- ज्येष्ठ गझलकारा ज्योती बालिगा यांची खालील गझल भैरवी रागात स्वरबद्ध झाली असून, यात शुद्ध गांधार, शुद्ध धैवत आणि शुद्ध निषादाचा वापर करून बंदिश रंजक व शब्दांना न्याय देणारी करण्याचा प्रयत्न केला आहे.मतला दिपचंदी तालात व शेर रूपक तालात निबद्ध असलेल्या या गझलची सुरवातच कोमल धैवतासोबत शुद्ध गांधार घेऊन होते.दुसऱ्या मिसऱ्यात एकाच स्वरांची कोमल व तीव्र रूपे एकामागे एक आल्यामुळे (माझ्या मते) ऐकायला सोपी व गायला कठीण असलेली ही रचना प्राजक्ता सावरकर शिंदेंनी अतिशय समर्थपणे पेलून अगदी सुरेल आणि हळुवारपणे गायिली आहे.
- सादर आहे ..
भवतालच्या नजरास या चुकवून मी येऊ कशी
कुठल्या घराचा उंबरा खिळवून मजला ठेवतो
तुझिया करी उल्केपरी निखळून मी येऊ क
आली अचानक कोठुनी ही शीळ चंदेरी तुझी
माझ्या मनाच्या पायऱ्या उतरून येऊ कशी
माझ्याच श्वासांचा उभा आहे पहारा भोवती
आयुष्य हे की पिंजरा निसटून मी येऊ कशी
No comments:
Post a Comment