास्त्र के नाम पर यही सिखाया जाने के कारण उस पर कोई बातें नहीं बनाता, यह बात अलग। वैसे भी बोलने से फायदा क्या? परीक्षा में वहीं लिखना पड़ेगा नहीं तो गुण कम हो जायेंगे।) लेकिन यमन के बारे में ऐसा संभ्रम नहीं होता।

◆ शास्त्रीय जानकारी

    पिछले 200 से लेकर 250 बरसों तक चलते आ रहे उत्तर भारतीय संगीत शास्त्र के अनुसार यमन राग कल्याण ठाटसे उत्पन्न हुआ है। वादी स्वर गांधार और संवादी स्वर निषाद है। जाती संपूर्ण है और गान समय रात का पहला प्रहर है। गान समय पर मैंने इससे पहले भी संक्षेप में लिखा हुआ है. लेकिन इस बार विस्तार से लिख रहा हूं। देखा जाये तो राग का गानसमय कौन सा होना चाहिये यह तय करने के लिए कोई भी नियम प्राचीन ग्रंथों मे लिखे हुए नहीं है। फिर भी राग का गानसमय निश्चित कर दिया गया है। इसका कारण क्या है. पता नहीं। जहां प्राचीन ग्रंथों में रागों के नाम और आज के रागों के नाम में समानता नहीं है. सुरो ने समानता नहीं है. वहां गान समय किस प्रकार से और कौन निश्चित करेंगे? कुछ तो शास्त्रीय नियम होने चाहिए, इसलिये उन्हें जारी करना इससे ज्यादा इसमें कोई अर्थ नहीं दिखाई देता। किसी भी मनुष्य ने गाना कब गुनगुनाना है और क्या गुनगुनाना है यह बात किसी और ने निश्चित करने से क्या हासिल होगा? अभी जो ठाट पद्धती चल रही है, उसके बारे में सोचा जाये तो मधुवंती जैसा राग ठाट पद्धती में गाना असंभव है। फिर दस से बढ़कर ग्यारह ठाट करके उस ग्यारहवे ठाटको अगर मधुवंती नाम दिया जाये तो क्या बिगडेगा? लेकिन नहीं, दस ठाटों में ही किसी भी तरह से तोड़ मरोड़ के सभी रागों को उसमें ही बांधना... यह थोडा निसर्ग नियमोंसे हटकर लग रहा है। हिंडोल, गौडसारंग, तोडी, मुलतानी इन रागोंमें तीव्र मध्यम है और इन्हें दिन में गाये जानेवाले रागों की मान्यता दी गई है। नियम के अनुसार देखा जाये तो तीव्र मध्यम होनेवाले राग केवल रात के समय ही गाये जाने चाहिये। एक और ऐसा भी नियम है कि 'ग' 'नी' कोमल होनेवाले रागों में तीव्र मध्यम होता ही नहीं। फिर कोमल ग और नि के साथ तीव्र म होने वाले सुरावटके राग को मधुकंस कैसे कहा जाता है? सच में देखा जाये तो राग के गाने के नियमों को बहुत पहिलेसे ही बाजूमेही रखा है, यह हमें 'दर्पण' इस ग्रंथ के-

"यथोत्काल एवैते गेया पूर्विधानतः ।
राजाज्ञया सदागेया नतु कालं विचारयेत् ।।

और 'तरंगिनी' इस ग्रंथ के

"दशदंडात्परं रात्रौ सर्वेषां गानभीरीतम्। 
रंगभुमौ नृपाज्ञायां कालदोषो न विद्यते ।।

साथ साथ श्रीमान बॅनर्जी के 'गीत सूत्रसार' (Grammer of vocal music) ग्रंथ के 58 पच्चे पर उन्होंने लिखा है...

"हमारे यहाँ राग रागिनीयों को दिन तथा रात्री के नियमित समयों पर गाने की जो प्रथा चली आ रही है, वह केवल काल्पनिक है।"

      इससे भी गान समय प्रथा में जो खोखलापन है वह साफ साफ दिखाई देता है। देखा जाये तो स्वरसमुदाय में ऐसी कोई विशेषता नहीं है कि जिसके लिए उन्हें कुछ खास समय के लिये न गाने से सुयोग्य परिणाम नहीं मिल जाता। संगीत का उद्देश सुरों के द्वारा भावना व्यक्त करके श्रोताओं का मन प्रसन्न करना केवल इतना ही है। इसका अर्थ यही है कि इसके लिये किसी विशिष्ट समय की कोई आवश्यकता नहीं है। जो भाव सुबह के समय व्यक्त हो सकते हैं या व्यक्त कर सकते हैं, वे शाम या रात के समय क्यूँ नहीं कर सकते? बिलकुल कर सकते हैं, सकना ही तो चाहिये। 'पारिजात' इस ग्रंथ में भूपाली राग सुबह के समय गाया जाता है ऐसा जिक्र है लेकिन आजके समय में वह रात्र कालीन माना जाता है।

(घनश्याम सुंदरा... यह भूपाली राग की धुन सुबह बहुत मधुर लगती है ना? सुबह के अहिर भैरव राग का 'पूछो ना कैसे मैने रैन बिताई'... यह चित्रपट का गाना रात को मन मोह लेता है ना?)

दक्षिण भारत में यमन राग सुबह के समय और भैरवी रात के समय गायी जाती है। लेकिन कुछ लोगों की राय ऐसी है कि ललित, रामकली, तोडी ऐसे राग शाम के समय गाने से गानसिद्धी बहुत अच्छे तरीके से हो जाती है। इसका मतलब यह है कि गान समय यह प्रकार याने लोगों पर बिना वजह डाला हुआ बोड़ा है। स्वर आखिर स्वर ही होता है, राग आखिर राग ही होता है, किसी श्री समय गा लेने से उसका परिणाम उतनाही असरदार होता है।

     ये बाकी चीजें छोड दिजीये, क्योंकि सच्चाई यह है कि यमन राग किसी भी हाल में सभी का पसंदीदा राग है। इसकी विशेषता यह है कि प्रतिभाशाली गायक, वादक और संगीतकारों पे यह बहुत कम समय में प्रसन्न हो जाता है और उन्हें मनचाहा वर भी दे जाता है। लेकिन अगर कोई इसमें यहाँ वहाँ भटक गया तो उसका मजाक उड़ाया जाएगा यह बात तो तय है। आपको अगर यमन गाना आ गया तो बाकी सब राग आप गा सकते हैं ऐसा बुजुर्ग लोक कहते हैं। इस राग को गाया नहीं ऐसा एक भी गायक या बजानेवाला ढूंढना केवल ना मुमकिन है. इतना यह मधुर है। भारत में सभी भाषाओंमें मिला कर जितने गाने इस राग में बने हैं, उतने गाने किसी अन्य राग में अब तक नहीं तय्यार हुए। सुगम संगीतकारों के लिए तो यह राग एक वरदान की तरह है। मन की किसी भी भावनाको इस राग के द्वारे हम पुरी ताकत से व्यक्त कर सकते हैं, इतनी क्षमता राग यमन में है। यह एक संगीतकार के नाते में विश्वास के साथ कह सकता हूं।

     मैंने की हुई यमन रागकी विविध मूड़ की रचनाओं पर कोल्हापूर के संगीत समीक्षक एडवोकेट राम जोशीजी (जो आज इस दुनिया में नहीं हैं) के एक लेखांक का छोटासा हिसा यहाँ प्रस्तुत करने का मोह में नहीं टाल सकता।

जोशी जी कहते हैं.....

यमन यह ऐसा राग है कि हर कोई संगीतकार उससे मोहब्बत कर बैठता है। कदमजी भी उससे कैसे परे होंगे? उन्होंने यमन राग में बहुत ज्यादा रचनाएं प्रस्तुत की है लेकिन फिर भी हर एक रचना स्वतंत्र है. अलग है, वो किसी एक छप्पे में से निकली हुई भगवान की मुर्तियां नहीं है। हर एक धून को उसका अलग चेहरा है, रंग है, रूप है, व्यक्तित्व है। किसी भी कार्यक्रम की शुरुआत वे खुद के लिखे इस काव्य से करते हैं।

'सरगम तुझ्याचसाठी गीते तुझ्याचसाठी 
गातो गझल मराठी प्रिये तुझ्याचसाठी'

दादरा की इस बंदिशकी यमन राग में यह रचना एकदम सिधीसाधी। सुगम संगीत में, शास्त्रीय संगीत के व्याकरण और नियमों को कोई भी स्थान नहीं। यहाँ केवल अपेक्षा है कि जो कुछ भी कानों पर पड़ता है उसमें सुंदरता, मधुरता और मोहकता होनी चाहिये। इसलिये यह बात सरल है कि यहाँ शुद्ध यमन खोजने का प्रयास मत कीजिये। क्यूंकि वह यमन, कल्याण के साथ पलभर में दोस्ती कर लेता है और जब इन दोनों ही माध्यमों के हलके से मिलाप की नजाकत जब समझ में आती है, तो बिना झिझक़ उसे दाद दिए बगैर और कुछ श्रोताओंके हाथों में नहीं रहता। यह अनुभूती मैंने उनके हर एक यमन में ले ली है और हमेशा लेता रहूंगा।

मी असा ह्या बासरीचा सूर होतो, 
नेहमी ओठांपुनी मी दूर होतो'

इस गजल की धुन भी उसी तरह की है। धृपद की दुसरी पंक्ती जिसे क्रॉस लाईन कहा जाता है, उसकी रचना और स्वर समूह की रचना बहुत ही मधुर है। उस में 'सूर होतो' यहाँ पर तीव्र सप्तक के षड्‌ज सूरका इस शब्द के लिए इतनी नजाकत से उपयोग किया ही है, साथ ही वह पंक्ती गाते समय 'सूर' यह शब्द और तीव्र षड्‌ज का हलका लेकिन फिर भी ठोस लगाव और रूपक ताल का एक पुरा ज्यादा आवर्तन पूर्ण होने तक जो लंबे रामय तक ठहर जाता है वह अतिसुंदर लगता है। संगीत रचनाकार के पास केवल सांगीतिक अलंकारोंका खजाना होने से काम नहीं चलता बल्की सूर के पोशाख को अच्छा लगे ऐसा केवल एकही अलंकार संगीत का श्रवण सौंदर्य बढ़ाता है। संगीतकार सही मायने में खुद की रचना खुद के पुरे सामर्थ्य के साथ और अपेक्षित परिणाम के साथ गा सकता है। यह अनुभव मास्टर कृष्णराव से लेकर सुधीर, श्रीधर फडके, वसंत पवार, राम कदम यशवंत देव इन सभी के साथ महसूस होता है। सुधाकर कदम खुद गायक होने के कारण वे भी इस बात को अपवाद नहीं है। 'सूर होतो' यहाँ पर शब्दकला और स्वर मधुरता इन दोनों के एक अनोखे, सुंदर मिलाप का अनुभव आता है।

'सांज घनाच्या मिटल्या ओळी'

यह भी एक बहुत ही कोमल भावनाओंको खोलकर दिखानेवाली सुंदर काव्यरचना है। कदमजी ने बंदिश भी यमन में ही बांधी है। इसकी क्रॉस लाईन के आखिर में 'क्षितिजावरती' यहाँ पर उन्होंने नि और कोमल ऋषभ का बहुत ही कुशलतापूर्ण उपयोग करके यमन की पुरी व्यक्तिरेखा बदल डाली है। इतना ही नहीं, उस ऋषभ की योजना के कारण 'क्षितिज' इस शब्द का अर्थ प्रतीत करने के लिए कोमल रिषभ को अन्य कोई पर्याय नहीं है यह तुरंत ही समझ में आता है। पुरीया रागका इसमें होनेवाला दर्शन और साथ ही अंतरे के बाद आनेवाली सुरावट यह सब बहुत अच्छे तरीके से मेलजोल खाती है। सुप्रसिद्ध कवी अनिल कांबलेजी के-

'जवळ येता तुझ्या दूर सरतेस तू
ऐनवेळी अशी काय करतेस तू'

सुनाई। लेकिन खासियत यह है कि उससे वही धून इस गीत की तर्जभी यमन में ही बांधी है। यमन की बहुत ही चुलबुली स्वररचना खेमटा के अंग से लगनेवाला दादरा का ठेका, लय थोड़ी उड़ती उड़ती और इसलिये उसे विशिष्ट अर्थ देनेवाली, इस गीत को बहुत सही न्याय देती है। सौंदर्य स्थलोंका निर्देश करने की इच्छा हो तो 'ऐनवेळी अशी काय' इस पंक्ती की अधीरता दर्शाने के लिये बहुत ही सुयोग्य ऐसी स्वर समूह रचना करना बिलकुल ठीक होगा। 'सामग, सामगधप आदी का आनंद अपने आप ही अनुभव करने योग्य है। 'तुझ्या नभाला गडे किनारे' यह भी यमन की एक श्रवणीय रचना है। यमन इस एकही राग की चारों रचनायें उन्होंने मुझे एक के बाद एक सुनाई।लेकिन खासियत यह है कि उसमे वही धुन 
बार बार नहीं दोहराई है। स्वर रचना एक जैसी बिलकुल भी नहीं है, उसमें एक अलगपन है, जो किसी भी श्रेष्ठ संगीत रचनाकार की विशेषता मानी जाती है। सुगम संगीत में आकर्षक मुखड़े को याने धृपद को विशेष महत्व है। कदम जी की स्वररचनाओं के मुखड़े बहुतही आकर्षक होते हैं। उससे भी ज्यादा कुशलता और महत्व होता है, वह मुखड़े के बाद आनेवाले क्रॉसको। क्यूंकि संगीत रचना की आकर्षकता का वह प्रमुख स्थान है। मुखड़े की धुन को अनुरूप या फिर उससे भी आगे जाकर उसका सौंदर्य बढानेवाली आरोही पुरी करके अवरोही और षड्ज पर विराम होनेवाली स्वररचना, यह काम बहुत कठीन होता है। अगर ऐसा नहीं होता तो पुरी धून फंस जाती है। कई संगीत रचनाओं में ये दोष दिखाई देते है। संगीतकार को अपनी पुरी बुद्धी यहाँ पर खर्च करनी पडती है। सुधाकर कदम जी की रचनायें इस कसौटी पर पुरी उतरती है और इसीलिए वे मन को मोह लेती है। अंतरे के बाद आनेवाली धुन पहली धुनके हाथ में हाथ डालकर आगे बढ़ती है। किसी अन्य राग को जाते जाते धीरेसे स्पर्श करना याने शहद की अंगुली चखने जैसा बड़ा ही मधुर होता है। अर्थ यही है कि अंतिम पंक्तियां पुरी तरह से हायलाईट का उजाला कर देती है। बिलकुल उसी तरह की स्वररचना भी कदम जी बड़े सामर्थ्य से कर दिखा देते हैं। यमन एक ही, लेकिन उसके रूप हजार, उसके रंग हजार और उसके ढंग भी हजारों और उसकी यह अनोखी अदाकारी जिसे हम मोहजाल या मायाजाल कह सकते हैं, जब हम पर डाला जाता है तब खुद माहीर रसिक होकर भी हम फंस जाते हैं। बाद में समझ आता है कि यह यमनने किया हुआ कपट था लेकिन फिर भी वह कपट बहुत ही मधुर था और मासूम भी था।

     यमन राग अभंग से लेकर लावणी तक के सभी प्रकारों में रंग जाता है या दुसरों को रंगाता है। मराठी भाषा में करीब करीब सभी संगीतकारोंने इसमें स्वररचना की हुई है। अगर उनकीं एक लिस्ट बनाई जाये तो फिर वह एक बडा लेख होगा। फिर भी कुछ रचनाओं का जिक्र किये बिना यह लेख पुरा नहीं होगा।

'घूंदी कळ्यांना...

'का रे दुरावा...'

'पराधीन आहे जगती....

'तोच चंद्रमा...'

'पिकल्या पानाचा देठ की ग हिरवा..."

'कबीराचे शेले विणतो...'

'सुखकर्ता दुखहर्ता... (आरती)'

'जिये सागरा धरणी मिळते...'

'जीवनात ही घडी...'

'शुक तारा...'

'तिन्ही सांजा सखे मिळाल्या...'

साथही कई नाट्यगीत भी इसमें शामील है। उसने अभिषेकी बुआ का मत्स्वगंधा नाटक के लिये रचा हुआ स्वरशिल्प 'देवाघरचे ज्ञात कुणाला...' हुये बहुत पसंद है। गाया है रामदास कामतजी ने। हिंदी चित्रपट सृष्टी में भी यमन ने धूम मचायी है। सैगल के 'मैं क्या जानू क्या जादू है..." से लेकर आज के 'तुम दिल की धड़कन हो... तक.... इसमें सुंदर सुंदर गीत है।

... 'मन रे तू काहे न धीर धरे.....

'जिया ले गयो...'.

'जा रे बदरा बैरी जा.....

'वो हँसके मिले हमको.....

'पान खाये सैयाँ.....

'इस मोडपर आते है.....

'चंदन सा बदन...'.

'आँसू भरी है.....

जब दीप जले आना....
ऐसे कितने गानोंकी बात करेंगे...?

उर्दू ग़ज़ल में 'रंजिश ही सही....' यह ग़ज़ल याने मिलोंका पत्थर है। साथ में 'वो मुझसे हुये..... 'शाम-ए-फ़िराक...' ये गजलें और 'आज जाने की ज़िद ना करो...' यह फ़रीदा खानम की गायी हुई रचना याने कमाल की उंचाई।
'मरीज़े मुहब्बत...', 'दिलवालों क्या देख रहे हो...' ये गुलाम अली की गजलें अपना अनोखा रंग दिखाती है।
'क्यूँ मुझे मौत के पैग़ाम दिए जाते है...' (शोभा गुर्टू), 'तुम आए हो तो शबे इंतज़ार गुजरी है...' (इकबाल बानो), 'आपका इंतज़ार कौन करे...' (शुमोना राय) ये गजलें भी बहुत श्रवणीय है। उर्दू गझल गायक मेहदी हसन साहबने गायी हुई अहमद फ़राज़ की 'रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिए आ...' इस गजल ने लोकप्रियता के सारे झंडे उखाड दिए। (देखा जाये तो यह गीत (गझल) 1972 की 'मोहब्बत' इस पाकिस्तानी फिल्म का है और इसके संगीतकार निसार बज्मी हैं। लेकिन खां साहब ने महफिल में गाकर इस रचना का सोना किया) इस गजल के साथ साथ यमन राग की लोकप्रियता (गजल गायन के संदर्भ में) आसमां को छू गई। पहले से ही मधुर होनेवाले इस राग में फराज साहब के शब्द, खौँ साहब की भरीपुरी मिठी आवाज और उन शब्दोंको जचनेवाली, बिनती करनेवाली बंदिश इस प्रकार का बहुतही उंचे दर्जे का संगम इसमें दिखाई देता है।

     ऐसी ही बिनती मैंने स्वरबद्ध की हुई तुझ्यासाठीच भी इस अलबम के 'तुझ्यासाठीच मी....... इस गजल में आपको दिखाई देगी। (अर्थात सच्चे परीक्षक आपही हैं) ऐसा यह यमन.... तो फिर सुनिए... केवल मध्य और मंद्र सप्तक की यह बंदिश, वैशाली माडे की आवाज में..

तुझ्यासाठीच मी माझे तराणे छेडले होते
तुझ्यासाठीच स्वप्नांचे दिवे मी लावले होते

-सुधाकर कदम

हिंदी अनुवादः डॉ. आरती मोने


 

Tuesday, July 22, 2025

 .                  #साठवणीतील_आठवण


१९८० मध्ये जेव्हा सुरेश भट आणि मी मराठी गझल व गझल गायकीच्या प्रचार,प्रसारासाठी महाराष्ट्राच्या भ्रमंतीवर निघालो होतो, तेव्हाच्या अगदी सुरवातीच्या काळात सुरेश भटांच्या उपस्थितीत गायिलेली ही गझल आहे. मी स्वतः हार्मोनियम वाजवून गात असल्यामुळे त्या काळी तबला वादक तालमणी प्रल्हाद माहुलकर आणि मी,असे दोघे मिळून कार्यक्रम करायचो.त्यावेळच्या ध्वनिव्यवस्थापकाने कॅसेटवर  हे ध्वनिमुद्रण केले होते. कॅसेटवरून कसेबसे कॉम्प्युटरवर उतरवले.ते आपणासमोर सादर आहे.आवडण्या न आवडण्याचे स्वातंत्र्य आपणास आहे.चांगली असो वा वाईट,आपली प्रतिक्रिया मात्र आवश्यक.


सूर्य केव्हाच अंधारला यार हो

या नवा सूर्य आणू चला यार हो


हे नवे फक्त आले पहारेकरी

कैदखाना नवा कोठला यार हो


जे न बोलायचे तेच मी बोलतो

मीच माणूस नाही भला यार हो


ओळखीचा निघे रोज मारेकरी

ओळखीचाच धोका मला यार हो


आज घालू नका हार माझ्या गळा

मी कुणाचा गळा कापला यार हो


-#सुरेश_भट


●heasphone please...

 .                            #अर्चना 

                #साठवणीतील_आठवण 


१९८०/८१/८२ या काळात पुण्यातील तेव्हाचे नवोदित, समवयस्क गझलकार इलाही जमादार,अनिल कांबळे,

म.भा.चव्हाण,रमण रणदिवे,प्रदीप निफाडकर,दीपक करंदीकर वगैरे वगैरे मंडळी मी महाराष्ट्रातील एकमेव मराठी गझल गायक असल्यामुळे फार सलोख्याने,

मित्रत्वाच्या नात्याने वागायचे.यातील बहुतेकांच्या रचना स्वरबद्ध करून माझ्या कार्यक्रमात गायिलो आहे.सुरेश भट आणि मी,आम्ही विदर्भ,मराठवाडा,पश्चिम महाराष्ट्र पिंजून काढल्यानंतर,  पुण्यात माझे महाराष्ट्र साहित्य परिषद,फर्ग्युसन कॉलेज,राजवाडे सभागृग,गांधर्व संगीत विद्यालय असे अनेक कार्यक्रम होत गेले. पुढे १९८४ नंतर कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढल्यामुळे आर्णी ते पुणे,मुंबई संपर्क हळू हळू कमी झाला. महाराष्ट्र शासनाच्या #गीतमंच विभागासाठी बरीच गाणी स्वरबद्ध करून दिल्यामुळे 'रिसोर्स पर्सन' म्हणून व बालचित्रवाणी करीता गाणी रेकॉर्ड करायची असल्याने अधून मधूम पुण्यात येणे होत होते.

      २००३ मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेऊन पुण्यात स्थायिक झालो तेव्हा वरील काही मंडळी 'प्रतिथयश' या पदाला पोहोचली होती.मी अनेकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला परंतु यातील एक-दोन सोडले तर सर्वजण आपल्या तोऱ्यात असलेले दिसले.म्हणजे खास पुणेरी...तरी पण सगळ्यांनी एकत्र यावे म्हणून दर महिन्याला 'गझलकट्टा' आयोजित करायचो.प्रतिसाद चांगला मिळायचा पण आर्थिक झळ मात्र मलाच बसायची.याच दरम्यान बालचित्रवाणीला असलेले मित्र विकास कशाळकर यांना काही बालगीतं स्वरबद्ध करून हवी होती.(या अगोदर मी आर्णीला असताना कुमाग्रजांचे 'महाराष्ट्रगीत' व विंदा करंडीकरांचे 'उठ उठ सह्याद्रे' ही दोन गीते बालचित्रवाणीकरिता त्यांनी माझ्याकडून स्वरबद्ध करून घेतली होती.) त्यांनी मला विचारले.मी होकार दिला.व मीरा सिरसमकर यांची दोन गीतं नेहा दाऊदखाने (सध्याची नेहा सिन्हा) या बाळ गायिकेकडून गाऊन घेतली.ही गाणी माझ्या वेगळ्या बाजामुळे छान झाली.त्यावरून सिरसमकरांच्या डोक्यात बालगीतांचा अलबम करण्याची कल्पना आली.आणि मग 'खूप मजा करू' हा बालगीतांचा अलबम आकाराला आला.फाउंटन म्युझिक कंपनी तर्फे तो बाजारात आला.पुण्यात आल्यानंतरचे हे माझे पहिले काम होते.

      आर्णीला असताना नागपूरच्या कवयित्री आशा पांडे यांची गीते-भक्तिगीते वर्तमानपत्रांमधून प्रकाशित व्हायच्या.त्यांच्या ओघवती लिखाणामुळे परिचय नसतानाही मी अनेक गीते स्वरबद्ध करून संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून गाऊन घ्यायचो.गझलकार श्रीकृष्ण राऊत यांनी आशा पांडेंची ओळख होती.त्यानेच मला त्यांना भेटायला सांगितले.एकदा आकाशवाणीचे (नागपूर) ध्वनिमुद्रण संपल्यानंतर आशा पांडे यांना भेटलो.गप्पा-गोष्टी-चर्चा झाल्या त्यानंतर विषय संपला.मी पुण्यात स्थायिक झसल्यावर त्यांनी भक्तीगीतांच्या अलबमचे प्रपोजल समोर ठेवले.मी तत्काळ स्वीकारले.आणि कामाला लागलो. अभिषेकी बुवांशी जुनाच संबंध असल्यामुळे व मला थोड्याफार प्रमाणात त्यांचे मार्गदर्शन लाभलेले असल्यामुळे ते गुरुसमानच होते.आणि तसेच गाणे शौनकचे होते. म्हणून शौनक अभिषेकी आणि अनुराधा मराठे यांच्या आवाजात अलबम करायचे निश्चित केले.हे प्रपोजल घेऊन मी शौनकला भेटलो.यवतमाळच्या एका कार्यक्रमाल बुवांसोबत बालशौनक पण होता.त्यांच्या जेवणाची व्यवस्था मी बघत होतो.ती आठवण ताजी झाली.आणि शौनकचा होकार आला. अनुराधाबाई पण तयार झाल्या आणि आमच्या रिहलस सुरू झाल्या अनुराधा बाईंची प्रॅक्टीस त्यांच्याकडे व्हायची. शौनकच्या प्रॅक्टीससाठी कधी मी शौनककडे जायचो तर कधी शौनक माझ्याकडे यायचे.शौनक कडील प्रॅक्टीस विद्याताई आवर्जून ऐकायच्या.आणि प्रॅक्टीस संपली की पहिल्या मजल्यावरील संगीत कक्षातून खाली आलो की चालींवर छान छान प्रतिक्रिया देऊन प्रोत्साहित करायच्या.खरे म्हणजे माझी आणि त्यांची ही पहिलीच भेट होती.पण पहिल्या भेटीत परकेपणा जाणवला नाही.या महिना दीड महिन्याच्या कालखंडात त्यांच्याशी अनेकदा मनमोकळ्या गप्पा व्हायच्या.त्यांच्या या प्रेममय वागण्यामुळे इच्छा असूनही आर्थिक परिस्थितीमुळे व कौटुंबिक जबाबदरीमुळे बुवांकडे गुरुकुल पद्धतीने शिकू न शकल्याची खंत मनात घर करून गेली.नंतर हा अलबम पुण्यातील एलकॉम स्टुडिओमध्ये ध्वनिमुद्रित झाला.याचे संगीत संयोजन मिलिंद गुणे यांनी केले होते.मिलिंद सोबतचा हा माझा पहिला प्रोजेक्ट होता.त्यानंतर आमची जी नाळ जुळली ती आजतागायत जुळून आहे.या अलबमचे शीर्षक होते 'अर्चना'.याच्या लोकार्पणाचा भव्य सोहळा कोथरूडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात कवी  सुधीर मोघे आणि कवी गंगाधर महांबरे यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडला.हा अलबम टी सिरीजतर्फे बाजारात आला होता.वर्ष होते २००६. हा माझा दुसरा अलबम. त्यानंतर संगीतकार म्हणून माझ्या कामाने जो वेग घेतला तो आजतागायत कायम आहे.हे अभिषेकी बुवांचे व विद्याताईंचे आशीर्वादच समजतो.

Monday, May 26, 2025


 .              #उर्दू_ग़ज़ल #मेहफ़िल


मैं के तनहाई की चादर तानकर लेटा रहा

और ज़माना जाने क्या क्या दासतां कहता रहा


क्या मिला है चाँद को एक बेजुबानी के सिवा

ज़िंदगी भर जो पराई आग मे जलता रहा


ज़िंदगी मेरी है उस बेआब मोती की तरह

जो समंदर की तहो में रह के भी प्यासा रहा


शायर - हनीफ़ साग़र 

गुलुकारा - प्राजक्ता सावरकर शिंदे

मोसिकार - 'शान-ए-ग़ज़ल' सुधाकर कदम

तबला - पं. किशोर कोरडे


●mobile REC...Headphone please.

Tuesday, May 13, 2025

मैं म्मिलुंगा मिलाने से पहले...नई धून.


 

घर आहे पण दारच नाही...



               दै. हिंदुस्थान (अमरावती) मधून साभार...


      मराठी गझल हा काव्यप्रकार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेण्याचे महान कार्य करणाऱ्या ज्या दोन व्यक्तींची आदराने नावे घेतली जातात, त्यातील एक म्हणजे कविश्रेष्ठ #सुरेश_भट व दुसरे म्हणजे कवी, गझलकार, गीतकार, संगीतकार व स्फुट लेखक 72 वर्षांचे चिरतरुण श्री. #सुधाकर_कदम. दोघेही वैदर्भीय. भट अमरावतीचे तर कदम यवतमाळ जिल्ह्याचे.
दै. हिंदुस्थानच्या "#रंग_गझलेचे" या लोकप्रिय सदरात आज कदम सर प्रथम प्रवेश करीत आहे याचा मला आनंद आहे.
       गझल सम्राट स्व.सुरेश भट ज्यांचा उल्लेख 'महाराष्ट्राचे मराठी मेहदी हसन "म्हणून करतात त्या सुधाकर कदम  यांनी मराठी गझल गायकी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात  रूजविण्यासाठी,व लोकप्रिय करण्यासाठी संपूर्ण आयुष्य वेचले. "सुरेश भट स्मृती  पुरस्कार तसेच" #गझलगंधर्व " हा किताब प्राप्त कदम सरांचा १९८३ साली "भरारी " हा,पहिला मराठी गझल गीतांचा अल्बम प्रसिद्ध झाला.  "#खूप_मज्जा_करू "हा तेरा बालगीतांचा अल्बमही प्रसिद्ध  झाला आहे. गुलशन कुमार प्रस्तुत सीडी मध्ये " #अर्चना " या भक्तिगीतांची सीडीही प्रकाशित झाली आहे.गायक सुरेश  वाडकर व गायीका वैशाली माडे यांनी स्वरसाज चढवलेल्या "#काट्यांची_मखमल" या मराठी गझल अल्बमला , "#तुझ्यासाठीच_मी "या गीतकार दिलीप पांढरपट्टे यांच्या अल्बमला तसेच बालभारती ,पहिली ते चौथीच्या कविता" #झुला " व कुमार भारती आठवी ते दहावीच्या "झुला"ला सुधाकर कदम यांनी संगीत दिले आहे.वृत्तपत्रातून त्यानी "#फडे_मधुर_खावया "या सदराखाली स्फूट लेखन ही केलेले आहे.
अनेक वाद्य  वाजविण्यात पारंगत असलेल्या सुधाकर कदम यानी नागपूर आकाशवाणीचे #गायक व #वादक म्हणूनही काम केले आहे.
त्यांना   ' आऊट स्टॅडिंग यंग पर्सन', 'कलादूत', 'समाजभूषण', 'कलावंत', 'शान-ए-ग़ज़ल', 'महाकवी संतश्री विष्णुदास','गझल गंगेच्या तटावर' या व अन्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.अर्चना या त्यांच्या अल्बम मधील भक्तिगीते पंडित शौनक अभिषेकी,अनुराधा मराठे यांनी गायिलेली आहेत.
     आज त्यांची "घर आहे पण दारच नाही" ही गझल सादर करतो आहे. आस्वाद घ्यावा. प्रतिसाद द्यावा.

-अनिल जाधव Anil Jadhav 

Monday, May 12, 2025

हा असा चंद्र...गायक-मयूर महाजन...


 .                  #हा_असा_चंद्र 

     दि.१९ एप्रिलला माझ्या अमृतमहोत्सवा निमित्त झालेल्या मैफलीत गायिलेली

"#हा_असा_चंद्र_अशी_रात_फिरायासाठी" ही सुरेश भटांची  गझल, ते १९८१ मध्ये आर्णीला  माझ्याकडे मुक्कामी  असताना झाली आहे.(त्यांच्या हस्ताक्षरातील ही  गझल तारखेसह माझ्याकडे आहे.) बंदिश सुद्धा त्याच काळातील आहे.किरवाणी राग ''बेस' आहे.पण सुरवातीलाच किरवाणीत नसलेला कोमल निषाद आला आहे.पहिल्या शेरातील 'फुलांची वस्ती', दुसऱ्या शेरातील 'रंग', तिसऱ्या शेरातील 'घाव' इत्यादी शब्दांवरील वेगवेगळ्या सुरावटी त्या त्या शब्दांचा अर्थ अधोरेखित करतात.आमच्या चर्चेतून अशा अनेक गझलांना योग्य बंदिशी झाल्यानंतर "अशी गावी मराठी गझल" हा उपक्रम आम्ही दोघांनी महाराष्ट्रात  राबविणे सुरू केले.असो! 

     तर प्रत्येक शेर शब्दानुरूप नव-नव्या सुरावटींनी  रंग भरत कसा सजविल्या जातो ते ऐका. गायकी माझी,आवाज मयूर महाजनचा आणि बंदीशीची पसंती खुद्द सुरेश भटांची.

     नंतरच्या काळात अनेक गझल गायकांनी आपापल्या परीने स्वरबद्ध करून ही गझल गायिली आहे.


हा असा चंद्र अशी रात फिरायासाठी

तूच नाहीस इथे हात धरायासाठी...


चेहरा तो न इथे ही न फुलांची वस्ती

राहिले कोण अता सांग झुरायासाठी


कालचे तेच फिके रंग नकोसे झाले

दे तुझे ओठ नवा रंग भरायासाठी


नेहमीचेच जुने घाव कशाला मोजू

ये गडे आज उभा जन्म चिरायासाठी


गायक - मयूर महाजन

संगीत - सुधाकर कदम

तबला - डॉ.देवेन्द्र यादव

व्हायोलिन - प्रभंजन पाठक

हार्मोनियम - रामेश्वर ताकतोडे

की बोर्ड - आशिष कदम

सूत्र संचालन - प्रशांत पेंडसे


    ●मराठी गझल गायनाच्या सुरवातीच्या काळात हेटाळणी,कुत्सितपणे मारलेले टोमणे वगैरे ऐकत गेलो.मीच नाही तर सुरेश भटांना सुध्दा हेटाळणीला सामोरे जावे लागले.सर्व गान प्रकार शास्त्रीय संगीतामधूनच निर्माण होतात .पण ते 'फेअर' होऊन येतात.शास्त्रीय संगीतामधील सर्व चांगल्या बाबी घेऊन 'सुगम' म्हटल्या जाणारे 'दुर्गम' संगीत तयार होत असते.ते रसिकांना आवडते,कारण ते 'फाईन' होऊन येते.

     खरे म्हणजे गझल गायकाला शास्त्रीय संगीत गणाऱ्यापेक्षा जास्ती अवधानं सांभाळावी लागतात.माझे हे वक्तव्य  शास्त्रीय संगीत गाणाऱ्यांना पटणार नाही.पण ही वस्तुस्थिती आहे.गझल गायकाला शास्त्रीय संगीताचे सखोल ज्ञान असणे आवश्यक असते.त्याला साहित्याची जाण म्हणण्यापेक्षा अभ्यास असायला हवा.तो चांगला गायक असणे आवश्यकच आहे.आणि तो चांगला संगीत दिग्दर्शक पण असायला हवा.तरच तो गझल गायक बनू शकतो.माझे हे म्हणणे सुरेश भटांना तंतोतंत पटले होते.म्हणूनच आमची नाळ जुळली.व पुढील इतिहास घडला तो...

#अशी_गावी_मराठी_गझल​... इति सुरेश भट.

------------------------------------------------------

●गझलकार मसूद पटेल यांची प्रतिक्रिया...

    रसिकांच्या हृदयावर कायम अधिराज्य गाजवणाऱ्या या रचनेची निर्मिती आर्णी गावी म्हणजे माझ्या जिल्ह्यात व्हावी ही किती अभिमानाची गोष्ट आहे.कविश्रेष्ठ सुरेश भट साहेबांच्या या अजरामर रचनेला त्यांच्या समक्ष दिल्या गेलेली ही लाजवाब चाल आणि नव्या पिढीच्या नवोदित गायकाने चालीचे केलेले सोने या सर्वांचा जुळून आलेला हा योग  एका कालातीत सांगीतिक अविष्कारच्या जन्माला कारणीभूत ठरणारा आहे .

मनःपूर्वक अभिनंदन सर!

🌸🙏🌸

अमृतमहोत्सव प्रसंगी तालयोगी पंडित सुरेश तळवलकर...


 

Sunday, May 4, 2025

संपली अजूनी कुठे ही रात सजणा...


 दि.१९ एप्रिलला माझ्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित 'सरगम तुझ्याचसाठी...' या मराठी गीत-गझलच्या मैफलीतील अत्यंत सुंदर अशी गझल...


संपली अजुनी कुठे ही रात सजणा

का असा जातोस तू इतक्यात सजणा


बोलते आहे नव्या स्वप्नासवे मी

हात घे हलकेच तू हातात सजणा


पाहण्यासाठी मला झंकारताना

चांदणे खोळंबले दारात सजणा


मोहराया लागले तारुण्य माझे

दरवळाया लागला एकांत सजणा


गायिका - प्राजक्ता सावरकर शिंदे

संगीत - सुधाकर कदम

तबला - डॉ.देवेन्द्र यादव

व्हायोलिन - प्रभंजन पाठक

हार्मोनियम - रामेश्वर ताकतोडे

की बोर्ड - आशिष कदम

सूत्र संचालन - प्रशांत पेंडसे

● जोग रागाची सुरावट घेऊन आलेली अनिल कांबळे यांनी ही गझल जवळ-जवळ चाळीस वर्षांअगोदर स्वरबद्ध झाली होती.#सरगम_तुझ्याचसाठी या मी स्वरबद्ध केलेल्या गीत-गझल कार्यक्रमात माझी ज्येष्ठ कन्या भैरवी गायची. या गझलचे वैशिष्ट्य म्हणजे यात जोग रागासोबतच दुसऱ्या शेरात सारंग राग  आणि पुढे मुर्छनाद्वारे विविध रागांची उधळण केलेली दिसून येते. मूळ रचनेला स्वरांद्वारे विविध प्रकारे सजवणे म्हणजे गझल गायकी...याचा प्रत्यय ही गझल ऐकताना येते.यातील आर्जव गायकीतून दाखविणे ही प्राजक्ताची हातोटी म्हणावी लागेल.

Live - pune.19/4/2025

सरगम तुझ्याचसाठी ...


 

सरगम तुझ्याचसाठी, गीते तुझ्याचसाठी

गातो गझल मराठी, प्रिये तुझ्याचसाठी


व्याकुळ ही विराणी, गाते तुझी कहाणी

शिवरंजनी दिवाणी, प्रिये तुझ्याचसाठी


घन सावळा गरजतो, बेबंद तान घेतो

बरसून शांत होतो, प्रिये तुझ्याचसाठी


सोसून गायिले मी, गाऊन सोसले मी

आयुष्य जाळले मी, प्रिये तुझ्याचसाठी


गायक - मयूर महाजन

तबला - डॉ.देवेन्द्र यादव

व्हायोलिन - प्रभंजन पाठक

हार्मोनियम - रामेश्वर ताकतोडे

की बोर्ड - आशिष कदम

     ●ही गझल माझ्या आयुष्याची 'टॅग लाईन' आहे,असे मित्रवर्य प्रशांत पेंडसे यांचे म्हणणे आहे.आणि एकार्थाने ते सत्यही आहे.१९६५ ते १९७५ ऑर्केस्ट्रा,१९७२ पासून संगीत शिक्षक म्हणून नोकरी,१९८० ते १९८२ सुरेश भटांसोबत महाराष्ट्रभर भ्रमंती.१९८२ नंतर सोलो कार्यक्रम.यात पगार सोडला तर आर्थिक लाभ नगण्य.पण  शारीरिक त्रास मात्र भरपूर होत गेला.कदाचित हा त्रास सोसण्यातूनच ही कविता प्रसवली असावी.येताना सुरावट पण घेऊन आली.त्यातही प्रत्येक कडव्यात तीन-तीन यमक जुळवत आली.

      मी तर ही कविता गायचोच.पण माझा कनिष्ठ सहोदर प्रशांत कदम अतिशय सुंदर रीतीने गायचा.यातील "प्रिये तुझ्याचसाठी" या ओळीवरून 'ही प्रिया कोण?' अशी विचारणा व्हायची.तर, मित्रहो ही प्रिया दुसरी तिसरी कोणी नसून माझी '#मराठी' आहे.

      या गझलच्या सादरीकरणा अगोदर शाहीर सुरेशकुमार वैराळकर यांनी आपल्या मनोगतामधून काही महत्वाचे मुद्दे मांडले.तसेच नेटके सूत्र संचालन प्रशांत पेंडसे यांनी केले.

Live -  Amrutmahotsav ceremony, pune 19/4/2025





संगीत आणि साहित्य :