प्राजक्ता असो की मयूर असो, कोणतेही गीत वा गझल द्या, अगदी अंतर्मनातून आणि झोकून देत आपल्या गायकीतून एक एक शब्द रसिकांपर्यंत ताकदीने पोहोचवतात.
दोघेही संगीताचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेले रियाजी असल्यामुळे त्यांच्या आवाजाला एक वेगळीच धार आहे.हा वेगळेपणा नेहमी जाणवतोच मग ती घरगुती मैफल असो व जाहीर कार्यक्रम.संगीतकाराच्या मूळ सुरावटीला धक्का न लावता स्वतःच्या कल्पनेने शब्दानुरूप नव-नवे स्वरगुच्छ टाकून गझल रंगविणे ही दोघांची खासियत आहे. दि.२६ डिसेंबर २०२४ ला अमरावतीच्या संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात पार पडलेल्या कार्यक्रमात ही बाब प्रकर्षाने जाणवली. प्रेक्षकांमध्ये अमरावती शहरातील व बाहेर गावाहून आलेले रसिक, गायक,वादक,कवी-गझलकार मंडळी उपस्थित होती. त्यांची मिळणारी उत्स्फूर्त दाद हीच त्यांच्या गायकीची पावती होती.संपूर्ण मैफलीचा संगीतकार म्हणून ही मनःपूर्वक आलेली दाद माझ्यासाठी अत्यंत आनंददायी होती.
खालील उर्दू गझल वेळेअभावी दोन शेर घेऊनच संपवावी लागली.नेमका यावेळी प्राजक्ताचा आवाज मस्त तापला होता.गझल मित्रवर्य दिलीप पांढरपट्टे यांची 'दिन लगे है रात सा अब और काँटा फूल सा' ही होती.गझलची सुरवात एका शेराने करून प्राजक्ताने समा बांधला व पुढे गझलच्या शब्दर्थाला साजेशा मुरक्या,बेहेलावे,अचूक शब्दफेक,निखालस शब्दोच्चार अवर्णनीयच...आपण ऐका, आपणासही अनोख्या गझल गायकीची प्रचिती येईल.
रूपक तालातील या बंदिशीला पूरक अशी तबला संगत डॉ.देवेन्द्र यादव,
हार्मोनियम संगत रामेश्वर ताकतोडे,
व्हायोलिन संगत हरीश लांडगे,की बोर्डवर अतिशय संयत व अनुरूप अशी संगत आशिष कदम यांनी केली.सूत्र संचालन रफ़िक़ काज़ी यांचे होते.
दिन लगे है रात सा अब और काँटा फूल सा
ए मोहब्बत का असर है ए नहीं कोई हादसा
हम पयंबर है मुहब्बत के वफ़ा के प्यार के
जान का दुश्मन भी लगता है हमे दिलदार सा
'रिंद' की जादूगरी का ये भी पहलू देखिए
हाथ में पानी भी ले वो तो लगे है जाम सा
No comments:
Post a Comment