आयुष्याच्या चक्रव्युहातुन कधीच सुटका नसते
नियती त्याला दळण्यासाठी खूंटा मारून बसते
कुणास नसतो ठाव-ठिकाणा,कुणास नसतो गाव

स्वतंत्र त्यांना जगण्यासाठी गाव-शीवही पुरते...
ध्येय न कुठले,बंध न कुठले,सोस नसे कुठलाही
जगण्या मधली गंमत सारी विमुक्त होऊन सरते
वजा-बाकिचा हिशेब सारा मांडायासी जाता---
हातामध्ये त्याच्या केवळ शुन्य नि शुन्यच उरते...
जगरहाटिला साक्ष ठेवुनी वास्तव स्वप्ने बघता
स्वप्नांच्या त्या इंद्रधनूचे सारे रंग धुसरते...
कौतुक नाही क्षितिजाच्याही पल्याड बघणार्याचे
जन्म मृत्युच्या फेर्यामध्ये पल्याड काही नसते...
लक्ष चौ’र्यांशी योनी भोगुन पुन्हा जन्म का घ्यावा
मोक्ष जयाला म्हणती ते का असे दूरवर पळते ?
हवा दिलासा आणि भरवसा जगण्याच्या सिद्धीचा
दुर्दैवाने ललाट रेषा कणा-कणाने झिजते...
मरण मागण्या हात पसरतो अनाम शक्ती पुढती
परंतु सृष्टी पुन्हा प्रवाही होउन झर-झर झरते...

सुधाकर कदम
No comments:
Post a Comment