माणसातिल खेकडे
चालताती वाकडे...
संस्कृतीचे नाव अन्
डोळियावर झापडे...
स्वच्छतेच्या नाटका
झाडु आणि फावडे...
राजकारण ज्या हवे
तेच बनती माकडे...
शांतता प्रस्थापिण्या
‘बार’ भरती बेवडे...
तत्वहीनांच्या पुढे
सत्य होई नागडे...
कोंडले भिंतीमधे
धर्म त्यांनी बापडे...
धर्म,नीती शिकविती
आश्रमातुन ‘बोकडे’...
पांघरूनी ‘नाम’ झुल
रोज खाती ‘बांगडे’...
माय ठेउन आश्रमी
मनवती ते ‘मदर डे’...
वाइटांना नेहमी
चांगल्याचे वावडे...
माणसे मुर्दाडता
अश्रु होई कोरडे...
- सुधाकर कदम -
१६.११.२०१४
डोळियावर झापडे...
स्वच्छतेच्या नाटका
झाडु आणि फावडे...
राजकारण ज्या हवे
तेच बनती माकडे...
शांतता प्रस्थापिण्या
‘बार’ भरती बेवडे...
तत्वहीनांच्या पुढे
सत्य होई नागडे...
कोंडले भिंतीमधे
धर्म त्यांनी बापडे...
धर्म,नीती शिकविती
आश्रमातुन ‘बोकडे’...
पांघरूनी ‘नाम’ झुल
रोज खाती ‘बांगडे’...
माय ठेउन आश्रमी
मनवती ते ‘मदर डे’...
वाइटांना नेहमी
चांगल्याचे वावडे...
माणसे मुर्दाडता
अश्रु होई कोरडे...
- सुधाकर कदम -
१६.११.२०१४
No comments:
Post a Comment