२०१७ मध्ये पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठात झालेल्या जागतिक मराठी गझल संमेलनाच्या एका सत्रात,मराठीमध्ये ज्या प्रमाणात गझल लिहिणारे तयार झाले त्या प्रमाणात गायक/गायिका तयार झाल्या नाहीत,अशी खंत मी व्यक्त केली होती.परंतू गेल्या चार वर्षात पुढे आलेल्या मराठी गझल गायकांची संख्या पाहून आनंदाने ऊर भरून आला.याचसाठी माझा अट्टाहास होता. मी लावलेल्या रोपट्याचा वटवृक्ष होत चालला ही मराठी गझलसाठी व माझ्यासाठीही खूप आनंदाची बाब आहे.सर्व नवोदित मराठी गझल गायक/गायिकांचे मनःपूर्वक अभिनंदन व भविष्यातील वाटचालीकरिता खूप खूप शुभेच्छा...
No comments:
Post a Comment