गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Saturday, May 2, 2015

कास्तकार...


(अष्टाक्षरी)

सरकार बदलाने
आत्महत्या न थांबल्या ।
घुसमटले शिवार,
शेते-वाड्या स्मशानल्या ॥

इथून तिथून सारे
फोकनाड्या मारणारे ।
आश्वासने देऊनिया
सामान्या फसवणारे ॥

जमीन अधिग्रहण
विधेयक ‘शंकासुर’ ।
सामान्यांच्या मुळावर
उद्योगपत्यांचा वार ॥

कृषीक्षेत्र घटताहे
त्याचे कोणा नसे काही ।
उद्योगधार्जिणी दिसे
आपली ही लोकशाही ॥

नागरीकरण असे
खरे बकालीकरण ।
राजकारण्यांसाठी हे
मतांचे राजकारण ॥

नापीक जमीनीसवे  
सुपीक जमीनीवर ।
बांधते बिल्डर लॉबी
बहुमजल्यांचे घर ॥

सार्‍या प्रश्नांच्या मुळाशी
कुणा जावेसे ना वाटे ।
फक्त खुर्चीसाठी असे
पक्षांंचे तीर-कमठे ॥

-सुधाकर कदम-
१ मे २०१५
महाराष्ट्रदिन

No comments:





संगीत आणि साहित्य :