गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Tuesday, September 10, 2024

साहित्य वऱ्हाड' पुरस्कार...

#यवतमाळ_जिल्हा_साहित्य_संघ आयोजित साहित्य सम्मेलनातील अत्यंत मानाचा असा #साहित्य_वऱ्हाड पुरस्कार...
                            ●-●
    माननीय श्री सुधाकर कदम #गझलगंधर्व आपण मराठी गझल गायन आणि साहित्य विश्वात अमूल्य योगदान देऊन सामाजिक सभ्यतेला व संस्कृतीला एक नवे वळण दिले आहे.आपल्या अमोल कार्याची दखल घेऊन आपल्या संगीत व साहित्य कलेचा गौरव करण्यासाठी स्व.सुहासभाऊ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 'साहित्य वऱ्हाड'  पुरस्कार आपल्याला देताना आम्हाला अभिमान वाटतो आहे आणि तो आपल्याला मिळतो आहे त्यामुळे तो या पुरस्काराचाही सन्मान आहे.आपणास दीर्घायुष्य लाभो आणि आपण।आपल्या मातीतील जनतेला आपल्या गझलेनी मंत्रमुग्ध करत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

आयोजक - यवतमाळ जिल्हा साहित्य संघ.


 

No comments:





संगीत आणि साहित्य :