सुरेश वाडकर आणि वैशाली माडे यांनी गायिलेली दिलीप पांढरपट्टे यांची एक सुंदर गझल...
जीवनाचा खेळ रंगाया हवा
मांडलेला डाव मोडाया हवा
काळजाचे गीत मी गाऊ कसे ?
वेदनेचा सूर लागाया हवा
याचसाठी मी न काही बोललो
जो दिला तो शब्द पाळाया हवा
जीवघेण्या त्या निरोपाच्या क्षणी
हुंदका येईल, दाबाया हवा
जिंदगी ही शाप झाली इश्वरा
मृत्युचा उःशाप तू द्याया हवा
No comments:
Post a Comment