इंद्रियात न्हाता
सारी इंद्रायणी
पान्हावली वाणी
तुकयाची...
घनवत्स नभ
उतरता डोळी
मागोमाग ओळी
अभंगाच्या...
चंदनाचे फूल
येता वेदनेला
फुटे अक्षराला
अग्नी-पंख...
देहाच्या जात्यात
भरडता ओळी
निथळती डोळी
थेंब-थेंब...
अनाहत नादे
व्याकुळता गात्र
अत्र नि परत्र
एक विठू...
डोहाळता गाथा
आक्रंदला जीव
तरी नाही ठाव
कोणी दिला...
दीन समाधीचे
सोहळे सांगती
देहूतली माती
आसमंता...
नंदादीपा तुझी
काजळी जपत
रडतेय वात
रात्रं-दिन...
सारी इंद्रायणी
पान्हावली वाणी
तुकयाची...
घनवत्स नभ
उतरता डोळी
मागोमाग ओळी
अभंगाच्या...
चंदनाचे फूल
येता वेदनेला
फुटे अक्षराला
अग्नी-पंख...
देहाच्या जात्यात
भरडता ओळी
निथळती डोळी
थेंब-थेंब...
अनाहत नादे
व्याकुळता गात्र
अत्र नि परत्र
एक विठू...
डोहाळता गाथा
आक्रंदला जीव
तरी नाही ठाव
कोणी दिला...
दीन समाधीचे
सोहळे सांगती
देहूतली माती
आसमंता...
नंदादीपा तुझी
काजळी जपत
रडतेय वात
रात्रं-दिन...
सुधाकर कदम
तुकाराम बीज
७.३.२०१५
No comments:
Post a Comment